जे न देखे रवी...
कविता
खोल ह्रदयात उमटला, नादमय विणेचा झंकार,
सावळे रूप विठाईचे, जाहले नयनात साकार !!
मकरकुंडले डुलती कानी, पीतांबर झळके कटीवर,
वारक-यांची वाट पाहत, उभा ठाकला विठू वीटेवर !!
टाळ मृदुंगाची धून, कानी गुंजते मधुर ,
दर्शनाची ओढ लागे, पाय चालती भर्भर !!
दोन वरीस वारी नाही, आसावले भेटीस मन,
कामात चित्त लागेना, वारीतच गुंतले ध्यान !!
विठ्ठल नाम
अभंगाची गोडी
चिपळाची जोडी
विठ्ठल नाम माळी
भक्ती फुले भाबडी...
अगम्य भिंती तोडी
शरीर झोला सांडी
चराचर चैतन्य बहू
मना सुख जोडी...
वेल वाढती वाकडी
शोधे आधार बापुडी
नाही बांडगुळ हे जाण
तू बांध नामाची झोपडी...
वाट पाहून थकली
येईल मोक्ष कावडी
रोज रोज का मग
डोळ्यांत सूर्य बुडी...
-भक्ती
विठुराया.....
विठुराया....
तुझ्या प्रेमामृताच्या वर्षावात नित्य न्हाऊनही,
कोरडीच राहिली काया....
मन विषयी गुंतले निरंतर,
सोडवेना कधी माया...
क्षणामागून क्षण संपले,
जीवन जातसे वाया...
पश्चात्तापे मन तप्त,
लाभो तुझी छाया...
आता लागो तुझे ध्यान,
पडतसे मी पाया...
नको दूर लोटूस मजला,
विनविते तुज विठुराया...!!
टिपूर चांदणे
अज्ञाताच्या
ऐलतिरावर
ज्ञाताचे
ओझे खांद्यावर
वाहुनी थकण्या
आधी थोडे
पैलतिरा घालीन उखाणे
नश्वरतेचे
लेवुनी लेणे
चिरंतनाचे
गाता गाणे
शून्यत्वाच्या
अथांगातुनी
झरेल अविरत
कैवल्याचे टिपूर चांदणे
शिल्पकार !
दगडाचा जन्म देवा, कधी कुणाला नसावा..
कसे जगणे म्हणावे, चटक्यांच्या जगण्याला..
दर्याखोर्यातून कितीदा, देह घरंगळलेला..
किती युगे उलटती, फक्त वाट पाहण्याला..
कुणी लाथ घातलेली.. कुणी उशाला घेतलं..
कुठे पडतांना तुटलं.. कुठं तुटतांना फुटलं..
इतकाल्या दगडांतून, निवडक उचलतात..
अन् रुक्ष आकारातूंन एखादाच घणतात..
मी लसं घेतली... मी लसं घेतली...
(मी कात टाकली च्या चालीवर, श्री ना धो महानोरांची माफ़ी मागुन)
मी लसं घेतली... मी लसं घेतली...
मी मुडक्या क्वारंटीनची बाई लाज टाकली
मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली...
करोना काळात, करोना काळात चावंळ चावंळ चालती
भर लॉकडाउनात, तोंड लपवत चालती
करोना काळात, करोना काळात काळात ग काळात ग
मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली...
कावळा आणि लॉक डाऊन
दाटून आलेलं आभाळ पण पाऊस पडत नव्हता
उडू की नको या विवंचनेत पडलेला एक अर्धा भिजलेला कावळा
कसा बसा, शहारत, तोल सावरत गर्द आकाशाकडे बघत
चारी दिशांना काय शोधत होता कुणास ठावूक
नक्की काय करावं या विवंचनेत त्याचा चेहरा बहुधा अधिकच काळवंडलेला
शेजारच्या कावळीच्या जास्त जवळ जावं तर सोशल डिस्टंसिंग आड येणार
वेड लागले
वेड लागले सखया, जिवाला वेड लागले.
दिसलास तू , सांगू कशी , माझी न मी राहिले.
वेड लागले सखया , जिवाला वेड लागले.
जादू अशी झाली कशी , दो नयनांच्या भेटीने.
आनंद हा साठवू कसा , इवल्या या मुठीने
फूलपाखरू हो ,मन माझे , तुला धुंडताना
आभाळ हे वाटे थिटे , तूज सवे हिंडताना
स्वप्नात मी रमले अशी , हे चित्र रेखताना
प्रीत ही तुझी माझी , पाहते बहरताना
माज
स्वैर वारा खेळ खेळतो, लालबुंद मातीशी
कणकणास उंच उडवे, दूरवर आकाशी
रंग वेगळा धूलिकणांचा मिसळला नभांत
सूर्यागमनाने झाल्या दशदिशा मूर्तिमंत
डोकावे अधूनमधून कळस एका मंदिराचा
दावे जणू दिशा कुणा , जरी आसमंत धुरळ्याचा
स्वैर वारा अन कळस , स्थितप्रज्ञ भासले
रंग घेऊनि सोनेरी मात्र धूलिकण माजले
माज उतरला क्षणात आपटले धर्तीवरती
राघू
आज झालो भ्रष्ट मी
पसरले माझे दोन हात
पाठीवरती वार करुनि
केला साहेबा कुर्निसात
लावूनी चरणधूळ ललाटी
पकडून धरली गच गोटी
मागे वळूनी पाहतो तर
त्याचीही हिरवी शेपटी
कोण खोटा कोण खरा
हिशेब मनी नाही लागला
ज्याला मी साहेब समजलो
तोपण साला राघू निपजला
=======================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
वडीलांना काव्यसुमनांजली
तुमच्या जाण्याने जग सुने झाले
सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे ||
किती आठव काढावी
किती स्मृती जपावी
त्या आठवांनी डोळा पाणी आले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१||
रिक्त झाली तुमची नेहमीची जागा
तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा
असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले?
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२||
बाल वयातील प्रेम
छोठ होत वय माझ,
पण खोट नवत प्रेम प्रिये .
माध्यमिकच्या त्या बाल वयातील
तू माझ पहिल पहिल प्रेम प्रिये.
शाळेच्या पहिल्याच दिवशी
पाहून तुज आकर्षिले माझे मन प्रिये .
तुझ पाहण्याची मज असायची ओढ प्रिये.
तुज पाहता शाळेच्या आदोगर,
हृदयाचा पडायचा टोल प्रिये.
तुझ्या येण्याने Classroom म्हणजे,
आधार घेते
रेंगाळलेली सांज होतांना
नभीधुंद जरा माघार घेते,
चांदण्याची रात होतांना
तुझ्या मिठीचा आधार घेते||१||
दवांत भिजलेला गुलाब
पहाटे खुडण्याचा अपराध करते,
नको थांबवू तुझ्यासाठी
काट्याचाही घाव एकवार घेते||२||
नाजूक वात तेवतांना
देवाला कधी प्रश्न विचारते?
उमलू दे तुझे नेत्रदीपक
उरला जरी मी अंधार घेते||३||
सुटका नाही
ज्या प्रश्नांना नसते उत्तर
तेच मला खुणविती निरंतर
अज्ञेयाच्या पल्याडून कुणी
म्हणते,"यातून सुटका नाही"
तीन मितींची अभेद्य कारा
तिचे दार किलकिले उघडुनी
बघती प्रतिभावान थोडके
तेही म्हणती,"सुटका नाही"
तुंदिलतनु तुपकट ध्येयांची
हाक ऐकुनी डळमळते मन
उनाड भटकी पायवाट मग
खेचून म्हणते,"सुटका नाही"
(मल-आशय !)
आमच्या गुर्जींची क्वीता वाचून आमच्याही मलात तरंग उठले
(मल-आशय !)
मलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे.
नाकात तुमच्या काही का ही?, का म्हणता आत दरवळते आहे.
खोल तळाशी मोठा पापलेट, वा अथवा चिकन चा तुकडा.
मलसारक हे चूर्ण त्यावरी, का? एरंडेल हा - जुनाच झगडा!
जुन्या चहाची नवीन उकळी
जुन्या चहाला पुन्हा नव्याने उकळी आणू,
दात नसू दे, चणे खायला कवळी आणू!
अंदर नंगे बाहर चंगे सगळे येथे
ज्ञान पाजण्या कफनी थोडी ढगळी आणू!
ढंग, लहेजा, भाषा आपली आतषबाजी,
माळ लवंगी, बॉम्ब लक्षुमी-सुतळी आणू!
दुनियेला या कसले सोने लागुन गेले?
आपण आपली बाळ बाहुली (बेबी डॉलही) पितळी आणू!
इंद्रधनू....
इंद्रधनू...
निरोप घेताना म्हणालो मी,
माझी आठवण ठेव..
नशिबापुढे हतबल आपण,
जोड्या ठरवतो देव....
क्षणात सारं बदललं तरी,
विसरू कशी तुला..?
तिचे साश्रुपूर्ण नयन,
विचारत होते मला....
निशब्द शांततेत घुमला,
उदास तिचा उसासा..
पण हात हाती घेऊन दिला,
तिनंच मला दिलासा....
- ‹ previous
- 28 of 468
- next ›