काळाची उबळ

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
10 Nov 2017 - 1:18 pm

खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,

तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली
पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत !

खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,

जेव्हा माणूस विचार करावयास शिकला
तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत

तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित
ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं
पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल.

सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज
गुन्हेगारी आभाळाला टेकली
राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली
महागाईचा पारावर गेला
प्रदुषणाने कळस केला
प्रगती कशी प्रतिगामी झाली
प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली
प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले
स्वैराचारतर मी म्हणू लागलाय, पाप वाढल पाप वाढलं
नकारात्मक बातम्यांच्या पुरात राहील साहिल वाहून गेल
जगबुडी आली जगबुडी आली
अहो वाचवा वाचवा, वाचवा मला कुणीतरी

खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,

(मंडली ह. घ्या.)

अनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालनागपुरी तडकाफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कवितासांत्वनाअद्भुतरससंस्कृती

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Nov 2017 - 2:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेखकाच्या भावनांशी काही अंशी सहमत देखिल आहे. होते असे एखाद्या दिवशी.
अशा वेळी सगळे कामधंदे टाकुन मस्त कुठेतरी भटकायला जावे.
यू नीड अ ब्रेक मॅन...
(आली उबळ तर खोगो चघळ या आमच्या आगामी पुस्तकामधुन साभार)
पैजारबुवा,