सुटका नाही

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Jun 2021 - 12:56 pm

ज्या प्रश्नांना नसते उत्तर
तेच मला खुणविती निरंतर
अज्ञेयाच्या पल्याडून कुणी
म्हणते,"यातून सुटका नाही"

तीन मितींची अभेद्य कारा
तिचे दार किलकिले उघडुनी
बघती प्रतिभावान थोडके
तेही म्हणती,"सुटका नाही"

तुंदिलतनु तुपकट ध्येयांची
हाक ऐकुनी डळमळते मन
उनाड भटकी पायवाट मग
खेचून म्हणते,"सुटका नाही"

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

11 Jun 2021 - 6:22 pm | गॉडजिला

No escape

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jun 2021 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा

अगदी वस्तुस्थिती निदर्शक

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jun 2021 - 3:34 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुटका नेहमीच भ्रामक असते का?
सुटका नेहमीच भ्रामक का असते ?

पैजारबुवा,

गॉडजिला's picture

14 Jun 2021 - 3:43 pm | गॉडजिला

भ्रामकतेमुळे असते

पाषाणभेद's picture

26 Jun 2021 - 12:55 am | पाषाणभेद

छान आहे काव्य. अर्थगंभीर.

अनन्त्_यात्री's picture

27 Jun 2021 - 11:23 am | अनन्त्_यात्री

मन:पूर्वक धन्यवाद.