दर महा १०% परतावा शक्य आहे का?

Primary tabs

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
17 Jan 2019 - 3:51 pm

लोक हो

केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी
देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत).

सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो.

खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत.

10pc

गुंतवणूकलेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

17 Jan 2019 - 5:28 pm | टवाळ कार्टा

पुढच्या 2 महिन्यात ज्या कंपन्या कमीत कमी 5% तरी नक्कीच वर जातील अश्या निदान 5 कंपन्यांची नावे सांगू शकाल का

युयुत्सु's picture

17 Jan 2019 - 5:36 pm | युयुत्सु

पुढच्या 2 महिन्यात ज्या कंपन्या कमीत कमी 5% तरी नक्कीच वर जातील अश्या निदान 5 कंपन्यांची नावे सांगू शकाल का!

नक्कीच! पण मला इतरांना सल्ले देऊन मनःस्ताप नकोय कारण माझ्याकडे सल्ले देण्याचा परवाना नाही. हा अभ्यास ज्याचा त्याने करणे अपेक्षित आहे.

टवाळ कार्टा's picture

17 Jan 2019 - 5:52 pm | टवाळ कार्टा

खिक्क

तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व!

Blackcat's picture

24 Jan 2019 - 2:22 am | Blackcat (not verified)

मला भिंत चालवता येते , पण मी ते तुम्हाला दाखवणार नाही, तुमचा अभ्यास तुम्ही करावा.

मार्कस ऑरेलियस's picture

17 Jan 2019 - 5:52 pm | मार्कस ऑरेलियस

हा डेटा कोठुन काढला ? कृपया त्या साईटची माहेती देता का?

मार्कस ऑरेलियस's picture

17 Jan 2019 - 6:01 pm | मार्कस ऑरेलियस

सहज कुतुहल म्हणुन टॉपच्या ४-५ शेयरचा ग्राफ पाहिला, डिसेंबर्च्या शेवटच्या आठवड्यात किंव्वा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शार्प रेज दिसत आहे अर्थात हे क्वार्टरली रिझल्ट्स चा परिणाम असावा असा अंदाज आहे ! हे थोडे प्रेडिक्टेबल वाटते !

धिस इस इन्टरेस्टिंग ! कॅन डु समथिंग विथ धिस !

कृपया हा डेटा कोठुन मिळवला ते सांगता का ? ह्या कंपन्यांच्या फायनाशियल डिटेल्स मिळतात का ते पहातो !

अनुप ढेरे's picture

18 Jan 2019 - 9:41 am | अनुप ढेरे

र्थात हे क्वार्टरली रिझल्ट्स चा परिणाम असावा असा अंदाज आहे

क्वार्टरली रिझल्ट अत्ता आत्ता यायला सुरु झाले आहेत. त्याचा परिणाम नसावा ही शार्प्त रेन्ज

कृपया हा डेटा कोठुन मिळवला ते सांगता का ?

हे नक्की सांगेन. मार्केटचा सखोल अभ्यास करण्यासाठी खूप टूल्स उपलब्ध आहेत. बरीचशी फुकट पण आहेत. थोडे पैसे टाकायची तयारी असेल तर वेडे-वाकडे विश्लेषण करून देणारी सॉफ्ट्वेअर उपलब्ध आहेत. मी अशी पैसे टाकून ५ तरी वापरली आहेत. त्यात ChartAlert (देशी) आणि Quantshare (परदेशी) ही २ मला सध्या पसंत पडली आहेत. ChartAlert च्या वार्षिक शुल्कात रोजच्या रोज तुम्हाला हवा तो डेटा (EoD, Real time) मिळतो. तो वापरून आपली ट्रेडिंग मॉडेल्स, अल्गोरिदम, strategies बनवता येतात.

ChartAlert मध्ये back testing करता येत नाही. पण Quantshare मध्ये ते येते. माझ्या ट्रेडिंग मॉडेल्सनी ३००% पेक्षा जास्त रिटर्न एका वर्षाच्या कालावधीमध्ये दिले आहेत.

युयुत्सु's picture

1 Apr 2019 - 10:56 am | युयुत्सु

ChartAlert च्या आत्ताच रिलीज झालेली आवृत्ती खुप छान आहे आणि त्यात back testing करता येते.

कदाचित वाचक असा ग्रह करून घेत आहेत की युयुत्सु दर महिना ८-१० टक्के परतावा "एकूण" गुंतवणूकीवर मिळण्याचा दावा करत आहेत. पण युयुत्सू यांनी एका महिन्यात घेतलेल्या एकूण शेअर पैकी काही शेअर ८-१० परतावा देतात असा दावा केला आहे का ?

खरेतर परतावा "एकूण" महिन्यात गुंतवलेली रक्कम आणि त्यावरचा एकूण मिळणारा परतावा असा बघायला हवा. हा एकूण मिळणारा परतावा ८-१० आहे असा वाचकांचा ग्रह आहे.

मूळात युयुत्सु यांचा दावा कदाचित हा आहे की जर समजा १० शेअर घेतले तर असे २-३ शेअर असतील जे १०% परतावा देतील.

अर्थात काही शेअर मधून एवढा परतावा मिळवणे वेगळे आणि सगळ्याच शेअर मधून एवढा परतावा मिळणे वेगळे.या दोन गोष्टींमुळे हा संभ्रम झालेला आहे.

बाकी युयुत्सु यांना सल्ला द्यायचा नसेल तर हरकत नाही. पण त्यांनी शेअर बाजारवर प्राणायामप्रमाणे एक मोठी लेखमाला लिहावी ही विनंती, ज्यामद्दे अगदी शेअर म्हणजे काय , चांगली पुस्तके , यू ट्यूबवरचे चांगले चॅनलल्स इथपासून शेअर अॅनालिसीसच्या पद्धती यासांरखा सगळ्याच वा जास्तीत जास्त मुद्दे अंतर्भूत असतील. यातून आमच्या आणि मिपाकरांच्या माहितीत भरच पडेल.

युयुत्सु's picture

18 Jan 2019 - 3:02 pm | युयुत्सु

मित्रांनो,

शब्दानुज आणि मिपाचे आणखी एक सदस्य (व्यनिद्वारा) यांनी केलेल्या फर्माईशीने मला मनाला थोड्या गुदगुल्या झाल्या, पण प्रामाणिकपणे सांगतो की मोठी लेखमाला लिहिण्यास मी तितकासा पात्र नाही. कारण मला मला आर्थिकजगताचा सर्वंकष अनुभव नाही. माझ्या स्वत:च्या काही मर्यादा आहेत. तशीच काही बलस्थाने आहेत. मला स्वत:ला अगदी परवापरवा पर्यंत कंपनीचा ताळेबंद समजत नव्हता. आता मी दर्दी झालो आहे, असे नाही. FnO सारखे प्रकार मला अजिबात कळलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या वाट्याला मी गेलेलो नाही. मार्जिन ट्रेडींग आणि डे ट्रेडींग हे प्रकार काय आहेत, एव्ह्ढे समजाऊन घेण्यापुरते जुजबी करून बघितले, पण माझ्या एकंदर प्रकृतीला ते मानवणारे नाहीत असे लक्षात आल्यावर परत त्या वाटेला फिरकलो नाही. तसेच मला बॉण्ड मार्केट हा प्रकारही कळलेला नाही.

शेअर बाजारात पैसे मिळवता येतात. पण ते शिस्तबद्ध कार्यक्रम असेल तरच मिळवता येतात. अंदाजपंजे किंवा ऐकीव माहितीवर आधारित केलेला व्यवहार आतबट्ट्याचा असतो हे लक्षात ठेवावे.

मला हिशेब ठेवायचा अतिशय कंटाळा असल्याने मी बरेच वर्षे म्युच्युअल फंडावर माझ्या गुंतवणुकींसाठी अवलंबून राहीलो. पण ३ वर्षांपूर्वी माझ्या ब्रोकरने P&L स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली आहे, हे कळल्यामुळे मला एकदम हुरुप आला आणि ट्रेडींग करायला सुरुवात केली. त्यात Edward Thorp या MIT मधल्या प्राध्यापकाचे आत्मचरित्र वाचल्यावर आणखी उत्साह आला.

माझी उद्दीष्टे अगदी स्वच्छ आहेत -
० घरबसल्या चार पैसे मिळतात त्यामुळे मन आनंदी राहते
० माझी रिसर्चची हौस भागते
० वेळ चांगला जातो.

माझी काही बलस्थाने
० आत्मविश्वास माणसाने कुठुनही आणावा पण तो यशासाठी अत्यंत आवश्यक असतो (मी आय०आय०टी मुंबईचा विज्ञार्थी आहे. त्यामुळे माझ्याकडे बेसिक हुशारी आहे असा आत्मविश्वास (किंवा माज, इगो इ०) माझ्याकडे आहे.). तसेच आपला आत्मविश्वास फाजिल नाही ना हे कळणे पण फार महत्त्वाचे असते. फाजिल आत्मविश्वास ओळखणे तसे फार अवघड नाही. तुम्ही मार्केटमध्ये घेतलेला निर्णय जर एखाद्या अफवेने, बातमीने, इतरांच्या सल्ल्याने डळमळीत होणार असेल किंवा मित्रांनी सांगितले की, "अरे मार्केट कोसळणार आहे", म्हणुन तुम्ही गडबडुन जाणार असाल तर तो आत्मविश्वास खरा नाही.

मला स्वत:ला आलेख, पॅटर्न उत्तम कळतात. त्यामुळे एण्ट्री-एक्झिटची रणनीति आखणे सोपे जाते. यासाठी आवश्यक तो अभ्यास आणि प्रयोग सतत चालु असतात. त्यासाठी वेळप्रसंगी पैसे खर्च करायची तयारी मी ठेवली आहे. तुम्हाला seriously हा उद्योग करायचा असेल तर तुम्हीही हे करणे आवश्यक आहे.

कोणतीही रणनीति कायम उपयोगी पडेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अनेक कल्पना विकसित कराव्या लागतात. मला त्या सारख्या सुचत असतात.

मला स्वत:ला मार्केट कितीही गडगडले तरी झोपेवर किंवा इतर आयुष्यावर कसलाही परिणाम होत नाही. २०१८ च्या क्रॅशमुळे माझा पोर्ट्फोलिओ पण गडगडला आहे. पण तो सावरायची योजना माझ्याकडे असल्याने माझे डोके अत्यंत थंड आहे.

माझा आत्मविश्वास मी अत्यंत छोट्या छोट्या व्यवहारांनी वाढवत नेला. ट्रेडींगमध्ये कोणतीही नवीन कल्पना तपासायची असेल तर सुरुवातीला छोटी रक्कम गुंतवूनच मी माझ्या कल्पना विकसित करतो. माझ्या मॉडेलने सुचवलेले स्टॉक जेव्हा बड्या ब्रोकरने सुचवलेले असतात, तेव्हा तो एक दुजोरा असतो आणि डोळे मिटुन मी ते खरेदी करतो. पण बड्या ब्रोकरने दिलेले सल्ले (reccomendations) मी आंधळेपणाने अजिबात वापरत नाही.

भारतात आता Trader's Confrences नियमित होऊ लागल्या आहेत. त्यातील अनेक सत्रे तूनळीवर उपलब्ध आहेत.

शब्दानुज यांनी एक संभ्रमाचा मुद्दा उपस्थित केला आहे - मार्केटमध्ये सतत लाटा (सायकल्स) येत असतात. एक लाट ओसरायच्या आता नफा बुक करून दुसरी लाट पकडणे एकदा जमले की दर महा १०% परतावा अशक्य नाही. मार्केट गडगडत असले तरी काही स्टॉक चढत असतात. ते शोधुन कोसळत्या मार्केटमध्ये पण पैसे कमावता येतात.

जाता जाता - पैसा कमवा पण कर न चुकता भरा.

मी कितीतरी वेळा मिपकरानां अर्थविश्व विभाग सुरु करन्यासाठी विनंती केली होती !!! जिथे आपल्या सारखे एक्सपर्ट मुळे माझ्या सारख्या नवख्या ला मदत होईल .
2018 ला मी मार्केट मध्ये एंट्री केली त्या वेळी माझे सुद्धा 10 % मंथली चे टार्गेट होते पण नवीन असल्यामुळे गटांगळय खाल्ल्या . एक वर्ष झाले पोर्टफोलियो 60 % मायनस मध्येच आहे . कारण एंट्री आणि एग्जिट चुकल्या . वर जाणारे शेयर्स घेत गेलो आणि घेतल्या नंतर लगेच दुसऱ्या दिवसांपासून ते पडायचे मग घाबरून विकायचो . आता तीन महीने झाले हेग 4650 ला घेतला व होल्ड केला तर आज त्याची किंमत 3544 आहे . पक्का वैतगलोय राव !!!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jan 2019 - 8:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

गेल्या ३-४ वर्षांपासुन मी म्युच्युअल फंडमध्ये जास्त ईंटरेस्ट घेउन गुंतवणुक करतोय. पण २०-२२ टक्के दिसणारा फायदा आता ५-६ टक्क्यावर आलाय. स्मॉल कॅपची तर वाटच लागलीये. मिड कॅप खुपच खाली आलेत. डेट फंड आत्ता कुठे थोडेसे वर आहेत. फॉरेन फंड (बी एन पी, डी एस पी, फ्रँकलिन )तर वर यायचे नावच घेत नाहीत. टेक्नॉलॉजी फंड बरे आहेत पण इन्फ्रा आणि कन्झ्युमर वाले डुबलेत.

शेअर्समध्ये आयशर मोटर, टाटा मोटर ( ऑटो सेक्टर) हेग, ग्राफाईट बसले आहेत. सॉफ्टवेअर आणि बँका काही प्रमाणात तग धरुन आहेत पण फारसे आकर्षक नाहीत.

थोडक्यात मी धीर धरलाय पण किती दिवस असे चालणार समजत नाहिये.

संपादक मंडळ ला काय प्रॉब्लम आहे तेच कळत नाही , फक्त चर्चा करण्यासाठी अर्थविश्व विभाग सुरु करायला काय हरकत आहे ?
जेणेकरून तदन्य मंडळी त्यांचे विचार / अनुभव मांडतील , एखाद्या चांगल्या शेअर बद्दल माहिती समजेल . शेवटी शेयर्स गुंतवणूक मधील फायद्या / तोटया ला जबाबदार गुंतवणूकदार च असतो एवढी अक्कल त्याला असतेच .

शब्दानुज's picture

18 Jan 2019 - 10:05 pm | शब्दानुज

कलाविभाग काढून टाकण्यासारखा भाग आहे. तिथला सगळ्यात वरचा लेखही २ वर्ष जुना आहे. तो काढून अर्थजगत सुरु करण्यास अडचण नसावी.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2019 - 8:16 pm | टवाळ कार्टा

अर्थविभागाला राजकारणाइतका ट्यार्पी नसेल

युयुत्सु's picture

19 Jan 2019 - 8:02 am | युयुत्सु

आता तीन महीने झाले हेग 4650 ला घेतला व होल्ड केला तर आज त्याची किंमत 3544 आहे . पक्का वैतगलोय राव !!!!

चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खाली आले तर ती संधी असते हे लक्षात ठेवावे. माझ्या मॉडेल प्रमाणे हेग मधली रॅली संपली असून तो अजुन खाली यायची शक्यता आहे. तसे झाल्यास तो परत खरेदी करावा. नवी रॅली चालु व्हायला अजुन काही महिने तरी वेळ जावा लागेल.

युयुत्सु's picture

19 Jan 2019 - 9:06 am | युयुत्सु

माझी शेअर्स निवडायची पद्धत

प्रथम निफ्टीच्या तुलनेत कोणते सेक्टर्स चांगली कामगिरी करत आहेत, हे मी वरचेवर तपासतो.
या सेक्टर्स मध्ये लोकांची पसंती कशाला आहे, हे मी शोधतो
सर्वात जास्त पसंतीचे २-३ सेक्टर निवडून मग त्या त्या सेक्टर मध्ये चांगली कामगिरी करणारे शेअर्स "बाय" सिग्नल देत
आहे का तपासतो.
असे शेअर्स मिळाले नाहीत तर त्याच सेक्टर मध्ये बाय देणारे इतर चांगले शेअर कोणते, हे शोधतो

अशा चाळणीतून निवडलेले शेअर्स सहसा चांगलेच निघतात आणि डॊळे मिटून घेता येतात.

ज्ञानव's picture

20 Jan 2019 - 9:22 pm | ज्ञानव

हे सोदाहरण दिलेत तर चर्चेला उधाण येईल. बरेच पंटर आहेत इथे.

युयुत्सु's picture

19 Jan 2019 - 11:44 am | युयुत्सु

वरील पद्धतीप्रमाणे निवड करत गेल्यास फेडरल बॅन्क हा शेअर माझे मॉडेल सुचवत आहे. मला या शेअर विषयी फारशी माहिती नाही म्हणून मनी कंट्रोलवर जाऊन तपास केला असता प्रभुदास लिलाधर आणि मोतीलाल ओस्वाल या दोन ब्रोकरनी या शेअरला बाय दिला आहे.

चालु भाव ९० आहे आणि १००-११५चे टार्गेट आहे

त्यामुळे मी हा सोमवारी डोळे मिटून घेणार!

सूचना - सदर उदाहरण केवळ नमुन्यासाठी दिले आहे. हे माझे रेकमेंडेशन नाही. स्वत: अभ्यास केल्या शिवाय कोणताही व्यवहार करू नये

शाम भागवत's picture

19 Jan 2019 - 2:19 pm | शाम भागवत

हा शेअर अजून थोडा खाली येऊ शकतो. बॅंक निफ्टीकडे लक्ष ठेवले तर योग्य वेळेच्या जवळ जाता येऊ शकेल.

युयुत्सु's picture

19 Jan 2019 - 2:20 pm | युयुत्सु

हो.

भंकस बाबा's picture

20 Jan 2019 - 11:12 pm | भंकस बाबा

ब्रोकरेज हाउसेस चोर कंपन्या असतात. ह्यांच्या बोळ्याने दूध पिणारा हमखास तोंड पोळून घेतो

तुम्ही म्हणता त्यात बरेच तथ्य आहे. त्यांचा "बाय" माझ्या "बाय"च्या बराच अगोदर येतो असा अनुभव आहे.

मराठी_माणूस's picture

19 Jan 2019 - 12:12 pm | मराठी_माणूस

Value research च्या stock advisor बद्दल काय मत आहे ?

युयुत्सु's picture

19 Jan 2019 - 1:00 pm | युयुत्सु

Value research च्या stock advisor बद्दल काय मत आहे ?

मी त्यांची फक्त म्यु० फंडांची रॅंकीग वापरली आहेत. Equitymaster च्या शेअर्स शिफारशी वापरून बघितल्या पण फारसे काही हाती लागले नाही. अशा मॉडेल्सची recommendation आणि आपली सायकॉलॉजी यांचे जुळावे लागते नाहीतर फज्जा उडतो. स्वत:च्या अभ्यासाला पर्याय नाही.

उगा काहितरीच's picture

19 Jan 2019 - 1:46 pm | उगा काहितरीच

अशोक लेलँड बद्दल काय करावे ? १५२ च्या आसपास घेतले होते. १६५ वगैरे गेले तेव्हा चांगलं वाटत होतं पण आता चक्क १०० च्या खाली ! सध्या गडबडून जाऊन विकून नाही टाकलेत. पण काय करावं कळत नाहीये .

युयुत्सु's picture

19 Jan 2019 - 2:23 pm | युयुत्सु

माझ्या मॉडेल प्रमाणे याची घसरगुंडी अजुन २-३ महीने चालु राहिल असे वाटते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jan 2019 - 12:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी एच बी एल पॉवर बरेच (अंदाजे ५००) घेउन ठेवले आहेत रु. ६० च्या आसपास पण सध्या २८ रु. चालु आहे.
तसेच कोणीतरी सुचवले म्हणुन एल अँड टी फायनान्स घेतलाय २०० च्या आसपास तोही १४० रु. आहे. हे दोन्ही शेअर्स वर येतील का आणि कधी? निदान मुद्दल निघेल ईतके झाले तरी बास.

मराठी कथालेखक's picture

22 Jan 2019 - 12:27 pm | मराठी कथालेखक

फेब्रुवारी मध्ये अशोक लेलँड काहीसा वर येईल (११०~११५ पर्यंत) पण १५० (तुमची खरेदी किंमत) ओलांडून नफ्यात येण्याकरिता ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत वाट बघावी लागेल.

युयुत्सु's picture

20 Jan 2019 - 12:37 pm | युयुत्सु

एच बी एल पॉवर
घसरगुंडी थांबत आली आहे पण निश्चितपणे upward movement अजुन सुरु झाली नाही.

L&TFH अजुन थोडा खाली येऊन २-३ महिन्यानी वर जायला सुरुवात होईल असे वाटते.

मला असे वाटते की तुम्ही अजुन सहा महिने तिकडे बघु पण नका.

ज्ञानव's picture

20 Jan 2019 - 9:20 pm | ज्ञानव

शेअर्सच्या वैयक्तिक ट्रेडिंगबद्दल इथे चर्चा करू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. व्यनी किंवा व्हॉटस अप द्वारे संपर्क साधून चर्चा करावी.

कपिलमुनी's picture

20 Jan 2019 - 12:42 pm | कपिलमुनी

10% महिना हे एखाद्या शेयरसाठी एखादा महिना जमेल पण लॉंग टर्म साठी unrealistic target आहे.

सकाळी बाथरूम मध्ये बसल्या बसल्या ट्वीट करून जगातील सगळे शेअर बाजार माझ्या नावकऱ्या ( ट्रम्प ) ने पाडले आहेत . त्यात आपल्या लोकसभेच्या 2019 मध्ये निवडणुका आहेत त्या मुळे परकीय गुंतवनणुक़दार धस्तावले आहेत . या मुख्य घटना मुळे लॉन्गटर्म वाल्याचें ( मी सुद्धा ) पोर्टफोलियो 40 ते 50 टक्क्यानीं खाली आहेत .
क़दाचित इन्वेस्टमेंट इतकी किंमत यायला अजुन आठ दहा महीने लागतील अस वाटातय .

युयुत्सु's picture

20 Jan 2019 - 5:20 pm | युयुत्सु

खरे आहे. पण कार्वी आणि सी आय आय चे अहवाल पण वाचा.

ज्ञानव's picture

20 Jan 2019 - 9:17 pm | ज्ञानव

शक्य आहे. पण मिळत नाही.

सुबोध खरे's picture

21 Jan 2019 - 8:59 am | सुबोध खरे

दरमहा १० % परतावा सलग पाच वर्षे मिळवणारा माणूस मला दाखवून द्या

छत्रपती शिवाजी टर्मिनस वर सकाळी १० वाजता सर्वांच्या समोर मी त्याचा जाहीर सत्कार करायला आणि त्याचे चरण तीर्थ घ्यायला तयार आहे.

सुबोध खरे's picture

21 Jan 2019 - 9:20 am | सुबोध खरे

दहा काय पाच वर्षे सोडाच अगदी तीन वर्षे जरी दरमहा १००० रुपये गुंतवले तरी त्याचा (३६ हजार रुपयाचा) परतावा ३ लाख ६० हजार इतका येतो.

तीन वर्षात

सातत्याने

दसपट करून देणारी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हि अशक्य गोष्ट आहे. (चुकून एखादे वेळेस अनुमान धपक्याने होणे हा अपवाद आहे. )

अमर विश्वास's picture

21 Jan 2019 - 4:04 pm | अमर विश्वास

दरमहा दहा टक्के परतावा .. हे स्वप्नरंजन आहे.

सलग सर्व महिने दहा टक्के परतावा .. तो ही पूर्ण पोर्टफोलिओवर ?

म्हणजे समजा मी १ जानेवारी २०१८ ला १ लाख रुपये घेऊन मार्केट मध्ये उतरलो .. जे काय शेअर्स खरेदी विक्री केले ...
आणि १ जानेवारी २०१९ ला माझ्याकडे १ कोटी वीस लाख रुपये असतील ?

माझा ओपन चॅलेंज आहे .. मी ५०% प्रॉफिट शेअर करायला तयार आहे .. कोणीही अशी गुंतवणूक करून दाखवावीच ...

कृपया अशा प्रलोभनांपासून दूर राहा ...

युयुत्सु's picture

21 Jan 2019 - 4:37 pm | युयुत्सु

बुवा , तुमच्या आकडे वारी मध्ये गडबड आहे. खाली जे कोष्टक दिले आहे त्यात दर महिन्याला मिळणारी रक्कम दिली आहे. याप्रमाणे १ कोटी वीस लाख रुपये न होता फक्त २ लाख ८५ हजार ३११ रु होतात (यात १ लाख मुळ मुद्दल आहे).

गेल्यावर्षी मार्केट कोसळले होते, त्यामुळे गेल्या वर्षी असा परतावा मिळण्य़ाची शक्यता शून्य!

मी फक्त संधी असते एव्हढेच सांगितले. कोणते ही प्रलोभन दाखवले नाही. माझ्याकडे सल्ला मागण्यास येऊ नये.

Jan 100000
Feb 110000
Mar 121000
Apr 133100
May 146410
Jun 161051
Jul 177156.1
Aug 194871.71
Sep 214358.881
Oct 235794.7691
Nov 259374.24601
Dec 285311.670611

ट्रम्प's picture

21 Jan 2019 - 8:11 pm | ट्रम्प

इतक्या आत्मविश्वासाने चूकीची अकडेवारी नका हो देवू !!!!!

तुमच्या अकडेवारी मुळे माझ्या सारखा नवखा माणूस शेअर मार्केटच्या कधीच नादी लागणार नाही = ) =)

डाम्बिस बोका's picture

1 Mar 2019 - 9:21 am | डाम्बिस बोका

तुमचे गणित चुकते आहे महाराजा. १० % परतावा हा मूळ मुद्दल वर आहे.
दर महा १०% परतावा शक्य आहे का?
पूर्णपणे शक्य आहे. मी स्वतः TRADING कंपनी मधये १२ वर्ष काम केले आहे. तितकीच वर्षे ACTIVE TRADER आहे. सर्वसाधारण १०% plus नियमीत पाने मिळवतो. अभ्यास, नुकसान सोसायची ताकत, नेटवर्किंग अश्या barachach गोष्टी लागतात.

डाम्बिस बोका's picture

1 Mar 2019 - 9:28 am | डाम्बिस बोका

थोडी चूक झाली क्षमा असावी.

दरमहा १०% नाही, परंतु वर्षाला सर्वसाधारण १०% परतावा मिळवता येतो. थोडे महिने उणे आणी थोडे महिने अधिक करून आणि शिस्तबद्ध तयारीने जमते.
मला वाटते १०-२५% वार्षिक परतावा ला सर्वसाधारण सहमती मिळावी.

सुबोध खरे's picture

21 Jan 2019 - 5:51 pm | सुबोध खरे

मी खाली १२ टक्के दरमहा चक्रवाढ व्याजाने पैसे कसे मिळवावे आणि कोट्याधीश कसे व्हावे याचे कोष्टक दिले आहे.

ते वापरून कुणालाही कोट्याधीश होता येईल

पूर्वसूचना--

हे कोष्टक फक्त पुण्यवान माणसांनाच दिसेल

आणि ते पाहण्यासाठी विंडोज ३.१ हि प्रणाली ४८६ संगणकावर वापरावी

मी फक्त हि संधी आहे एव्हढेच सांगितले. कोणते ही प्रलोभन दाखवलेले नाही. माझ्याकडे सल्ला मागण्यास येऊ नये.

https://www.google.com/search?q=how+to&rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&oq=ho...

प्रकाश घाटपांडे's picture

22 Jan 2019 - 10:34 am | प्रकाश घाटपांडे

हे कोष्टक फक्त पुण्यवान माणसांनाच दिसेल >>> मला तर दिसल बुवा! बाकीच्यांच माहीत नाही>

युयुत्सु's picture

22 Jan 2019 - 10:42 am | युयुत्सु

हे कोष्टक फक्त पुण्यवान माणसांनाच दिसेल

आम्ही फक्त आम्हाला जे दिसत त्यावर फोकस करतो, बाकीच्यांना काय दिसते याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही.

युयुत्सु's picture

21 Jan 2019 - 8:35 pm | युयुत्सु
सुबोध खरे's picture

21 Jan 2019 - 8:49 pm | सुबोध खरे

https://money.rediff.com/losers/bse/monthly/groupa

वरच्या दुव्यात गेल्या एक महिन्यात १० % नुकसान झालेले A गटातील ४० समभाग आहेत.

आणि याच कालावधीत निफ्टी मध्ये ०.२% वृद्धीच झाली आहे.

नुसता एक तक्ता दिला कि आपला मुद्दा सिद्ध झाला असे समजणाऱ्यांसाठी.

ज्ञानव's picture

22 Jan 2019 - 9:26 am | ज्ञानव

शुक्रवारी (१८/०१/२०१९ रोजी) ३७५ ला घेतलेला सन फार्मा आज (२२/०१/२०१९ रोजी ) ४१५ पर्यंत आला आहे. विकला तर १०% नक्की मिळतील मी विकणार नाही कारण आत्ता ट्रेंड फोर्मेशन सुरु आहे. कदाचित हा योगायोग असावा. पुढील महिन्यात दुसरा कोणता तरी शेअर आपण चेक करू. वर्षभरात आपल्याला काहीतरी निष्कर्ष पुराव्यानिशी शाबित करता येईलच की....

सुबोध खरे's picture

22 Jan 2019 - 10:07 am | सुबोध खरे

कोणीही माणूस आपले बुडालेले समभाग आणि बुडालेला पैसे याची जाहिरात करत नाही हि वस्तुस्थिती मी नम्रपणे लोकांच्या निदर्शनास आणू इच्छितो.

खुले आव्हान --

सातत्याने १०% दरमहा मिळवून ५ वर्षात कोट्याधीश झालेला माणूस मला दाखवा आणि १००० रुपये मिळवा

बाकी चालू द्या

थॉर माणूस's picture

23 Jan 2019 - 12:37 am | थॉर माणूस

सातत्याने १०% दरमहा मिळवून ५ वर्षात कोट्याधीश होता येते असा दावा मिसळपाव वर कुणी आणि कधी केला हे दाखवाल का जरा?

काय राव तेच तेच रडगाणं लावलंय. नसेल जमत तुम्हाला तर नका ना करू ट्रेडींग, कशाला तेच तेच छापताय परत? मुळात शेअर्स किंवा फॉरेक्स किंवा कमॉडीटी... कुठल्याच ट्रेडींगमधे ठराविक परतावा मिळणारच अशी शाश्वती कुणीही देत नाही. फक्त शक्यता आहे इतकेच सगळे सांगतात, वर असले कुठलेही ट्रेडींग करण्याच्या फंदात पडताना सुरूवातीलाच योग्य त्या सुचना/इशारे दिले गेलेले असतात. तरीही कुणी जर हमखास पैसे दुप्पट करण्याचा मार्ग म्हणून पैसे गुंतवायला गेले तर ते बुडण्याचीच खात्री जास्त.

तेव्हा तुमचे हजार रुपये तुमच्याकडेच ठेवा, नाहीतर एफडी मधे ठेवा. सेव्हींग्स खात्यापेक्षा जास्त ठरावीक टक्के परताव्याची शाश्वती तेही अभ्यास न करता... सध्या तेच देऊ शकतात.

युयुत्सु's picture

22 Mar 2019 - 12:14 pm | युयुत्सु

फक्त शक्यता आहे इतकेच सगळे सांगतात, वर असले कुठलेही ट्रेडींग करण्याच्या फंदात पडताना सुरूवातीलाच योग्य त्या सुचना/इशारे दिले गेलेले असतात.

हे त्यांना "सोईस्करपणे" दिसत नाहीये. मी केलेल्या व्यवहारांचे पुरावे दिले तरी ते मान्य करायचे नाहीत. त्यांना फक्त थयथयाट करता येतो आणि भुंकत बसता येते.

युयुत्सु's picture

22 Jan 2019 - 10:26 am | युयुत्सु

"विकला तर १०% नक्की मिळतील मी विकणार नाही कारण आत्ता ट्रेंड फोर्मेशन सुरु आहे."

हा अजुन महिनाभर घसरेल असे माझे मॉडेल सांगते.

कोणीही डॉक्टर आपले मेलेले पेशंट आणि (तरीही) आलेले बक्कळ पैसे ह्याची जाहिरात करत नाही हि वस्तुस्थिती मी नम्रपणे लोकांच्या निदर्शनास आणू इच्छितो.

युयुत्सु's picture

22 Jan 2019 - 10:23 am | युयुत्सु

कोणीही डॉक्टर आपले मेलेले पेशंट आणि (तरीही) आलेले बक्कळ पैसे ह्याची जाहिरात करत नाही हि वस्तुस्थिती मी नम्रपणे लोकांच्या निदर्शनास आणू इच्छितो.

हा हा हा हा हा हा ... यु मेड माय डे!

सुबोध खरे's picture

22 Jan 2019 - 11:21 am | सुबोध खरे

अनवधानाने (का होईना) तुम्ही माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद

बाकी वैयक्तिक पातळीवर आल्याबद्दल आपले अभिनंदन

ज्ञानव's picture

22 Jan 2019 - 11:54 am | ज्ञानव

अजिबात नाही कारण मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात हि सर्वश्रुत म्हण सर्वानाच लागू आहे आणि तुम्ही काही तरी जगावेगळे सत्य जगासमोर आणताय अशी परिस्थिती हि नाही त्यामुळे मी पामर कोण कुठले मुद्दे सिद्ध करणार. मी फक्त जे सर्वश्रुत आहे ते सर्वांनाच लागू आहे हे सिद्ध केले. शेअर मार्केट विषयी तुमचे प्रेम मी वैयक्तिक रीत्या जाणतोच.

आणि अअत्यंत महत्त्वाचे म्हणजे, जसे तुम्ही आर्थिक जगतातील व्यवसाईकसुद्धा कसे खोटारडेपणा करतात आणि प्रलोभने दाखवून फसवू शकतात ते उद्धृत केलेत अगदी तसेच मी डॉक्टर ह्या प्रोफेशनबद्दल म्हंटलेआहे. त्यामुळे ते तुम्ही वैयक्तिक घेण्याचे कारणच नाही. मिपाद्वारे किंवा अर्थक्षेत्राद्वारे तुमची माझी जुजबी का होईना ओळख आहे. पण शेअर मार्केटबद्दल मला नितांत प्रेम आहे आणि कदाचित तितकेच तुम्हालादेखील तुमच्या पेशाबद्दल असेलच. ह्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटवर किंवा त्या प्रोफेशनवर कुणी काही लिहिले कि तुमचे प्रतिसाद एककल्ली असतात असा माझा तरी अनुभव आहे. पण मी ते वैयक्तिक कधीच घेत नसलो तरी माझ्या व्यवसायाबद्दल कुणीही एकच बाजू दाखवून बोलेल तर मला बोलावेसे वाटते आणि जशी समोरच्याची भाषा तसे उत्तर द्यावे हे हि नावडीने का होईना पण करावे लागते. चांगले वाईट लोक दोन्ही पेशात आहेत आणि तुम्ही डॉक्टर असल्याने तुम्हाला तुमच्या पेशातील वाईट प्रथा माहिती असतीलच त्यावर तुम्हीच लिहिणे सांगणे शोभून दिसते मी जर त्या विषयावर लिहायला घेतले तर तो माझा मूर्खपणा होईल कारण मला त्या पेशाची अजिबातच माहिती नाही.

सुबोध खरे's picture

22 Jan 2019 - 12:31 pm | सुबोध खरे

मूळ गृहीतक चूक असले तर त्याचा निष्कर्ष चूक येतो.
मी कोणत्याही अर्थ व्यवसायिकाबद्दल टिप्पणी केलेलीच नाही तर

कोणीही माणूस

आपले बुडालेले समभाग आणि बुडालेला पैसे याची जाहिरात करत नाही हे माझे मूळ वाक्य आहे ते सामान्य माणसाबद्दल आहे.आपला मूर्खपणा कोणीही जगजाहीर करत नाही हे सत्य आहे.

श्री युयुत्सु यांनी मांडलेले सातत्याने १०% दरमहा मिळवणे शक्य आहे हे गृहीतक चूकच नव्हे तर फसवणूक करणारे आहे. त्यामुळे सामान्य माणसे अर्थ बाजारापासून लांबच जाण्याची शक्यता आहे यासाठी मी परत परत सांगतो आहे कि हे जवळ जवळ अशक्य आहे.

या धाग्यावर कोणताही अर्थ व्यावसायिक आपली जाहिरात करत नव्हता किंवा त्यांचा यात सहभाग नव्हता( आपण सोडून दुसरा असल्यास मला माहिती नाही)(युयुत्सु हे माझ्या माहितीप्रमाणे अर्थ व्यावसायिक नाहीत).

राहिली गोष्ट -- मी लोकांना आवर्जून सांगत आलो आहे कि

टिप्स

वर अवलंबून बाजारात अजिबात उतरू नका किंवा त्यावर विसंबून आपली गुंतवणूक कधीही करू नका. चांगला अर्थ सल्लागार गाठा आणि त्याच्या सल्ल्याने आपले घामाचे पैसे गुंतवणूक करा. अचाट आणि अफाट नफा हा गुन्हेगारी आणि मादक द्रव्य सोडून कुठेही मिळणार नाही.

चांगला अर्थ सल्लागार आपल्याला साधारण १२-१५ % वार्षिक नफा सातत्याने वर्षानुवर्षे मिळवून देऊ शकतो.

फुकट मिळणार सल्ला हा अंतिमतः महागात पडेल.

मुळात माझा प्रतिसाद हा अर्थ सल्लागार या व्यवसायाबद्दल नव्हताच.

आपण तो स्वतः वर ओढवून का घेतला आणि वैद्यकीय व्यवसायाबद्दल टिप्पणी का केली याचे कारण समजले नाही.

कोणीही डॉक्टर आपले मेलेले पेशंट आणि (तरीही) आलेले बक्कळ पैसे ह्याची जाहिरात करत नाही हि वस्तुस्थिती आहेच ती नाकारण्यात हशील नाही.

असो

बाकी माझाच प्रतिसाद शेवटचा असला पाहिजे असा माझा आग्रह मुळीच नाही.

ज्ञानव's picture

22 Jan 2019 - 12:49 pm | ज्ञानव

श्री युयुत्सु यांनी मांडलेले सातत्याने १०% दरमहा मिळवणे शक्य आहे हे गृहीतक चूकच नव्हे तर फसवणूक करणारे आहे हे अजून सिद्धच झाले नाहीये. एखादी गोष्ट सिद्ध होण्याआधीच ती चूक आहे हि शुद्ध फसवणूक आहे असे म्हणणे हीच सामान्य जनतेची दिशाभूल आहे. वैद्यकीय क्षेत्रात देखील अल्प विष हे औषध मानतात असे ऐकून माहित आहे (कित्येक डॉक्टरांनी ते मला माझ्या नकळत पाजले पण असेल ) म्हणून औषधात विष असतेच असे गृहीतक तयार करण्याचा मला अधिकार मिळत नाही. कारण खरच त्यात विष असते का ? मला त्याबद्दल माहितीच नाही.
असो.
काही शेपट्या सरळ होतच नाहीत.

सुबोध खरे's picture

22 Jan 2019 - 7:44 pm | सुबोध खरे

काही शेपट्या सरळ होतच नाहीत.

अगदी पूर्णपणे मान्य.

औषधात विष असतेच असे गृहीतक बरोबर आहे.

आपण ज्याला जीवन म्हणतो ते पाणी सुद्धा अति प्रमाणात घेतले तर मृत्यू ओढवू शकतो.

माझे १००० रुपयाचे आव्हान आहेच

बाकी चालू द्या

बरं आता, १० महिने झाले, दरमहा १०% परतावा मिळालेले शेअर्सची यादी येउद्यात...

कृपया लवकर द्यावी.

डाम्बिस बोका's picture

1 Mar 2019 - 9:32 am | डाम्बिस बोका

चांगला अर्थ सल्लागार आपल्याला साधारण १२-१५ % वार्षिक नफा सातत्याने वर्षानुवर्षे मिळवून देऊ शकतो.
-- पूर्णपणे सहमत, थोडा स्वतःचा वेळ आणी ह्या विषयात जर आवड असेल तर नक्की सुरवात

माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की स्वतः abhays करून १०-२५ % वार्षिक परतावा शक्य आहे.

ज्ञानव जबरी टोला हाणलाय डॉक्टरना.

यांचे म्हणजे स्वतः दुसर्यावर कितीही चिखलफेक करायची आणि त्याचे शिंतोडे स्वतः वर उडाले कि थयथय करायची.

सुबोध खरे's picture

22 Jan 2019 - 12:32 pm | सुबोध खरे

आपला प्रतिसाद स्कोअर सेटलिंगचा असावा असे वाटते

त्यामुळे मी त्यावर कोणताही प्रतिसाद देऊ इच्छित नाही

बाकी चालू द्या

उपेक्षित's picture

22 Jan 2019 - 8:27 pm | उपेक्षित

खरे कसले स्कोअरसेटलिंग ?

अहो तुमच्या बाबत आदरच आहे पण उगाच सगळ्या बाबत माझेच खरे आणि मलाच तेवढे कळते हे गेले कित्येक दिवस बघत होतो आत्ता अगदी राहवलेच नाही म्हणून बोललो.

असो बाकी तुमचे चालुदे...

अनिंद्य's picture

22 Jan 2019 - 12:01 pm | अनिंद्य

@ युयुत्सु,

अल्पकालीन गुंतवणूक / टेकनिकल अनॅलिसिस मला फारसे समजत नाही पण तुम्ही आकर्षक विचार मांडला आहे.

तुमच्या अभ्यासात एशियन पेंट, ब्रिटानिया, लार्सन आणि हिंद झिंक सारखे शेयर असल्यास त्याबद्दल समजून घ्यायला आवडेल.

युयुत्सु's picture

22 Jan 2019 - 12:40 pm | युयुत्सु

तुमच्या अभ्यासात एशियन पेंट, ब्रिटानिया, लार्सन आणि हिंद झिंक सारखे शेयर असल्यास त्याबद्दल समजून घ्यायला आवडेल.

दुपारी बघून सांगतो

युयुत्सु's picture

22 Jan 2019 - 1:14 pm | युयुत्सु

लोकहो,

माझ्या आईवडीलांना (दोघेही आता हयात नाहीत) अत्यंत उत्तम आर्थिकदृष्टी होती. मी अजुनही ब-याच आर्थिक बाबींमध्ये त्यांनी कसा विचार केला असता, याला महत्त्व देतो. ते दोघेही मला म्हणायचे की आपल्यालापेक्षा हूषार माणसे काय विचार करतात, यावर बारीक लक्ष ठेवायचे.

हे सांगण्याचे कारण असे की माझ्यापेक्षा निश्चितपणे कैकपटीने हूशार अशी एक व्यक्ती ( आय० आय० टी० मद्रासची गोल्डमेडॅलिस्ट) मला योगायोगाने नेट्वर भेटली (नाव आत्ता आठवत नाही, पण शोधले की सापडेल). हा मनुष्य सगळे सोडून ट्रेडींगमध्ये घुसला. त्याने सेबीची असंख्य सर्टीफिकेशन मिळवलेली आहेत. त्याचा एक सेमीनार व्हिडीओ बघत असताना त्याने केलेले एक विधान मला आश्चर्यचकीत करून गेले. तो म्हणाला, In stock market 100% profit( return?) in a year is very common. हे कॅमेरासमोर बोललेले वाक्य मला गदागदा हलवून गेले. माझ्यापेक्षा हूशार व्यक्ती जेव्हा हे विधान जाहिरपणे करते तेव्हा त्यात तथ्य असले पाहिजे, या आईवडिलांच्या शिकवणुकीनुसार मी त्यावर विचार करायला सुरुवात केली. ही २०१६-१७ची गोष्ट आहे. तेव्हा मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे नुकतीच ट्रेडींग करायला सुरुवात केली होती. पण तेव्हा मी घेतलेले ट्रेडींग विषयक निर्णय एक-दोन अपवाद वगळत अचूक ठरले, इतकेच नव्हे तर IndiaBulls Ventures मध्ये मी १००%पेक्षा अधिक नफा सुरुवातीलाच मिळाल्याने, हे वास्तव मी बर्‍यापैकी अनुभवले आहे असे म्हणायला हरकत. IndiaBulls Ventures मध्ये अजूनही hold केले असते तर कुठे पोचलो असतो, या कल्पनेने अजुनही गुद्गुल्या होतात. माझे ट्रेडींग मॉडॆल यानंतर सतत evolve होत आहे. मार्केट कसे काम करते, याच्या सतत अभ्यासाने आत्मविश्वास दृढ आहे.

ज्ञानव's picture

22 Jan 2019 - 1:26 pm | ज्ञानव

तुम्ही योग्य मार्गावर आहात. मार्केट हा साईड बिझनेस किंवा छंद नाही. जे छंद म्हणून मार्केटकडे येतात ते अनेकवेळा मार खातात आणि मग आपल्याला सगळे कळते ह्या थाटात मतांची पत्रके वाटत फिरताना दिसतात. ह्या व्यवसायाची खोली आणि त्याचे पदर ह्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. पण आपल्यातलेच काही जण जेव्हा बालिशपणे फसवणूक फसवणूक म्हणत किंचाळत फिरतात तेव्हा वाईट वाटते. तुमचा शीर्षकातला प्रश्न (मला तो प्रश्नच वाटला गृहीतक नव्हे बाकी तुम्ही खुलासा करालच ) चर्चेला घेता येईल. जर तुम्ही अर्थक्षेत्र ह्या ग्रुप वर नसाल तर मला व्य.नि. करा मी सामील करून घेतो. तिथे मारू गप्पा.

युयुत्सु's picture

22 Jan 2019 - 2:43 pm | युयुत्सु

ज्ञानव,

यात गमतीचा पण महत्त्वाचा भाग असा आहे की मी विचारलेल्या प्रश्नाला समांतर असा प्रश्न असा आहे - मला एव्हरेस्ट गाठता येईल का?

मग दिशाभूल करण्यात हूशार असलेली लोकं सांगतात की - अजिबात शक्य नाही. तुला मरायचे असेल तर एव्हरेस्टवर कशाला जातोस? किती लोक मरतात ते ठाऊक नाही का? किती लोक मोहिम मधेच सोडून देतात, याबाबत कधी कोण कुणाला सांगतं?

पण या दीडशहाण्या लोकांना हे कळत नाही, एव्हरेस्ट गाठण्याचे स्वप्न बघणार्‍यांना खच्ची किंवा परावृत्त करण्यापेक्षा वास्तवाची जाणीव करून द्यावी आणि निर्णय त्या व्यक्तीवर सोपवावे आणि एखादी व्यक्ती जिद्दीने प्रयत्न करत असेल तर शक्य तर त्याचे उद्दीष्ट पूर्ण कसे होईल याचे मार्गदर्शन करावे.

मग असे लक्षात येते की एव्हरेस्ट गाठु पहाणार्‍या काही व्यक्ती गेला बाजार घरातून बाहेर पडून घराबाहेरची टेकडी सरावाने काबीज करतात, तर काही जण नियमित सिंहगडासारखा किल्ला चढु लागतात. काही ट्रेकींगची आवड जोपासतात. काहींना फक्त एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत जाणे जमते आणि तेव्हढे समाधान पण खूप असते.

सांगायचे तात्पर्य असे की एव्हरेस्ट गाठायचे स्वप्न बघणार्‍यांना अनेक सेकंडरी बेनिफीट मिळु शकतात, हे ज्या दीडशहाण्यांना नाकारायचे असते, त्यांची सावली देखिल मी अंगावर कधी घेत नाही.

तुमच्या ग्रुपमध्ये यायला मला आनंदच होईल...

ज्ञानव's picture

22 Jan 2019 - 4:21 pm | ज्ञानव

मुळात १०% परतावा शक्य आहे का? असा साधासरळ प्रश्न आहे पण तो प्रश्न नसून स्किम असल्यागत फसवणूकीचा हाकारा देणं निर्बुद्धपणाचेच आहे.

युयुत्सु's picture

22 Jan 2019 - 5:13 pm | युयुत्सु

हे त्यांना कळले असते, तर काय पाहिजे होते

अनुप ढेरे's picture

22 Jan 2019 - 2:56 pm | अनुप ढेरे

डॉक्टर खर्‍यांशी पूर्ण सहमत. दरमहा १०% परतावा वगैरे दावे दिशाभुल करणारे आहेत. काउंटरप्रोडक्टिव आहेत. वैयक्तिक पातळीवर उतरुन केलेली टीका वाचुन करमणुक झाली.

====
मिपा व्यवस्थापनास,
शेअर रेकमेंडेशन असलेले प्रतिसाद उडवुन टाकावेत ही विनंती.

थॉर माणूस's picture

23 Jan 2019 - 12:50 am | थॉर माणूस

पुन्हा एकदा... लाँग टर्म दरमहा १०% शक्य आहे असा दावा या धाग्यात कुठे आहे दाखवाल का?

त्यांनी एक प्रोफाईल केस स्टडी म्हणून घेतला आहे, एका महिन्याचा सँपल वापरून त्यात १०% परतावा दाखवला आहे. थोडक्यात, असे वेगवेगळे स्टॉक फोलिओज वेगवेगळ्या महिन्यात ८-१०% परतावा आणू शकतील. जर एखाद्याची मार्केटवरची मांड पक्की असेल तर त्याला वर्षातले किमान काही महिने हे टार्गेट गाठता येऊ शकेल. अर्थात, असा परतावा मिळवणे अशक्य नाही इतकेच फार फार तर म्हणता येईल.

अशा मार्केट्स मधे रामबाण वगैरे काहीही नसतो. वन साईज फिट्स ऑल हा न्याय वापरून झटपट पैसे डब्बल करण्याच्या नादात लोक डोळे झाकून इतरांचे प्रोफाईल फॉलो करायला जातात आणि आडवे होतात. त्याची एंट्री, आपली एंट्री किंवा त्याच्या फोलिओची डायवर्सिटी आणि आपण उचललेले त्यातले मोजके शेअर्स्/टीप्स हे सगळे सोयीस्कर रीत्या विसरून मार्केट ला शिव्या घालून मोकळे होतात.

अनुप ढेरे's picture

23 Jan 2019 - 10:59 am | अनुप ढेरे

धाग्याचं टायटल पुन्हा वाचा. दरमहा १०% याचा अर्थ काय होतो?

दरमहा १०% परतावा शक्य आहे का ? शेवटचे प्रश्नचिन्ह तुम्ही वाचले का ? व्याकरणात त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे पण भक्तांना घाईच फार असते.

एखादी गोष्ट शक्य आहे का असा प्रश्न पडणे आणि त्यावर उहापोह होणे अवास्तव/अनैसर्गिक/फसवणूक दर्शवणारे आहे का ?

युयुत्सु's picture

23 Jan 2019 - 11:25 am | युयुत्सु

यु मेड माय डे टुडे टु! हा हा हा हा हा हा...

अनुप ढेरे's picture

23 Jan 2019 - 11:52 am | अनुप ढेरे

सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो.

हे धाग्यातुन उध्रुत आहे. धाग्याचं टायटल आणि धाग्याचा कंटेंट यातुन दरमहा १०% टक्के परतावा मिळतो असा दावा आहे. हा दावा बोगस असण्याची शक्यता प्रचंड आहे.

असो, चालु द्या तुमचं!

ज्ञानव's picture

23 Jan 2019 - 12:00 pm | ज्ञानव

दावा केला आहे. मिळतातच असा दावा कुठे हि केलेला नाही. त्यांनी एक मॉडेल दिलय ते चूक किंवा बरोबर ठरवण्यासाठी मागील डेटा चाळून पहावा लागेल किंवा पुढील अख्खे वर्ष मॉक ट्रेड करून पहावा लागेल तेव्हा निष्कर्ष आणि दावे करणे योग्य ठरेल. ह्यात फसगत होऊ नये म्हणूनच प्रश्नचिन्ह आहे. राईट ब्रदर्सना जसे उडू शकतो का आपण ? हा प्रश्न पडला आणि त्यावर कष्ट घेऊन हो आपण उडू शकतो हा दावा ते करू शकले असते पण एकदा सिध्द झाल्यावर कसला दावा आणि कसले काय? तर मुद्दा असा कि एखादी घटना घडू शकते का ? हे बीज त्यांनी रोवले आहे ज्याला जसे जमेल तसे संशोधन त्याने करावे आणि आपले निरीक्षण नोंदवावे हे अपेक्षित आहे. त्यातून प्रबोधनच घडेल. पण महाराष्ट्राबाहेरून आलेली मंडळी येन केन प्रकारे पैसा कमावून गेली आम्ही अजून फालतू काथ्याकुट करण्यात धन्यता मानतो ह्याचे अतीव दुःख होते.

अनुप ढेरे's picture

23 Jan 2019 - 12:15 pm | अनुप ढेरे

उलट असल्या अशक्यप्राय दाव्यांना भुलुन लोक मार्केटात उतरतात. एकदा हात पोळले की पुन्हा कधीही मार्केटात येत नाहीत. म्हणुन असले फसवे दावे अतिशय कांऊटरप्रोडक्टिव आहेत.

ज्ञानव's picture

23 Jan 2019 - 12:22 pm | ज्ञानव

एक प्रश्न आहे. अजून ठरायचे आहे. एखादा शक्य करून दाखवणारा उदयाला येऊ शकतो किंवा आला असेल पण तुमच्या आमच्या दृष्टीक्षेपात आला नसेल. जगात काहीच अशक्य नाही कारण शक्य होण्याची योग्य वेळ यावी लागते. तुमच्या लहानपणी तुम्हाला संगणक किंवा खिशात ठेऊन फिरता येण्या जोगा फोन हि अशक्यप्राय वाटले असेल पण म्हणून एखाद्याने साधा प्रश्न विचारू नये का ?
तुम्ही आहात का शेअर मार्केटमध्ये ?

अनुप ढेरे's picture

23 Jan 2019 - 4:07 pm | अनुप ढेरे

जगात काहीच अशक्य नाही कारण शक्य होण्याची योग्य वेळ यावी लागते

हे अत्यंत बावळपणाचं विधान आहे. उद्या स्पाँडिलायटिस असलेल्या माणसाला एव्हरेस्ट वर जाणं शक्य आहे सांगाल. या असल्या दाव्यावर भुलुन जर तो गेला एव्हरेस्ट सर करायला तर काय होईल त्याचं?

तुम्ही आहात का शेअर मार्केटमध्ये ?

हो, म्हणुनच असले दावे फोल आहेत हे समजतं.

ज्ञानव's picture

23 Jan 2019 - 4:43 pm | ज्ञानव

वाचता का ? योग्य वेळ आलीतर हा अर्धा भाग तुम्ही वाचला नाहीत कि सोयीस्कर पणे काणाडोळा केलात कि आणखी काही....?

नवा प्रश्न : तुम्ही १००% आहात का शेअर मार्केटमध्ये ?

https://www.swissinfo.ch/eng/ankylosing-spondylitis_-journey-is-destinat...

अनुप ढेरे's picture

23 Jan 2019 - 5:14 pm | अनुप ढेरे

नवा प्रश्न : तुम्ही १००% आहात का शेअर मार्केटमध्ये ?

नाही, शेअर ट्रेडिंग माझा पूर्णवेळ व्यवसाय नाही.

====
तुम्ही नेहेमिच मुर्खासरखे आर्ग्युमेंट करता का? अशक्य/आउटलायर गोष्टींची उदाहरणं देउन लोकांना भुलवणं हे नवीन नाही. अ‍ॅमवे टाइप झालं हे तर.
एक शंका येऊ राहिल्ये. तुमची अ‍ॅडव्हायझरी वगैरे आहे का? तुम्ही इथे गिर्‍हाईकं गोळा करायला आलेले वाटता. तसलेच लोक असले दावे करून बकरे पकडत असतात.

मला तुमच्या सारख्या लोकांच्या नादी लागायचं नाही. पण इथे हास्यस्पद आणि धोकादायक दाव्यांबद्दल खर्‍यांनी लोकांना जी वॉरनिगं दिली, प्रामाणिकपणे दिली, त्यावरुन त्यांच्यावर तुम्ही लोक गँगअप करताना दिसलात म्हणुन प्रतिसाद दिले.

===
मि.पा. प्रशासनास,
फोरम्सवर शेअर-सल्ले देणे यावर सेबीचे नियम कडक आहेत. या धाग्यावर असे सल्ले दिले गेले आहेत. असे सल्ले सेबी रजिस्टर्ड सल्लागारालाच देण्याची परवानगी आहे.

===

या धाग्यावरुन राम राम!

ज्ञानव's picture

23 Jan 2019 - 5:25 pm | ज्ञानव

तुम्ही नेहेमिच मुर्खासरखे आर्ग्युमेंट करता का? हो तुमच्यासारखे मूर्ख दिसले कि पेटून उठतो.
स्वतः १००% मार्केट मध्ये नसताना मुक्ताफळे उधळणारे मला अजिबात आवडत नाहीत

आणि मी सेबी रजिस्टर्र्ड आहे. तरीही मी कुठलाच सल्ला दिला नाही. उलट वैयक्तिक शेअर्सबद्दल इथे चर्चा नको असेच म्हंटले आहे. जरा अभ्यास वाढवा बुवा! सगळा धागा आणि त्यातले प्रतिसाद व्याकरणासहित संपूर्ण वाचा आणि मग बोंबला.

गेलात का ??

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 12:50 pm | सुबोध खरे

व्यवस्थित अभ्यास आणि स्थिर मन असले तर महिन्याला ८%-१०% शेअर्स मध्ये फार कठीण नाही , असा माझा अनुभव आहे.

हे मूळ विधान फॉरेक्स ट्रेडिंग या धाग्यात असून तेथून हा प्रश्नचिन्ह असलेला धागा काढला गेला आहे. प्रश्नचिन्ह नंतर का आले याची कारणे तज्ज्ञांनी शोधावी.

https://www.misalpav.com/comment/reply/43897/1021069

यात प्रश्न चिन्ह नसून हे विधान आहे.

तेंव्हा

घाई कुणाला

आहे आणि

भक्त कोण

आहेत ते तज्ज्ञांनी ठरवावे

अनुभव सांगणे आणि छाती ठोक दावा करणे ह्यातला फरक कळेना मग बोलणेच खुंटले.
तसेच माझ्याकडे सल्ला मागायला येऊ नये म्हंटले आहे कि तरीही एखादा गेला तर तो निर्बुद्धच म्हणावा.
आणि
तद्न्य करताहेत हं शहानिशा त्यांना कुणाच्या हुकमाची गरज नाही.
मूळ धाग्याला प्रश्न चिन्ह केव्हा आले ह्यासाठी बराच रिसर्च झालाय, ह्याचा अर्थ विश्लेषणाचा गुण आहे फक्त तो कुठे वापरावा ह्याबद्दल योग्य गुरूची गरज आहे.

सहावी क च्या वर्गातली मुले जशी भांडतात तसे भांडतोय का आपण ??? (तीन प्रश्न चिन्ह आहेत विधान अथवा दावा नाही.)

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 1:22 pm | सुबोध खरे

अशी कोलांटी मारण्याची वेळ का यावी?