मराठी बाणा...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
12 Nov 2008 - 5:17 pm

राम राम मंडळी,

आमच्या ब्लॉगवर गुगलच्या ऍडसेन्सकरता आम्ही अर्ज केला होता. तो अर्ज नामंजूर करणारे आम्हाला आलेले त्यांचे पत्र खालीलप्रमाणे..

Hello Chandrashekhar Ramchandra Abhyankar,

Thank you for your interest in Google AdSense. Unfortunately, after
reviewing your application, we're unable to accept you into Google
AdSense at this time.

We did not approve your application for the reasons listed below.

Issues:

- Unsupported language

---------------------

Further detail:

Unsupported Language: We've found that the majority of your site's
content is in a language we do not currently support. Right now, we're
only able to offer language support and ad targeting for the languages
listed here:
https://www.google.com/support/adsense/bin/answer.py?answer=9727&hl=en_US .
If you manage or own another site in one of our supported languages,
feel free to resubmit your application as described below.

While we look forward to supporting your language, we don't yet have a
date as to when AdSense will be available for you. If you'd like to
stay up-to-date with the languages we support, please feel free to
check back with us at the above link.

Please also be aware that if your website language is in an AdSense for
Search only supported language (Indonesian, Thai, or Vietnamese), you
must submit a new application using a different email address, at
https://www.google.com/adsense?hl=en_US . In the "Website Language"
menu, please select the correct primary language of your site. This
will assist us in our review of your application.

---------------------

For a complete list of AdSense criteria, please visit:

https://www.google.com/adsense/policies?hl=en_US

https://www.google.com/adsense/localized-terms?rc=IN&ce=1&hl=en_US

To update and resubmit your application, please visit
https://www.google.com/adsense?hl=en_US and log in at the 'Existing
Customer Login' box using the email address and password you submitted
with your application. Our specialists will review your account for
compliance with our program policies, so please make sure to resolve
all of the issues listed above before resubmitting.

Please contact us at adsense-support@google.com if you have any
questions.

Sincerely,

The Google AdSense Team
============================================================

या पत्राला आम्ही दिलेले उत्तर...(आमचे उत्तर निळ्या अक्षरात..)

>> If you manage or own another site in one of our supported languages,
>>feel free to resubmit your application as described below.

It would be more better if you start supporting my language..!

I have NO NEED to change my language...!

>>While we look forward to supporting your language,

Better..!

>>we don't yet have a date as to when AdSense will be available for you.

Or, you can say -

we don't yet have a date as to when you will be available for Adsense..! :)

Anyways, pls take your own time. No probs..!

>>If you'd like to stay up-to-date with the languages we support, please feel free to
>>check back with us at the above link.

When you will start supporting my language, please feel free to write to me...!

Regards,
(Marathi) Chandrashekhar Ramchandra Abhyankar.

===========================================================

फोकलिचे साले! आमची भाषा ओळखत नाहीत..! गेलात उडत भडव्यो..! :)

जय मराठी..!
जय महाराष्ट्र..!

आपला,
(वेडझवा कोकणी) तात्या अभ्यंकर.

भाषासमाजप्रकटनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

12 Nov 2008 - 5:38 pm | विनायक प्रभू

मनःपुर्वक अभिनंदन

छोटा डॉन's picture

12 Nov 2008 - 5:50 pm | छोटा डॉन

च्यायला कमाल आहे ह्या गुगलवाल्यांची ...
साले मराठी ओळखत नाहीत म्हणजे काय ???

गेले उडतं ...
तात्या, जे केलेत ते योग्य केलेत, छान वाटले ..
तुमचे अभिनंदन ...

>> When you will start supporting my language, please feel free to write to me...!
मस्तच !!! :) :) :)

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2008 - 5:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरील कारणामुळे आमचाही अर्ज नामंजुर झालेला आहे.
निळ्या अक्षरातील उत्तर आम्हीही लिहावे म्हणतो :)

-दिलीप बिरुटे

भाग्यश्री's picture

12 Nov 2008 - 10:14 pm | भाग्यश्री

सेम.. माझाही अर्ज याच कारणाने नामंजुर झाला होता.
मराठी ब्लॉग्स इतके असताना गुगल अजुनही सपोर्ट करत नाही म्हणजे काहीही!!
निळ्या अक्षरातली उत्तरं मीही देणार! :))

http://bhagyashreee.blogspot.com/

अभिरत भिरभि-या's picture

12 Nov 2008 - 6:17 pm | अभिरत भिरभि-या

या "गुल " डोक्यावाल्यांनी
Swedish
Hebrew Thai
Turkish
भाषा यादीत दिल्यात. वरिल प्रत्येक भाषेपेक्षा आपली भाषक संख्या जास्त आहे.
हा घ्या पुरावा
http://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_number_of_native_speakers

गुगलचा निषेध !!!

तात्यांचे अभिनंदन !!!!

( गुगल वरील बहिष्कार शक्य होईल का असा विचार करणारा गुगल जीवी आयटी हमाल)
अभिरत

कलंत्री's picture

12 Nov 2008 - 6:59 pm | कलंत्री

मराठी संकेतस्थळांनी गुगल वर अर्जाचा भडिमार केला पाहिजे.

पडली की तात्यांचे नाव चंद्रशेखर आहे.
मा.चंद्रशेखर आपण घेतलेली भूमीका मला आवडली.

अभिज्ञ's picture

12 Nov 2008 - 7:09 pm | अभिज्ञ

"सी रामचंद्र" हे नावहि तात्यांना चपखल लागू पडतेय.
:)

अभिज्ञ.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 Nov 2008 - 7:16 pm | घाशीराम कोतवाल १.२

तात्या काळ्जी करु नका पंढरपुरचा विठोबा आनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत लालबागचा राजा आपल्या पाठीशी आहे गरज लागली तर आम्हाला हाक मारा आम्ही आहोतच तयारीत

लालबाग च्या राजाचा विजय असो
संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 Nov 2008 - 7:18 pm | घाशीराम कोतवाल १.२

च्यायला कमाल आहे ह्या गुगलवाल्यांची ...
साले मराठी ओळखत नाहीत म्हणजे काय ???

गेले उडतं ...
तात्या, जे केलेत ते योग्य केलेत, छान वाटले ..
तुमचे अभिनंदन ...

फोकलिचे साले! आमची भाषा ओळखत नाहीत..! गेलात उडत भडव्यो..!

जय मराठी..!
जय महाराष्ट्र..!

संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत

शिंगाड्या's picture

12 Nov 2008 - 7:19 pm | शिंगाड्या

तात्या,
सडेतोड उत्तराबद्दल अभिनंदन..:-)
अभिमान वाटतो आम्हाला तुमचा..

मराठी_माणूस's picture

12 Nov 2008 - 8:12 pm | मराठी_माणूस

खरमरीत उत्तरा बद्दल अभिनंदन आणि एक मराठी माणूस म्हणुन धन्यवाद

सर्वसाक्षी's picture

12 Nov 2008 - 8:47 pm | सर्वसाक्षी

तात्या,
उत्तम केलेस! यांना सगळे लोंबणारे पाहायची सवय, हाऽड करणारा भेटला नसावा.

इतकी उत्तम भाषा समजत नसेल तर गेले उडत.

आजानुकर्ण's picture

12 Nov 2008 - 9:13 pm | आजानुकर्ण

सहमत आहे.

आपला,
(सहमत) आजानुकर्ण

मात्र more better ऐवजी फक्त better चालले असते

आपला,
(best) आजानुकर्ण

कोलबेर's picture

12 Nov 2008 - 9:49 pm | कोलबेर

मात्र more better ऐवजी फक्त better चालले असते किंवा much better तरी.

आनंद's picture

12 Nov 2008 - 9:08 pm | आनंद

कमाल आहे तात्या तुमची, कांप्युटरन लिवलेल्या बी पत्राला तुम्ही उत्तर देता.

कोलबेर's picture

12 Nov 2008 - 9:51 pm | कोलबेर

कमालच आहे. आम्ही तर कांप्युटरने लिवलेल्या 'ए' पत्राला पण उत्तर देत नाही.. :)

प्रभाकर पेठकर's picture

12 Nov 2008 - 10:11 pm | प्रभाकर पेठकर

दुर्दैव गुगल्यांचे. मराठी भाषेच्या चरणी सेवा रुजू करण्याचे भाग्य त्यांनी लाथाडले.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

टारझन's picture

12 Nov 2008 - 10:21 pm | टारझन

वरिल प्रतिक्रिया फारच उत्साहात दिल्यासारख्या वाटतात. प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या पॉलीसी असतात. आणि जाहीरात करणार्‍या स्पॉसर्स वर हे अवलंबून असते.. आता गुगलला काही तसे स्पॉंसर्स भेटले नसावेत ...
पण गुगलला शिव्या देउन काही होणार आहे का? आपण आज गुगल सर्विस जगू शकतोय का ? विचार करून स्वतःलाच उत्तर द्या ...
मराठी पॉलिसीत नाही याचं आश्चर्य आणि दु:ख दोन्ही झालं .. पण गुगलला वाईट म्हणन्याचा मला कोणताही नैतिक अधिकार नाही. (हे वैयक्तिक मत) ... गुगल ऍड्स पॉलिसी मधे मराठी इंक्लूड झाली तर आणंद होइल ..

(गुगल्/ऑर्कुटपेमी)
टारझन गुगली

ऋषिकेश's picture

13 Nov 2008 - 10:18 am | ऋषिकेश

टारोबाशी सहमत

-(सहमत गुगर्लप्रेमी) ऋषिकेश

मानव's picture

13 Nov 2008 - 12:13 am | मानव

लय भारि

च्या मारि मर्‍हाटी भा षा म्हायित नाय भडविच्याना !

गेल ऊडत ,हिथ कुनाच अडुन राहलय ,लाल तोण्डाचि माकड !

प्रमोद देव's picture

13 Nov 2008 - 10:18 am | प्रमोद देव

माझ्या पूर्णपणे मराठी जालनिशीवर गुगलच्या जाहिरातींसाठी मी अर्ज केला होता आणि तो चक्क संमतही झाला. मी काही दिवस माझ्या जालनिशीवर जाहिराती ठेवल्या होत्या. पण मला त्यात विशेष काही फायदा दिसला नाही म्हणून मी त्या चक्क काढून टाकल्या. आजही माझ्या खात्यात २-३ डॉलर जमा आहेत म्हटलं! ;)
अहो पण जिथे माझ्या जालनिशीवर कुणी फिरकतही नाही तिथे अशा जाहिराती लावल्या काय नी नाही लावल्या काय?
काय गाववाल्यानु? खरा का नाय?

भास्कर केन्डे's picture

14 Nov 2008 - 7:54 pm | भास्कर केन्डे

तात्यांचा अनुभव वाचून वाईट वाटलं अन तात्यांनी लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल आदरही.

माझ्या अनुदिनीसाठी मात्र मला देव साहेबांसारखाच अनुभव आला. पण त्यावेळी अनुदिनीचं नाव विंग्रजीमध्ये टंकित केलेलं होतं. आता मराठीत आहे. तेव्हा पुन्हा एकदा अर्ज करुन पाहतो म्हणजे नक्की कळेल गोम काय आहे ते.

आंतरजालावरच्या मराठी लोकांना इंग्रजी सुद्धा येतं हे गुगल ला महिती नसेल काय? कारण त्यांच्या एका मार्केटिंगच्या तत्वानुसार इंग्रजी येत असेल पण मातृभाषा दुसरी असेल तर त्या लोकांवर त्यांच्या मातृभाषेतून जाहिरातींचा भडिमार करावा. जसे की कोरियन, रशियन, वगैरे.

गुगल वाल्यांना मराठी सर्फरांचे सुत्र समजाऊन सांगता येईल काय?

आपला,
(संभ्रमित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

जैनाचं कार्ट's picture

13 Nov 2008 - 10:34 am | जैनाचं कार्ट (not verified)

गुगल ऍड !

ही प्रणाली तुमच्या संकेतस्थळावरील कटेन्टवर काम करते !
उदा. तुमच्या संकेतस्थळावर पुस्तक / न्युज / खरेदी / विक्री असे शब्द असतील तर त्या शब्दांना अनुरुप अशी जाहिरात गुगल ऍड शोधून तुमच्या संकेतस्थळावर दाखवतो !

पण मराठी मध्ये एक अडचण आहे... मराठी भाषेत ऍड देणारेच कोणी नाही आहे ;) पण हिंदी / बंगाली भाषांना गुगल ऍड सपोर्ट करतं कारण त्या भाषेतील व्यवसाईक हिंदी व बंगाली मध्ये ऍड देतात !

तुम्ही गुगल ला दोष नाही देऊ शकत त्यांचा तर धंदा आहे.... जेव्हा त्यांच्या कडे मराठी ऍड येतील तेव्हा ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील ! ही पॉलिसी आहे ! माझा त्यांच्याशी पत्र व्यवहार ही झाला आहे! (माझे शब्दच्या वेळी) तेव्हा त्यांनी हाच मुद्दा सांगितला होता !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

महेश हतोळकर's picture

13 Nov 2008 - 11:00 am | महेश हतोळकर

पण राजेंचा ही मुद्दा बरोबर आहे. जर धंदा नसेल तर का गुगलने मदत करावी. मला वाटतं गुगल खरंच या बाबतीत काम करत आहे. सध्या येथे हिंदी इंग्रजी भाषांतराची सोय उपलब्ध आहे. मराठी इंग्रजी भाषांतराची सोय झाल्यावर जाहिरातीही सुरु होतील. शेवटी त्यांना ही पैसा कमवायचा आहे.

महेश हतोळकर

साती's picture

13 Nov 2008 - 11:11 am | साती

तात्या, माझाही अनुभव प्रमोद देवांसारखाच आहे. जेव्हा माझ्या ब्लॉगची आउटलाईन इंग्रजीत होती तेव्हा कंटेन्ट मराठी असूनही ऍडसेन्स सपोर्ट करत होतं. आता मीच काही लिहित नसल्याने काढून टाकलंय म्हणा.
पण इतके मराठी ब्लॉग असताना गुगलला आता का असे भिकेचे डोहाळे लागलेत? :)
मल वाटतं राज म्हणतात त्याप्रमाणे केवळ मराठी शब्दात ऍड देणारे लोक वाढले की आपोआप गुगल सार्‍या सेवा मराठीत व्यवस्थित चालू करेल. गुगल बिचारं बिनडोकसारखं अक्षराला अक्षर जुळवून काम करतं हो, स्वतःचं जास्त डोकं नाही लावत.

साती

विसोबा खेचर's picture

13 Nov 2008 - 11:16 am | विसोबा खेचर

चला! या निमित्ताने बर्‍याच गोष्टींचा वुलगडा झाला.. :)

तात्या.

--

"हा मारुती कांबळे कोण? त्याचा एकदा छडा लावलाच पाहिजे"
-मास्तर (सामना)

अनामिका's picture

14 Nov 2008 - 1:17 pm | अनामिका

तात्या केलेत ते योग्यच केलेत!
मिसळपावची जाहिरात करायला कशाला हवी आहे गुग्गल आणि तत्सम कुणी?
मिसळपावचे सभासदच हे कार्य योग्य रितीने पार पाडु शकतात्.आणि अमृताते पैजा जिंकणार्‍या माय मराठीला" तिच्याच मुळ स्वरुपात जाहिरातीस नकार देणार्‍यांची पत्रास ठेवतो कोण इथे?
गेले उड्डत!!!!!!!!!!!
"अनामिका"

भाग्यश्री's picture

14 Nov 2008 - 2:42 pm | भाग्यश्री

मिसळपाव??
अनामिकाताई थंड घ्या! :)
तात्या, त्यांचा ब्लॉग म्हणाले..

http://bhagyashreee.blogspot.com/

जैनाचं कार्ट's picture

14 Nov 2008 - 2:55 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>>अनामिकाताई थंड घ्या!

=))

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2008 - 2:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनामिकाताई थंड घ्या!

=))

अभिरत भिरभि-या's picture

14 Nov 2008 - 7:33 pm | अभिरत भिरभि-या

आहेत त्या. जरा दमाने चेष्टा करा :)

अनामिका's picture

14 Nov 2008 - 7:24 pm | अनामिका

मी थंडच आहे हो!
काळजी नसावी ;)
"अनामिका"

शनआत्तार's picture

14 Nov 2008 - 7:40 pm | शनआत्तार

तात्या, जे केलेत ते योग्य केलेत, छान वाटले ..
तुमचे अभिनंदन ...

याना असेच केले पाहीजे आपली भुमिका योग्य आहे.

आमचो तुमका पाठींबो असा.
तुमचो गाव वालो
आत्तार सर शिरगाव

सुनील's picture

14 Nov 2008 - 8:13 pm | सुनील

तात्या, तुम्हाला आलेले पत्र हे सिस्टीम्-जनरेटेट दिसते. अशा पत्रांना उत्तरे देण्यात काही हशील नसते. "बाणा" थोडासा कुरवाळला जाईल पण बाकी काही नाही.

टारू आणि जैन यांच्या प्रतिसादाशी सहमत.

(चहा सोडून आम्ही सगळे थंडच घेतो!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनामिका's picture

14 Nov 2008 - 11:57 pm | अनामिका

:? आहेत त्या. जरा दमाने चेष्टा करा

=)) =)) =))
अरे मी काय वाघ आहे का? ;)
"अनामिका"

काळा डॉन's picture

15 Nov 2008 - 8:44 am | काळा डॉन

हे हे हे तात्याचं विंग्लिश पन आमच्यासरकच दिसतय!

(ढ भोपळा) काळू डॉन

घासू's picture

15 Nov 2008 - 8:29 pm | घासू

आपलं एकच म्हणणे

जय महाराष्ट्र!

पाटीलअमित's picture

4 Jul 2015 - 3:14 am | पाटीलअमित

पुढे काय? तिच परी स्थीती अजुनहि आहे