सोसायटी आणि बॅचलर

निखिल देशपांडे's picture
निखिल देशपांडे in जनातलं, मनातलं
4 May 2009 - 7:10 pm

शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन.

घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का???
मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे.
घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते.
मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो.
घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा

माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला. ह्या फोन मधे झालेला संवाद खालील प्रमाणे

मी:- नमस्कार सर, आताच घरी आलो, तुम्हाला करणारच होतो फोन
घरमालक:- ठीक आहे, थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तुमच्याशी थोडे बोलायचे आहे.
मी: कशा संदर्भात???बोला ना???
घरमालकः- सोसायटी मधे थोडा प्रॉब्लेम झाला आहे. ५२ नं मध्ये काहि मुले रात्री मुलींना घेउन आले होते आणि त्यांना नको ते चाळे करताना पकडले गेले.
मी:- अच्छा (स्वगत :- आता बहुतेक हा घर सोडायला सांगणार)
घरमालक:- तुमच्या खाली राहाणार्‍या लोकांनी सांगितले आहे की काल तुमच्या कडे पण मुली आल्या होत्या.
मी:- तुमच्याशी मी ह्या विषयावर सोमवारी आल्या नंतर बोललेले चालेल का??? ह्या गोष्टी फोन वर बोलण्या पेक्षा प्रत्यक्ष बोललेले चांगले असे मला वाटते.
घरमालकः- ठीक आहे.

खरे तर मी कधिच माझ्या कुठल्याही मैत्रीणिला माझ्या रुमवर घेउन गेलो नाहिये. माझ्या रुममेट च्या मैत्रिणि येतात हे मला माहित होते. त्यामुळे वस्तुस्थिती जाणुन घेण्यासाठी त्याला फोन लावला असता कळले. काल त्याची होणारी बायको दुपारी चार वाजता येवुन साधरणता सहा वाजेच्या सुमारास दोघेही बाहेर गेले होते. त्यावर मित्राला मी घरमालकांसोबत झालेले बोलणे सांगितले. त्यानंतर तो आमच्या घरमालकांना भेटायला गेला. तेव्हा त्याने सर्व परिस्थीती त्यांना समजावुन सांगितली.

माझा ह्या मित्राचे लग्न ठरले आहे, रीतसर घरच्यांनी साखरपुडा करुन दिलेला आहे. आता त्याची होणारी बायको आमच्या घरापासुन जवळच राहते. त्यामुळे सहाजिकच शनिवार्-रविवार ते बराच वेळ सोबतच घालवतात. कधी तिच्या रुमवर तर कधी आमच्या. बरेच वेळेस मी पण घरी असतो. मला त्यांच्या वागण्यात काहिच वावगे वाटत नाही. साधारणता सर्वसाधारण सभ्यतेचे नियम पाळुन तो किंवा ती कधिच एकमेकांकडे रात्री ९ नंतर थांबत नाहित. आता वस्तुस्थीति जाणुन घेतल्यावर आमच्या मालकांचे म्हणने पडले पहा जर टाळता आले तुम्हाला तर टाळा.

ह्या सगळ्यावर विचार करत असताना मला आठवले मि पा वरचा परा चा प्लेटॉनिक मैत्रीचा धागा. अजुनही समाज एका मुलिची आणी मुलाची विशुद्ध मैत्री असते असे मानत नाही का??? एक बॅचलर मुलगा आणि एक मुलगी सोबत आल्यावर नेहमी नको ते चाळेच करतात का??? आता माझ्या मित्राने काय करावे??? नेहमी भेटायला बाहेर कुठेतरी जाणे हे शक्य होत नाही. सार्वजनिक ठिकाणी ह्यांना प्रेमीयुगुल म्हणुन पोलिस त्रास देणार नाही कश्यावरुन??? एका व्यक्तिच्या बेजवाबदार वागण्यामुळे सर्वांना त्रास का???

असो तर आज रात्री मालकांना भेटायला जात आहे. त्यांना वरिल व अजुन काही प्रश्न विचारायची इच्छा आहे. बघा तुम्हाला काय वाटते. मी फक्त हे प्रश्न विचारुन घर बदलावे लागणार नाही अशी आशा करतो.

संस्कृतीसमाजजीवनमानप्रकटनलेखमतशिफारससल्लाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

4 May 2009 - 7:26 pm | चिरोटा

अजुनही समाज एका मुलिची आणी मुलाची विशुद्ध मैत्री असते असे मानत नाही का?

मानतो पण खात्री पटावी लागते.उ.दा. तुमच्या मित्राने होणारी बायको आली असताना आजुबाजुला रहाणार्‍या लोकाना गप्पा मारायला बोलावले असते आणि ओळख करुन दिली असती तर असे झाले नसते असे मला वाटते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

तुम्ही तुमच्या होणार्‍या पत्नीची किंवा पतीची ओळख अशी सरसकट कोणाही व्यक्तीला विनाकारण करुन द्याल का?

माझ्यामते फक्त घरमालकाला तुम्ही, तुमचा मित्र आणि त्याची नियोजित सहचर ह्यांनी भेटावे रीतसर ओळख करुन द्यावी/घ्यावी. मुलगी जवळच रहाते हे स्प्ष्ट करावे, इतर कुटुम्बीय असले तर त्यांची जुजबी माहिती द्यावी आणि होणारे नवरा-बायको असल्याने एकमेकांना भेटणे गैर नाही हे सांगावे. सभ्यतेचे सामाजिक संकेत पाळून ते त्यांच्या फावल्या वेळात काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याउप्परही तक्रार असेल तर लक्ष देऊ नये! :)

चतुरंग

मेघना भुस्कुटे's picture

4 May 2009 - 7:39 pm | मेघना भुस्कुटे

संपूर्ण सहमत.

छोटा डॉन's picture

4 May 2009 - 7:46 pm | छोटा डॉन

लेखात सांगितल्याप्रमाणे समजुन सांगितल्यावर मालक म्हणतो की " ठिक आहे पण टाळता आले तर पहा" ...
समजुतदार असल्याचे लक्षण आहे, बहुतेक काही प्रोब्लेम होणार नाही ...

पण सोसायटीच्या इतर लोकांची काही गँरेटी नसल्याने प्रेडिक्शन करणे कठिण आहे ...
बाकीचे सोडा हो पाठीमागुन मारलेल्या टोमण्यांचा अतिशय त्रास होतो हे सत्य आहे, फारच भ्याड आणि सणक आणणारा प्रकार आहे हा. इथे सर्वांची तोंडे बंद करणे शक्य नसते, त्रास होतोच ...
मालकाच्या समजुतदारपणाचे कौतुक करु वाटते ...

------
(कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत राहणारा) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 7:36 pm | नितिन थत्ते

हे या पोस्टला उत्तर नाही पण प्रतिसाद वर दिसावा म्हणून इथे लिहिले.
आजच्या लोकसत्तातील वास्तुरंग पुरवणीतील महत्त्वाचा दुवा. अविवाहित भाडेकरूना सोसायटी मज्जाव करू शकत नाही असा ग्राहक न्यायालयाचा निर्णय आहे

http://www.loksatta.com/daily/20090516/ws02.htm

खराटा
(रंग माझा वेगळा)

छोटा डॉन's picture

4 May 2009 - 7:41 pm | छोटा डॉन

निखीलराव, एका चांगल्या विषयाला हात घातला आहात. ह्यावरही बरेच लिहण्यासारखे आहे ( आले, बर्‍याच जणांचे मी अजुन लिहणार आहे हे वाचल्यावर बदललेले चेहरे‍ डोळ्यासमोर आले. असो. ) ;)
तुम्ही पुण्यात असाल तर हा प्रॉब्लेम शक्यतो होतोच ...

त्यात तुम्हीही आणि घरमालकही मराठी असाल तर हमखास होतो ...
(कॄपया मराठी आणि अमराठी ह्यावर वाद नको, माझ्या म्हणण्याचा विस्तॄत अर्थ लक्षात घेतल्यास बरे होईल )
शेवटी हे सुद्धा "समजुतदारपणा" आणि परस्परांवरील "विश्वास" ह्यावर अवलंबुन आहे हे लक्षात घेतले तर बरेच इश्श्यु आपोआप सुटतील ...
मात्र दुर्दैवाने हे प्रमाण फार कमी आहे.
तुम्ही एखाद्या "कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत" रहात असाल तर शक्यतो असला त्रास होणार नाही, इथे मुद्दा एकंदरीत बिघडलेल वातावरणचा नाही तर जग पाहुन आलेल्या मॅच्युरिटीचा आहे ...
आजही सामान्य सोसायटीत "एका मुलाने रुमवर मुलगी आणणे" अथवा उलटे हे घोर अपराध समजले जाते हे दुर्दैवी सत्य आहे ...
कदाचित त्याला काही बाहेरुन आलेल्यांची अथवा इथल्यांचीच "गैर वागणुक" कारण असेल पण हे सर्वसाधारण सत्य समजता येणार नाही ...

माझा वैयक्तीक माझ्या रुमवर माझ्या मैत्रिणींना बोलावण्यास विरोध नसेल व रुममेट्सचाही नसेल. मैत्रिणींनाही असा प्रॉब्लेम कधी झाल्याचे ऐकले नाही. मालकानेही कधी ह्याबद्दल प्रश्न विचारल्याचे आठवत नाही, इनफॅक्ट विचारलेच नाहीत ...

तुमच्यासाठी उपाय :
तो सांगणे अवघड आहे, कारण ह्याला अनेक पैलु येतात. घरमालकाची विचारसारणी कशी आहे ह्यावर हे अवलंबुन आहे.
माझा सल्ला : पुण्यात असाल तर दुसर्‍या घराचा शोध चालु करा अथवा तुमच्या बिचार्‍या मित्राची चुक नसताना त्याला घर बदलण्याचा चुकीचा अपण अटळ निर्णय घ्यावा लागेल ...

महत्वाची गोष्ट :
"रुमवर मैत्रिणी अथवा मित्र बोलावुन चाळे करणे हे प्रकार घडतात " हे अगदीच अमान्य नाही, हे जरुर घडते पण "घडतेच" असे नाही ...
पण शितावरुन भाताची परिक्षा केली तर डिफेन्स करण्यासारखे काही उरत नाही ...
मात्र अशा चाळेखोर व्यक्तींमुळे बाकीच्यांना त्रास होतो हा मुद्दा "विनाअट" मान्य करण्यासारखा आहे, आम्हालाही मान्य आहे.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2009 - 7:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डान्रावांच्या मुख्य सल्ल्याशी सहमत. दुसर्‍या घराचा शोध सुरू करा, बॅकअप असलेला चांगलाच. एकट्या मुलाला भाड्यावर घर शोधायला त्रास होतो याची मलाही कल्पना आहे; माझ्या भावालाच ओळखीच्यांचंच घर मिळाल्यामुळे हा त्रास झाला नाही. आणि का होतो याचीही कल्पना आहेच, त्यामुळे मी घरमालकांनाही दोष देत नाही. सुक्याबरोबर ओलंही जळतं पण आपला त्याला कधीकधी इलाज नसतो.

"'चाळे' म्हणजे नक्की काय?" असा प्रश्न सध्या मला पडला आहे. म्हणजे घरी मित्र-मैत्रिणी बोलावून एकाच्या दृष्टीने सभ्यपणे पार्टी करणे हा दुसर्‍याच्या दृष्टीने 'थेरं' या प्रकारात मोडणारा प्रकार असू शकतो.

पुन्हा एकदा मुख्य सल्ला: सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तेव्हा बॅकअप असलेला बरा!

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

चतुरंग's picture

4 May 2009 - 7:50 pm | चतुरंग

हाताशी पर्याय असलेला नक्कीच चांगला!

चतुरंग

निखिल देशपांडे's picture

4 May 2009 - 8:00 pm | निखिल देशपांडे

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तेव्हा बॅकअप असलेला बरा!

ह्याचाशी नक्किच सहमत. घर शोधायला सुरवात केली आहेच
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

निखिल देशपांडे's picture

4 May 2009 - 8:15 pm | निखिल देशपांडे

तुम्ही पुण्यात असाल तर हा प्रॉब्लेम शक्यतो होतोच ...
सध्यातरी ठाण्यात आहे.... :-)

त्यात तुम्हीही आणि घरमालकही मराठी असाल तर हमखास होतो ...

तुम्ही एखाद्या "कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत" रहात असाल तर शक्यतो असला त्रास होणार नाही, इथे मुद्दा एकंदरीत बिघडलेल वातावरणचा नाही तर जग पाहुन आलेल्या मॅच्युरिटीचा आहे ...
आजही सामान्य सोसायटीत "एका मुलाने रुमवर मुलगी आणणे" अथवा उलटे हे घोर अपराध समजले जाते हे दुर्दैवी सत्य आहे ...
कदाचित त्याला काही बाहेरुन आलेल्यांची अथवा इथल्यांचीच "गैर वागणुक" कारण असेल पण हे सर्वसाधारण सत्य समजता येणार नाही ...

मी ही मराठी आणी मालक ही मराठी.... साधारण सोसायटितले सदस्य सुद्धा मराठी.... कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत राहिलो होतो त्या मुळे फरक सरळच जाणवतो.

तुमच्यासाठी उपाय :
तो सांगणे अवघड आहे, कारण ह्याला अनेक पैलु येतात. घरमालकाची विचारसारणी कशी आहे ह्यावर हे अवलंबुन आहे.
माझा सल्ला : पुण्यात असाल तर दुसर्‍या घराचा शोध चालु करा अथवा तुमच्या बिचार्‍या मित्राची चुक नसताना त्याला घर बदलण्याचा चुकीचा अपण अटळ निर्णय घ्यावा लागेल ...

तुमचा सल्ला अगदी योग्य वाटतो.
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2009 - 7:33 pm | परिकथेतील राजकुमार

मानतो पण खात्री पटावी लागते.उ.दा. तुमच्या मित्राने होणारी बायको आली असताना आजुबाजुला रहाणार्‍या लोकाना गप्पा मारायला बोलावले असते आणि ओळख करुन दिली असती तर असे झाले नसते असे मला वाटते.
=)) =))
अरे त्याची होणारी बायको आली होती. कोणी शिनीमा नटी किंवा प्रदर्शनातली वस्तु न्हवती आली. कै च्या कै बर का.
आजकाल एक तर दोन फ्लॅट मधल्या लोकांची आपापसात ओळख पण नसते त्यात हे पालथे धंदे कोणी करायला सांगीतलेत अजुन ?
नुसते घराचे दार उघडे ठेवुन बसलेले चालत नाही का ? आणी अशा उघड्या दाराकडे लक्ष ठेवणारे कोणी असतील तर बिनधास्त ४ मैत्रीणी घेउन त्यांच्या घरी जाउन बसावे. "तुम्हाला चोरुन चोरुन डोकवायचा त्रास नको, म्हणुन आलो" असे सांगुन मोकळे व्हावे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

4 May 2009 - 7:42 pm | नितिन थत्ते

मालकाची खात्री पटावी म्हणून मित्राच्या पालकांना मालकाशी बोलायला सांगा.
त्या मुलीला मालकाशी व सोसायटीतील शेजारणींना भेटवा. (नंतर संबंध येणारच आहे- मित्र तेथेच राहणार असेल तर).
तसेच सोसायटीच्या पदादिकार्‍यांना त्या मित्राने भेटलेले बरे.
थोडक्यात गोष्टी जितक्या उघडपणे कराल तितका लोकांचा विश्वास बसेल.

खराटा
(रंग माझा वेगळा)

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2009 - 7:46 pm | परिकथेतील राजकुमार

उद्या सोसायटीत राहायला आलेले बॅचलर पण म्हणाले की सगळ्या सोसायटीतील पुरुषांनी त्यांच्या बायका आणी मुलींची ओळख करुन द्या म्हणजे आमचा विश्वास बसेल की इथे सुसंस्कृत लोक राहतात आणी त्यांच्या घरात 'इतर' बायका नसतात.
आली का पंचाईत ??

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

छोटा डॉन's picture

4 May 2009 - 7:51 pm | छोटा डॉन

बॅचलर पण म्हणाले की सगळ्या सोसायटीतील पुरुषांनी त्यांच्या बायका आणी मुलींची ओळख करुन द्या म्हणजे आमचा विश्वास बसेल की इथे सुसंस्कृत लोक राहतात आणी त्यांच्या घरात 'इतर' बायका नसतात.

+१, अगदी योग्य आहे हा मुद्दा ...
समोर राहणारी केवळ बॅचलर मुले आहेत म्हणुन नेहमी घराचा दरवाजा बंद करुन बसणार्‍या "संस्कॄतीरक्षक शेजार्‍यांना" हा अधिकार आहे का मुळ प्रश्न.
असल्यास ह्या नियमाचे पालन एकाच साईडने जस्टिफाईड आहे का ?

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

चिरोटा's picture

4 May 2009 - 7:51 pm | चिरोटा

...सुसंस्कृत लोक राहतात आणी त्यांच्या घरात 'इतर' बायका नसतात.आली का पंचाईत ??

विचारु शकता पण लोक जुमानणार नाहीत. कारण सुसंस्कृतेची व्याख्या समाज (म्हणजे त्या सोसायटीतील लोक) करतो.सध्या तरी चाळे करा नाहीतर करु नका, मुलगी रूमवर आणणे समाजाच्या सभ्यतेच्या व्याख्येत बसत नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

छोटा डॉन's picture

4 May 2009 - 7:58 pm | छोटा डॉन

सध्या तरी चाळे करा नाहीतर करु नका, मुलगी रूमवर आणणे समाजाच्या सभ्यतेच्या व्याख्येत बसत नाही.

बासच , विषयच संपला आता ...
कोण बरे हा समाज ? ह्यांच्या सभ्यतांची व्याख्या ती काय ?
सदैव आपली दारं बंद करुन बसणारी आणि खुज्या व भित्र्या मानसीकतेची शेजारी म्हणजे समाज होय ?
शिवाय आम्ही ह्या समाजाला किंमत द्यावी ह्यासाठी हा समाज आमच्यासाठी काय करतो ?

एखाद्या सणाला समोर बॅचलर पोरांना सणासुदीचे खायला मिळावे म्हणुन कधी जेवायचे आमंत्रण देतो का हा समाज ?
घरापासुन दुर राहिलेली पोरं काय खातात, कशी राहतात, काही त्रास आहे का ह्याकडे लक्ष देतो का हा समाज ?
काही दुखले खुपले तरी कधी ढुंकुनही चौकशी करतो का हा समाज ?
एखादे यश मिळाले तर त्या आनंदात मुक्त मनाने सामील होतो का हा समाज ?

नसल्यास आम्ही ह्या समाजाचे काय देणे लागतो व आम्ही का म्हणुन त्यांच्या "झुट्या व अनाठायी" सभ्यतांचे पालन करावे ?
मी वर विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणार असाल तर "सभ्यतेची व्याख्या" स्पष्ट होईल असे वाटते ...
सभ्यता म्हणजे काय तर " आपला तो बाळ्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे" असेच आहे सध्या ....
असो.

------
( सामाजीक सभ्यतेच्या विरोधातला बंडखोर ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

लिखाळ's picture

4 May 2009 - 8:01 pm | लिखाळ

सर्व संस्कृतीरक्षकांचा विजय असो !

डॉन्या के साथ बाता : आपल्याला जे जमले नाही ते तरुण लोक करताना दिसले की अनेकांचे पित्त खवळते आणि अचानक त्यांना संस्कृतीची आठवण होते असे कधीकधी वाटते :)
-- लिखाळ.

छोटा डॉन's picture

4 May 2009 - 8:06 pm | छोटा डॉन

डॉन्या के साथ बाता : आपल्याला जे जमले नाही ते तरुण लोक करताना दिसले की अनेकांचे पित्त खवळते आणि अचानक त्यांना संस्कृतीची आठवण होते असे कधीकधी वाटते

+१, अगदी करेक्ट ..!!!

म्हणजे कसे की मुलींच्या मुलांच्या हातात हात घालुन पबमध्ये जाऊन थिरकण्याला विरोध आहे कारण ती मुले "आम्ही" नाही आहोत व कोणीतरी "दुसरीच" आहेत. मग बुडाली हो संस्कॄती ऽऽऽ
जर त्याच मुली "आमच्या"बरोबर येत असतील तर ते आमचे "स्वातंत्र्य" होते ...
असो, चालायचेच ...

------
(संस्कॄतीरक्षक)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

लिखाळ's picture

4 May 2009 - 8:11 pm | लिखाळ

यावरुन एक म्हण सुचली -
आपला तो प्रणय, दुसर्‍याचे ते चाळे !! :)
-- लिखाळ.

मेघना भुस्कुटे's picture

4 May 2009 - 8:13 pm | मेघना भुस्कुटे

=))
=))
=))
झकास आहे!

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2009 - 8:15 pm | परिकथेतील राजकुमार

अजुन एक वाक्य आठवले :-
आप करे तो रासलीला
हम करे तो कॅरेक्टर ढिला....

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2009 - 8:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळची म्हण आवडली, पर्‍याची म्हण कॉस्मॉपॉलिटन असल्यामुळे अगदीच चूक वाटली! (पर्‍या ह. घे रे, नाहीतर लिहायचास माझ्यावरही एखादा फार्स!) ;-)

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

(खुद के साथ बातां : रंगा, लिखाळांना इतक्या चाबूक म्हणी कशा बरं सुचतात? बहुदा पुलाखाली जाऊन बघायला हवं! ;) )

चतुरंग

लिखाळ's picture

4 May 2009 - 9:18 pm | लिखाळ

हा हा हा .. बरी आठवण झाली ! :)
-- लिखाळ.

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2009 - 8:02 pm | परिकथेतील राजकुमार

विचारु शकता पण लोक जुमानणार नाहीत. कारण सुसंस्कृतेची व्याख्या समाज (म्हणजे त्या सोसायटीतील लोक) करतो.
बॅचलर समाजाचा एक हिस्सा नाहीत काय ? तुम्ही भाडे भरता तेव्हडेच किंबहुना त्यापेक्षा जास्ती भाडे भरुन ते राहात असतात मग त्यांना हा प्रश्न विचारायचा अधीकार का नाही ?

जसा एखाद्या सोसायटीला बॅचलर लोकांचा त्रास झाला असेल तसा त्या मुलांना पण सोसायटीचा त्रास कशावरुन झाला नसेल ?

आमच्या सोसायटीत पण अनेक बॅचलर मुले राहतात. एखादा रात्री १२ ला भसाड्या आवाजात गायला तरी फक्त आजुबाजुच्या फ्लॅट मधुन 'वाह वाह' 'झोपा गर्दभ कुमार' असे आवाज आले की एकदम शांतता पसरते ;) शेवटी एकमेकांच्यावरचा विश्वास महत्वाचा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

4 May 2009 - 7:51 pm | नितिन थत्ते

प रा चा मुद्दा बिनतोड. पण अदितीने सांगितल्या प्रमाणे सत्तेपुढे शहाणपण नसते. म्हणून प्रश्न.

खराटा
(रंग माझा वेगळा)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2009 - 7:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण तुमचा उपाय वाचून तर रोग परवडला म्हणायची वेळ आली. आज आम्हीही भाड्याने घर घेऊन रहात आहोत, एखाद दोन माणसं सोडून या बिल्डींगीत १४-१५ महिन्यात कोणाशीही ओळख झालेली नाही.

आपल्या समाजात एकदा लग्नं झालं की आता माणूस 'सभ्य' आहे, यांच्याकडे जायला, आपल्या लेकीसुनांना पाठवायला हरकत नाही असा एक सर्वमान्य समज आहे. त्यामुळे तुमच्या मित्राचं लग्न ठरलं आहे हे घरमालकाला सांगून हवंतर त्या मुलीलाही भेटायला घेऊन जा. शक्यतोवर यापुढे त्यांनी काही खिटपिट करू नये.

अगदीच नाही झालं तर घरी एक सत्यनारायण घाला, मित्राचं लग्नं ठरलं/झालं म्हणून! (हा सल्ला ह.च घ्या) ;-)

मित्राला आणि त्याच्या होणार्‍या बायकोला शुभेच्छा.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

चिरोटा's picture

4 May 2009 - 7:46 pm | चिरोटा

सहमत.

सभ्यतेचे सामाजिक संकेत पाळून ते त्यांच्या फावल्या वेळात काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे

हे आपल्या समाजाला पटत नाही ना!. म्हणून तर हे उपद्व्याप करावे लागतात.

थोडक्यात गोष्टी जितक्या उघडपणे कराल तितका लोकांचा विश्वास बसेल.

बरोबर्.म्हणूनच जास्तित जास्त शेजार्‍यांशी ओळख करुन द्यावी.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

निखिल देशपांडे's picture

4 May 2009 - 7:55 pm | निखिल देशपांडे

बरोबर्.म्हणूनच जास्तित जास्त शेजार्‍यांशी ओळख करुन द्यावी.
अहो ज्या शेजार्‍यांशी मागच्या २ वर्षात फक्त २ वेळा बोलणे झाले आहे त्यांना का म्हणुन ही माझी होणारी बायको आहे हे सांगत फिरावे. आणी ते बोलण्यासाठी त्यांची ऐकुन घ्यायची तयारी असली पाहिजे
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

छोटा डॉन's picture

4 May 2009 - 8:00 pm | छोटा डॉन

ज्या शेजार्‍यांशी मागच्या २ वर्षात फक्त २ वेळा बोलणे झाले आहे त्यांना का म्हणुन ही माझी होणारी बायको आहे हे सांगत फिरावे

.
अगदी बिनतोड मुद्दा आहे ...
अजिबात गरज नाही तसे सांगण्याची, गेले उडतं ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2009 - 8:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

निखिलराव, तुमचे घरमालक मराठी आहेत का? असतील तर या धाग्याचे आणि प्रतिसादाचे प्रिंट्स काढा आणि दाखवा त्यांना! काम होऊन जाईल तुमचं!! :-)

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

निखिल देशपांडे's picture

4 May 2009 - 8:17 pm | निखिल देशपांडे

चांगला उपाय आहे.... आज घेउनच जातो ... जस्तित जास्त काय घर सोडायला सांगतील, ३ महिन्याने करार संपणारच आहे.
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

चिरोटा's picture

4 May 2009 - 8:05 pm | चिरोटा

मग बॅकअप बघाच बुवा!!.ईकडे समाज बरोबर की आपण हा प्रश्न नाही. मित्राला तिकडे रहायचे असेल तर त्याला ओळखी करुन घ्याव्याच लागतील असे वाटते. तयारी नसेल तर दुसरीकडे जावे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

नितिन थत्ते's picture

4 May 2009 - 8:23 pm | नितिन थत्ते

डॉन वगैरे लोकांशी पूर्णतः सहमत आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवलेली बरी.
समाज आगरकर, कर्वे आणि फुल्यांचा सत्कार ते मेल्यानंतर करतो. जिवंतपणी शेण-चिखल्-दगड यांचा माराच सहन करावालागतो. तेव्हा समाज बदलायला निघाला असाल तर तयारी ठेवा बुवा.

खराटा
(रंग माझा वेगळा)

छोटा डॉन's picture

4 May 2009 - 8:31 pm | छोटा डॉन

समाज आगरकर, कर्वे आणि फुल्यांचा सत्कार ते मेल्यानंतर करतो. जिवंतपणी शेण-चिखल्-दगड यांचा माराच सहन करावा लागतो.

छे हो, वर उल्लेखलेली माणसे फार मोठ्ठी आहेत ...
त्यांच्याबरोबर कणभर तुलना होण्याइतकी आमची औकाद नाही, फार मोठ्ठे लोकं आहेत हो हे ...

बाकी आपल्याशी सहमत आहे, खरोखर असे घडते ...
समाज बदलायला वगैरे निघालो नाही ( अजुन डोके बर्‍यापैकी ठिकाणावर आहे ;) ) पण जमेल तितके "शहाणे करुन सोडावे सकळ जन" हा प्रयत्न चालु असतो. विस्तॄत दॄष्टीकोण राहिला तरच शांततामय जीवन जगता येईल ह्यावर आमचा गाढा विश्वास आहे.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

नितिन थत्ते's picture

4 May 2009 - 9:59 pm | नितिन थत्ते

तुमचे म्हणणे बरोबर आहे डॉनराव. शक्य तोवर शहाणे करून सोडण्याचा प्रयत्न करावाच.
फक्त काय आहे.. आपण इथे लांबून सल्ले देतोय. ज्याला तिथे दोन हात करायचेत "त्याला आम्ही हवे तसे वागू जोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत" असे म्हणायचे असेल तर ते सहज साध्य नसेल एवढेच सांगायचे होते.
(आगरकरांचे उदाहरण फक्त परिचयाचे म्हणून दिले)

खराटा
(रंग माझा वेगळा)

छोटा डॉन's picture

4 May 2009 - 10:05 pm | छोटा डॉन

ज्याला तिथे दोन हात करायचेत "त्याला आम्ही हवे तसे वागू जोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत" असे म्हणायचे असेल तर ते सहज साध्य नसेल

अगदी अचुक ...
एकदम मान्य आहे आपले मत ...

------
(सहमत)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

Nile's picture

4 May 2009 - 8:24 pm | Nile

अहो तो श्री राम नाही लोकांची तोंड बंद करु शकला तिथे तुमची आमची काय गत?

प्रेम करण्यार्‍याने प्रेम हवे तसे (म्हणजे लपुन वा खुलेआम) करावे, समाज काही केलं तरी बोंब मारणार.

अवलिया शेठ काढा हो एक फर्मास पाठ पुराणातुन! ;)

क्रान्ति's picture

4 May 2009 - 8:26 pm | क्रान्ति

बॅचलर मुलींनाही जागा मिळायला त्रास होतो . त्यात घरमालकाच्या सतराशे साठ अटी! अरे, ही मुलं मुली सुद्धा सभ्य चांगल्या घरातली असतात, त्यांनाही आई-वडील, भावंडं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले, की त्यांची काहीतरी भानगड आहे, असा कोता विचार किती दिवस करणार? उद्या आपल्या मुलांवर/नातवंडांवर देखिल अशी वेळ येऊ शकते, हा विचार का नाही मनात येत?

क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2009 - 8:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्रांतीताई, त्यांची भले असेल काही "भानगड", पण चारचौघांसमोर त्यांचं वागणं आक्षेपार्ह नसेल तर त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? त्यांना तो अधिकार कोणी दिला? त्यांनी हिरावून घेतला असेल तर खरंच त्यांना असा अधिकार आहे का??

अनेक जोडप्यांना व्यावहारीक अडचणींमुळे नाही लगेच लग्नं करता येत, लगेच 'भानगड' असते का त्यांची? आणि लग्नाची तारीख काढली, हॉल बुक केला की मग सगळं चालतं, असं का??

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

विकास's picture

4 May 2009 - 8:53 pm | विकास

कोणे एके काळी... महाविद्यालयात वर्गातील मुलगे आणि मुली यांची "वर्गमैत्री" (क्लासमेट्स या अर्थी) असलेली पाहून कुजकट नजरा असलेली मंडळी पाहीलेली आणि अनुभवली आहेत. त्यांना वेळोवेळी हाताळण्याच्या प्रसंगानुरूप केसस्टजीज असू शकतात/आहेत :-)

सध्या जे काही चालले आहे, त्यात जर धिंगाणा घालणार्‍या मुलांचा जर त्रास झाला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणून उगाच कोणाला तरूण-तरूणी म्हणून "जाब" विचारणे अती वाटते. अर्थात या प्रसंगातील मालक हा समंजस वाटतो आहे आणि खात्री करून घेऊ इच्छित आहे असे दिसते.

त्यामुळे वर अनेकांनी सांगितलेला एकच उपाय येथे योग्य वाटतो: तो म्हणजे घरमालकाची ओळख मुलीशी करून देणे. मला वाटते या एका चालीने हा नसलेला प्रश्न आपोआप सुटेल.

सोसायटीतील माणसे अशी का वागतात याची पण एकाहून अधिक कारणे असू शकतात असे वाटते:

  1. वर उल्लेखलेले (तथाकथीत) संस्कृतीरक्षण ही त्यातील एक शक्यता आहे.
  2. पुर्वानुभवावरून जर रात्रीच्या वेळेस मोठमोठे आवाज करणार्‍या पार्ट्या झाल्या असल्यातर.
  3. स्वतःची मुले ही अडनिड्या वयात असताना त्यांना त्या वयाला न साजेसा "मेसेज" मिळू नये असे वाटणे.

बाकी माझ्या लेखी एखाद्या मुलाला जागा भाड्याने देताना संदर्भ आणि ओळख करून देणे हे कधिही चांगलेच. पण बर्‍याचदा ते दिसत नाही. तसे करण्याचा संबंध हा केवळ संस्कृतीशी नाही तर सुरक्षिततेशी पण आहे असे वाटते. उ.दा. मुंबई-पुणे विमानतळावरून येताना शेजारील तिशीच्या आसपासच्या तरूणाशी गप्पा मारत होतो. तो लंडनहून येऊन पुण्याला जात होता, मी बॉस्टनहून. त्याने आमच्या टॅक्सी ड्रायव्हरला नव्या मुंबईत थोडी वाकडी वाट करायला लावली. त्या अपरात्री दोन विद्यार्थीदशेतील मुले होती, त्यांना त्याने त्यांच्यासाठी लंडनहून आणलेले पार्सल दिले. नंतर पुढे रस्त्यावरून जाताना लक्षात आले की तो प्रथमच पुण्यात जात होता, ज्या घरात त्याने रुममेट म्हणून जागा घेतली होती ती त्याने नेटवरून शोधली होती, नक्की कुठे जात होता ते त्याला माहीत नव्हते आणि कदाचीत ज्यांच्याकडे जात होता त्यांना तोदेखील माहीत नव्हता... त्याने मला सांगताना तो बंगलोरचा आहे असे सांगितले. आता विचार करा, तो नक्की कुठला ते माहीत नाही, कुठतरी आडरस्त्यावर पार्सल देताना दिसतो (अर्थात याचा घरमालकाशी संबंध नाही), मग पुण्यात पोचल्यावर रस्ता शोधत आणि माणसांना शोधत तो ठरलेल्या ठिकाणी जातो. मला हे सर्व त्या घरमालकासाठीच नाही तर अगदी त्या मुलासाठीपण धोक्याचे वाटते... कारण जिथे राहणार आहे ते कसे आहेत याची कल्पना त्याला देखील नाही ही अवस्था...

असो. वर थोडे विषयांतर झाले, पण घर भाड्याने देण्यात जसे संस्कृतीरक्षण वगैरे असू नये असे वाटते तसेच सुरक्षिततेचा मुद्दा असावा असे देखील वाटते. मात्र बर्‍याचदा नुसत्याच जागा विकत घेऊन भाड्याने देणारे, त्यांच्यावर पण जबाबदारी (लायाबिलीटी) असताना, "पैसे देणारी रिअल इस्टेट" व्यतिरीक्त यासर्व बाबींचा विचार करतात असे वाटत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

4 May 2009 - 10:05 pm | प्रकाश घाटपांडे

विकास यांच्याशी सहमत आहे. तीन एक वर्षांपुर्वी भारती विद्यापीठ परिसरात सोसायट्यांमध्ये परप्रांतिय विद्यार्थ्यांनी स्थानिक रहिवाशांना दमदाटी / मारहाण केली.भाड्याने घेतलेल्या सदनिकेत रम रमा रमी हे सर्व उद्योग चालु असायचे इतके कि इतरांना त्याचा खुपच त्रास होई. केवळ जास्त भाडे मिळते म्हणुन मालकांनी या सदनिका भाड्याने दिल्या होत्या. हे प्रकरण वर्तमानपत्रांनी उचलून धरले त्यावेळी अनेक वाद प्रतिवाद ( खर तर संवाद) झाले दोन्ही बाजु लोकांच्या समोर आल्या. कुठलही विधान सरसकट करता येणार नाही परंतु समाजमनाला न रुचणार्‍या परंतु विवेकी गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. मुद्दे योग्य असले तरी पुर्वदुषित ग्रहांमुळे ते समाजमनाला मान्य करायला अवघड जाते. मुद्दे जर आक्रस्ताळेपणे मांडले गेले तर मुद्दे योग्य असले तरी आक्रस्तळे पणामुळे चर्चा मुद्द्यावरुन गुद्द्यावर येते.

बाकी माझ्या लेखी एखाद्या मुलाला जागा भाड्याने देताना संदर्भ आणि ओळख करून देणे हे कधिही चांगलेच. पण बर्‍याचदा ते दिसत नाही. तसे करण्याचा संबंध हा केवळ संस्कृतीशी नाही तर सुरक्षिततेशी पण आहे असे वाटते.

सहमत आहे परंतु प्रत्येकवेळी हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होतेच असे नाहि.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

5 May 2009 - 12:17 am | विकास

>>>...भारती विद्यापीठ परिसरात सोसायट्यांमध्ये परप्रांतिय विद्यार्थ्यांनी स्थानिक रहिवाशांना दमदाटी / मारहाण केली.भाड्याने घेतलेल्या सदनिकेत रम रमा रमी हे सर्व उद्योग चालु असायचे इतके कि इतरांना त्याचा खुपच त्रास होई....

हाच मुद्दा बर्‍याचदा तेथील इतर रहीवाशांना त्रासदायक ठरतो. बाकी येथे बर्‍याचजणांचा असा मुद्दा दिसला की कॉस्मोपॉलीटन वस्तीत असले प्रकार होत नाहीत. त्याचा अनुभव नाही, मात्र पुण्यात अगदी पूर्ण मराठी लोकांच्या इमारतीत पण असे भाडेतत्वाने दिलेल्या जागेत कोणी नाक खुपसत नाही असे जवळून पाहीले. मात्र जेंव्हा आजूबाजूची शांतता खराब होते तेंव्हा घरमालकाला सांगून मुलांना कंट्रोलमधे आणले. हा प्रश्न बर्‍याचदा मुलगा आणि मुलगी असा असण्यापेक्षा धांगडधिंगा असण्याचा असतो. अमेरिकेत पण विशेष करून युनिव्हर्सिटीजच्या भागात तेथील कायमस्वरूपी रहीवासी जर स्टूडंट्सनी गोंधळ घातला तर अशीच तक्रार करतात. येथे फक्त पोलीसांना फोन करायला पण लोकं कमी करत नाहीत.

तसे करण्याचा संबंध हा केवळ संस्कृतीशी नाही तर सुरक्षिततेशी पण आहे असे वाटते.

सहमत आहे परंतु प्रत्येकवेळी हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होतेच असे नाहि.

माझ्या आजीचे एक वाक्य आठवले, "नशिबाचे भोग कुणाला चुकत नाहीत म्हणणे ठीक आहे, पण म्हणून स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंड पाडून घेयची का?" :-) तात्पर्यः आपल्या हातात जितके शक्य आहे तितके बॅकराउंड चेक करणे टाळायची गरज नाही. मात्र ते केल्यावर फूलप्रूप नाहीतरी बर्‍यापैकी काळजी घेतल्याने वेडेवाकडे प्रसंग होणे टळू शकतात असे वाटते...

निखिल देशपांडे's picture

5 May 2009 - 10:00 am | निखिल देशपांडे

बाकी माझ्या लेखी एखाद्या मुलाला जागा भाड्याने देताना संदर्भ आणि ओळख करून देणे हे कधिही चांगलेच. पण बर्‍याचदा ते दिसत नाही.

सहमत आहे, बर्‍या पैकी हे घडतही. आता माझच उदाहरण द्यायचे झाले तर मुंबइतले माझे हे चौथे घर आहे. दर वेळेस माझी सर्व माहिति घरमालक नोंद करुन घेतातच. ह्या माहितित मी रहाणार कुठला आहे? माझा घरचा पत्ता? माझ्या काम करणार्‍या अस्थापनेचा पत्ता ही सर्व माहिती दिलेली असते. ह्या उपर पोलिस तपासणी होवुन गुन्हेगारी पार्श्व्भुमी नाही हे पण तपासल्या जाते. आत एवढे सगळे करुन घर मिळाल्यावर जर मी घरात आवाज न करता किंवा सार्वजनिक सभ्यतेचे नियम पाळुन राहात असेल तरी मला बॅचलर म्हणुन त्रास होतोच.

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

अवलिया's picture

4 May 2009 - 11:20 pm | अवलिया

चर्चा आणि प्रतिसादातुन एकच सारांश मी तरी काढला
घरमालकाच्याच पोरिला पटवणे सगळ्यात बेस्ट !!
रुमवर आली तरी "भाडे" वसुलीला आली होती सांगता येते !!

--अवलिया

मराठमोळा's picture

4 May 2009 - 11:30 pm | मराठमोळा

चर्चा आणि प्रतिसादातुन एकच सारांश मी तरी काढला
घरमालकाच्याच पोरिला पटवणे सगळ्यात बेस्ट !!
रुमवर आली तरी "भाडे" वसुलीला आली होती सांगता येते !!

आता कसं बोललात नाना.. :) झकास.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सँडी's picture

5 May 2009 - 12:11 am | सँडी

तुम्ही एखाद्या "कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत" रहात असाल तर शक्यतो असला त्रास होणार नाही, इथे मुद्दा एकंदरीत बिघडलेल वातावरणचा नाही तर जग पाहुन आलेल्या मॅच्युरिटीचा आहे ...

अगदी बरोबर! यावरुन एक आठवलं. मॉडेल कॉलनीत ३-४ इमारती सोडुन रहात असलेल्या एका मित्राकडे येणे-जाणे असायचे. तिथे एक (त्यावेळचा)नविनच प्रकार समजला(आता अगदी सामान्य! प्रकार). एका जवळच्या फ्लॅटमध्ये ३-४परप्रांतिय मुलमुली एकत्र रहायची. मुलींच जाणंयेणं हे प्रकार तर राजरोस. चार भिंतीत कोण काय करतं असे संकुचित, रिकामटेकडे आणि उगाचचं जास्त(दुष्काळी का होईना)पावसाळे पाहिल्याचा आव आणणारे विचार मनाला न शिवल्याने चर्चासत्रात वेळ घातला नाही.
त्यांचे ते उनाड वागणं वगैरे गोष्टींकडे तेथील सो कॉल्ड कॉस्मोपॉलिटीन सोयायटीवाल्यांच दुर्लक्ष.

निखिलराव, वर पराने म्ह्टल्याप्रमाणे
आप करे तो रासलीला
हम करे तो कॅरेक्टर ढिला....

=))
हेही प्रकार आजकाल जास्तच, तसेच

५२ नं मध्ये काहि मुले रात्री मुलींना घेउन आले होते आणि त्यांना नको ते चाळे करताना पकडले गेले.
------------------------------------------------------------------------------------------------
माझ्या रुममेट च्या मैत्रिणि येतात हे मला माहित होते.
------------------------------------------------------------------------------------------------
काल त्याची होणारी बायको दुपारी चार वाजता येवुन साधरणता सहा वाजेच्या सुमारास दोघेही बाहेर गेले होते
आता वस्तुस्थीति जाणुन घेतल्यावर आमच्या मालकांचे म्हणने पडले पहा जर टाळता आले तुम्हाला तर टाळा.

या माहीतीवरुन असे वाटते की या वेगवेगळ्या घटना असल्यातरी तिथल्या लोकांचे खुपच गैरसमज झाले असावेत. आपले घरमालक सहजासहजी ऐकतील असे वाटतं नाही.
तरीपण चर्चा करुन पहा. जर तुमच्या मित्राला तो फ्लॅट लग्नानंतर वापरायचा असेल तर तात्पुरती तडजोड करुन त्यांचे म्हणणे मान्य करायला हरकत नाही. नसल्यास दुसरा फ्लॅट ऑप्शन म्हणुन पाहुन ठेवावा.

-संदीप कुलकर्णी.
काय'द्याचं बोला

मुक्तसुनीत's picture

5 May 2009 - 12:07 am | मुक्तसुनीत

पेईंग गेस्ट /भाडेकरू म्हणून काही करारनामा केला आहे काय ? केला असल्यास त्यात असले "डिस्क्रेशनरी " कलम आहे काय ? नसल्यास मालकांना बोलण्याचा अधिकार उरत नाही असे वाटते. अर्थात, जोरजबरदस्ती करून भाडेकरूंना बाहेर काढायचे मालकांनी ठरविले तर गोष्ट वेगळी.

बाकी आमचे मत :

१. घरमालकांचे विचार बुरसटलेले दिसतात. त्यांना भाड्याचे पैसे हवे असतील तर कायद्याच्या कक्षेत बसणारे भाडेकरूंचे वर्तन (भाडेकरूची मुदत संपेपर्यंत ) त्यानी सहन करावी. करार आणि कायद्याच्या कक्षेत , मुदतपूर्व कालात भाडेकरूला काढण्याचा त्यांना अधिकार नाही.
२. सभ्यता आणि कायदेशीरपणा यांचे बंधन पाळल्यानंतर "कन्सेंटींग ऍडल्ट्स्"नी काय करावे नि काय करू नये याबद्दलची त्यांची स्वायत्तता यावर त्या जोडप्याचा हक्क आहे. त्यांनी मालकाना "काका , काकी , माईंड युअर ओन बिझनेस" म्हणायला हरकत नाही. भाड्याने जेव्हा जागा वापरायला दिली तेव्हा कायद्याच्या कक्षेत बसणारे सर्वकाही त्या जागेत चालू शकते.

रेवती's picture

5 May 2009 - 12:32 am | रेवती

वरील चर्चा वाचून एक मजेशीर प्रसंग आठवला.
मी शाळकरी वयाची असताना आमच्या सोसायटीत मुंबईत राहणार्‍या (पण पुण्यात घर असावं म्हणून घेऊन ठेवणार्‍या)काकांनी त्यांचे घर परदेशी विद्यार्थांना दिले होते.
त्या दोघा मुलांच्या मैत्रिणी रोज संध्याकाळी भेटायला यायच्या. एकमेकांना सोडून जातानाची भेट ही बिल्डींगखाली शिनेमाश्टाइलने होत असे.
त्याचवेळी सोसायटीमधील बराचसा स्त्रीवर्ग भाजी, इस्त्रीला कपडे देणे, मुलांना विविध क्लासेस ना नेणे/आणणे, बालकवर्ग खेळण्यात, तसेच आज्जी/आजोबा वर्ग हे बिल्डींगसमोरच्या बेंचवर बसणे व समवयस्कांशी बोलणे ह्यामधे गुंतलेला असे. वॉचमन या सुप्रसिद्ध वेळी सगळ्या बिल्डींगांच्या टाक्या भरणे अशी कामे करत असे. हळूहळू एक बातमी सगळ्या सोसायटीत पसरली व सर्वप्रथम लहान मुले त्या परदेशी मुलामुलींचा मुक्तपणे चाललेला निरोपसमारंभ बघायला जमू लागली. चक्क त्यांच्याभोवती कोंडाळं करून ते नक्की काय करतात हे पाहू लागली. वॉचमन तर फारच एकाग्रतेने दीर्घचुंबनदृश्य बघत असे. आजोबा मंडळींना पुढच्या बिघडलेल्या पिढीवर बोलण्यास जोर चढला (आज्ज्या मात्र,"अगदीच ताळतंत्र सोडला मेल्यांनी" यावरच बोलायचे थांबल्या.). माझ्या बाबांसकट सर्व वडीलांना आपल्या मुलींची फार म्हणजे फार काळजी वाटू लागली. काही दिवसातच मुंबईच्या काकांना फोन करून बातमी देण्यात आली व सर्वांची करमणूक करणारे भाडेकरू गायब झाले. खरं तर यावर एक स्वतंत्र गोष्टं तयार होइल ;) पण आधीच अवांतर असल्याने क्षमस्व!
रेवती

भडकमकर मास्तर's picture

5 May 2009 - 9:49 am | भडकमकर मास्तर

आणि सर्व प्रतिसादही मस्त...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

चिरोटा's picture

5 May 2009 - 9:50 am | चिरोटा

थोडा खर्च जास्त करायची तयारी असेल तर कुलाबा,पेडर रोड्,कफ परेड्,मलबार हिल अश्या ठिकाणी भाड्याची जागा बघा.
ईकडे लोक दुसर्‍याच्या घरात डोकावून बघत नाहीत.बरेचसे लोक अमराठी आहेत. आपण काय करता हेही विचारणार नाहीत्.मग १ काय २५ मुली रूमवर आणल्या तरी ते काही करणार नाहीत्.अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

निखिल देशपांडे's picture

5 May 2009 - 10:11 am | निखिल देशपांडे

थोडा खर्च जास्त करायची तयारी असेल तर कुलाबा,पेडर रोड्,कफ परेड्,मलबार हिल अश्या ठिकाणी भाड्याची जागा बघा.ईकडे लोक दुसर्‍याच्या घरात डोकावून बघत नाहीत.बरेचसे लोक अमराठी आहेत.
पैसे खर्च करण्याचा प्र्श्न येत नाही हो..... पैसा काय कितिही टाकता येईल.... आणी त्या साठी आपण सांगितल्या जागिच नाहि तर ठाणे, बोरीवली , मुलुंड, भांदुप, वाशी , कोपखैरने, बेलापुर, पनवेल, खारघर अश्या ठीकाणी मराठी सोसायटीत ही रहाता येयिल
तिकडे दुसर्‍याचा वय्यक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न करणार्‍या सोसायट्या आहेतच

आपण काय करता हेही विचारणार नाहीत्.मग १ काय २५ मुली रूमवर आणल्या तरी ते काही करणार नाहीत्.अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.!
:-)
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

सँडी's picture

5 May 2009 - 10:26 am | सँडी

अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.!
=)) =)) =)) अगायाया!

-संदीप कुलकर्णी.
काय'द्याच बोला.

मराठमोळा's picture

5 May 2009 - 10:03 am | मराठमोळा

छान चर्चा.
मी जर माझे हे अनुभव लिहायला घेतले तर दोन दिवसही कमी पडतीत. असो.
चर्चेतील प्रतिसादही पटले.

आपला (बरेच वर्ष बाहेर राहण्याचा अनुभव असलेला)
मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

निखिल देशपांडे's picture

5 May 2009 - 6:32 pm | निखिल देशपांडे

काल ह्या धाग्यावर चर्चा केल्यानंतर मी माझ्या घरमालकांकडे गेलो. आमच्या घरमालकाने सांगितलेली भुमिका पुढील प्रमाणे

" तसे तर घरात तुम्ही तुमची प्रेयसी, होणारी वधु, मैत्रीणी ह्या पैकी कोणीही आले तर मला फरक पदत नाही. पण नेमके ह्या वेळेस मी सोसायटीच्या कमीटी वर असल्यामुळे प्रोब्लेम होत आहे. कारण सोसायटीच्या मिटींग मधे लोक मलाच सांगत होते की तुमच्या रुम मधे रहाणार्‍या मुलांकडे मुली येतात. खरे तर सोसायटी मधे लग्नाविणा सोबत राहाणारे दोन तिन जोडपे आहेत पण परवा झालेल्या प्रकारेमुळे सोसायटी वाले बॅचलर मुलांच्या मागे आहेत. तर सध्या काही दिवस तुम्ही टाळले तर बरे राहील आणी काही कारणास्तव जर घरी आणावेच लागत असेल तर आम्हाला कल्पना द्या म्हणजे कोणी काही बोलले तर आम्हाला उत्तर देता येयिल."

तर सध्या तरी आम्ही त्याच सोसायटीत आहोत.... आमच्या मित्राने होणार्‍या बायकोला भेटायला तिच्याघरी जायचा निर्णय घेतला आहे.
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

चिरोटा's picture

6 May 2009 - 9:21 am | चिरोटा

तर सध्या काही दिवस तुम्ही टाळले तर बरे राहील आणी काही कारणास्तव जर घरी आणावेच लागत असेल तर आम्हाला कल्पना द्या म्हणजे कोणी काही बोलले तर आम्हाला उत्तर देता येयिल

हे ऊत्तर अपेक्षितच होते्. आता 'तुम्ही आम्हाला कोण विचारणारे?" असा प्रतिप्रश्न कोणी केला तर 'ईकडून आताच्या आता फुटा' असे ऊत्तर येइल.!! पोलिसात कोणी गेला तर पोलिस कोणाची बाजु घेतील हे आपणास ठावोक आहे. :D
अवांतर्-हे योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

यन्ना _रास्कला's picture

5 May 2009 - 9:24 pm | यन्ना _रास्कला

ईथ वाशित पाम बीचवर अस काय काय चाल्त कि शाशन लवझोन का करत नाय ते कलत नाय. नवे लगिन ठरलेल्यानि काय करायच.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

चिरोटा's picture

6 May 2009 - 9:09 am | चिरोटा

अहो पेशल ईकॉनॉमिक झोन बनवतानाच नाकी नऊ येतात सरकारला,तिकडे लव झोन कसला घेवून बसलात?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विनायक प्रभू's picture

6 May 2009 - 9:18 am | विनायक प्रभू

अभंगाची कॅसेट् लावावी बॅक्ग्राउंड ला. सर्व उद्देश साध्य होतात.
मुख्य दरवाजावर नितिवान"(नितिश + पासवान)सर्टीफिकेट मिळते ते लावावे.
कुठे मीळाले नाही तर माझ्या कडे या.

अमोल केळकर's picture

6 May 2009 - 9:24 am | अमोल केळकर

आत्तापर्यंत तुमचा प्रश्न सुटला आहे असे मानतो.
तरी भविष्याची सोय/ बॅक अप म्हणून एखादे घर बघून ठेवा असे अनेक सन्मानीय सदस्यांनी सुचवले आहे . त्याचा अवश्य विचार करा
त्यासाठी एक उपाय सुचवतो. -
तुमचा मित्र आणी त्याची होणारी बायको या दोघांना घर हुडकायच्या कामाला लावा.
त्यांना ही एकमेकांचा सहवास लाभेल आणि तुमचे ही काम होईल. :D
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा