स्माजात वावरताना आपल्या डोळ्यासमोर रोज अनेक गोष्टी घडत असतात. काही महत्वाचे किंवा विशेष प्रसंग दीर्घकाळ लक्षात राहतात पण कधीकधी एखादा छोटासा प्रसंगही लक्ष वेधून घेतो आणि आपला त्या प्रसंगाशी काहीही संबंध नसतानाही मनात घर करून जातो.
असाच एक गेल्या काही दिवसापूर्वीचा आमच्या सोसायटीतला एक प्रसंग. सायंकाळच्या वेळी मी सोसायटीमध्ये फिरत असताना माझ्यापासून थोड्या अंतरावर एक कार मोकळ्या जागेतील पार्किंगमध्ये येऊन थांबली. कारमधून पति, पत्नी आणि दहा-बारा वर्षे वयाचा मुलगा असे कुटुंब खाली उतरले ( मी त्यातल्या कुणालाही ओळखत नसलो तरी ते पती-पत्नी व मुलगा असे कुटुंब असावे असे मानायला हरकत नव्हती ). उतरल्यावर पती व मुलगा सामान्य वेगाने पुढे चालू लागले पण त्या स्त्रीला बहुधा काही दुखापत झाली असावी किंवा इतर काही वैद्यकीय समस्या असावी त्यामुळे ती संथपणे चालत होती. अर्थातच पती व मुलगा पुढे गेले तर पत्नी मागे पडली. पण काही क्षणांतच तो मुलगा थांबला व मागे फिरला आणि आपल्या आईच्या जवळ आला. आईचा हात त्याने आपल्या खांद्याभोवती लपेटून घेतला व आईसोबत चालू लागले. मुलगा मागे गेलेला पाहून मग पतीसुद्धा थांबला. मागे वळुन "अरे काय झाले ?" असे विचारत तो मागे फिरला आणि मग आपल्या पत्नी व मुलाच्या सोबतीने चालू लागला.
खरेतर हा खूपच छोटासा प्रसंग होता पण त्या मुलाने मुद्दाम मागे येवून आईचा हात आपल्या खांद्याभोवती लपेटून घेतला वा तो आईसोबत चालू लागला ती कृती खूपच लोभसवाणी होती...
कदाचित त्याच्या वडिलांकरिताही ती एक शिकवण असावी काय असा विचार माझ्या मनात चमकून गेला
प्रतिक्रिया
7 Dec 2021 - 7:30 pm | कुमार१
**आईसोबत चालू लागला ती कृती खूपच लोभसवाणी होती...
>>>
छान !
8 Dec 2021 - 10:42 am | तर्कवादी
धन्यवाद कुमारजी
7 Dec 2021 - 7:34 pm | मुक्त विहारि
नाॅर्मल आहे
9 Dec 2021 - 10:57 am | कर्नलतपस्वी
कालच हेलीकॉप्टर आपघाता मधे जनरल बिपीन रा़वत आणी सौ मधुलीका रावत यांचा आपघाती मृत्यू झाला. ही कुठली सोबत म्हणायची.
कसलेला सैनिक आणि कुशल सैन्य नेता, भावपूर्ण आदरांजली.