पुस्तकांविषयी सर्वकाही...

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
27 Feb 2017 - 1:39 pm

नमस्कार मिपाकर्स..

सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!!

आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात. ही माहिती सर्वांसोबत वाटून घेण्याच्या अनुषंगाने हा धागा काढत आहे.

सध्या काय वाचत आहात, अलिकडे काय वाचले, एखाद्या पुस्तकाची माहिती हवी आहे किंवा एखादे पुस्तक मिळत नाहीये / मिळवायचे आहे, एखादे पुस्तक पूर्वी कधीतरी वाचले पण नांव आठवत नाहीये अशा कोणत्याही गोष्टी लिहिण्यासाठी या धाग्याचा वापर करू शकता.

एखादे पुस्तक विकत घेतले आणि सध्या नको आहे अशावेळी कुणाला विकत / तसेच द्यावयाचे असेल तर त्यासाठीही हा धागा जरूर वापरा (फक्त मिपा प्रशासनाला आर्थिक व्यवहारांपासून दूर ठेवा)

चला तर मग.. सर्व मिपाकर मिळून पुस्तकांविषयी कोणत्याही शंका, निरीक्षणे, सल्ले, अनुभव यांची पोतडी उघडूया. वाचनसंस्कृतीची आपल्या परीने जपणूक करूया.

(पुस्तकप्रेमी) मोदक.

****************

१) येथे मराठी, हिंदी, इंग्लीश.. सर्व भाषांमधील पुस्तकांबद्द्ल लिहू शकता. हा धागा फक्त मराठी पुस्तकांपुरता मर्यादित नाही.
२) शक्य झाले तर मराठीशिवाय इतर भाषांमधील पुस्तकाबद्दल लिहिताना, त्याचे मराठीत भाषांतर झाले आहे का आणि झाले असल्यास भाषांतरीत पुस्तकाचे नांव दिले तर पुस्तक शोधणे सर्वांना सोयीचे पडेल.

****************

संस्कृतीप्रकटनशुभेच्छाआस्वादसमीक्षाशिफारससल्ला

प्रतिक्रिया

मोदक's picture

27 Feb 2017 - 1:42 pm | मोदक

मी सुरूवात करतो.

आज एकच दिवस मेहता प्रकाशनमध्ये मराठी भाषा दिनानिमीत्त सर्व पुस्तकांवर ४०% सूट आहे. किमान ३४००/- रूपयांची खरेदी आवश्यक, म्हणजे एकूण डिस्काऊंट मिळून बिल २०००/- दरम्यान होते.

सागर's picture

27 Feb 2017 - 3:14 pm | सागर

मोदका छान धागा सुरु केलास

सध्या मी भा. रा. भागवतांनी अनुवाद केलेले "शाब्बास शेरलॉक होम्स" ही ५ छोट्या पुस्तकांची मालिका वाचतो आहे.
डायमंड प्रकाशनाने गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" या दोन खंडांची पुनर्र्छ्पाई केली आहे. इतिहासाची आवड असणार्‍यांनी अवश्य संग्रही ठेवावा असा हा ग्रंध आहे.
असो
मला जुनी काही पुस्तके हवी आहेत. कोणी मदत करु शकले तर खूप आनंद होईल.

- वारसा नॉस्ट्राडेमसचा - मूळ लेखक : रेमंड लिओनार्ड - मराठी अनुवाद : अनिल काळे
- द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन - अनुवाद : प्रमोद जोगळेकर
- शकुंतला - आनंद साधले (याची झेरॉक्स प्रत देखील चालेल )

- द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन - अनुवाद : प्रमोद जोगळेकर

हे पुस्तक सध्या छपाईत नाही. :(

हो ना. जेव्हा उपलब्ध होते तेव्हा घेतले नाही :(

गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" २ खंड ऑनलाईन ऑर्डर करता येतील. मी घेतले आहेत.
२०% सवलतीने खरेदी करण्यासाठीचा दुवा : http://www.diamondbookspune.com/viewdetails.php?bid=118&disc=20

वरुण मोहिते's picture

27 Feb 2017 - 3:38 pm | वरुण मोहिते

मला एक पुस्तक हवंय..डार्क गॉड्स नावाचं .टेड क्लेन म्हणून लेखक आहेत अमेझॉन वरून मागवलं तर २० दिवसांनी त्यांचा परत मेल आला कि उपलब्ध नाही म्हणून. असं म्हणतात हे पुस्तक नारायण धारपांचं इन्स्पिरेशन आहे.ते गेल्यावर त्यांच्या घरातली पुस्तक जेव्हा विकली तेव्हा रद्दीत हे पुस्तक हृषीकेश जोशी सध्या भयकथा वैग्रे लिहितात त्यांना मिळालं . अशी कथा ऐकल्यावर उगाच उत्सुकता लागलीये ते पुस्तक वाचायची .

वरुण हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे पण खुप महाग आहे.
अ‍ॅमेझॉन च्या साईट वर सर्च मधे नाहि सापडले. पण गूगल सर्च मधून सापडले.

लिन्कः
http://www.amazon.in/gp/offer-listing/0330297147/ref=dp_olp_used_mbc?ie=...

बहुदा वापरलेले (सेकंड सेल आहे) पुस्तकाच्या रेटिंग वरुन बरेच प्रसिद्ध पुस्तक आहे असे दिसते.

वरुण मोहिते's picture

27 Feb 2017 - 5:30 pm | वरुण मोहिते

सातवाहन कालीन महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास ..महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ मंडळासाठी
विजयानगर पुणे ३०... अशी बऱ्यापैकी रेअर असलेली यादी पण आहे .

रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का??

रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का??

हो करा की. तसेच पुस्तकाची ओळख आणि तुम्हाला त्यात काय आवडले हे ही जरूर लिहा.

मला 'विषातील विज्ञान' हे पुस्तक हवं आहे
मला या पुस्तकाचं फक्त नावच पुसटस आठवत, हे पुस्तक अनुवदित आहे,
जर कुणाला याबद्दल काही माहीत असल्यास क्रुपया सांगावे.
छान धागा मोदक मित्रा!

Nitin Palkar's picture

27 Feb 2017 - 6:49 pm | Nitin Palkar

१९९० ते २०११ या काळातील Readers Digest चे सुमारे शंभर मासिक अंक (संमिश्र, सलग नव्हेत) माझ्याकडे आहेत. हौशी संग्रहाकास नाममात्र किमतीस विकणे आहेत. संपर्क: ७०४५६ ३६३४६

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - ऑनलाईन ईबुक्स

https://msblc.maharashtra.gov.in/pdf/

(यापद्धतीने लिंक द्यायचं कारण म्हणजे 'छुपी' पुस्तकंही दिसतात.)

हल्ली वाचनाला वेळ मिळत नाही म्हणून मग audible (ऍमेझॉन) वर पुस्तक श्रवण करतो, ऑफिस ला गाडीतून जाता येता.

आधी थोडं वेगळं वाटत, पण सवय होते, आणि नंतर मज्जा येते.

ह्यावर आवर्जून ऐकावे/वाचावे असे पुस्तक म्हणजे Man versus Wild च्या Bear Grylls चे पुस्तक
Mud, Sweat and Tears.
हे माझ्या १२ वर्षाच्या मुलाला देखील ऐकवले आणि त्याने मन लावून ऐकले।
विलक्षण अनुभव आहेत ह्या माणसाचे. नक्की वाचून बघा।

देशपांडेमामा's picture

1 Mar 2017 - 6:51 pm | देशपांडेमामा

लय भारी पुस्तक आहे हे. मी वाचतोय सध्या :-)

देश

गॅरी ट्रुमन's picture

27 Feb 2017 - 9:41 pm | गॅरी ट्रुमन

India Since Independence: Making Sense of Indian Politics हे जनेयुमधील प्राध्यापक व्ही.कृष्ण अनंत यांचे पुस्तक माझ्या अगदी 'ऑल टाईम फेव्हरेट' मध्ये आहे. हे पुस्तक भारतीय राजकारणात स्वातंत्र्यापासून जवळपास १९९० पर्यंतच्या घटनांचा आढावा घेते. तसेच या पुस्तकामध्ये घटना जशा घडल्या तशा दिल्या आहेत त्यामुळे या पुस्तकाचे लेखक जनेयुमधील प्राध्यापक असले तरी जनेयु स्टाईलमध्ये हलकटपणा करायला स्कोप नाही.

मिपावर राजकारणावरील चर्चांमध्ये माझ्या अनेक प्रतिसादांना या पुस्तकाचा आधार असतो. या पुस्तकात नेहरूंचा काळ, इंदिरा गांधींचा काळ, आणीबाणी, जनता पक्ष, राजीव गांधींचा कालावधी इत्यादी काळात झालेले राजकीय चढउतार भरपूर सविस्तरपणे दिले आहेत. माझ्यासारख्या राजकारणात अतोनात रस असलेल्याला हे पुस्तक म्हणजे अगदी पर्वणीच आहे. कितीही वेळा वाचले तरी मधूनमधून ते पुस्तक मी परत वाचत असतो. हे पुस्तक उत्तम आहेच फक्त पुस्तकात अनेकवेळा तारखांचा घोळ झाला आहे (म्हणजे फार घोळ नाही--२-४ दिवस इकडेतिकडे) ते टाळता आले असते तर बरे झाले असते असे वाटते.

रोचक वाटत आहे. बिपन चम्द्रा आणि रामचंद्र गुहा या दोघांची स्वातंत्र्योत्तर भारतावरची पुस्तके संग्रही आहेत. आता हेदेखील वाचायला हवे.

अत्रे's picture

5 Mar 2017 - 5:19 pm | अत्रे

धन्यवाद, रोचक वाटत आहे.

अभिजीत अवलिया's picture

28 Feb 2017 - 9:08 am | अभिजीत अवलिया

सध्या आतिवास सविता ह्यांचे अफगाणिस्तानमधील अनुभवावर आधारित 'भय इथले' हे पुस्तक वाचत आहे. त्यानंतर जयंत नारळीकर ह्यांचे 'चार नगरातील माझे विश्व' वाचणार आहे.

सध्या गजानन मेहेंदळे ह्यांनी लिहिलेले 'श्री राजा शिवछत्रपती' हे पुस्तक वाचत आहे. प्रचंड माहितीच्या ओघाने निव्वळ थक्क व्ह्यायला होतंय.

वरुण मोहिते's picture

28 Feb 2017 - 10:27 am | वरुण मोहिते

वसंत वसंत लिमये यांचं . रहस्य कथा कथा वर्तमान काळाशी सुसंगत ह्या धर्तीवर . आधीचं लॉक ग्रिफिन पण तसेच होते.
'शोध 'पण असेच होते मुरलीधर खैरनार यांचे .
अंग्रेजी मध्ये सध्या 'द ग्रेट इंडियन नॉवेल ' वाचतोय शशी थरूर यांचे .

पुंबा's picture

28 Feb 2017 - 10:28 am | पुंबा

नुकतेच 'पाडस', 'चीपर बाय द डझन' आणि 'सारे प्रवासी घडीचे' ही तीन पुस्तके वाचून संपवली. अत्यंत सुंदर पुस्तके आहेत तीनही. सध्या कथासंग्रह वाचायचा मूड आहे, दि बा मोकाशींचा 'दिवेलागण' आणि श्री दा पानवलकरांचा 'सूर्य' असे दोन कथासंग्रह वाचत आहे. मिपावर बॅटमॅन यांनी अफाट स्तुती केल्याने मराठी 'वांग्मयाचा गाळीव इतिहास' हे देखील आणले आहे, दुकानात चाळत असताना पहिली एक दोन पाने वाचूनच जो वेड्यासारखा हसत होतो. नॉन फिक्शनमध्ये मायकेल सँडेल यांचे 'जस्टिस: व्हॉट्स द राईट थिंग टू डू' आणि 'गावगाडा' ही दोन चालू आहेत पण तितका सलग वेळ देता येत नसल्याने एखादे प्रकरण वाचून थंड पडत आहेत. न सांगण्याजोगी गोष्ट आणले आहे, पण सुरू करण्यासाठीच मूड येत नाहीये. मुख्य ओढा कथासंग्रहांकडे असल्याने, मिपाकर, कृपया चांगले कथासंग्रह सुचवा.
तसेच, 'जप्ती' ही कथा मी सातवीत असताना वाचली होती, ती खूप आवडली होती, दुर्दैवाने लेखिकेचे आणि कथासंग्रहाचे नाव लक्षात येत नाही. बहुदा, वसुंधरा पटवर्धन किंवा असेच काही तरी त्यांचे नाव होते. कुणाला ही कथा ठाऊक असल्यास अधिक माहिती द्यावी.

सारे प्रवासी घडीचे जबरदस्त पुस्तक आहे. =))

**********************
अवांतर - मी पूर्वी कधीतरी या पुस्तकाचे परिक्षण लिहिले होते.
**********************

सारे प्रवासी घडीचे

ही कथा आहे एका कोकणातल्या एका प्रतिष्ठीत घरातील जमीनदाराच्या मुलाची. "आपू" ची.

शिक्षणानंतर शहरात गेलेला आपू गावामध्ये एक दोन दिवसांसाठी येतो, वाड्याचे बंद दारही पाहण्याची सवय नसणारा आपू त्याच वाड्याच्या रिकाम्या उदास भकास खोल्यातून जुन्या आठवणी शोधत फिरतो, वाळवी व कसर लागलेले देव पाहून खिन्न होतो, एखाद्या पाहुण्यासारखे पूजा करणार्‍या भटजींच्या डब्यातले अन्न खातो या व अशा उदास वातावरणात आपूची आत्म-कथा सुरू होते.
आपूला एकेक गोष्टी आठवतात.. या पुस्तकातील सर्व घटना माणसांभोवती विणलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला दळवींनी दिलेली विनोदाची झालर त्यांचे विनोदावरील प्रभुत्व दाखवून जाते.. निर्वीष, निर्वैयक्तीक आणि निव्वळ प्रसंग व संवादातून उभा केलेला विनोद!!
आबा.. त्यांची ग्रामदैवत रवळनाथावरील निष्ठा. रवळनाथाचे त्यांना आलेले अनुभव.
आबांचा कट्टर वैरी बाबुली. त्याच्याशी नेहमी सुरू असलेले कोर्टकचेरीतील दावे.
आपूच्या शाळाप्रवेशाची नांदी. भविष्य पाहण्यासाठी आलेले भटजी व त्यांनी काढून दिलेला मुहूर्त.
आपूचे व त्याच्या आजीचे विडी आणण्यावरून जमलेले द्वैत, आपू शाळेत गेला तर विड्यांचे काय ही आज्जीला लागलेली काळजी.
शाळेत न जाण्याची आपूची तर त्याला शाळेत घालण्याची आबांची धडपड. "सरस्वती आयली तर लक्ष्मी जातली" हे आज्जीने सांगीतलेले तत्वज्ञान!
आपूने शाळेतच बसावे - पळून जावू नये म्हणून केलेल्या दादुल्याची नेमणूक.
शाळेतला "ढ" पण जिवलग मित्र नरू.
"भो पंचम जॉर्ज"ची मनापासून प्रार्थना करणारे व शाळामास्तर हेच पोस्टमास्तर असलेले बागाईतकर मास्तर.
"माका नाव W W कुळकर्णी असत" असे म्हणून V V कुळकर्णी नावाने आलेले पत्र नाकारणारे (पण कार्ड असेल तर वाचून परत देणारे) आपूचे शेजारी "वामन विष्णु कुळकर्णी"
शाळेचे गॅदरींग, "घनतमी शुक्र राज्य करी" व "अहाहा चेंडू.." या गाण्यांच्या अयशस्वी प्रयोगानंतर सर्वानुमते ठरलेले "देवाजीने करूणा केली" हे गाणे. गॅदरींगमध्ये आपूच्या विळ्याने किरकोळ जखम झालेला परशा व त्यानंतर परशाचा विळा हातात घेवून बागाईतकरांचे धोतर (घामाने!) ओले होईपर्यंत भांडण केलेला परशाचा बा.
बागाईतकरांच्या रिटायरमेंट नंतर शाळेत अवतरलेला पावटे मास्तर. हा मास्तर बाबुलीच्या गटातील असल्याने त्याने केलेले आपूचे हाल.
पावटे मास्तरच्या हाताचा मार खाऊन खाऊन एक दिवस त्याच्या खुर्चीवर खाजकुयलीची कुसे टाकून व नंतर पावटे मास्तरच्या "दुर्गाबाय" नावाच्या एका विधवेशी असलेल्या प्रकरणावरून "दुर्गेदुर्गट भारी तुजविण संसारी.." हे आरती टाळ्या पिटून भर बाजारात पावटे मास्तरच्या मागी लागणारा नरू..
पावटे मास्तर जातपात पाळत असल्याने केशा चांभाराला शिक्षण कमीटीचा मेंबर म्हणून निवडून देणारे आबा व केशाने केलेले शाळेचे "इन्स्पेक्षन"
एका चांभाराला निवडून देणारे गाव पुरोगामी असलेच पाहिजे म्हणून गावात अवतरलेले "खुळो डाक्टर" डॉ.रामदास. त्यांनी आयोजीत केलेले गावकर्‍यांनी सर्वभोजन.
दारूचा गुत्ता चालवणारा पेस्तँव.. दारूडा बाबल्या मडवळ.
पशू, पक्षी व वनस्पतींची जिवापाड काळजी घेणारा हाफमॅड तात्या.
आपूला जेलमध्ये डांबले म्हणून गेम करून सस्पेंड केला गेलेला हवालदार मुंगी.
दशावतारी जिवा, त्याने साकारलेला शंकासूर..
जिवाचा प्रतिस्पर्धी व रवळनाथाचा पुजारी बाबू गुरव.
बाबूने केलेले एकमेव नाटक द्रौपदी वस्त्रहरण - ज्याचा शेवट "लंगोटीमध्ये उभी असलेली द्रौपदी विडी ओढणार्‍या भगवान कृष्णाच्या तोंडात भडकावते" असा होतो.
गावातील रिकामटेकडे व सतत कोणाचीतरी माहिती काढत त्यावरून वेळ घालवणारे लोक.. त्यांनी वेगवेगळ्या सवईंवरून लोकांना बहाल केलेली झोंबणारी टोपणनावे.. नायनाय भाऊ, हाफमॅड तात्या, अमृतांजन प्रेमजी, दुलाजीचा मुलगा "यम" (रेड्यावर बसून शेतातून घरी येणारा म्हणून!) लंगडा तातू..
हे अगदी छोटेखानी पुस्तक हास्याचे कारंजे उडवते. या व अशा अनेक माणसांचे चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!

मोदकभौ, फार भारी लिहिलेत आपण. सगळी उजळणी झाली मनातल्या मनात, परत हसतोय.

चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!

मी खरेच आहे असे मानतो.. :))

पिशी अबोली's picture

3 Mar 2017 - 12:10 am | पिशी अबोली

भारी! अतिशय आवडतं हे पुस्तक.
सगळी उजळणी झाली खरंच..

शैलेन्द्र's picture

20 Mar 2017 - 9:02 pm | शैलेन्द्र

सारे प्रवासी घडीचे, हे ऑडीओ बुक आहे, हव असेल तर सांंगा

द्या की.. मेल आयडी पायजे का..?

मलाही द्या प्लीज. मेल आयडी व्यनी करेन.

इडली डोसा's picture

21 Mar 2017 - 10:58 am | इडली डोसा

कशावर पाठवणार?

फेदरवेट साहेब's picture

28 Feb 2017 - 2:42 pm | फेदरवेट साहेब

फिल्ड मार्शल एर्विन रोमेलचे चरित्र 'डेझर्ट फॉक्स' वाचण्याचा मूड होतोय इतक्यात.

फोनमध्ये डाउनलोड केलेली epub / txt पुस्तके Kindle स्टाइलमध्ये वाचता येणारे Windows app " Bookviser Reader" मधून--

पुंबा's picture

1 Mar 2017 - 5:17 pm | पुंबा

मी ereader prestigio वापरतो. .mobi, तसेच epub दोन्हीही प्रकारची पुस्तके निश्चिंतपणे वाचता येतात. फाँट आणि मार्जिन कमी जास्त करता येते. google books व किंडल छानच आहेत पण मोबाईलमधील जास्त जागा खातात.

वरुण मोहिते's picture

1 Mar 2017 - 6:03 pm | वरुण मोहिते

मराठी _तुही यत्ता कंची??
तुही यत्ता
लेखक -नामदेव ढसाळ
अंग्रेजी -वॉट एव्हरी इंडियन शुड नो बिफोर इन्वेस्टींग
लेखक _एम टी राजू

अमर विश्वास's picture

1 Mar 2017 - 7:16 pm | अमर विश्वास

Books

सध्या जनरल जे. जे. सिंग यांचे "माझे सैनिक - माझा लढा" वाचत आहे.
टाटायन वाचून संपवले

टाटायनमधली अजित केरकर आणि टाटा फायनान्स (पेंडसे ?) ही दोन प्रकरणे वाचून धक्का बसला होता.

बाकी टाटांसंबंधी पुस्तके वाचायची असतील तर आर एम लाला यांच्या पुस्तकांना पर्याय नाही. (तसेच बिझनेस लिजंड आणि बिझनेस महाराजे मधली जेआरडी आणि रतन टाटांची व्यक्तीचित्रे.)

__/\__

तुनळीवर एक झकास वल्ली आहे पुस्तकांवर जबरा बोलतो व सुचवतो. विशेषता आधुनिकोत्तर एकदा जरुर आजमवा त्याच्याच सुचवणीवरुन सध्याच वाचन सुरु आहे. युट्युबात. जावुन bookchemist टाइप करा व सर्च करा मजा आजायेगा गॅरंटी !
अमर विश्वास's picture

1 Mar 2017 - 10:02 pm | अमर विश्वास

मोदकजी ...
टाटांबद्दल जेव्हडे वाचु तेभाडे कमीच आहे
गिरीश कुबेर यांचे यांचे सध्याचे (लोकसत्ता जॉईन केल्या नंतर) लिखाण वाचल्यानंतर त्यांचे पुस्तक वाचायला भीतीच वाटते .. पण टाटायन चांगले आहे.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजित केरकर आणि टाटा फायनान्स ही दोन प्रकरणे खरच खळबळजनक आहेत.

खुद्द पेंडसेंनी लिहिलेले जे आर डी - मी पाहिलेले हे पुस्तक ही वाचनीय आहे.

त्याचप्रमाणे जे आर डी चे "key notes address " एकत्र पुस्तक रूपाने उपलब्ध आहे (मराठी भाषांतर) जरूर वाचा

मोदक's picture

2 Mar 2017 - 5:00 pm | मोदक

कुबेरांबद्दल सहमत. ;)

मी पाहिलेले जेआरडी लिहिणारे द. रा. पेंडसे - हे टाटा ग्रुप मध्ये वरिष्ठ अर्थतज्ञ होते. (टाटा फायनान्स वाले पेंडसे वेगळे.)

तसेच टाटा याच विषयावर आर एम लाला यांचे "क्रिएशन ऑफ वेल्थ" नावाचे एक पुस्तक आहे. टाटांची सुरूवातीपासूनची कथा आणि मारिओ मिरांडा यांची विषयानुरूप बहारदार रेखाचित्रे असे जबरदस्त पुस्तक आहे.

पुण्यात मंगळदास रोडवर "टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज" आहे. तेथे कधीतरी जरूर भेट द्या.

अमर विश्वास's picture

2 Mar 2017 - 9:47 pm | अमर विश्वास

धन्यवाद मोदक ...

खुप वर्षांपूर्वी मी पाहिलेले जेआरडी हे पुस्तक वाचले होते.. नावात घोळ झाला .... चुक सुधारल्याबद्दल धन्यवाद

टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज ला भेट दिली आहे .. तसेच कामानिमित्त बॉम्बे हाऊस ला ही भेट देण्याची संधी सुद्धा मिळाली ... आत्तापर्यंत अनेक कॉर्पोरेट हाऊसेस ना भेट दिली .. पण बॉम्बे हाऊस चा अनुभव वेगळाच होता

माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचे आत्मचरित्र Matters of Discretion: An Autobiography मध्यंतरी वाचले होते.

माझ्या मते हे एक चांगले पुस्तक आहे पण त्यातील काही गॅप मात्र जाणवण्यासारख्या आहेत.

१. गुजराल यांनी मॉस्कोमधील भारतीय वकिल म्हणून १९७६ ते १९८० ही चार वर्षे काम पाहिले. आज इंदरकुमार गुजराल हे नाव ऐकले की आपण परराष्ट्रधोरणाबरोबर ते नाव ताबडतोब निगडीत करतो. मला वाटते की गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील एकूणच दृष्टीकोन या काळात जास्त बदलला. गुजराल यांना हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा काळ वाटत असणे स्वाभाविक आहे आणि त्यांनी पुस्तकातली अनेक प्रकरणे त्यावर दिली आहेत. पण अर्ध्याहून जास्त भारतीयांचा जन्म त्यांची मॉस्कोतील कारकिर्द संपल्यानंतर झालेला आहे. या वाचकवर्गाला त्यांचे मॉस्कोमधील अनुभव काहीसे कंटाळवाणे आणि फार रस वाटावे असे असतील असे वाटत नाही. त्यातील काही अनुभव तर खूपच विस्ताराने लिहिले आहेत असे मला वाटले. उदाहरणार्थ राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डींच्या मॉस्को भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या मेजवानीच्या वेळी ब्रेझनेव्ह उपस्थित राहिले नाहीत हा रेड्डींना अपमान वाटला आणि त्यामुळे कूटनैतिक संकट उभे राहिले असते आणि ते कसे टळले यावर काही पाने खर्ची पाडली आहेत. हे अनुभव सामान्य भारतीय वाचकांना फार भावतील असे नाही. तसेच सोव्हिएट रशियाच्या इतिहासात रस असलेल्या वाचकालाही हे फार भावेल इतक्या विस्तारानेही या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. म्हणजे हे काही अनुभव कोणत्याच वाचकाला भावतील असे वाटले नाहीत आणि ते नक्की कशाकरता पुस्तकात आहेत असेही वाटले.

२. इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात गुजराल माहिती आणि प्रसारणमंत्री होते. त्यावेळी आणीबाणीच्या काही दिवस आधी संजय गांधींनी त्यांच्यावर इंदिरा समर्थकांच्या सभांना रेडिओ-टिव्हीवर प्रसिध्दी द्या असा आदेश दिला होता आणि तो त्यांना मान्य नव्हता यावर त्यांनी लिहिले आहेच. पण आणीबाणी या स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटनेविषयी त्यांनी पुस्तकात फार लिहिलेले नाही हे पण जरा खटकलेच.

३. गुजराल सुरवातीपासून काँग्रेसशी संलग्न होते. पण एप्रिल १९८४ मध्ये त्यांनी काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची आघाडी उघडायचा प्रयत्न केला याविषयी त्यांनी लिहिले आहे. पण त्यांना काँग्रेस का सोडाविशी वाटली याविषयी गुजराल यांनी काहीच लिहिले नाही हे नक्कीच खटकले. मला स्वतःला १९८९ पूर्वीच्या घटना केवळ पुस्तके वाचून माहित आहेत त्यामुळे अशा महत्वाच्या घटनेविषयी काहीच न लिहिलेले मात्र खटकले.

४. गुजराल पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत कल्याणसिंग सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस केली होती. ती राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाकडे परत पाठवली. गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर हा नक्कीच डाग होता. याविषयी त्यांनी मायावतींनी कल्याणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर गुजराल यांचे राज्यपाल रोमेश भंडारी यांच्याशी काय बोलणे झाले एवढेच लिहिले आहे. आणि त्यानंतर "उत्तर प्रदेशातील पेचप्रसंग सुटल्यावरच मला व्यवस्थित झोप लागू शकली" असे लिहिले आहे. पण तो पेचप्रसंग नक्की कसा सुटला याचा उलगडा मात्र वाचकांना होत नाही.

५. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावरच्या त्यांच्या जीवनाविषयी फार त्यांनी लिहिलेले नाही. विशेषतः १९९८ च्या अणुचाचण्यांनंतर गुजराल यांनी लोकसभेत वाजपेयी सरकार नक्की कोणत्या चुका करत आहे यावर भाष्य केले होते. गुजराल यांची इंग्रजी भाषेवरील पकड आणि वक्तृत्व मला नेहमीच भावत असे. त्यांचे लोकसभेतील हे भाषण मी मुद्दामून बघितले होते. तसेच गुजराल पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर ही घटना दोन महिन्यातच झाली होती. तसेच भारताच्या परराष्ट्रधोरणाला नवे वळण लावणारी ही घटना होती. गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील रस लक्षात घेता या महत्वाच्या घटनेवर त्यांनी काहीतरी लिहायला हवे होते असे वाटून गेले.

६. जेव्हा एखादा नेता आत्मचरित्र लिहितो तेव्हा आपल्या जीवनात घडलेल्या घटना एकामागोमाग एक लिहिणे एवढाच त्याचा उद्देश नसावा असे वाटते. तर त्या नेत्याच्या विषयात पुढे काय घडामोडी होऊ शकतील याविषयीचे स्वतःचे मत असायला हवे असेही वाटते. विशेषतः गुजराल हे परराष्ट्रधोरणातील जाणकार असल्यामुळे यानंतरच्या काळात भारताला परराष्ट्रधोरणात नक्की कोणती आव्हाने उभी राहतील आणि ती पेलण्यासाठी काय करायला हवे याविषयी थोडे तरी भाष्य हवे होते असेही वाटले.

एकूणच माझ्यासारख्या राजकारणात प्रचंड रस असलेल्या वाचकाला इंदरकुमार गुजराल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने लिहिलेल्या या पुस्तकाकडून ज्या अपेक्षा होत्या या मात्र पूर्ण झाल्या नाहीत. हे पुस्तक गुजराल यांनी वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर प्रकाशित झाले होते. कदाचित त्यावेळी त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नसावी. तसेच गुजराल यांचे निधन होण्यापूर्वी दोनेक वर्ष त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्या वयात हा विरहाचा धक्का पचविणे तसे कठिणच असेल याची कल्पना करता येते. तसेच प्रकाशकांना आधीच कबूल केल्यामुळे प्रकृती साथ देत आहे तोपर्यंत पुस्तक पूर्ण करायचे हे पण दडपण असेल. या सगळ्या कारणांमुळे त्यांचे आत्मचरित्र हे एखाद्या अपूर्ण मूर्तीप्रमाणे वाटले. हे पुस्तक त्यांनी ८-१० वर्षे आधी लिहिले असते तर त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे झाले असते असेही वाटून गेले.

अर्थातच हे पुस्तक वाईट आहे असे नक्कीच नाही. गुजराल, अडवाणी इत्यादी नेत्यांचे राजकीय जीवन म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासच. या आत्मचरित्राच्या निमित्ताने स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील पहिल्या ५० वर्षांचा लेखाजोखा थोडा तरी नक्कीच समजतो. तसेच वि.प्र.सिंग यांच्या मंत्रीमंडळातील लाथाळ्या, १९९० चे इराक-कुवेत प्रकरण इत्यादींचा चांगलाच आढावा त्यांनी घेतला आहे. पण असाच आढावा इतर महत्वाच्या घटनांचाही घेतला गेला असता तर बरे झाले असते असे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला वाटून गेले.

दा विन्ची's picture

2 Mar 2017 - 4:48 pm | दा विन्ची

माझ्याकडे मोबाईल वर वाचण्यासाठी ३०-४० इंग्रजी पुस्तके उपलब्ध आहेत pdf फॉरमॅट मध्ये. साईझ साधारण १ ते २ Mb.
सिडने शेल्डन, रॉबिन कुक, रॉबर्ट लुडलुम, मायकल क्रिश्टन, जॉन ग्रिशॅम आणि डॅन ब्राऊन ची. हवी असल्यास व्हाट्स अँप वर देऊ शकतो.

मला आवड्तील ही पुस्तके वाचायला, व्यनि केला तर चालेल काय?

वरुण मोहिते's picture

3 Mar 2017 - 2:12 pm | वरुण मोहिते

मातोश्रीवर अर्धी रात्र
लेखक -विजय तेंडुलकर ....काही अप्रकाशित कथा
अंग्रेजी -गुड स्ट्रॅटेजी बॅड स्ट्रॅटेजी
लेखक -रिचर्ड रुमेल्ट
मॅनेजमेंट आवडणाऱ्या लोकांनी रुमेल्ट ह्यांचं पुस्तक वाचावं

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 8:13 am | पिलीयन रायडर

हा एकच धागा असेल तर खरंच बरं होईल. मागे एकदा बोका भाऊंनी काही पुस्तकं मला एका धाग्यात सुचवली होती. तो धागा कोणता हेच मला आठवत नाही. कुणी कृपा करुन मिपावर आजवर पुस्तकांच्या याद्याविषयक आलेल्या धाग्यांच्या लिंक्स सुद्धा इथे देईल का?

मी खुप दिवसात पुस्तकंच वाचलेले नाही. :( उद्याच लायब्ररीत जाईन. आणि इथे त्या पुस्तकाविषयी लिहेन.

ह्या आधी वाचलेलं पुस्तक म्हणजे रिबेका. चांगलं आहे. शेवटाची ओढ लावतं पण शेवट नीटसा कळत नाही. भाषा मात्र अत्यंत प्रवाही आहे. कथा अप्रतिमपणे उभी केली आहे वाचकासमोर.

गॉन विथ... वाचायला सुरूवात केली खरी. पण मला इतकी वर्णनं असलेली पुस्तकं वाचता येत नाहीत. त्यामुळे सोडुन दिलं.

मिसळपाव वर असणारे पुस्तका विषयी हे काही जुने धागे
वाचता वाचता वाढे.....
मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र
पुस्तक खरेदी - मदत
दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके
मला आवडलेले पुस्तक
मला आवडलेले पुस्तक ( विस्तारीत)
मला आवडलेली ५० पुस्तके

ऑगस्ट महिन्यात "मला आवडलेली ५० पुस्तके" हा धागा वाचनात आला. प्रतिसाद वाचताना आपण पुस्तक वाचण्याच्या बाबतीत किती आळशी आहोत याची जाणीव झाली. वडिलांना आणी भावाला वाचनाची प्रचंड आवड त्यामुळे घरातील माळे, कपाटे, पलंगाचे कप्पे पुस्तकांनी तुडूंब भरलेले.
मग काय झटकला आळस, काढली पुस्तकं कपाटातून बाहेर आणी केली सुरवात..

सद्य वि. ग. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल वाचतोय.

मागच्या पाच महिन्यात वाचलेली पुस्तके.

फकिरा:- अण्णाभाऊ साठे
लोक माझे संगती:- शरद पवार
राजा शिवछत्रपती :- बाबासाहेब पुरंदरे.
डोंगरी ते दुबई हुसेन
ज्वलज्वलनतेजास संभाजीराजे
J R D
मन मे है विश्वास
राऊ
स्वामी
ययाती
धागे अरब जगाचे
पानिपत
एक होता कार्व्हर
अमृतवेल

आजून ही खूप पुस्तकं आहेत घरात जी वाचायची बाकी आहेत. बघू कसं जमतंय ते

शेवटी मिपाकरांचे आभार माझ्यात वाचायची आवड निर्माण केल्या बद्दल

रिबेकाच्या शेवटमधे नक्की काय कळलं नाही? मी फार पुर्वी पुस्तक वाचलंय आणि चित्रपट पाहिलाय. जमल्यास शंका समाधान करायचा प्रयत्न करेन.

मराठी पुस्तके पीडीएफ स्वरुपात मिळतील का?

अर्थशास्त्रातील २००२ चे नोबेल पारितोषिक विजेते प्रिन्सटन विद्यापीठातील एमेरीटस प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow हे नितांतसुंदर पुस्तक अलीकडेच वाचले.

प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन हे मुळातले अर्थशास्त्रज्ञ नाहीतच. ते आहेत मानसशास्त्रज्ञ. तरीही त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचे कारण सूक्ष्मअर्थशास्त्रातील ( मायक्रोइकॉनॉमिक्स) विविध मॉडेल ही माणसे 'रॅशनल' असतात या गृहितकावर आधारीत आहेत पण माणसे प्रत्यक्षात 'रॅशनल' नसतात हे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातील दुसरे मानसशास्त्रज्ञ कै. Amos Tversky यांनी १९७० च्या दशकात अनेक प्रयोग करून सिध्द केले.

Thinking, Fast and Slow हे पुस्तक त्या दोघांनी (आणि इतरानी) केलेल्या विविध प्रयोगांवर आधारीत आहे. प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते आपण विचार करतो तो विचार दोन पातळ्यांवर होतो-- सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२. सिस्टिम-१ म्हणजे intuitive विचार करणारी व्यवस्था (फास्ट थिंकिंग) तर सिस्टिम-२ म्हणजे अधिक खोलात जाऊन अधिक वेळ घेऊन विचार करणारी व्यवस्था (स्लो थिंकिंग). प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते सिस्टिम-२ ही 'आळशी' व्यवस्था असते. म्हणजे शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे सिस्टिम-२ चा कल असतो. या दोन सिस्टिमचे कार्य कसे चालते आणि आपण नक्की कसा विचार करतो याविषयी पुस्तकात कित्येक उदाहरणे दिली आहेत. खरे तर या पुस्तकावरील प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र लेख होऊ शकेल. पण आतापुरते एक उदाहरण देतो:

प्राध्यापक कॅनेमन यांनी एक 'लिंडा प्रॉब्लेम' म्हणून उदाहरण दिले आहे. त्यांनी लिंडा या एका काल्पनिक ३१ वर्षीय स्त्रीचे वर्णन दिले आहे. ती single, outspoken आणि तल्लख आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरूध्द आणि सामाजिक न्यायाच्या बाजूची तिची स्पष्ट भूमिका आहे आणि तिने अण्वस्त्रांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये वेळोवेळी भाग घेतला आहे अशा स्वरूपाचे तिचे वर्णन आहे. हे वर्णन देऊन झाल्यानंतर प्राध्यापक कॅनेमन यांनी या प्रयोगातील लोकांना लिंडा नक्की कोणत्या पेशामध्ये असू शकेल याचे ८ पर्याय दिले. लोकांना ती ज्या पेशात असेल याची सर्वात जास्त शक्यता वाटेल त्या पेशाला क्रमांक १, त्यानंतर शक्यता असलेल्या पेशाला क्रमांक २ अशा पध्दतीने ८ पेशांची क्रमवारी लावणे अपेक्षित होते. त्या ८ पेशांच्या यादीत तिसरा पेशा होता-- "स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर", सहावा पेशा होता "बँकेत टेलर" आणि आठवा पेशा होता "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर". त्या प्रयोगात भाग घेणार्‍यांपैकी बहुसंख्य लोकांनी लिंडा "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" ला नुसत्या "बँकेत टेलर" पेक्षा वरचा क्रमांक दिला. वास्तविकपणे बँकेत टेलर असलेल्या समजा १०० स्त्रिया असतील तर स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर असलेल्या बँकेतील टेलर नक्कीच १०० पेक्षा कमी असतील. म्हणजे 'रॅशनल' माणूस "बँकेत टेलर" या पेशाला "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" पेक्षा वरचा क्रमांक देईल. पण तसे झाले नाही.

आपण नक्की कसा विचार करतो याविषयी अशा कित्येक (किंबहुना काही शे) उदाहरणांचा खजिना आहे या पुस्तकात. या पुस्तकाने मला पूर्णपणे अंतर्बाह्य हलवून टाकले हे लिहिणे म्हणजे या पुस्तकाचा माझ्यावर जो परिणाम झाला आहे त्याचे अगदी मिळमिळीत वर्णन झाले. सूक्ष्मअर्थशास्त्रात मानसशास्त्राचाही अंतर्भाव असावा असे पूर्वीही अनेक रिसर्चर म्हणत असत.पण प्राध्यापक कॅनेमन आणि Amos Tversky यांच्या कामामुळे या प्रयत्नांना एक महत्वाची दिशा मिळाली. त्यातूनच 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हे सूक्ष्मअर्थशास्त्रातील एक महत्वाचे क्षेत्र विकसित झाले. याचा जाहिराती, सेल्स तसेच ह्युमन रिसोर्सेस इत्यादी अनेक मॅनेजमेन्टच्या क्षेत्रांवर अमूलाग्र परिणाम होऊ शकेल.

प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांना २००२ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्याबद्दलचे सायटेशन होते: "for having integrated insights from psychological research into economic science, especially concerning human judgment and decision-making under uncertainty".प्राध्यापक Amos Tversky यांचे १९९६ मध्ये निधन झाले. अन्यथा त्यांनाही प्राध्यापक कॅनेमन यांच्या बरोबरच नोबेल पारितोषिक मिळाले असते.

युट्यूबवर प्राध्यापक कॅनेमन यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातील एक व्हिडिओ या पुस्तकाविषयी गुगल टॉक्समध्ये आहे. तो पुढीलप्रमाणे:

असले जबरदस्त काम करणारे लोक बघितले की खरोखरच भारावून जायला होते.

जरी अर्थशास्त्रात फार इंटरेस्ट नसेल तरी हे पुस्तक जरूर वाचावे असे मी म्हणेन. आपण ज्या पध्दतीने विचार करतो त्यात कित्येक त्रुटी नकळतपणे कशा असू शकतात (ज्याविषयी आपल्याला काहीही माहित नसते) हे समजले की खरोखरच थक्क व्हायला होते. पुस्तकात Bayes' theorem , Binomial distribution याविषयीचे काही प्रोबॅबिलिटीतले उल्लेख आहेत. तो भाग माहित नसेल तर तेवढी २-३ प्रकरणे समजली नाहीत तरी इतर प्रकरणांमध्ये खरोखरच खजिना भरलेला आहे.

आनंदयात्री's picture

7 Mar 2017 - 9:53 pm | आनंदयात्री

आवडले, विवेचनाबद्दल धन्यवाद.

चतुरंग's picture

7 Mar 2017 - 10:46 pm | चतुरंग

आजच वाचनालयातून घेऊन येतो. :)

गॅरी ट्रुमन's picture

14 Mar 2017 - 11:07 am | गॅरी ट्रुमन

प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांनी म्हटल्याप्रमाणे विचार करायच्या सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ चे एक उदाहरण याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये दिले आहे. या पुस्तकावर आणखी काही लिहून विनाकारण टी.आर.पी वाढवायचा नाही पण हा विषय मला प्रचंड आवडला आहे. तसेच यावर नवा लेख लिहावा इतपत मसालाही नाही. त्यामुळे इथेच घुसखोरी करत आहे.

समजा एका शहरात दोन मॅटर्निटी होम्स आहेत. एकात दररोज सरासरी १५ बालकांचा जन्म होतो तर दुसर्‍यात दररोज सरासरी ४५ बालकांचा जन्म होतो. त्यापैकी कोणत्या मॅटर्निटी होममध्ये एखाद्या दिवशी जन्मलेल्या बालकांपैकी ६०% मुली असायची शक्यता जास्त आहे? या प्रश्नाचे मी 'सिस्टिम-१' चा वापर करून दोन्ही मॅटर्निटी होममध्ये ही शक्यता सारखीच आहे हे उत्तर दिले.

प्रत्यक्षात ही शक्यता लहान मॅटर्निटी होममध्ये (दररोज १५ जन्म होणार्‍या) जास्त आहे. हा प्रश्न बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशनचा वापर करून सोडवता येईल. हे उत्तर लहान मॅटर्निटी होमसाठी सुमारे १५.३% तर मोठ्या मॅटर्निटी होमसाठी सुमारे ४.९% इतके येते. मी स्वतः बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशन विद्यार्थ्यांना गेली जवळपास ६ वर्षे शिकवत आलेलो आहे. हे उत्तर काढून ती शक्यता लहान मॅटर्निटी होमसाठी नक्कीच जास्त आहे हे मला समजले नसते असे नक्कीच नाही. पण अशा प्रकारची आकडेमोड करणे हे सिस्टिम-२ चे काम आहे. आणि वर म्हटल्याप्रमाणे सिस्टिम-२ आळशी असते. शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे त्या सिस्टिमचा कल असतो.त्यामुळे आपली सिस्टिम-१ एकदम intuitive उत्तर असते ते देते.

एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते. एक उदाहरण द्यायचे झाले तर समजा एक नाणे १० वेळा उडवले तर त्यात ६ छापे यायची (६०%) शक्यता बर्‍यापैकी असेल हे आपल्याला कळतेच. पण समजा तेच नाणे १ लाख वेळा उडवले तर त्यात ६० हजार छापे यायची (परत ६०%) शक्यता तितकी नसेल. कारण जसा सॅम्पल साईझ वाढतो त्याप्रमाणे 'अ‍ॅव्हरेज आऊट' होते आणि टोकाचे रिडिंग यायची शक्यता कमी होते.

मी हा भाग स्वतः शिकवत असूनही आणि मी मुळातले पुस्तक वाचूनही (त्यात सॅम्पल साईझचा परिणाम काय होतो हे व्यवस्थित समजावून दिले आहे) माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले. सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले.

हाच अनुभव मिपाकरांपर्यंत पोहोचवावा म्हणून इथेच घुसखोरी करत आहे. त्याबद्दल दिलगिरी. पण हे पुस्तक वाचलेत तर असे चकित व्हायचे अनुभव कित्येकवेळा येतील हे मात्र अगदी स्वानुभवावरून सांगतो.

आनंदयात्री's picture

14 Mar 2017 - 9:12 pm | आनंदयात्री

रोचक.

आषाढ_दर्द_गाणे's picture

14 Mar 2017 - 10:28 pm | आषाढ_दर्द_गाणे

एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते....
...माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले.
सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले.

माफ करा, जरा स्पष्टच विचारतो - ह्यात थक्क होण्यासारखे नक्की काय आहे?
तुम्ही जरा विचार केला असतात, वेळ घेतला असतात आणि तुमच्याकडे असणाऱ्या सांख्यिकी ज्ञानाचा वापर केला असतात तर बरोबर उत्तर तुम्हाला सापडले असते. पण घाई केलीत आणि घोळ झाला.
आता हे सांगायला मानस/अर्थशास्त्रज्ञ कशाला हवेत?

बाकी तुमच्या शिफारशीवरून हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
रच्याकने, सध्या 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स'ला आलेले 'अच्छे दिन' म्हणजे उत्क्रांतीवाद्यांनी डार्विनचे सिद्धांत चुकीचे आहेत हे मान्य करण्यासारखे आहे असे वाटते.
सगळ्या अर्थशास्त्राचा डोलारा हा माणूस 'रॅशनल' (ह्याला मराठीत अचूक पर्यायी शब्द नाही) असण्यावर अवलंबून आहे.
पण जवळपास सगळेच निर्णय घ्यायच्या वेळेस मनुष्य इररॅशनल वागतो हे अर्थशास्त्रद्यांना फार आधीच कळलेलं आहे.
असो.

एका पुनर्जन्माची कथा हे पुस्तक वाचले..

Rheumatoid Arthritis नामक दुर्धर विकार झालेल्या मनोविकारतज्ञ डॉक्टरने, ओशो तत्त्वज्ञानाने या रोगाशी कसा सामना केला याचा विस्तृत अनुभव आहे.

चार नगरांतले माझे वास्तव्य - जयंत नारळीकर
यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर)
कोडमारा - अनिल अवचट

ही पुस्तके खरेदी केली

पुंबा's picture

15 Mar 2017 - 8:19 pm | पुंबा

यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर)

याबद्दल कुतुहल वाटते आहे. वाचून झाल्यावर सांगा कसे वाटते ते. मला किर्लोस्कर घराण्याबद्दल विलक्षण लोभ वाटतो. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचेन.

मला किर्लोस्कर घराण्याबद्दल विलक्षण लोभ वाटतो - __/\__

किर्लोस्करांविषयी वाचायचे असेल तर पुढील पुस्तके जरूर वाचा.

Cactus and Roses - शंतनुरावांचे आत्मचरित्र या पुस्तकाची शंतनुरावांच्या जन्मशताब्दीनिमीत्त निघालेली २००३ सालची प्रत सध्या उपलब्ध आहे किंवा येथे पीडीएफ डाऊनलोड करता येईल.
कालापुढती चार पाऊले - सविता भावे (१९७९)
यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर) - शं वा किर्लोस्कर (१९८७ चे पुनर्मुद्रण)
एका नांगराची कहाणी - डॉ. भा. र. साबडे (१९८९)
शंतनुराव - डॉ. भा. र. साबडे

वरील यादीतील "कालापुढती चार पाऊले" सध्या सहज मिळेल, अन्य कोणतीही पुस्तके मिळाली तर नक्की सांगा, तसेच या यादीपेक्षा अन्य कोणती पुस्तके माहिती असतील तर प्रतिसादात कळवा.

शंतनुराव किंवा एकंदर किर्लोस्करांविषयी आणखी कांही वाचायचे असेल तर कल्याणी आणि ओगले ग्लास वर्क्स यांची पुस्तके वाचा, त्यांच्या सुरूवातीच्या काळात शंतनुरावांचे अनन्यसाधारण योगदान आहे.

पुंबा's picture

16 Mar 2017 - 1:47 pm | पुंबा

धन्यवाद मोदकभौ..

Cactus and Roses वाचायला सुरूवात केलीये. यांत्रीकाची यात्रादेखील आणणार आहे.

मी वरती नोंदवायचे विसरलो.. पण "यांत्रीकाची यात्रा" हे पुस्तक मला जुन्या पुस्तकाच्या दुकानात मिळाले.

तुम्हाला नवीन पुस्तक मिळण्याची कितपत शक्यता आहे याची कल्पना नाही..

मोदकभौ, रसिक साहित्यमध्ये विचारून बघतो.

वरुण मोहिते's picture

14 Mar 2017 - 8:56 pm | वरुण मोहिते

दोन म्हातारे वं इतर कथा .अनुवाद -उमा कुलकर्णी
इंग्लिश _ बऱ्यापैकी न आवडलेलं सियालकोट सागा _अश्विन संघी

जी एंचं काजळमाया किंडलवर विकत घेतलं. त्यातली प्रदक्षिणा ही पहिली कथा कॉलेजला असताना वाचली होती. इतकं विकल होऊन जायला झालं होतं की सगळ्या कथा वाचवल्याच गेल्या नव्हत्या, सरळ पुस्तक ग्रंथालयात परत देऊन आलेलो. आता पुन्हा वाचायला सुरूवात केलीये. विकलता, एकटेपणा, जीवनाचं भयाण, क्रौर रूप, नियतीचा निर्दय सारीपाट, जगण्यातली विलक्षण गुंतागुंत मांडायला जी एंसारखा विलक्षण प्रतिभावंतच हवा.

सानझरी's picture

16 Mar 2017 - 5:40 pm | सानझरी

जी एंचं कुठलंतरी पुस्तक वाचायला घेतलेलं. त्यातली रुपकं इतकी किळसवाणी वाटलेली कि पुढे वाचवलंच नाही. जी एंच्या २-३ कथा 'औदुंबर' पुस्तकात वाचल्यात तेवढ्याच.. बाकी जी एंच्या पत्रांची मी जबरदस्त फ्यॅन. (चारही खंड आणि जी एंची पत्रवेळा)

सध्या वेळ मिळेल तसे हे वाचतोय...
P1
अतीशय सुंदर आणि समाधान देणारं !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees

मागे रघुराम राजन यांचे Fault Line: How Hidden Fractures Still Threaten the World Economy हे अप्रतिम पुस्तक वाचले होते. भूकंपशास्त्रात फॉल्टलाईन म्हणून एक संकल्पना आहे. जमिनीच्या खाली दोन भूगर्भाच्या प्लेट एकमेकांशेजारी असतात तिथे या फॉल्टलाईन्स असतात. या फॉल्टलाईन्सच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर दबाव तयार होतो आणि तो दबाव प्रमाणाबाहेर वाढला की त्यातूनच पुढे भूकंप होतात. राजनसाहेबांनी जागतिक अर्थकारणात अशा कोणत्या 'फॉल्टलाईन्स' आहेत हे या पुस्तकात खूपच चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहे.

या पुस्तकात राजनसाहेबांनी २००७-०८ चे अमेरिकेतील आर्थिक संकट, १९९७ चे पूर्व आशियाई संकट इत्यादींचा व्यवस्थित उहापोह केला आहे. तसेच कोणत्याही जार्गनचा वापर न करता विषय अगदी साधीसाधी उदाहरणे वापरून समजावून दिला आहे. विशेषतः २००७-०८ च्या संकटाची मूळे बरीच मागे जातात आणि त्या संकटात सरकारनेही नकळतपणे कसा हातभार लावला होता हे त्यांनी समजावून सांगितले आहे. तसेच २००५ च्या जॅकसन होल कॉन्फरन्समध्ये इतर सगळे फेडचे चेअरमन अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांचे गोडवे गात असताना नेमक्या रघुराम राजन यांनी Has Financial Development Made the World Riskier? हा पेपर सादर करून एका अर्थी सगळ्यांचाच रसभंग केला हे पण त्यांनी लिहिले आहे.

हा विषय इतक्या सोप्या शब्दात समजावून देणारे दुसरे पुस्तक वाचायला मिळणे कठिण आहे.

Rajan

वरुण मोहिते's picture

18 Mar 2017 - 11:47 am | वरुण मोहिते

पुस्तक वाचण्याच्या .

Ranapratap's picture

18 Mar 2017 - 7:55 pm | Ranapratap

अच्युत गोडबोले यांचे बोर्डरूम व अर्थात वाचून झाले. इतर हि पुस्तके वाचनीय आहेत, जसे मुसाफिर भाग 1 व 2, गुलाम, मनात. सद्या नॉर्मन लेवीस यांचे word power made easy वाचतोय, अभ्यासतोय इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम पुस्तक.

सद्या नॉर्मन लेवीस यांचे word power made easy वाचतोय, अभ्यासतोय इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम पुस्तक.

हे पुस्तक चांगले आहे. विविध शब्द चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहेत. पण हे पुस्तक खूपच प्राथमिक पातळीवरील आहे. इंग्रजी शब्दांसाठी आणखी दोन अक्षरशः खतरनाक पुस्तके सुचवतो. या पुस्तकात समानार्थी किंवा विरूध्दार्थी शब्द अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला पर्याय आहेत. अनेक प्रश्नांमधील मुळातला शब्द आणि पर्यायात दिलेला एकही शब्द माहित नव्हता. मला भाषांमध्ये वगैरे फार गती नाही पण तरीही इंग्रजी शब्द करायला खूपच आवडते. नवे शब्द कळले की त्यातून वेगळा आनंदही मिळतो. त्यामुळे मला ही दोन पुस्तके प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली. ही पुस्तके ६०-७० वर्षे जुनी असल्यामुळे प्रताधिकार वगैरे भानगडींमधून मुक्त झाली आहेत आणि खूप स्वस्तही आहेत (१०० रूपयाच्या आतबाहेर)

१. All about words

२. How to build a better vocabulary

१

२

धन्यवाद गॅरीजी, दोन्हीही पुस्तके मिळवतोच.

गॅरी ट्रुमन's picture

20 Mar 2017 - 11:01 am | गॅरी ट्रुमन

या दोन पुस्तकांमधले शब्द करताना जाडीजुडी डिक्शनरी बरोबर घेऊन बसावे लागेल. पॉकेट डिक्शनरीचाही फार उपयोग होईल असे वाटत नाही :)

हे शब्द केले की तेवढ्यापुरता आनंद मिळतोच. पण अर्थातच हे शब्द आपण दैनंदिन व्यवहारात वापरत नसल्यामुळे बर्‍याचशा शब्दांचा विसर पडतो. तरीही हे शब्द कुठेतरी बघितले/वाचले तर संदर्भातून त्याचा अर्थ समजतोही. पण तरीही स्वतःहून त्या शब्दांचा वापर तितक्या सफाईने करता आलेला नाही :(

gogglya's picture

22 Mar 2017 - 7:59 pm | gogglya

घेउन टाकली. माहीतीबद्दल धन्यवाद.

आषाढ_दर्द_गाणे's picture

19 Mar 2017 - 10:59 pm | आषाढ_दर्द_गाणे

सध्या तुनळीवर कधीपासुन वाचायच्या यादीत असणाऱ्या पुस्तकांची श्रवणरुपे (ऑडिओबुक्स) साडपली आहेत
पण मूळ पुस्तक न वाचता सरळ 'ऐकण्याविषयी' मी साशंक आहे.
एखादे आवर्जून वाचायचे पुस्तक तुम्ही सरळ 'ऐकले' आहे का?
कसा होता तो अनुभव? विशेषतः ललित (फिक्शन. हाच पर्यायी शब्द आहे माहित नाही की नाही ते नक्की ठाऊक नाही)?

लिंक द्या एखादी.. ऐकून बघतो.

आषाढ_दर्द_गाणे's picture

21 Mar 2017 - 1:10 am | आषाढ_दर्द_गाणे

काफ्का (अजून कोण) - मेटामॉर्फोसिस

अतिशय गूढ वगैरे कथा असल्याने ऐकून कशी मजा येईल हे कळत नाहीये
रच्याकने, मी आधी वाचून काढलेल्या कादंबऱ्यांची श्रवणपुस्तके ऐकण्यात पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळालेला आहे...

गणामास्तर's picture

20 Mar 2017 - 10:19 am | गणामास्तर

शाळेत असताना मराठीला एक धडा होता. त्यात जहाजावर काम करणारा आणि लग्नाच्या सुट्टीसाठी घरी आलेला अबोल, थोडा तुसडा कथानायक होता.
एका समारंभात लोक जमलेले असताना रेडिओवर एका बुडणाऱ्या जहाजावरून मोर्स कोडवरचे संदेश येऊ लागतात आणि तो ते समजावून देत असतो असे काही तरी कथानक होते. कुणाला आठवतंय का त्या कथा वा लेखकाचे नाव ?

रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी
लामणदिवा ह्या कथासंग्रहात ही कथा आहे. सध्या तोच कथासंग्रह वाचत आहे.

पुंबा's picture

20 Mar 2017 - 10:56 am | पुंबा

अवांतरः मोकाशींचा रेडिओदुरूस्तीचा व्यवसाय होता स्वतःचा. ह्या गोष्टीत रेडिओ हे महत्वाचे पात्र म्हणून येते.

गणामास्तर's picture

20 Mar 2017 - 11:12 am | गणामास्तर

लै लै धन्यवाद. .मिळवतो आता 'लामणदिवा' .

यातही कथानायकापेक्षा (तो तुसडा वगैरे वाटला नाही) नायिका स्वार्थी आणि असंवेदनशील रंगवली होती.

गॅरी ट्रुमन's picture

20 Mar 2017 - 10:49 am | गॅरी ट्रुमन

या धाग्याच्या निमित्ताने कधीकाळी वाचलेली पुस्तके आठवायला लागली आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोमधील प्राध्यापक स्टीव्ह लेव्हिट यांचे Freakonomics: A Rogue Economist Explores the Hidden Side of Everything हे असेच एक पुस्तक.

या पुस्तकात नुसत्या आकडेवारीचा अभ्यास करून अनेक गोष्टी कशा समजावून घेता येतात याविषयी लिहिले आहे. अनेकदा आपण असा विचारही केलेला नसतो. उदाहरणार्थ १९८० च्या दशकाच्या शेवटी आणि १९९० च्या दशकाच्या सुरवातीला अमेरिकेत 'टिनेज' गुन्हेगारांचे प्रमाण बरेच वाढले होते. त्यावेळी अजून १० वर्षात अमेरिकेतील कुठलेच शहर यापासून मुक्त नसेल आणि कधीही कुठेही अचानक १६-१८ वर्षाचा कोणी बंदूक दाखवून आपल्याला लुबाडेल अशा स्वरूपाचे चित्र सगळीकडे बघायला मिळेल वगैरे वगैरे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात झाले उलटेच.१९९५ पासून हा गुन्हेगारीचा दर लक्षणीय प्रमाणात कमी झाला. २००० पर्यंत तर हा दर १० वर्षांपूर्वी होता त्यापेक्षा बराच कमी झाला होता. हे असे का झाले असावे? त्यासाठी १९९० च्या दशकात बिल क्लिंटनच्या काळात अर्थव्यवस्था सुधारली आणि नोकर्‍या अधिक प्रमाणावर उपलब्ध झाल्या म्हणून गुन्हेगारी कमी झाली वगैरे कारणे दिली गेली. पण ही कारणे ज्या प्रमाणात गुन्हेगारी कमी झाली त्याचा खुलासा करू शकत नाहीत हे पण प्रा.लेव्हिटने दाखवून दिले. मग असे काय झाले ज्यामुळे गुन्हेगारी अचानक कमी झाली? त्याचे कारण १९७३ मध्ये अमेरिकेत गर्भपाताला मान्यता मिळाली. एका कुणा स्त्रीची केस (नाव विसरलो) सुप्रीम कोर्टात गेली होती आणि त्यावेळी कोर्टाने गर्भपाताला मान्यता दिली. पूर्वी नको असलेली मुले जन्माला येत होती, परिणामी त्यांच्याकडे दुर्ल़क्ष होऊन मग तेच पुढे गुन्हेगार बनायचे प्रमाण जास्त होते. पण गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाल्यावर नको असलेली मुले जन्माला यायचेच बंद झाले. अशा निर्णयांचे परिणाम लगेच दिसत नाहीत. त्यामुळे झाले असे की जे १९९० च्या दशकात बालगुन्हेगार व्हायची शक्यता सर्वात जास्त होती अशी मुले १९७० च्या दशकाच्या शेवटी आणि १९८० च्या दशकाच्या सुरवातीला जन्मालाच आली नाहीत. त्यातूनच हे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले.

काही वेळा अमेरिकेतील काही शाळाशिक्षक आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली दिसावी (आणि त्याचे श्रेय आपल्याला मिळावे) म्हणून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत परीक्षा संपल्यावर ओ.एम.आर शीटमध्ये बरोबर उत्तरे स्वतः भरत असत. हे कसे पकडावे याविषयीही पुस्तकात काही लिहिले आहे हे वाचल्याचे आठवते.

पुस्तकातील काही गोष्टी अमेरिकेतील परिस्थितीला अनुसरून आहेत. त्या वाचायला आपल्याला कंटाळवाणे होऊ शकते. उदाहरणार्थ ड्रग माफियांचे राज्य कसे चालते याविषयी सुधीर वेंकटेश म्हणून भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने तिथे जाऊन काढलेल्या माहितीवर अनेक पाने खर्ची घातली आहेत. मला तरी तो भाग वाचायला कंटाळवाणा झाला होता. तसेच गोर्‍या लोकांच्या केकेके संघटनेवरही काही लिहिले आहे. तो भागही तितका अपीलींग वाटला नाही. तरीही एकूण हे पुस्तक चांगलेच वाटले. या पुस्तकानंतर प्रा.स्टीव्ह लेव्हिट यांनी सुपर फ्रिकॉनॉमिक्स, थिंक लाईक अ फ्रिक अशी पुस्तकेही लिहिली आहेत. ती अजून वाचलेली नाहीत. तसेच त्यांचा हा ब्लॉगही इंटरेस्टींग आहे.

अशा विषयांमध्ये रस असलेल्यांना प्रा.लेव्हिट यांचे हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल.

1

अद्द्या's picture

20 Mar 2017 - 11:48 am | अद्द्या

मस्तच धागा , फक्त एक सूचना .

लेखक , अनुवाद इत्यादी माहिती देताना .. जर आपल्याकडे पीडीएफ उपलब्ध असेल तर स्वतःचा मेल आयडी हि द्या. म्हणजे लोक त्यावर मेल करून पीडीएफ घेऊ शकतील .

पुस्तकांची यादी करणे सुरू आहे.. इथल्याच मित्रांनी सुचवल्याप्रमाणे

पुस्तकाचा प्रकार - आत्मचरित्र / कादंबरी..
पुस्तकाचा प्रकार - वैद्यकीय / साहित्यीक...
भाषा
पुस्तकाचे नांव
लेखकाचे नांव

अशी यादी करतो आहे. आणखी काय ट्रॅक करावे..?

गॅरी ट्रुमन's picture

21 Mar 2017 - 9:56 am | गॅरी ट्रुमन

याची गुगल शीट बनवून सगळ्यांबरोबर शेअर करता आली तर चांगले होईल. बर्‍याचदा इतर मिपाकर वाचत असतील आणि आपण काहीही वाचत नसू तर त्यातून आपल्यालाही वाचायची प्रेरणा मिळते. व्यायामाविषयी हाच प्रकार अनुभवायला मिळत आहे. तसेच वाचनाविषयीही होईल.

इडली डोसा's picture

21 Mar 2017 - 11:34 am | इडली डोसा

छापील प्रत उपलब्ध आहे / नाही , शिवाय किंडल आवृत्ती उपलब्ध आहे नाही हे पण लिहिता येईल का? गुगल शीट केल्यास मला सहभागी व्हायला आवडेल.

मोदक's picture

21 Mar 2017 - 1:47 pm | मोदक

ट्रुमन आणि इडली डोसा,

ही माझ्या संग्रहातली पुस्तके असतील, याची गुगल शीट करावी का..?

गॅरी ट्रुमन's picture

21 Mar 2017 - 1:58 pm | गॅरी ट्रुमन

मला वाटते की या धाग्यावर किंवा गुडरीडावर किंवा अन्यत्र कुठे लिहिले असेल अशा पुस्तकांचा समावेश व्हावा आणि हळूहळू ती गुगल शीट (आणि हा धागा) अपडेट केला जावा. म्हणजे इतर मिपाकर नक्की काय वाचत आहेत हे समजून त्याविषयी आपल्याला वाचायला कल्पना मिळतील.

अर्थातच हा एक आयत्या वेळी बनविलेला सल्ला झाला. अन्य कुठल्या पध्दतीने हे काम करता आले तर फारच चांगले. पण 'अरे मी इतरांच्या मानाने फार वाचत नाही' ही टोचणी लागणे आणि त्यातून जास्त वाचन होणे महत्वाचे. मग ती टोचणी कशीही लागो :)

ही शीट बघा आणि बदल सुचवा..!

आपण येथेच प्रतिसादात पुस्तकांची माहिती देत राहू.. मी जमेल तशी ही शीट अपडेट करतो..!

गॅरी ट्रुमन's picture

21 Mar 2017 - 4:30 pm | गॅरी ट्रुमन

धन्यवाद.

त्या स्प्रेडशीटमध्ये प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वर्कशीट आहे. आतापर्यंतच या धाग्यावर १५-२० पुस्तकांविषयी चर्चा झालीच आहे. आणि मी अजून बरीच भर त्यात टाकणार आहे काळजी नसावी :) तेव्हा प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वर्कशीट असल्यास काही काळानंतर (म्हणजे त्या स्प्रेडशीटमध्ये ३०-४० पुस्तकांची नोंद झाल्यावर) ते अडचणीचे ठरू शकेल.

मी फार टेक सॅव्ही नाही त्यामुळे मला यावर उपाय सुचवता येणार नाही. तसेच मी ती स्प्रेडशीट मेन्टेनही करत नसल्यामुळे नुसते सल्ले देणेही कितपत बरोबर आहे याची कल्पना नाही :)

गॅरी ट्रुमन's picture

21 Mar 2017 - 10:03 am | गॅरी ट्रुमन

अनेकदा आपल्याला पुस्तके कुठून मिळवावीत हा प्रश्न पडतोच. पुस्तके घरी घेऊन घरातील सामान वाढवावे असे अनेकांना वाटत नाही. मी पण त्यातलाच. अशावेळी किंडल उपयोगी ठरते. किंडलवर वाचताना डोळ्याला त्रासही होत नाही. बरीच पुस्तके छापील प्रतीपेक्षा स्वस्तात असतात आणि किंडलवर पुस्तक असले तर घरी किती पुस्तके साठवायची हा प्रश्नही येत नाही. तसेच किंडलवर 'अनलिमिटेड' म्हणून एक प्रकार असतो. त्यात किंडलवरची लायब्ररी असते. त्यात सगळी नाही तरी बरीच पुस्तके उपलब्ध असतात.

तसेच घरपोच किंवा हापिसच्या डेस्कवर पुस्तके पोचती करणार्‍या लायब्ररी सेवाही उपलब्ध आहेतच. पूर्वी हापिसात क्वेंच कॉर्पोरेट लायब्ररीचा मी सदस्य होतो. नाममात्र फीमध्ये आपल्या डेस्कवर पुस्तके पोहोचती करायची/न्यायची सोय होती त्यात. त्याचबरोबर पै फ्रेंड्स लायब्ररी, लायब्ररीवाला.कॉम अशा काही सेवाही उपलब्ध आहेत.

या धाग्याच्या निमित्ताने मागे वाचलेली अनेक पुस्तके आठवायला लागली आहेत. जशी आठवतील तशी आणि वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यावर लिहिणारच आहे.

अनुज धर यांचे India's biggest cover-up हे पुस्तक असेच मागे वाचले होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांचे तैपईतल्या विमान अपघातात निधन झाले असे म्हटले जाते. पण त्याविषयी अनेक वादविवाद आहेत. हे पुस्तक त्याविषयीच आहे. सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले याविषयी १९५६ मध्ये आझाद हिंद सेनेचे शाहनवाझ खान यांच्या नेतृत्वाखाली तर १९७० मध्ये न्या.खोसला यांच्या नेतृत्वाखाली आयोग नेमण्यात आले होते. या दोन्ही आयोगांनी काम निष्पक्षपणे न करता सरकारला हवा होता तो अहवाल दिला असा अनुज धर यांचा दावा आहे. पुढे १९९९ मध्ये न्या.मुखर्जींच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाने बोसांचा त्या अपघातात मृत्यू झाला नाही असे म्हटले.

अमुक एक साधू किंवा बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याच्या वावड्या अनेकदा उठल्या होत्या.त्यातल्या काही वावड्यांचाही या पुस्तकात उल्लेख आहे आणि संबंधित साधू हे सुभाषचंद्र बोस असू शकणार नाहीत हे अनुज धर यांनी म्हटले आहे. पण सुभाषचंद्र बोस यांचे नक्की काय झाले? त्यांचे त्या विमान अपघातात निधन झाले का? त्याविषयी लेखक अनुज धर यांनी काही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर एक स्पष्ट दावा केला आहे. तो दावा कोणता याविषयी इथे काहीही लिहित नाही (अन्यथा 'स्पॉईलर' होईल).

एकूणच हे पुस्तक वाचताना 'सुभाषचंद्रांचे पुढे काय झाले' ही उत्कंठा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. लेखकाने हे पुस्तक खूपच परिश्रमाने आणि खूप अभ्यास करून लिहिले आहे हे जाणवते. हे पुस्तकही नक्कीच वाचनीय आहे म्हणून रेकमेन्डेड :)

Anuj Dhar