हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
19 Dec 2008 - 2:43 am

दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी ’८ डाऊन’ गाडीवर लखनौ पासोन सुमारे चौदा मैल अंतरावर काकोरी ते आलमनगर दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या १० धाडसी शिलेदारांनी दरोडा घालुन सरकारी तिजोरी लुटली आणि साम्राज्य हादरले. हा घाला गाडीतुन वाहुन नेल्या जाणाऱ्या तिजोरीवर नव्हता तर ब्रिटीश साम्राज्यावर होता. या धाडसी क्रांतीकारकांनी जणु सरकारी खजिना लुटुन सरकारला आव्हान दिले होते. हा दरोडा अत्यंत विचार्पूर्वक ठरविलेला व सुनियोजित होता. एकदा हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल शाहजहानपूरहुन लखनौला जात असताना वाटेत त्यांनी या गाडीत सरकारी खजीना चढवताना पाहिला. त्यांनी गाडीचा तपशील लक्षात ठेवला व सुरक्षेची पाहणी केली. त्यांच्या लक्षात आले की पहारा सहज भेदता येईल.

क्रांतिकार्यासाठी, शस्त्रांसाठी पैसा आवश्यक. तो मिळवायचा कसा? समजा लुटमार केली कुणा सावकाराला, जमिनदाराला लुटले तर क्रांतिकारक हे नाहक लुटारु म्हणुन बदनाम होणार व त्यांच्या कार्याचा प्रसार होण्याऐवजी बदनामी होणार व जनाधारही नाही मिळणार. मग यावर उपाय काय? तेव्हा हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांनी दिशा दाखविली. ते म्हणाले की सरकारी खजिना लुटायचा व सरकारचे धन कार्यासाठी कारणी लावायचे. त्यांनी ही योजना आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगितली व सगळे चर्चेअंती तयार झाले. ९ ऑगस्ट १९२५ रोजी ८डाऊन मध्ये हुतत्मा चंद्रशेखर आजाद, हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल, हुतात्मा अश्फाकऊल्ला, हुतात्मा राजेंद्र लाहीरी या गाडीत प्रवासी म्हणुन शिरले. गाडी काकोरी स्थानक ओलांडुन जाताच या पैकी दोघांनी गार्डला आपले काही सामान स्थानकावर राहिले असल्याचे सांगत गाडी थांबवायची विनंती केली. गार्डने ती अव्हेरताच त्याला बेसावध गाठुन त्यांनी आडवा केला व साखळी खेचून गाडी थांबविली. गाडी थांबताच इतर क्रांतिकारकांनी वेगाने हालचाल केली. काहींनी गार्डला आडवा पाडुन ठेवला, काहींनी खजिन्याच्या डब्याच्या दारावरील पहारेकऱ्यांना लोळवुन आत प्रवेश केला व तिजोरी बाहेर ढकलली. काही क्रांतिकारकांनी बाहेरचा ताबा घेतला व पिस्तुलाने हवेत गोळ्या झाडुन घबराट निर्माण केली. मात्र हे सर्व होत असतांना क्रांतिकारकांनी ओरडुन सर्व प्रवाशांना संगितले की ते दरोडेखोर नसून क्रांतिकारक आहेत, ते देशकार्यास्तव केवळ सरकारी खजिना लुटणार असून जनतेला काही अपाय करणार नाहीत वा लुटणारे नाहीत; त्यांनी प्रवाशांना बाहेर डोकावणे धोक्याचे असल्याचे सांगुन गाडीतच बसून राहायचे आवाहन केले. गाडीतुन बाहेर फेकलेली भरभक्कम तिजोरी सहज फुटत नव्हती. अचनक समोरुन एक गाडी भरवेगाने येताना दिसली आणि आता गाडी आपण थांबविलेल्या गाडीवर आदळणार या क्ल्पनेने सगळे धास्तावले. मात्र ती गाडी बाजुने निघुन गेली, ती डेहराडुन एक्सप्रेस होती. सर्वांचा जीव भांड्यात पडला. अखेर तिजोरी फोडुन गाठोड्यात पैसे घेउन सगळे रात्रीच्या अंधारात पसार झाले. हुतात्मा चंद्रशेर आजाद यांनी सुमारे तीन मण पैशाचे ओझे सायकल वरून २४ मैल वाहुन नेले. दुसऱ्या दिवशी ही बातमी सर्वत्र पसरली. या बातमीने इंग्रज सरकार हादरले व चवताळलेही.

देशभरात काकोरीचे नाव गाजले व त्या क्रंतिकारकांची नावे सर्वतोमुखी झाली. हे क्रांतिकारक होते

हुतात्मा चंद्रशेखर आजाद
हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल
हुतात्मा अशफाकऊल्ला खान
हुतात्मा ठाकूर रोशन सिंह
हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी
श्री. मन्मथनाथ गुप्त
श्री. केशब चतर्जी
श्री. बनवारी लाल
श्री. मुकुंद लाल
श्री. सचिंद्रनाथ बक्षी

कानशिलत बसलेली ही थप्पड सरकारला सहन होण्यासारखी नव्हती. पोलिस यंत्रणा चवताळुन उठली व काकोरी परिसरातील एक अन एक गांव पिंजुन काढले गेले. सर्व आरोपींवर मोठी ईनामे घोशीत केली गेली. प्रलोभन व धाकदपटशा अशा दोन्ही प्रकारे प्रयत्न सुरू झाले. अखेर वाचाळता व फितुरी यांनी घात केला व २६ सप्टेंबर रोजी हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल पकडले गेले. पाठोपाठ हुतात्मा राजेंन्द्रनाथ लाहिरी, हुतात्मा ठाकुर रोशन सिंह व अनेकजन पकडले गेले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागासाठी ५४ जणांची धरपकड झाली. हुतात्मा अशफाकऊला खान दहा महिने भूमिगत राहण्यात यशस्वी ठरले. त्यांचा दिल्लीतुन कागदपत्रे मिळवून रशियात निसटुन जायचा बेत होता. मात्र या कामात मदत करण्याचा बहाणा करीत एका पठाणाने त्यांचा घात केला व ते अखेर पकडले गेले. मात्र अखेरपर्यंत हुतात्मा चंद्रशेखर आजाद व एक अन्य असे दोघेजण अखेरपर्यंत सरकारच्या हाती लागले नाहीत.

अभियोग सुरू होताच देशभरात खळबल माजली. सर्वत्र प्रचंड जनजागृती झाली. या खटल्यात देशभक्तांच्या बचावासाठी संयुक्त बचाव समिती स्थापन झाली जिचे सद्स्य होते मोतीलाल नेहरु, डॉ. गणेश शंकर विद्यार्थी, गोविंद वल्लभ पंत इत्यादी नेते. लाला लजपतराय व जवाहर लाल नेहरु हे क्रांतिकारकांना तुरुंगात भेटुन गेले तर प्रसिद्ध साहित्यिक मुन्शी प्रेमचंद देखिल अभियोगाच्या सुनावणीला न्यायालयात हजर राहिले होते. ’प्रताप’ दैनिकाने तर अग्रलेख लिहिला "देशाची मौल्यवान रत्ने सरकारी कोठडीत". हा साधासुधा खटला नव्हता तर सम्रटाच्या सत्तेला आव्हान दिल्याबद्दल उभारलेला राजद्रोहाचा महाअभियोग होता.

काकोरी प्रकरणात प्रत्यक्ष घटनेच्या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत खरेतर फक्त एक जण मृत्युमुखी पडला होता, पण तरीही सर्वांना जास्तीत जास्त क्रूर सजा देऊन ऋजणारी क्रांती नष्ट करायचा सरकारचा अटोकाट प्रयत्न होता. या खटल्यातील प्रत्येक आरोपी सरकारच्या डोळ्यात आधीपासूनच सलत होता. प्रखर देशभक्ती, हिंदी, उर्दु, पंजाबी, बंगाली व इंग्रजी भाषा अवगत असणारे व साहित्यिक असलेले प्रखर नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेले रामप्रसाद बिस्मिल ज्यांनी हिंदुस्थान प्रजसत्ताक संघट्नेच्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचला होता, त्यांना सरकार आपला महाशत्रू मानत होते. पंडितजी गोरखपूर तुरुंगात असताना हुतात्मा सरदार भगतसिंह प्रभृतींनी त्यांना तुरुंगातून बाहेर काढायची योजना आखली होती. भूमिगत असलेले हुतात्मा चंद्रशेखर आजाद वेश पालटुन मोटारहाक्याच्या रुपात वावरत होते. मात्र सरकारला कुणकुण असल्याने पहारा कडक होता. अनेक क्रांतिकारकांनी त्यांना नावे व वेश बदलुन भेटायचा प्रयत्न केला होता. मात्र प्रयत्न सुरू असूनही काही होत नाही असे दिसताच पंडितजींनी एका शेराच्या माध्यमातुन अखेरचा निरोप श्री. विजयकुमार सिन्हा यांच्या हस्ते सहकाऱ्यांना इशारा म्हणुन धाडला:

’मिट गया जब मिटनेवाला, फिर सलाम आया तो क्या!
दिल की बरबादी के बाद, उमका पयाम आया तो क्या!’

म्हणजे आता वेळ थोडा उरला आहे, कय करायचे ते लवकर करा अन्यथा फार उशीर झालेला असेल. साहित्यिक व शायर म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या हुतात्मा बिस्मिल यांचे नाव घेताच ’सर फरोशी की तमन्ना’ हे गीत ओठी येते. ही हुतात्मा रामप्रसाद यांच्या ओटी असलेली रचना, मात्र ही त्यांची आहे की हसरत मोहानींची यात काहीसा संभ्रम आहे.

या अभियोगात हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल, हुतात्मा अशफाकऊल्ला, हुतात्मा ठाकूर रोशन सिंह व हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. मन्मथनाथ गुप्त व शचिंद्रनाथ बक्षी यांना काळ्यापाण्यावर जन्मठेपेची तर इतर अनेकांना सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठवल्या गेल्या.

तुरुंगातुन आपली सुटका होणे शक्य नाही हे समजताच पंडितजींनी निरवानिरवीला सुरूवात केली, त्यांना काकोरी कटातील धन व वापरलेली शस्त्रे यांची माहिती आपल्या हिं.प्र.स. च्या साथिदारांना द्यायची होती. त्यांनी तुरुंगात गुपचुप कागद जमा करुन आपले आत्मचरित्र लिहिले व अनेक भागात ते जमेल तसे बाहेरही पाठविले. या आत्मचरित्राचा अखेरचा भाग त्यांनी आपल्या हौतात्म्याच्या अगदी दोन दिवस आधी म्हणजे १७ डिसेंबर १९२६ रोजी लिहिला व बाहेरही पाठवला. त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे जमा करुन त्यांच्या पश्चात त्यांचे आत्मचरित्र पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले व सरकारने त्यावर तत्परतेने बंदीही घातली. अखेरच्या भेटीत आई व वडिलांबरोबरच आईने आपल्या भाच्यालाही येउद्या अशी गळ घातली व तुरुंगाधीकार्‍यांनी ती मान्य केली. तो भाचा म्हणजे हिं.स्.प्र.से चे श्री. शिव वर्मा हे वेषांतरात गेले होते. त्यांना शस्त्रे व पैसा कोठे लपविला आहे ते जाणुन घ्यायचे होते.

सहा फूट उंचीचे हुतात्मा अशफाकऊल्ला खान हे अत्यंत साहसी वृत्तीचे. ते उत्तर प्रदेशतील शहाजहानपूरचे. तेही शेरोशायरी करीत असत. त्यांची देशभक्ति प्रखर होतीच पण ते द्रष्टे होते. धूर्त इंग्रज हिंदु-मुसलमान यात फूट पाडीत आहेत ज्यायोगे त्यांना राज्य करणे सोपे जाईल हे त्यांनी ओळखले व त्यांनी समाजाला सातत्याने धर्म विरहीत राष्ट्रवादाचा महिमा सांगितला. फोडा व झोडा या नितीचा अवलंब करणाऱ्या इंग्रजांनी तोच प्रयोग अशफाकऊल्लांवरही करायचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिस अधिक्षक तसाद्दक हुसेन याची नेमणुक केली. धर्मांध व हिंदुद्वेष्ट्या तसाद्दकने हुतात्मा अशफाक यांना फोडायचा प्रयत्न केला. त्यांनी असे सांगितले की बिस्मिल हा पंडित. तो हिंदु देशासाठी लढतोय. पण तुझे काय? तु तर पाक मुसलमान! तुला या हिंदु राज्याचा काय उपयोग? समजा स्वातंत्र्य मिळाले तर तुला हिंदुंचा गुलाम व्हावे लागेल. यावर हुतात्मा असहफाकसाहेबांनी शांतपणे सांगितले की पंडितजी हिंदुंसाठी नव्हे हिंदुस्तानसाठी लढत आहेत. मी हिंदु नाही पण हिंदुस्थानी आहे, आणि गोऱ्यांच गुलाम होण्यापेक्षा मला आजाद हिंदुस्थानी होणे अधिक चांगले वाटते. बहुधा हुतात्मा अशफाकऊल्ला खान हे स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले पहिले मुसलमान आणि त्यांना त्याचा विलक्षण अभिमान होता.

हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी हे बालपणापासुनच ध्येयाने प्रभावित झालेले. ते ’युगांतर’ चे सक्रिय कार्यकर्ते होते. ते संघटनेच्या कार्यातुन हुतात्मा बिस्मिल यांच्याकडे आकर्षित झाले व त्यांनी काकोरी प्रकरणात पुढाकार घेतला. ते मूळचे पूर्व बंगालच्या पाबना जिल्ह्यतील मोहनपूर गावचे. (आताचा बांग्लादेश). त्यांच्यावर बंगालमध्ये ही क्रांतिकारक कारवायांसाठी खटला भरला गेला होता व त्यांनी तुरुंगवासही भोगला होता (दक्षिणेश्वर बॉंब खटला).

हुतात्मा ठाकूर रोशनसिंह हे शहाजहानपूर जिल्ह्यातील नवादा या गावचे ठाकुर. घरचे गडगंज श्रीमंत. हुतात्मा रोशनसिंह हे नेमबाजी व कुस्तीमध्ये प्रविण होते. त्यांना असहकार आंदोलनात दोन वर्षे शिक्षा झाली. मात्र आपला तुरुंगवास कारणी लावत ते इंग्रजी शिकले. पुढे अर्थातच आंदोलनाचे वैफल्य लक्षात येताच ते सशस्त्र क्रांतीकडे आकर्षित झाले.

हे चारही हुतात्मे अनेक क्रांतिकारकांप्रमाणेच असहकार आंदोलनात सर्वस्व त्यागुन झोकुन दिलेले. मात्र ’एक वर्षात स्वातंत्र्य देतो, मला सहकार्य द्या’अ से सांगत अनेक तरुणांना सरकारी शाळा सोडुन आंदोलनात भाग घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या गांधींनी अचानक आंदोलन मागे घेतले अणि हे सर्वजण आंदोलने व निषेधघोष यांचे मिथ्यापण लक्षात येऊन अखेर ’रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले या?’ या उक्तीवर अढळ झाले. या चारही जणांनी आनंदाने फास गळ्यात ओढला. मात्र या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले व फाशी दिले गेले.

सर्वात पहिला मान हुतात्मा राजेंन्द्रनाथ लाहिरी यांचा. ते गोंडा येथे १७ डिसेंबर १९२७ रोजी ’मृत्यु ही तर जीवनाची दुसरी अवस्था आहे, त्याचे भय वा दु:ख का करावे’ असे सांगत फासावर गेले.

हुतात्मा ठाकूर रोशनसिंह १९ डिसेंबर १९२७ रोजी एका हातात वीणा घेउन दुसऱ्या हाताने आपल्याच गळ्यात दोर चढवुन अलाहाबाद येथे फाशी गेले.

हुतात्मा अशफाकऊल्ला हे १९ डिसेंबर १९२७ रोजी ’माज़े हात कुणाच्यही रक्ताने भरलेले नसताना मला इंग्रज सरकार अन्यायाने फाशी देत आहे, मात्र मी देशासाठी फासावर जाणारा पहिला मुसलमान क्रांतिकारक आहे याचा मला विलक्षण अभिमान वाटतोअ असे सांगत हाती कुराण घेऊन फैजाबादच्या तुरुंगात फासावर गेले.

"तुमच्या साम्राज्याचा सर्वनाश हीच माझी पहिली व अखेरची इच्छा आणि तिच्याखातर मी पुन्हा पुन्हा पुन्हा जन्म घेईन आणि पुन्हा पुन्हा फासावर जाईन" असे ठणकावुन सांगत हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल १९ डिसेंबर १९२७ रोजी गोरखपूर तुरुंगात फासावर गेले.

मात्र जाताना हुतात्मा बिस्मिल जुलमी सरकारला इशारा देऊन गेले

मरते ’बिस्मिल’, ’रोशन’, ’लाहिरी’, ’अशफाक’ अत्याचारसे
होंगे पैदा सैंकडो इनकी रुधिर की धारसे

काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन.

संस्कृतीइतिहाससमाजसद्भावनालेखमाहिती

प्रतिक्रिया

_समीर_'s picture

23 Dec 2008 - 12:24 am | _समीर_

क्रांतिकारकांचा विषय निघाला की सर्वसाक्षींकडून तारतम्याची अपेक्षा करणे मी सोडून दिले आहे.

दुर्दैवाने आता असेच करावे लागणार असे वाटते.

टग्या's picture

23 Dec 2008 - 1:16 am | टग्या (not verified)

दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते. गांधीद्वेषाचे मुखत्यारपत्र म्हणून मिसळपावाला प्रसिद्ध व्हायचे असल्यास माझे काहीच म्हणणे नाही.

यात धमकी नेमकी कोठे आहे हे समजले नाही. 'या कर्माचे हे फलित आहे' अशा प्रकारच्या विधानात्मक वाक्यात मला तरी काही धमकीवजा दिसत नाही.

('गांधीजींबद्दल काही वाह्यात लिहिलेत तर मीच मिसळपावाची प्रसिद्धी गांधीद्वेषाचे मुखपत्र म्हणून करीन' असे जर विधान असते तर ती धमकी झाली असती. तसे विधान केल्याचे आढळले नाही. 'गांधींबद्दल वाह्यात लिहिलेले खपून जाते, इतके की मिसळपाव हे गांधीद्वेषाचे मुखपत्र म्हणून सहज खपून जावे' हे वैयक्तिक मतप्रदर्शन झाले, धमकी नव्हे. आणि 'हीच इच्छा असल्यास माझे काहीच म्हणणे नाही' यात तरी धमकी कोठे आली हेही कळत नाही.)

प्रतिवाद्याने न केलेल्या कृतींचे आरोप हे गैरसमजातून येतात की तत्त्वांतून हे कळत नाही.

तुम्हाला प्रिय म्हणुन गांधींचे सर्वांनी असलेले आणि नसलेले गोडवे गावेत आणि तसे न केल्यास अशा धमक्या देणे बरे नाही.

(उलटपक्षी हीच भाषा धमकीवजा आहे असा प्रतिवाद केला जाऊ शकतो. असो.)

इथे गांधींनी क्रांतिकारकांचा द्वेष केला असे लिहिलेले आहे आणि यात गांधीद्वेष कुठे आला?

प्रस्तुत क्रांतिकारक किंवा प्रस्तुत क्रांतिकारी घटनेबद्दलची माहिती देताना या वाक्याचे काहीही महत्त्व अथवा त्याची कोणतीही गरज वाटत नाही. (या वाक्याशिवाय प्रस्तुत लेख लिहिल्यास क्रांतिकारकांविषयीच्या अथवा त्या घटनेविषयीच्या माहितीत तसूभरही फरक पडत नाही.) परंतु अशा प्रत्येक लेखात अशी वाक्ये समान धागा म्हणून येऊ लागली तर लेखनाच्या हेतूबद्दल शंका निश्चित निर्माण होतात.

'गांधींचे कार्य केवळ कोणत्याही क्रांतिकार्यात मोडता घालणे एवढेच होते' असे समान सूत्र जर प्रत्येक लेखातून प्रतीत होऊ लागले तर या आख्ख्या लेखमालेची प्रेरणा क्रांतिकारकांबद्दल आदर किंवा त्यांच्या कार्याबद्दल माहिती देणे ही नसून निव्वळ गांधीद्वेष ही आहे हे मानण्यास भरपूर जागा राहते.

इथे नकी वाह्यात काय लिहिले गेले आहे? निदान माझ्या लेखात तरी असे काही नाही.

आपल्या लेखांत गांधींबद्दल प्रत्यक्षपणे वाह्यात असे काहीही लिहिलेले नसले तरी वर म्हटल्याप्रमाणे गांधीद्वेषाचे एक समान सूत्र तरी निश्चितच प्रतीत होते. आणि त्यावर येणारे गांधीविषयक बरेचसे प्रतिसाद (किंवा गांधींवर किंवा गांधीवादावर लिहिण्यात येणार्‍या कोणत्याही लेखावरचे बरेचसे प्रतिसाद - एकंदरीतच 'गांधी' या विषयावर मिसळपावावर येणारे बरेच प्रतिसाद) हे वाह्यात असतात.

अर्थात (द्वेषपूर्ण वाटण्यासारखे असले तरी) स्वतः वाह्यात न लिहिण्यामुळे वाह्यात लिहिण्याचा आरोप व्यक्तिशः आपल्याला कदाचित लागू होत नाही, परंतु 'दुर्दैवाने, असे म्हणावेसे वाटते की गांधीजींबद्दल काहीही वाह्यात लिहिले तर ते मिपावर सहज खपून जाते' हे विधान (१) मिसळपावावरील बर्‍याच गांधीविषयक प्रतिसादांबद्दल एक सामान्य निरीक्षण म्हणून सत्य आहे, आणि (२) या विधानातून आपल्यावर वाह्यात लिखाणाचा व्यक्तिगत आरोप झाल्याचे दिसत नाही.

मात्र क्रांतिकारकांवरील प्रत्येक लेखात गांधींबद्दल ओढूनताणून एखादे विधान आणणे हा नेमका खोडसाळपणा होतो की वाह्यातपणा हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल. (हे माझे वैयक्तिक मत. प्रियालीताईंच्या किंवा इतर कोणाच्याही विधानांशी याचा काहीही संबंध नाही.)

_समीर_'s picture

21 Dec 2008 - 8:32 pm | _समीर_

धम्मकलाडूंच्या -- कदाचित अतिअल्लड किंवा मुद्दामहून हलकट -- प्रश्नांना सर्वसाक्षींनी सभ्यपणे दिलेल्या उत्तरांमध्ये भर घालतो आहे.

मुळात प्रश्न विचारण्यार्‍याची भुमिका अल्लड किंवा हलकट असेल तर उत्तर देण्यात काय हशील आहे? आणि तरिही उत्तर देण्याइतके हे प्रश्न रास्त वाटले ना? मग अनावश्यक हलकट्/अल्लड इ.इ. शब्दांचे डोलारे कशाला?

आपला तो सभ्यपणा दुसर्‍याचा मात्र हलकटपणा! :)

एकलव्य's picture

21 Dec 2008 - 8:42 pm | एकलव्य

मुळात प्रश्न विचारण्यार्‍याची भुमिका अल्लड किंवा हलकट असेल तर उत्तर देण्यात काय हशील आहे? आणि तरिही उत्तर देण्याइतके हे प्रश्न रास्त वाटले ना? मग अनावश्यक हलकट्/अल्लड इ.इ. शब्दांचे डोलारे कशाला?

ज्या हलकटपणे धम्मकलाडूंनी क्रांतिकारकांच्या हेतूंना नको नको ते संदर्भ लावले त्याने मला वेदना झाल्या आणि उत्तर द्यावेसे वाटले. त्याचा अर्थ ते प्रश्न रास्त होते असे होत नाही. क्रांतिकारकांवर टीका मी ही केलेल्या आहेत आणि इतरजण जेव्हा प्रश्न उभे करतात त्यामागे हलकटपणाच काय पण हलगर्जीही असावी असे माझ्या मनातही येत नाही.

आपण माझ्या थेट उल्लेखाला डोलारे म्हणत असाल तर जरूर म्हणा. आपली मर्जी!

धम्मकलाडू's picture

21 Dec 2008 - 11:07 pm | धम्मकलाडू

तुम्हाला वेदना होतात तर ऐका हे वेदनाशमक गाणे ढगाला लागली कळ.... यूट्यूबवर

(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

एकलव्य's picture

23 Dec 2008 - 8:21 am | एकलव्य

धम्मकलाडू - आपल्या प्रश्नांमागील भावना लक्षात आल्याने आपली संभावना "हलकट" अशी केली होती. तसे असले तरीही प्रश्नांची उत्तरे(१) मात्र तारतम्य सांभाळूनच दिलेली होती. क्रांतिकारकांविषयी जाणूनबुजून घाणेरडे बोलायचे आणि त्यावर आउट ऑफ द वे जाऊन दादा कोंडकेंचे गाणे सुचवायचे ह्याने आमचे डोके बिलकुल फिरत नाही. आपल्या विकृत पण प्रेमळ सल्ल्याबद्दल आभार. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो ह्या म्हणीला जागून फक्त आपली ही असली विकृती आम्ही निव्वळ विनोद म्हणून सोडून देत नाही इतकेच.

अवांतर -
(१) सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली नाहीत कारण काहींची सर्वसाक्षींनी त्यांच्या प्रतिसादात दिलेली होती.
(२) विचारलेल्या मूर्ख प्रश्नांना उत्तरे देण्याचे बंधन त्यांनी बाळगले नसते तरी चालले असते. मात्र स्वतः दिलेल्या उत्तराबद्दल बळकटी देण्यासाठी दाखले देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे मला वाटते.
(३) हा म्हटले तर स्वतंत्र आणि म्हटले तर संलग्न विषय असल्याने अवांतरात टाकले आहे. प्रतिसादांची जवळजवळ शंभरी भरलेली असल्याने स्वतंत्र प्रतिसाद न देता येथेच अवांतरात समारोप करतो आहे.

क्रांतिकारकांविषयी जाणूनबुजून घाणेरडे बोलायचे

क्रांतिकारकांबद्दल कुणीही वाईट बोललेले नाही. एकंदरच तुम्हाला भाषेची, भाषेच्या अलंकारांची काहीच समज नाही किंवा/शिवाय/आणि तुम्ही अत्यंत खोटारडे व ढोंगी आहात (क्रांतिकारकांविषयी जाणूनबुजून घाणेरडे बोलायचे या तुमच्या वाक्यामुळे) यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. असो. (अंडरविअर न घातलेल्या) एखाद्याची चड्डी (अर्धी हं) चारचौघांत कोणी खाली खेचली तर त्याला राग येणारच म्हणा. अशा माणसाने "हलकट" म्हणून संभावना केलीच तर ती अत्यंत आनंददायक बाब आहे. मम तपाला फळ मिळाल्याचीच ही पावती आहे. तुम्ही वारंवार अशा पावत्या देऊन धन्य करताहात. धन्यवाद.

(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

टग्या's picture

21 Dec 2008 - 6:48 pm | टग्या (not verified)

विशीत वा फरतर तिशीत ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांना कुणाचा द्वेष करायला वेळ नव्हता आणि इच्छाही नव्हती. त्यांनी फक्त मातृभूमिवर अपार प्रेम केले.

हेच खरे! मात्र त्यांचे नाव पुढेपुढे करण्यात स्वतःचा मोठेपणा मानणार्‍यांना (आणि तसे करताना ज्यांचे [ज्या नेत्यांचे] विचार पटत नाहीत त्यांच्या नावाने खडे फोडण्यातच मातृभूमीवर प्रेम मानणार्‍यांना) द्वेष करायला भरपूर वेळही आहे आणि इच्छाही आहे असे दिसून येते. कदाचित स्वतः हौतात्म्य पत्करावे न लागल्यामुळे हा वेळ मिळत असावा आणि इच्छाही होत असावी असे वाटते.

यशोधरा's picture

21 Dec 2008 - 6:53 pm | यशोधरा

टग्या भाऊ, राग मानू नका पण तुमचा हा प्रतिसाद तुम्हांला स्वतःलाही तेवढाच लागू होतो, पहा पटलं तर.

प्रियाली's picture

21 Dec 2008 - 7:07 pm | प्रियाली

तसे करताना ज्यांचे [ज्या नेत्यांचे] विचार पटत नाहीत त्यांच्या नावाने खडे फोडण्यातच मातृभूमीवर प्रेम मानणार्‍यांना) द्वेष करायला भरपूर वेळही आहे आणि इच्छाही आहे असे दिसून येते.

टग्यादादा देशभक्तांवर लेख लिहून द्वेष करतात का काहींचा? गांधींना मोठे करण्यासाठी क्रांतिकारक किंवा संघाबद्दल खोटे नाटे लिहितात का? मी वाचलेले नाही जरा दुवे द्या ना. वाचायची उत्सुकता आहे.

बाकी, खरडाखरडी करायला वेळ काय हो त्यांनाही आहे, तुम्हालाही आहे आणि मलाही आहे. :)

टग्या's picture

24 Dec 2008 - 4:47 am | टग्या (not verified)

गांधी मात्र यांचा द्वेश व निर्भत्सना करीत असत.

आपण म्हणता तर असतील बॉ!

बाय द वे इथे ही रोचक माहिती मिळाली. (संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांबद्दल आहे.):

Hedgewar lost his parents in his early childhood and was educated by his elder brother. After matriculating, he decided to go to Kolkata to study medicine. He was sent to Kolkata by Dr. Moonje in 1910 to pursue his medical studies and unofficially learn the techniques of fighting from the secret revolutionary organisations like the Anushilan Samiti and Jugantar in Bengal[1]. He immediately joined Anushilan Samiti and had contacts with revolutionaries like Surya Sen[citation needed]. He came to believe that although the revolutionaries had immense determination, in a country of continental proportions it was impossible to instigate an armed insurrection. After completing his graduation, he returned to Nagpur, disillusioned with the armed movement. In his memoirs, the third chief of RSS, Balasahab Deoras narrates an incident when Hedgewar saved him and others from following the path of Bhagat Singh and his comrades[2].

असो.

सुनील's picture

24 Dec 2008 - 3:28 pm | सुनील

टग्या ह्यांच्या ह्या प्रतिसादाला अलेले सर्व उपप्रतिसाद उडवले गेले आहेत, असे दिसते.

जर ते प्रतिसाद अवांतर म्हणून उडवले गेले असतील तर त्यापेक्षाही अधिक अवांतर प्रतिसाद येथे अद्यापही राहिले आहेत, त्याचे काय?

कृपया सर्वांना समान न्याय असावा, ही विनंती.

टीप - ते उपप्रतिसाद अवांतर नव्हते असे माझे मत आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कोलबेर's picture

24 Dec 2008 - 9:22 pm | कोलबेर

सहमत आहे! संपादक मंडळाकडुन ह्याबाबतीत तारतम्य अपेक्षीत आहे. इथे उडवलेल्या प्रतिसदांविषयी कसलाही खुलासा केलेला नाही त्यामुळे ते केवळ 'संपादकांना पटले नाहीत' म्हणून उडवले असावेत असे वाटते.

मिसळपावचा जन्म अश्याच प्रकारच्या (कुणालाही उत्तर देण्यास बांधील नसणार्‍या) दडपशाहीतुन झाला आहे ह्याची संपादकांनी जाणीव ठेवावी.

कृपया सर्वांना समान न्याय असावा, ही विनंती.

प्रतिसादकर्त्याला कल्पना द्यावी हे योग्य. (खव आणि व्यक्तिगत निरोप हे दोन्ही बंद केले असेल तर मात्र मूळ लिखाणातच का काढून टाकले आहे ह्याचे कारण दिलेत तर योग्य ठरेल).
मुस्कटदाबी होते आहे असे वाटता कामा नये हे मात्र खरेच.

चतुरंग

सुनील's picture

24 Dec 2008 - 10:11 pm | सुनील

मुस्कटदाबी होते आहे असे वाटता कामा नये हे मात्र खरेच

१००% सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

25 Dec 2008 - 7:21 am | विसोबा खेचर

कृपया संपादकांनी या धाग्यात लक्ष घालावे..

विसोबा खेचर's picture

25 Dec 2008 - 7:21 am | विसोबा खेचर

कृपया सर्वांना समान न्याय असावा, ही विनंती.

सहमत आहे, कृपया संपादकांनी या धाग्यात लक्ष घालावे..

चित्रा's picture

25 Dec 2008 - 9:37 am | चित्रा

संदर्भ लागत नाही. आजच पाच दिवसांनी निवांतपणे मिपा बघते आहे.
फक्त कुठल्याही संपादकांनी काही प्रतिसाद काढले तर तसे लिहावे ही विनंती. अन्यथा कोणी काढले असे गैरसमज होऊ शकतील. शिवाय समान न्याय असावा ही रास्त अपेक्षा आहे.
(स्पष्टीकरणः मी स्वतः जेव्हा प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत तेव्हा माझे नाव स्पष्ट देऊन काढले आहेत/संपादित केले आहेत. "संपादक" या नावाने नव्हे.)

सुनील's picture

25 Dec 2008 - 10:04 am | सुनील

टगेरावांनी एकसारखा प्रतिसाद दोन धाग्यात दिल्यामुळे किंचित गैरसमज झाला होता. दुसर्‍या धाग्यावरील ह्याच प्रतिसादावरील उपप्रदिसाद शाबूत असल्यासे आताच पाहिले आणि गैरसमज लक्षात आला.

तसदीबद्दल माफी असावी.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आधी गर्दीतून प्रतिसाद सापडायची मारामार... सापडलाच तर त्यातले संदर्भ लागायची रड... त्यात पुन्हा डुप्लिकेटस्. (हा दोष सर्वथैव स्वतःकडे बोट दाखवून आहे... कोणी स्वतःवर ओढवून घेऊ नये!)

सुनील तुम्ही एकटे नाही - चीअर्स!

का केली या सगळयानी आपल्या घरादाराची होळी ??
५० -६० वर्शान न्तर
त्यान्चे पुतळे उभे रहातील म्हणुन ??
म्हणजे पुतळ्यान्वर कावळे बसतील
अन खुर्चीन वर बगळे बसतील ??
कषा साठी उतरावे तम्बु ठोकुन ... कोण मेले कुणासाठी रक्त ओकुन ....
समाज एतका बे शर्म झाला आहे की
काय फरक पड्तोय ....
खरच आपण सगळेच कीती मतलबी होत चाललो आहोत... की त्याचे ही दुवे मागतोय ..

~ वाहीदा

गीत's picture

22 Dec 2008 - 1:50 pm | गीत

हाच लेख मनोगतावर ही वाचला