पौर्णिमा

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
17 Apr 2009 - 12:26 am

प्राजुताई नि राघवदादांच्या पौर्णिमा पाहून/वाचून मला मागच्या एका कोजागिरी पौर्णिमेला लिहिलेली कविता/गझल आठवली. शिळी, उष्टी असेलही कदाचित; पण आठवण झाली नि सहज शोधून मिळाली म्हणून मग येथे चिकटवायचे ठरवले. मिपाच्या धोरणात बसत नसल्यास संपादित करण्यास हरकत नाही.

चिंब हिरवळ, रात्र मखमल, गार गोरी पौर्णिमा
रातव्याचे थेंब न्हालेली टपोरी पौर्णिमा

चांदण्यांचे बाण सुटती मान ही वेळावता
केवढे घायाळ करते ही समोरी पौर्णिमा!

रातराणी श्वास हे वळले तिच्या ओठांकडे
नेमकी तेव्हाच लाज़ुन पाठमोरी पौर्णिमा?

रातरांगोळी तुझी मी वाट बघते राजसा
चंद्र होऊनी पुन्हा भरशील कोरी पौर्णिमा?

बघ मला, कोजागिरीचा चंद्रही पडु दे फिका
(ऐकले हल्ली जरा करते मुजोरी पौर्णिमा)

कवितागझलप्रकटनविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

17 Apr 2009 - 12:31 am | प्राजु

रातराणी श्वास हे वळले तिच्या ओठांकडे
नेमकी तेव्हाच लाज़ुन पाठमोरी पौर्णिमा?

सुरेख!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

17 Apr 2009 - 12:40 am | मदनबाण

चांदण्यांचे बाण सुटती मान ही वेळावता
केवढे घायाळ करते ही समोरी पौर्णिमा!
व्वा.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

धनंजय's picture

17 Apr 2009 - 1:01 am | धनंजय

झाली. पुन्हा वाचण्याचा आनंद मिळाला.

नाटक्या's picture

17 Apr 2009 - 1:02 am | नाटक्या

वा! छानच आहे..

(स्वगत : बेलाच्या आईला बेलासाठी लवकर स्थळ शोधायला सांगीतले पाहीजे.)

- नाटक्या

क्रान्ति's picture

17 Apr 2009 - 10:03 pm | क्रान्ति

अप्रतिम गझल! सगळेच शेर एकसे बढकर एक आहेत, काय काय उद्धृत कराव? मस्त!
=D>
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

अनामिक's picture

17 Apr 2009 - 10:08 pm | अनामिक

वा वा... मस्तं कविता/गझल...

अनामिक

चतुरंग's picture

17 Apr 2009 - 11:55 pm | चतुरंग

चांगलीच चिंब साजरी केलेली दिसतेच कोजागिरी पौर्णिमा! ;)

चतुरंग

सुधीर कांदळकर's picture

19 Apr 2009 - 8:16 pm | सुधीर कांदळकर

कल्पना जास्त सुंदर?

अप्रतिम.

सुधीर कांदळकर.