मला आवडलेल्या एका अफलातून चित्रपटाचं परीक्षण मी लिहायला घेतलंय खरं, पण त्याची वातावरणनिर्मिती होण्यासाठी कारणीभूत असलेल्या माझ्या आयुष्यातील दोन घटनांविषयी आधी लिहिणार आहे, थोडं लांबलचकच लिहिणार आहे, त्यामुळे आधीच क्रमशः चा disclaimer! Actual परीक्षण पुढच्या भागात. तोपर्यंत चित्रपट कोणता ते इथल्या सूज्ञ रसिकांनी ओळखलं तर आनंदच होईल.
***********
सप्टेंबर ११, २००१.
मला स्पष्ट आठवतंय सकाळी साडेसात वाजता मी कुठे होतो ते. आठ वाजता सुरू होणार्या एका मीटींग साठी लवकर गाडी बाहेर काढली होती, लॉस एंजेलिस मधल्या एका प्रशस्त चार लेन च्या रस्त्यावरून revival series ची लताच्या गाण्यांची CD ऐकत, गाडी चालवत होतो. एरवी मी NPR चं लोकल पब्लिक रेडिओ स्टेशन लावलं असतं, पण आज जरा मीटींगचे विचार डोक्यात होते म्हणून diversion म्हणून गाडी सुरू करतांनाच CD लावली होती. माझा सेल फोन नेहेमीप्रमाणे कप-होल्डर मध्ये ठेवलेला होता. माझ्या शेजारची लेन पूर्णपणे मोकळी होती. त्या लेन मधून मागे असलेली एक चंदेरी ब्युईक माझ्या समांतर येत असलेली मला आधी आरश्यातून, आणि मग उजवीकडे, दिसली. काय होतंय ते कळायच्या आत त्या गाडीच्या चालक गोर्या महिलेने खिडकीतून हात बाहेर काढला, मला मधलं बोट दाखवलं आणि किंचाळली "Go back, you bastards! We HATE you!!" इतकंच नव्हे, तर तिची लेन पूर्ण मोकळी असतांनाही कसलीही पूर्वसूचना न देता तिची गाडी जेमतेम चार-सहा फूट अंतर ठेवून पुढे जाऊन माझ्या लेनमध्ये घुसली. मी करकचून ब्रेक दाबले, पण ती वेग वाढवून निघून गेली. माझं नशिब म्हणून माझ्या मागे कोणतीही गाडी नव्हती. मी "च्या मारी, काय बया आहे" असं स्वतःशी म्हणेपर्यंत माझा सेल फोन वाजला. पत्नीचा आवाज, "अरे, टी व्ही पहातोय आम्ही, तुला माहितीये का काय झालंय न्यूयॉर्क ला ते?..." कधीही सकाळी टी व्ही न लावणार्या आमच्या घरात तिने शेजार्यांनी फोन केला म्हणून टी व्ही लावला होता, आणि अतिरेक्यांनी केलेल्या त्या भयानक विमानहल्ल्याची ती मला माहिती देत होती...दिवस जस-जसा पुढे सरकला तशी त्या अमानुष हल्ल्याची भीषणता समोर येत होती, नव्वद देशांचे रहिवासी असलेले न्यू यॉर्क मधले जवळजवळ तीन हजार लोक त्या हल्ल्यात मरण पावले. आतापर्यंत इतर देशांच्या भूमीवर होत असलेल्या हत्याकांडांविषयी अभावानेच बोलणारे अमेरिकन नागरिक हा घरच्या भूमीवर झालेल्या हल्ल्याने नखशिखांत हादरलेले होते. मला मात्र राहून राहून ती सकाळची "Go back, .... We HATE you!!" म्हणणारी स्त्री डोळ्यांपुढे येत होती....
*****************
सप्टेंबर २००५
रात्रीचे आठ वाजले होते.
दोन रस्ते पलिकडच्या काँप्लेक्स मध्ये रहाणार्या गीताचा फोन आला. "भय्या, आप बिझी हो क्या?" रडक्या आवाजात खूप भीती.
"नही तो, क्या बात है? मानसी ठीक है?" तिची जेमतेम वर्षाची मुलगी घेऊन ती नुकतीच सहा महिन्यांपूर्वी कर्नाटकातून आलेली होती, मला वाटलं मुलीला बरं नसेल म्हणून फोन केला असेल.
"नही भय्या, मानसी ठीक है, लेकिन मंजू अभी तक आया नही है|" मला आठवलं, पोस्ट-डॉक्टोरल फेलो असलेला मंजूनाथ कुठल्याशा कॉन्फरन्ससाठी मेक्सिकोमध्ये कॅनकून ला गेला होता. "दोपहरमे दो बजे आनेवाली फ्लाईट थी, गाडी लेकर अबतक तो कभीका आ जाना चाहिये था|" वडील भारतीय प्रशासकीय सेवेत असल्याने देशभर फिरलेली गीता हिंदी उत्तम बोलते.
म्हंटलं मी घरी येतो, काळजी करू नको, फ्लाईट लेट झाली असेल, चुकली असेल...तुझ्याकडे त्याच्या ऑफीसच्या कलीग्जचे काही काँटॅक्ट्स असतील तर काढून ठेव.
गेल्यावर त्याच्या दोन अमेरिकन कलीग्जच्या घरी फोन केला तर कळलं की ते दोघेही आधीच्या दिवशीच्या फ्लाईटने पुढे निघून आले होते, फोटोग्राफीची आवड असलेला मंजू मायन संस्कृतीचे भग्नावशेष पाहून एकटाच मागून येणार होता. त्याची itinerary पाहून mexicana ची फ्लाईट गीता म्हणाली तीच होती, आणि ती एअरपोर्टला वेळेत दोन वाजताच पोहोचली होती. त्याच्या सेल फोन वर केलेल्या कॉल्स पैकी एकाचंही उत्तर मिळत नव्हतं. आता मात्र गीताचा (आणि खरं तर माझाही) धीर सुटायला लागला होता. mexicana च्या एअरपोर्ट ऑफिसला केलेला फोन उचललाच जात नव्हता, दोनदा व्हॉईस मेसेज ठेवला. आतापर्यंत घरून पत्नीचे तीन-चार फोन झाले, आणि तिचं ऐकून शेवटी गीताला आणि मानसीला गाडीत घालून मी घरी घेऊन आलो, गीताचं (आणि तिला पाहून मानसीचं) रडणं थांबेना "भय्या, मेक्सिको मे क्या क्या होता है, चोरी, किडनॅपिंग, उसको कुछ हुआ तो नही होगा ना?" मी म्हंटलं "कुछ नही होगा, don't worry." म्हंटलं, त्याचं सामान जरी गेलं असतं तरी त्याने कलेक्ट कॉल नक्की केला असता.
पत्नी म्हणाली "मी या दोघांना जेवायला घालते, तू रणजितला घेऊन एअरपोर्ट वर जा आणि mexicana च्या ऑफिस मध्ये personally जाऊन चौकशी कर."
शेजारच्या रणजितला काढलं आणि दोघे गेलो एअरपोर्ट वर. तिथेही mexicana च्या counter वर आधी टोलवाटोलव, आणि मग मॅनेजर ला भेटा म्हणून सांगितलं. परिस्थिती explain केल्यावर त्या बाईंनी अनिच्छेनेच पॅसेंजर लिस्ट पाहून ही व्यक्ती दोन च्या फ्लाईटने आली आहे असं सांगितलं. आतापर्यंत दहा वाजत आले होते. निदान तो लॉस अॅंजेलिसपर्यंत तर पोहोचला आहे हे कळल्यावर आम्हाला दोघांना हायसं वाटलं, लगेच घरी फोन केला आणि हे कळवलं. झाssलं, गीताने पुन्हा गळा काढला, "मतलब उसकी कारका अॅक्सिडेंट हुआ है क्या? अबतक क्युं नही पहुंचा?"
म्हंटलं "नही, गीता, somebody would have called by now looking at his ID, हम लोग फिर भी पुलिस मे रिपोर्ट कर देते हैं|"
एअरपोर्टच्या बाहेर येताच तिथल्या कॅलिफोर्निया हायवे पॅट्रोल पोलिस ऑफिसरला गाठून मी काय करता येईल ते विचारलं, त्याने विचारलेली माहिती पुरवल्यावर त्याने रेडिओ वर काही चौकशी केली आणि आम्हाला सांगितलं की प्रथमदर्शनी तरी अशा वर्णनाची व्यक्ती एअरपोर्ट ते पॅसाडिना (आमच्या घराच्या आसपासचा भाग) या दरम्यान काही अॅक्सिडेंट मध्ये सापडलेली नाही. त्याने सांगितलं की आधिक माहितीसाठी दुसरे पोलिस ऑफिसर गीताला भेटायला आणि लेखी तक्रार घेण्यासाठी घरी जातील, तोपर्यंत मी आणि रणजितने एअरपोर्ट पार्किंग मध्ये मंजूची गाडी सापडते का ते पहावं. त्यानंतर कमीत कमी तासभर आम्ही सर्व आठ पार्किंग स्ट्रक्चर्स वरपासून खालपर्यंत पालथे घातले. शेवटच्या आठव्या स्ट्रक्चर मध्ये छपरावर चढत असतांना गीताचा फोन आला, पोलिस घरी येऊन कंप्लेंट लिहून घेऊन तिला धीर देऊन गेले होते, परत दहा मिनिटांत परत येतो असं म्हणून परत गेले होते. तोपर्यंत Murphy's Law प्रमाणे शेवटच्या स्ट्रक्चर मध्ये छपरावर शेवटच्या रांगेत रणजितला मंजूची गाडी दिसली. पुन्हा घरी फोन. आता आणखी गोची. म्हणजे हा प्राणी एअरपोर्टला तर पोहोचला, पण for some reason गाडी घ्यायला गेला नाही. काय लफडं असेल?
पुन्हा आम्ही mexicana च्या ऑफीस मध्ये गेलो. एव्हाना तिथला duty officer बदललेला होता. आताच्या ऑफिसर ने आम्हाला घेऊन सरळ immigration office गाठलं. आम्हाला बाहेर उभे करून तो आत गेला आणि पाच मिनिटांत बाहेर आला, त्याच्याबरोबर एक महिला आधिकारी, तिने आम्हा दोघांचे IDs पाहिले आणि आम्हाला सांगितलं "I cannot discuss this case with you, you can leave!" mexicana च्या ऑफिसर कडे पाहून तिने त्याला सांगितलं "You stay out of this, please return to your position." आम्ही त्याच्या मागे वळतोय हे पाहिल्यावर तिने थांबून त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला, तो समजून घेऊन गायब! मग आमच्याकडे पाहून ती म्हणाली "Sir, I asked you to leave!" मी म्हंटलं "Listen, Officer, he is a close friend, and his wife and a year old baby are waiting at home to know what happened to him! Can you at least tell us what the problem is?" तिने खांदे उडवले, म्हणाली, "I understand, someone will call her soon. You should leave."
आम्ही हताशपणे बाहेर आलो. घरी जावं की काय करावं याची चर्चा करीत एअरपोर्ट च्या पार्किंग लॉट मध्ये माझ्या गाडीजवळ पोहोचलो. इतक्यात माझ्या पत्नीचा फोन आला. तिने सांगितलं की मंजूचा गीताला इमिग्रेशन ऑफिसच्या detention room मधून एका मिनिटाचा फोन आला होता, त्याने सांगितलं की त्याच्या व्हिसामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला ते अडकवून ठेवत आहेत. काय प्रॉब्लेम आहे ते गीताने विचारेपर्यंत इमिग्रेशन ऑफिसरने "Your time is up! We need to confiscate that phone" असं म्हणत सेल फोन ओढून घेतला. गीताला म्हणे हार्ट अॅटॅकच यायचा बाकी होता, माझी पत्नी म्हणाली "अरे बघवत नाही किती रडतेय ते, तुझ्या कुणीतरी ओळखीची होती ना त्यांच्या Universityत?"
मला आठवलं, दोन वर्षांपूर्वी त्या University शी संबंधित काही कामानिमित्त मी गेलो असता एकदा त्यांच्या Immigration specialist शी ओळख झाली होती, आणि नंतर बरेचदा त्या बाईंना मी Indo-American Cultural Exchangeच्या संदर्भातल्या या ना त्या कारणाने भेटत राहिलो होतो. पण मध्यंतरी सहा महिन्यांत काहीच संपर्क नव्हता. मी माझा सेल फोन काढून पाहिलं, त्यांचा नंबर होता माझ्याकडे. "अगं पण रात्रीचे ११ वाजलेत! ही काय वेळ आहे का?" "हे बघ, ती करील मदत, मला खात्री आहे, कर फोन तू. आणि काय होईल फार तर? चार शिव्या देईल इतकंच ना, असू देत, our friends are worth it."
मी Cecilia Melendres ला फोन केला. पहिल्याच मिनिटात त्यांनी मला समजावून घेतलं, म्हणाल्या "You did the right thing, as the University Immigration Officer, I consider these researchers and their families my responsibility. Obviously, they won't speak to me over the phone if I called the airport immigration folks, stay there, I am coming in person." रात्रीच्या सव्वाअकरा वाजता Irvine मधून निघून या बाई बारा वाजता एअरपोर्टला पोहोचल्या!
आल्यावर त्या immigration officer ने त्यांना सांगितलं ते असं: single entry J1 visa असलेला मंजूनाथ मेक्सिकोला गेला तेंव्हा त्याचं I-94 card mexicana airline च्या लोकांनी काढून घेतलं, त्यामुळे त्याच्या अमेरिकेत re-entry करण्यासाठी लीगल डॉक्यूमेंट नव्हतं. कायद्यानुसार त्या immigration च्या लोकांनी त्याला detain करून पुढच्या पहिल्या available फ्लाईटने भारतात पाठवणार आहोत असं सांगितलं. Cecilia ने "या शास्त्रज्ञाला हा कायदा माहित नव्हता, त्याला पुरेशी माहिती दिली नाही ही आमची चूक आहे, माझ्या युनिव्हर्सिटीच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे, मी सकाळी ९ वाजता Chief immigration officer आले की त्यांच्याकडून लेखी explanation लिहून देते, तोपर्यंत थांबा!" अशा बर्याच विनवण्या केल्या. पण ते immigration आधिकारी ऐकेनात, ते म्हणाले की "We can only wait until the first available flight to deport him." ही पहिली फ्लाईट होती पहाटे ५ वाजता निघणारी Lufthansa. आणि कायद्याप्रमाणे या deportation चा खर्च मंजूच्याच गळ्यात पडणार होता. अखेर ते ऐकतच नाहीत हे पाहिल्यावर, आयत्यावेळी काढलेल्या Lufthansa च्या तिकिटाचा अव्वाच्या सव्वा खर्च Ceciliaने आग्रहाने स्वतः भरला, आणि पाच वाजता मंजू, आम्हाला शेवटपर्यंत न दिसता, भारतात रवाना झाला.
हे सगळं होईपर्यंत कायम घरी फोनाफोनी चालू होती. माझ्या पत्नीने गीताला सांगितलं "ऐसे भी तुम लोग छे महिनोंमे जाने वाले ही थे, समझ लो मंजूको जल्दी जाने मिल रहा है|" गीताचं रडणं खळेना, तिच्या डोळ्यांपुढे बहुतेक ती एकटी कशी राहील हाच प्रश्न असणार. पण हळूहळू ती सावरली. दुसर्या दिवशी मंजूच्या गाडीची duplicate किल्ली घेऊन ती गाडी घेऊन आलो.
मंजूला पुन्हा व्हिसा मिळून तो परतेपर्यंत दोन महिने गेले, तोपर्यंत गीता आणि मानसी आमच्याकडे आणि रणजितकडे आलटून-पालटून राहिले. मानसीच्या बाललीलांकडे पहाता-पहाता दिवस कसे गेले ते कळलंच नाही. मात्र "I consider these researchers and their families my responsibility" असं म्हणणारी, रात्री बारा ते पाच वेळ एअरपोर्टवर काढणारी Cecilia Melendres माझ्या कायम स्मरणात राहील.
***********
प्रतिक्रिया
2 Jul 2009 - 11:54 am | निखिल देशपांडे
पुढचा भाग परिक्षण लवकर येवुद्या!!!!
वाचुन न्युयोर्क चित्रपटाची आठवण झाली.
==निखिल
2 Jul 2009 - 3:15 pm | Nile
सिनेमा बरोबर ओळखला असे वाटते. खरं तर मी हा सिनेमा बघणार नव्हतो पण आता बहुगुणी साहेब त्यावर परिक्षण लिहिताहेत म्हणल्यावरे उत्सुकता ताणली आहे. :)
2 Jul 2009 - 12:05 pm | घाशीराम कोतवाल १.२
काय भयानक अनुभव आला हो!!
मंजुनाथला देव करो अशी वेळ कोणावर पन न येवो
Cecilia Melendres बाई ने खरच खुप मदत केली
तिच्या परीने HATS OF F
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
2 Jul 2009 - 12:38 pm | श्रावण मोडक
वाचतो आहे. परीक्षणाकडे डोळे लावून बसतो आता.
2 Jul 2009 - 1:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
परदेशात असताना अनेक लोकांनी, त्यांची काहीही जबाबदारी नसताना, अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलेली मदत आठवली. आणि आता सामोरे येतात असे काही संवाद.
माझा मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार नोंदवायला मी पोलिस स्टेशनमधे गेले होते. समोर खुर्चीवर ठाणे अंमलदार बसली होती.
मी: माझा फोन चोरीला गेला आहे, त्याची तक्रार नोंदवायची आहे.
ठा.अं: मग? आम्ही काय करू?
मी: (एक झटका बसल्यावर) तुम्ही तो शोधणार नाही याची १००% खात्री आहेच; पण त्याचं असं आहे की मी कर भरते. तेव्हा त्याची वसुली करण्यासाठी कारणं शोधते. म्हणून तक्रार नोंदवायला आले .....
2 Jul 2009 - 1:00 pm | योगी९००
Cecilia Melendres बाई ने खरच खुप मदत केली कारण त्यांनी (किंवा त्यांच्या युनिव्हर्सिटीने) मंजूनाथला पुरेशी माहिती नाही दिली.
पण या पोस्ट-डॉक्टोरल फेलो मंजूनाथला एवढे कळले नाही का की single entry व्हिसा असल्याने त्याला अमेरिकेच्या ह्द्दी बाहेर जाता येणार नाही? आहो साधी शिक्षण न झालेली माणसेही जेव्हा परदेशात येतात तेव्हा त्यांना त्यांच्या व्हिसाबाबत पुर्ण कल्पना असते.
देव करो अशी वेळ कोणावर पन न येवो.
पुढचा भाग परिक्षण लवकर येवुद्या!!!!
खादाडमाऊ
2 Jul 2009 - 1:05 pm | दिपाली पाटिल
काय अनुभव आलेत तुम्हाला आणि मंजु ला, बापरे, देव करो नी कोणालाही असा अनुभव नं येवो. बाकी अमेरिकेत मद्त करायला लगेच येतात ही लोकं...
दिपाली :)
2 Jul 2009 - 2:43 pm | अभिज्ञ
आयला वातावरण निर्मिती खतरनाक झालीय.
त्या पार्श्वभुमीवर चित्रपटाचे परिक्षण वाचण्यास अतिशय उत्सुक आहे.
लवकर येउ द्यात.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
2 Jul 2009 - 3:22 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी असेच म्हणतो.
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
2 Jul 2009 - 4:33 pm | स्वाती२
Immigration specialist ने काय उपकार नाही केले मदत करून. They messed up big time. मंजूच्या कामाच स्वरूप पाहता त्या लोकांनी इथे तो आल्यावर विसा multiple entry करून घ्यायला हवा होता. त्या बयेला भीती आता नोकरी जातेय का हे लोक दावा लावतायत म्हणून. तेव्हा बसली रात्रभर.
3 Jul 2009 - 7:40 am | प्राजु
हॉर्रीबल...!
परिक्षणाच्या प्रतिक्षेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/