✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दर महा १०% परतावा शक्य आहे का?

य
युयुत्सु यांनी
गुरुवार, 01/17/2019 - 15:51  ·  लेख
लेख
लोक हो केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत). सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो. खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत. 10pc
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
गुंतवणूक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
116268 वाचन

💬 प्रतिसाद (247)

प्रतिक्रिया

पुढच्या 2 महिन्यात ज्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/17/2019 - 17:28 नवीन
पुढच्या 2 महिन्यात ज्या कंपन्या कमीत कमी 5% तरी नक्कीच वर जातील अश्या निदान 5 कंपन्यांची नावे सांगू शकाल का
  • Log in or register to post comments

पुढच्या 2 महिन्यात ज्या

युयुत्सु
गुरुवार, 01/17/2019 - 17:36 नवीन
पुढच्या 2 महिन्यात ज्या कंपन्या कमीत कमी 5% तरी नक्कीच वर जातील अश्या निदान 5 कंपन्यांची नावे सांगू शकाल का! नक्कीच! पण मला इतरांना सल्ले देऊन मनःस्ताप नकोय कारण माझ्याकडे सल्ले देण्याचा परवाना नाही. हा अभ्यास ज्याचा त्याने करणे अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

खिक्क

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/17/2019 - 17:52 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत

युयुत्सु
गुरुवार, 01/17/2019 - 18:53 नवीन
तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/24/2019 - 02:22 नवीन
मला भिंत चालवता येते , पण मी ते तुम्हाला दाखवणार नाही, तुमचा अभ्यास तुम्ही करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हा डेटा कोठुन काढला ? कृपया

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/17/2019 - 17:52 नवीन
हा डेटा कोठुन काढला ? कृपया त्या साईटची माहेती देता का?
  • Log in or register to post comments

सहज कुतुहल म्हणुन टॉपच्या ४-५

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/17/2019 - 18:01 नवीन
सहज कुतुहल म्हणुन टॉपच्या ४-५ शेयरचा ग्राफ पाहिला, डिसेंबर्च्या शेवटच्या आठवड्यात किंव्वा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शार्प रेज दिसत आहे अर्थात हे क्वार्टरली रिझल्ट्स चा परिणाम असावा असा अंदाज आहे ! हे थोडे प्रेडिक्टेबल वाटते ! धिस इस इन्टरेस्टिंग ! कॅन डु समथिंग विथ धिस ! कृपया हा डेटा कोठुन मिळवला ते सांगता का ? ह्या कंपन्यांच्या फायनाशियल डिटेल्स मिळतात का ते पहातो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

र्थात हे क्वार्टरली रिझल्ट्स

अनुप ढेरे
Fri, 01/18/2019 - 09:41 नवीन
र्थात हे क्वार्टरली रिझल्ट्स चा परिणाम असावा असा अंदाज आहे
क्वार्टरली रिझल्ट अत्ता आत्ता यायला सुरु झाले आहेत. त्याचा परिणाम नसावा ही शार्प्त रेन्ज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कृपया हा डेटा कोठुन मिळवला ते

युयुत्सु
गुरुवार, 01/17/2019 - 18:43 नवीन
कृपया हा डेटा कोठुन मिळवला ते सांगता का ?
हे नक्की सांगेन. मार्केटचा सखोल अभ्यास करण्यासाठी खूप टूल्स उपलब्ध आहेत. बरीचशी फुकट पण आहेत. थोडे पैसे टाकायची तयारी असेल तर वेडे-वाकडे विश्लेषण करून देणारी सॉफ्ट्वेअर उपलब्ध आहेत. मी अशी पैसे टाकून ५ तरी वापरली आहेत. त्यात ChartAlert (देशी) आणि Quantshare (परदेशी) ही २ मला सध्या पसंत पडली आहेत. ChartAlert च्या वार्षिक शुल्कात रोजच्या रोज तुम्हाला हवा तो डेटा (EoD, Real time) मिळतो. तो वापरून आपली ट्रेडिंग मॉडेल्स, अल्गोरिदम, strategies बनवता येतात. ChartAlert मध्ये back testing करता येत नाही. पण Quantshare मध्ये ते येते. माझ्या ट्रेडिंग मॉडेल्सनी ३००% पेक्षा जास्त रिटर्न एका वर्षाच्या कालावधीमध्ये दिले आहेत.
  • Log in or register to post comments

ChartAlert च्या आत्ताच रिलीज

युयुत्सु
Mon, 04/01/2019 - 10:56 नवीन
ChartAlert च्या आत्ताच रिलीज झालेली आवृत्ती खुप छान आहे आणि त्यात back testing करता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

गोंधळ दुर करण्याचा एक प्रयत्न

शब्दानुज
Fri, 01/18/2019 - 08:51 नवीन
कदाचित वाचक असा ग्रह करून घेत आहेत की युयुत्सु दर महिना ८-१० टक्के परतावा "एकूण" गुंतवणूकीवर मिळण्याचा दावा करत आहेत. पण युयुत्सू यांनी एका महिन्यात घेतलेल्या एकूण शेअर पैकी काही शेअर ८-१० परतावा देतात असा दावा केला आहे का ? खरेतर परतावा "एकूण" महिन्यात गुंतवलेली रक्कम आणि त्यावरचा एकूण मिळणारा परतावा असा बघायला हवा. हा एकूण मिळणारा परतावा ८-१० आहे असा वाचकांचा ग्रह आहे. मूळात युयुत्सु यांचा दावा कदाचित हा आहे की जर समजा १० शेअर घेतले तर असे २-३ शेअर असतील जे १०% परतावा देतील. अर्थात काही शेअर मधून एवढा परतावा मिळवणे वेगळे आणि सगळ्याच शेअर मधून एवढा परतावा मिळणे वेगळे.या दोन गोष्टींमुळे हा संभ्रम झालेला आहे. बाकी युयुत्सु यांना सल्ला द्यायचा नसेल तर हरकत नाही. पण त्यांनी शेअर बाजारवर प्राणायामप्रमाणे एक मोठी लेखमाला लिहावी ही विनंती, ज्यामद्दे अगदी शेअर म्हणजे काय , चांगली पुस्तके , यू ट्यूबवरचे चांगले चॅनलल्स इथपासून शेअर अॅनालिसीसच्या पद्धती यासांरखा सगळ्याच वा जास्तीत जास्त मुद्दे अंतर्भूत असतील. यातून आमच्या आणि मिपाकरांच्या माहितीत भरच पडेल.
  • Log in or register to post comments

मित्रांनो,

युयुत्सु
Fri, 01/18/2019 - 15:02 नवीन
मित्रांनो, शब्दानुज आणि मिपाचे आणखी एक सदस्य (व्यनिद्वारा) यांनी केलेल्या फर्माईशीने मला मनाला थोड्या गुदगुल्या झाल्या, पण प्रामाणिकपणे सांगतो की मोठी लेखमाला लिहिण्यास मी तितकासा पात्र नाही. कारण मला मला आर्थिकजगताचा सर्वंकष अनुभव नाही. माझ्या स्वत:च्या काही मर्यादा आहेत. तशीच काही बलस्थाने आहेत. मला स्वत:ला अगदी परवापरवा पर्यंत कंपनीचा ताळेबंद समजत नव्हता. आता मी दर्दी झालो आहे, असे नाही. FnO सारखे प्रकार मला अजिबात कळलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या वाट्याला मी गेलेलो नाही. मार्जिन ट्रेडींग आणि डे ट्रेडींग हे प्रकार काय आहेत, एव्ह्ढे समजाऊन घेण्यापुरते जुजबी करून बघितले, पण माझ्या एकंदर प्रकृतीला ते मानवणारे नाहीत असे लक्षात आल्यावर परत त्या वाटेला फिरकलो नाही. तसेच मला बॉण्ड मार्केट हा प्रकारही कळलेला नाही. शेअर बाजारात पैसे मिळवता येतात. पण ते शिस्तबद्ध कार्यक्रम असेल तरच मिळवता येतात. अंदाजपंजे किंवा ऐकीव माहितीवर आधारित केलेला व्यवहार आतबट्ट्याचा असतो हे लक्षात ठेवावे. मला हिशेब ठेवायचा अतिशय कंटाळा असल्याने मी बरेच वर्षे म्युच्युअल फंडावर माझ्या गुंतवणुकींसाठी अवलंबून राहीलो. पण ३ वर्षांपूर्वी माझ्या ब्रोकरने P&L स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली आहे, हे कळल्यामुळे मला एकदम हुरुप आला आणि ट्रेडींग करायला सुरुवात केली. त्यात Edward Thorp या MIT मधल्या प्राध्यापकाचे आत्मचरित्र वाचल्यावर आणखी उत्साह आला. माझी उद्दीष्टे अगदी स्वच्छ आहेत - ० घरबसल्या चार पैसे मिळतात त्यामुळे मन आनंदी राहते ० माझी रिसर्चची हौस भागते ० वेळ चांगला जातो. माझी काही बलस्थाने ० आत्मविश्वास माणसाने कुठुनही आणावा पण तो यशासाठी अत्यंत आवश्यक असतो (मी आय०आय०टी मुंबईचा विज्ञार्थी आहे. त्यामुळे माझ्याकडे बेसिक हुशारी आहे असा आत्मविश्वास (किंवा माज, इगो इ०) माझ्याकडे आहे.). तसेच आपला आत्मविश्वास फाजिल नाही ना हे कळणे पण फार महत्त्वाचे असते. फाजिल आत्मविश्वास ओळखणे तसे फार अवघड नाही. तुम्ही मार्केटमध्ये घेतलेला निर्णय जर एखाद्या अफवेने, बातमीने, इतरांच्या सल्ल्याने डळमळीत होणार असेल किंवा मित्रांनी सांगितले की, "अरे मार्केट कोसळणार आहे", म्हणुन तुम्ही गडबडुन जाणार असाल तर तो आत्मविश्वास खरा नाही. मला स्वत:ला आलेख, पॅटर्न उत्तम कळतात. त्यामुळे एण्ट्री-एक्झिटची रणनीति आखणे सोपे जाते. यासाठी आवश्यक तो अभ्यास आणि प्रयोग सतत चालु असतात. त्यासाठी वेळप्रसंगी पैसे खर्च करायची तयारी मी ठेवली आहे. तुम्हाला seriously हा उद्योग करायचा असेल तर तुम्हीही हे करणे आवश्यक आहे. कोणतीही रणनीति कायम उपयोगी पडेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अनेक कल्पना विकसित कराव्या लागतात. मला त्या सारख्या सुचत असतात. मला स्वत:ला मार्केट कितीही गडगडले तरी झोपेवर किंवा इतर आयुष्यावर कसलाही परिणाम होत नाही. २०१८ च्या क्रॅशमुळे माझा पोर्ट्फोलिओ पण गडगडला आहे. पण तो सावरायची योजना माझ्याकडे असल्याने माझे डोके अत्यंत थंड आहे. माझा आत्मविश्वास मी अत्यंत छोट्या छोट्या व्यवहारांनी वाढवत नेला. ट्रेडींगमध्ये कोणतीही नवीन कल्पना तपासायची असेल तर सुरुवातीला छोटी रक्कम गुंतवूनच मी माझ्या कल्पना विकसित करतो. माझ्या मॉडेलने सुचवलेले स्टॉक जेव्हा बड्या ब्रोकरने सुचवलेले असतात, तेव्हा तो एक दुजोरा असतो आणि डोळे मिटुन मी ते खरेदी करतो. पण बड्या ब्रोकरने दिलेले सल्ले (reccomendations) मी आंधळेपणाने अजिबात वापरत नाही. भारतात आता Trader's Confrences नियमित होऊ लागल्या आहेत. त्यातील अनेक सत्रे तूनळीवर उपलब्ध आहेत. शब्दानुज यांनी एक संभ्रमाचा मुद्दा उपस्थित केला आहे - मार्केटमध्ये सतत लाटा (सायकल्स) येत असतात. एक लाट ओसरायच्या आता नफा बुक करून दुसरी लाट पकडणे एकदा जमले की दर महा १०% परतावा अशक्य नाही. मार्केट गडगडत असले तरी काही स्टॉक चढत असतात. ते शोधुन कोसळत्या मार्केटमध्ये पण पैसे कमावता येतात. जाता जाता - पैसा कमवा पण कर न चुकता भरा.
  • Log in or register to post comments

मी कितीतरी वेळा मिपकरानां

ट्रम्प
Fri, 01/18/2019 - 19:13 नवीन
मी कितीतरी वेळा मिपकरानां अर्थविश्व विभाग सुरु करन्यासाठी विनंती केली होती !!! जिथे आपल्या सारखे एक्सपर्ट मुळे माझ्या सारख्या नवख्या ला मदत होईल . 2018 ला मी मार्केट मध्ये एंट्री केली त्या वेळी माझे सुद्धा 10 % मंथली चे टार्गेट होते पण नवीन असल्यामुळे गटांगळय खाल्ल्या . एक वर्ष झाले पोर्टफोलियो 60 % मायनस मध्येच आहे . कारण एंट्री आणि एग्जिट चुकल्या . वर जाणारे शेयर्स घेत गेलो आणि घेतल्या नंतर लगेच दुसऱ्या दिवसांपासून ते पडायचे मग घाबरून विकायचो . आता तीन महीने झाले हेग 4650 ला घेतला व होल्ड केला तर आज त्याची किंमत 3544 आहे . पक्का वैतगलोय राव !!!!
  • Log in or register to post comments

अर्थविश्व चालु कराच

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 01/18/2019 - 20:33 नवीन
गेल्या ३-४ वर्षांपासुन मी म्युच्युअल फंडमध्ये जास्त ईंटरेस्ट घेउन गुंतवणुक करतोय. पण २०-२२ टक्के दिसणारा फायदा आता ५-६ टक्क्यावर आलाय. स्मॉल कॅपची तर वाटच लागलीये. मिड कॅप खुपच खाली आलेत. डेट फंड आत्ता कुठे थोडेसे वर आहेत. फॉरेन फंड (बी एन पी, डी एस पी, फ्रँकलिन )तर वर यायचे नावच घेत नाहीत. टेक्नॉलॉजी फंड बरे आहेत पण इन्फ्रा आणि कन्झ्युमर वाले डुबलेत. शेअर्समध्ये आयशर मोटर, टाटा मोटर ( ऑटो सेक्टर) हेग, ग्राफाईट बसले आहेत. सॉफ्टवेअर आणि बँका काही प्रमाणात तग धरुन आहेत पण फारसे आकर्षक नाहीत. थोडक्यात मी धीर धरलाय पण किती दिवस असे चालणार समजत नाहिये.
  • Log in or register to post comments

संपादक मंडळ ला काय प्रॉब्लम

ट्रम्प
Fri, 01/18/2019 - 21:47 नवीन
संपादक मंडळ ला काय प्रॉब्लम आहे तेच कळत नाही , फक्त चर्चा करण्यासाठी अर्थविश्व विभाग सुरु करायला काय हरकत आहे ? जेणेकरून तदन्य मंडळी त्यांचे विचार / अनुभव मांडतील , एखाद्या चांगल्या शेअर बद्दल माहिती समजेल . शेवटी शेयर्स गुंतवणूक मधील फायद्या / तोटया ला जबाबदार गुंतवणूकदार च असतो एवढी अक्कल त्याला असतेच .
  • Log in or register to post comments

अनुमोदन

शब्दानुज
Fri, 01/18/2019 - 22:05 नवीन
कलाविभाग काढून टाकण्यासारखा भाग आहे. तिथला सगळ्यात वरचा लेखही २ वर्ष जुना आहे. तो काढून अर्थजगत सुरु करण्यास अडचण नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

अर्थविभागाला राजकारणाइतका

टवाळ कार्टा
Sat, 01/19/2019 - 20:16 नवीन
अर्थविभागाला राजकारणाइतका ट्यार्पी नसेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

आता तीन महीने झाले हेग 4650

युयुत्सु
Sat, 01/19/2019 - 08:02 नवीन
आता तीन महीने झाले हेग 4650 ला घेतला व होल्ड केला तर आज त्याची किंमत 3544 आहे . पक्का वैतगलोय राव !!!!
चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खाली आले तर ती संधी असते हे लक्षात ठेवावे. माझ्या मॉडेल प्रमाणे हेग मधली रॅली संपली असून तो अजुन खाली यायची शक्यता आहे. तसे झाल्यास तो परत खरेदी करावा. नवी रॅली चालु व्हायला अजुन काही महिने तरी वेळ जावा लागेल.
  • Log in or register to post comments

माझी शेअर्स निवडायची पद्धत

युयुत्सु
Sat, 01/19/2019 - 09:06 नवीन
माझी शेअर्स निवडायची पद्धत प्रथम निफ्टीच्या तुलनेत कोणते सेक्टर्स चांगली कामगिरी करत आहेत, हे मी वरचेवर तपासतो. या सेक्टर्स मध्ये लोकांची पसंती कशाला आहे, हे मी शोधतो सर्वात जास्त पसंतीचे २-३ सेक्टर निवडून मग त्या त्या सेक्टर मध्ये चांगली कामगिरी करणारे शेअर्स "बाय" सिग्नल देत आहे का तपासतो. असे शेअर्स मिळाले नाहीत तर त्याच सेक्टर मध्ये बाय देणारे इतर चांगले शेअर कोणते, हे शोधतो अशा चाळणीतून निवडलेले शेअर्स सहसा चांगलेच निघतात आणि डॊळे मिटून घेता येतात.
  • Log in or register to post comments

दरमहा १०% परतावा.

ज्ञानव
Sun, 01/20/2019 - 21:22 नवीन
हे सोदाहरण दिलेत तर चर्चेला उधाण येईल. बरेच पंटर आहेत इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

एक उदाहरण

युयुत्सु
Sat, 01/19/2019 - 11:44 नवीन
वरील पद्धतीप्रमाणे निवड करत गेल्यास फेडरल बॅन्क हा शेअर माझे मॉडेल सुचवत आहे. मला या शेअर विषयी फारशी माहिती नाही म्हणून मनी कंट्रोलवर जाऊन तपास केला असता प्रभुदास लिलाधर आणि मोतीलाल ओस्वाल या दोन ब्रोकरनी या शेअरला बाय दिला आहे. चालु भाव ९० आहे आणि १००-११५चे टार्गेट आहे त्यामुळे मी हा सोमवारी डोळे मिटून घेणार! सूचना - सदर उदाहरण केवळ नमुन्यासाठी दिले आहे. हे माझे रेकमेंडेशन नाही. स्वत: अभ्यास केल्या शिवाय कोणताही व्यवहार करू नये
  • Log in or register to post comments

हा शेअर अजून थोडा खाली येऊ

शाम भागवत
Sat, 01/19/2019 - 14:19 नवीन
हा शेअर अजून थोडा खाली येऊ शकतो. बॅंक निफ्टीकडे लक्ष ठेवले तर योग्य वेळेच्या जवळ जाता येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हो.

युयुत्सु
Sat, 01/19/2019 - 14:20 नवीन
हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

माझा अनुभव,

भंकस बाबा
Sun, 01/20/2019 - 23:12 नवीन
ब्रोकरेज हाउसेस चोर कंपन्या असतात. ह्यांच्या बोळ्याने दूध पिणारा हमखास तोंड पोळून घेतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुम्ही म्हणता त्यात बरेच तथ्य

युयुत्सु
Mon, 01/21/2019 - 07:09 नवीन
तुम्ही म्हणता त्यात बरेच तथ्य आहे. त्यांचा "बाय" माझ्या "बाय"च्या बराच अगोदर येतो असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

Value research च्या stock

मराठी_माणूस
Sat, 01/19/2019 - 12:12 नवीन
Value research च्या stock advisor बद्दल काय मत आहे ?
  • Log in or register to post comments

Value research च्या stock

युयुत्सु
Sat, 01/19/2019 - 13:00 नवीन
Value research च्या stock advisor बद्दल काय मत आहे ?
मी त्यांची फक्त म्यु० फंडांची रॅंकीग वापरली आहेत. Equitymaster च्या शेअर्स शिफारशी वापरून बघितल्या पण फारसे काही हाती लागले नाही. अशा मॉडेल्सची recommendation आणि आपली सायकॉलॉजी यांचे जुळावे लागते नाहीतर फज्जा उडतो. स्वत:च्या अभ्यासाला पर्याय नाही.
  • Log in or register to post comments

अशोक लेलँड बद्दल काय करावे ?

उगा काहितरीच
Sat, 01/19/2019 - 13:46 नवीन
अशोक लेलँड बद्दल काय करावे ? १५२ च्या आसपास घेतले होते. १६५ वगैरे गेले तेव्हा चांगलं वाटत होतं पण आता चक्क १०० च्या खाली ! सध्या गडबडून जाऊन विकून नाही टाकलेत. पण काय करावं कळत नाहीये .
  • Log in or register to post comments

अशोक लेलँड बद्दल काय करावे ?

युयुत्सु
Sat, 01/19/2019 - 14:23 नवीन
माझ्या मॉडेल प्रमाणे याची घसरगुंडी अजुन २-३ महीने चालु राहिल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

पॉवर सेक्टर कसा आहे?

राजेंद्र मेहेंदळे
Sun, 01/20/2019 - 12:07 नवीन
मी एच बी एल पॉवर बरेच (अंदाजे ५००) घेउन ठेवले आहेत रु. ६० च्या आसपास पण सध्या २८ रु. चालु आहे. तसेच कोणीतरी सुचवले म्हणुन एल अँड टी फायनान्स घेतलाय २०० च्या आसपास तोही १४० रु. आहे. हे दोन्ही शेअर्स वर येतील का आणि कधी? निदान मुद्दल निघेल ईतके झाले तरी बास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

माझा अंदाज

मराठी कथालेखक
Tue, 01/22/2019 - 12:27 नवीन
फेब्रुवारी मध्ये अशोक लेलँड काहीसा वर येईल (११०~११५ पर्यंत) पण १५० (तुमची खरेदी किंमत) ओलांडून नफ्यात येण्याकरिता ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत वाट बघावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

एच बी एल पॉवर

युयुत्सु
Sun, 01/20/2019 - 12:37 नवीन
एच बी एल पॉवर घसरगुंडी थांबत आली आहे पण निश्चितपणे upward movement अजुन सुरु झाली नाही. L&TFH अजुन थोडा खाली येऊन २-३ महिन्यानी वर जायला सुरुवात होईल असे वाटते. मला असे वाटते की तुम्ही अजुन सहा महिने तिकडे बघु पण नका.
  • Log in or register to post comments

मला वाटते

ज्ञानव
Sun, 01/20/2019 - 21:20 नवीन
शेअर्सच्या वैयक्तिक ट्रेडिंगबद्दल इथे चर्चा करू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. व्यनी किंवा व्हॉटस अप द्वारे संपर्क साधून चर्चा करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

10% महिना

कपिलमुनी
Sun, 01/20/2019 - 12:42 नवीन
10% महिना हे एखाद्या शेयरसाठी एखादा महिना जमेल पण लॉंग टर्म साठी unrealistic target आहे.
  • Log in or register to post comments

सकाळी बाथरूम मध्ये बसल्या

ट्रम्प
Sun, 01/20/2019 - 16:53 नवीन
सकाळी बाथरूम मध्ये बसल्या बसल्या ट्वीट करून जगातील सगळे शेअर बाजार माझ्या नावकऱ्या ( ट्रम्प ) ने पाडले आहेत . त्यात आपल्या लोकसभेच्या 2019 मध्ये निवडणुका आहेत त्या मुळे परकीय गुंतवनणुक़दार धस्तावले आहेत . या मुख्य घटना मुळे लॉन्गटर्म वाल्याचें ( मी सुद्धा ) पोर्टफोलियो 40 ते 50 टक्क्यानीं खाली आहेत . क़दाचित इन्वेस्टमेंट इतकी किंमत यायला अजुन आठ दहा महीने लागतील अस वाटातय .
  • Log in or register to post comments

खरे आहे. पण कार्वी आणि सी आय

युयुत्सु
Sun, 01/20/2019 - 17:20 नवीन
खरे आहे. पण कार्वी आणि सी आय आय चे अहवाल पण वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

दरमहा १०% परतावा.

ज्ञानव
Sun, 01/20/2019 - 21:17 नवीन
शक्य आहे. पण मिळत नाही.
  • Log in or register to post comments

दरमहा १० % परतावा सलग पाच

सुबोध खरे
Mon, 01/21/2019 - 08:59 नवीन
दरमहा १० % परतावा सलग पाच वर्षे मिळवणारा माणूस मला दाखवून द्या छत्रपती शिवाजी टर्मिनस वर सकाळी १० वाजता सर्वांच्या समोर मी त्याचा जाहीर सत्कार करायला आणि त्याचे चरण तीर्थ घ्यायला तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

दहा काय पाच वर्षे सोडाच अगदी

सुबोध खरे
Mon, 01/21/2019 - 09:20 नवीन
दहा काय पाच वर्षे सोडाच अगदी तीन वर्षे जरी दरमहा १००० रुपये गुंतवले तरी त्याचा (३६ हजार रुपयाचा) परतावा ३ लाख ६० हजार इतका येतो. तीन वर्षात

सातत्याने

दसपट करून देणारी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हि अशक्य गोष्ट आहे. (चुकून एखादे वेळेस अनुमान धपक्याने होणे हा अपवाद आहे. )
  • Log in or register to post comments

दरमहा दहा टक्के परतावा .. हे

अमर विश्वास
Mon, 01/21/2019 - 16:04 नवीन
दरमहा दहा टक्के परतावा .. हे स्वप्नरंजन आहे. सलग सर्व महिने दहा टक्के परतावा .. तो ही पूर्ण पोर्टफोलिओवर ? म्हणजे समजा मी १ जानेवारी २०१८ ला १ लाख रुपये घेऊन मार्केट मध्ये उतरलो .. जे काय शेअर्स खरेदी विक्री केले ... आणि १ जानेवारी २०१९ ला माझ्याकडे १ कोटी वीस लाख रुपये असतील ? माझा ओपन चॅलेंज आहे .. मी ५०% प्रॉफिट शेअर करायला तयार आहे .. कोणीही अशी गुंतवणूक करून दाखवावीच ... कृपया अशा प्रलोभनांपासून दूर राहा ...
  • Log in or register to post comments

बुवा , तुमच्या आकडे वारी

युयुत्सु
Mon, 01/21/2019 - 16:37 नवीन
बुवा , तुमच्या आकडे वारी मध्ये गडबड आहे. खाली जे कोष्टक दिले आहे त्यात दर महिन्याला मिळणारी रक्कम दिली आहे. याप्रमाणे १ कोटी वीस लाख रुपये न होता फक्त २ लाख ८५ हजार ३११ रु होतात (यात १ लाख मुळ मुद्दल आहे). गेल्यावर्षी मार्केट कोसळले होते, त्यामुळे गेल्या वर्षी असा परतावा मिळण्य़ाची शक्यता शून्य! मी फक्त संधी असते एव्हढेच सांगितले. कोणते ही प्रलोभन दाखवले नाही. माझ्याकडे सल्ला मागण्यास येऊ नये. Jan 100000 Feb 110000 Mar 121000 Apr 133100 May 146410 Jun 161051 Jul 177156.1 Aug 194871.71 Sep 214358.881 Oct 235794.7691 Nov 259374.24601 Dec 285311.670611
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

अमर दादा !!!!!!

ट्रम्प
Mon, 01/21/2019 - 20:11 नवीन
इतक्या आत्मविश्वासाने चूकीची अकडेवारी नका हो देवू !!!!! तुमच्या अकडेवारी मुळे माझ्या सारखा नवखा माणूस शेअर मार्केटच्या कधीच नादी लागणार नाही = ) =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

चुकलेले गणित

डाम्बिस बोका
Fri, 03/01/2019 - 09:21 नवीन
तुमचे गणित चुकते आहे महाराजा. १० % परतावा हा मूळ मुद्दल वर आहे. दर महा १०% परतावा शक्य आहे का? पूर्णपणे शक्य आहे. मी स्वतः TRADING कंपनी मधये १२ वर्ष काम केले आहे. तितकीच वर्षे ACTIVE TRADER आहे. सर्वसाधारण १०% plus नियमीत पाने मिळवतो. अभ्यास, नुकसान सोसायची ताकत, नेटवर्किंग अश्या barachach गोष्टी लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

CORRECTION

डाम्बिस बोका
Fri, 03/01/2019 - 09:28 नवीन
थोडी चूक झाली क्षमा असावी. दरमहा १०% नाही, परंतु वर्षाला सर्वसाधारण १०% परतावा मिळवता येतो. थोडे महिने उणे आणी थोडे महिने अधिक करून आणि शिस्तबद्ध तयारीने जमते. मला वाटते १०-२५% वार्षिक परतावा ला सर्वसाधारण सहमती मिळावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डाम्बिस बोका

मी खाली १२ टक्के दरमहा

सुबोध खरे
Mon, 01/21/2019 - 17:51 नवीन
मी खाली १२ टक्के दरमहा चक्रवाढ व्याजाने पैसे कसे मिळवावे आणि कोट्याधीश कसे व्हावे याचे कोष्टक दिले आहे. ते वापरून कुणालाही कोट्याधीश होता येईल पूर्वसूचना--

हे कोष्टक फक्त पुण्यवान माणसांनाच दिसेल

आणि ते पाहण्यासाठी विंडोज ३.१ हि प्रणाली ४८६ संगणकावर वापरावी मी फक्त हि संधी आहे एव्हढेच सांगितले. कोणते ही प्रलोभन दाखवलेले नाही. माझ्याकडे सल्ला मागण्यास येऊ नये. https://www.google.com/search?q=how+to&rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&oq=how&aqs=chrome.3.69i57j35i39l2j0l3.3752j0j8&sourceid=chrome&ie=UTF-8
  • Log in or register to post comments

हे कोष्टक फक्त पुण्यवान

प्रकाश घाटपांडे
Tue, 01/22/2019 - 10:34 नवीन
हे कोष्टक फक्त पुण्यवान माणसांनाच दिसेल >>> मला तर दिसल बुवा! बाकीच्यांच माहीत नाही>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हे कोष्टक फक्त पुण्यवान

युयुत्सु
Tue, 01/22/2019 - 10:42 नवीन
हे कोष्टक फक्त पुण्यवान माणसांनाच दिसेल
आम्ही फक्त आम्हाला जे दिसत त्यावर फोकस करतो, बाकीच्यांना काय दिसते याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

https://www.youtube.com/watch

युयुत्सु
Mon, 01/21/2019 - 20:35 नवीन
https://www.youtube.com/watch?v=RXfeetU2l90
  • Log in or register to post comments

https://money.rediff.com

सुबोध खरे
Mon, 01/21/2019 - 20:49 नवीन
https://money.rediff.com/losers/bse/monthly/groupa वरच्या दुव्यात गेल्या एक महिन्यात १० % नुकसान झालेले A गटातील ४० समभाग आहेत. आणि याच कालावधीत निफ्टी मध्ये ०.२% वृद्धीच झाली आहे. नुसता एक तक्ता दिला कि आपला मुद्दा सिद्ध झाला असे समजणाऱ्यांसाठी.
  • Log in or register to post comments

सन फार्मा

ज्ञानव
Tue, 01/22/2019 - 09:26 नवीन
शुक्रवारी (१८/०१/२०१९ रोजी) ३७५ ला घेतलेला सन फार्मा आज (२२/०१/२०१९ रोजी ) ४१५ पर्यंत आला आहे. विकला तर १०% नक्की मिळतील मी विकणार नाही कारण आत्ता ट्रेंड फोर्मेशन सुरु आहे. कदाचित हा योगायोग असावा. पुढील महिन्यात दुसरा कोणता तरी शेअर आपण चेक करू. वर्षभरात आपल्याला काहीतरी निष्कर्ष पुराव्यानिशी शाबित करता येईलच की....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा