आकर्षणाचे नियम

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
10 Oct 2016 - 2:03 pm

Law of attraction अर्थात आकर्षणाचा नियम याविषयावरचा whatsapp समुह सुरु करत आहोत.

आकर्षणाचा नियम याबद्दल बर्याच जणांनी वाचलं असेल,"सिक्रेट" हे पुस्तक तसेच याच विषयावरचा चित्रपटही पाहिला असेल.
तुम्ही सतत जो विचार कराल तसेच परिणाम तुम्हाला मिळतील.ही या नियमाची सुरुवात;पण फक्त सकारात्मक विचार करुन हवं तसं घडेल का?

मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करता येईल? ते सकारात्मक विचार फलद्रुप होण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं? त्यासंबंधी चर्चा ,माहितीची देवाणघेवाण यासाठीच आहे हा समुह.

हा आकर्षणाचा नियम आहे तरी काय? तो कसा वापरायचा? वापरताना होणार्या चुका कोणत्या? तो केव्हा कशाप्रकारे अस्तित्वात येतो? काय तर्क आहे या आकर्षणाच्या नियमामागे? प्रभावीपणे वापरता येण्यासाठी काय करता येईल?
याबाबत इथे बोलता येईल.

काहीजणांची या विषयात बर्यापैकी प्रगतीही झाली असेल.आकर्षणाचा नियम हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भागही झाला असेल.अशा जाणकारांशी इथे चर्चा करता येईल.त्यांनी केलेले उपाय,केलेले प्रयोग याबाबत बोलता येईल.अनुभव सांगता येतील.

त्याशिवाय 'आकर्षणाचा नियम' या विषयावरचे या विषयाशी संबंधित असे लेख,पुस्तके,व्याख्याने,शिबीरे यांचीही माहिती देता येईल.

मनातल्या इच्छेपासून ते परिणामांपर्यंतचा प्रवास यशस्वी कसा करता येईल यासंबंधीचा संवाद इथे व्हावा;अशी अपेक्षा आहे.Law of attraction खरा की खोटा याची चर्चा इथे करता येणार नाही.

मिपावर Law of attraction या विषयावर या आधी धागे निघाले आहेत.पण मूळ विषय सोडून ट्रोलिंगच जास्त झालं.

समुहात सामील होण्यासाठी इच्छुकांनी 'आकर्षणाचे नियमसाठी' असा व्यनि करुन सोबत आपला WhatsApp क्रमांकही द्यावा.

विश्वास ही Law of attraction ची सुरुवात आहे.
जसा विश्वास तसं प्रत्यंतर.विश्वास ठेवून सकारात्मक कृती केली की हवी ती माणसं आपोआप भेटतात,हव्या त्या घटना आपोआप घडायला सुरुवात होते.

उद्याचा दसरा हा सीमोल्लंघनाचा दिवस.नकारात्मक विचारांना उल्लंघून सकारात्मक विचारउर्जेच्या क्षेत्रात प्रवेशासाठी हे आवाहन.

सर्वांना उद्याच्या दसर्याच्या शुभेच्छा.

समाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

मिपाने आता रॉयल्टी घ्यायला सुरुवात करावी!चाललंय काय? दर 15 दिवसांनी कोणत्या ना कोणत्या कायप्पा ग्रुपची जाहिरात दिसतेय!

महासंग्राम's picture

10 Oct 2016 - 2:38 pm | महासंग्राम

यशोतै धागाच काढावा म्हणतोय मी आमच्या कडे सर्व प्रकारच्या कायप्पा गटांची जाहिरात करून मिळेल, नवीन सदस्य मिळतील ..

यशोधरा's picture

10 Oct 2016 - 2:45 pm | यशोधरा

भागीदारीत काढू!

अवांतर: बाकी सगळी मजा राहूदेत बाजूला, कायप्पा ग्रूप काढून जी काय उत्तम चर्चा/ उपाय वगैरे सुचवले जातील ते इथेच लिहा. उत्तम चर्चेत खीळ घालू नये हे मिपाकरांना उत्तमरीत्या समजते आणि कोणी प्रयत्न केलाच तरी मिपाकरच अशा आयडीला गप्प बसवतात, हा अनुभव आहे.

इथेच यायचं, इथेच अलाणाफलाण्या ग्रूपची जाहिरात करायची आणि त्यातच इथे ट्रोलिंग होतं वगैरे म्हणायचं, अरे काये!

महासंग्राम's picture

10 Oct 2016 - 2:51 pm | महासंग्राम

अगदी अगदी सहमत आहे ...

मी काय म्हणतो, ग्रुप करुन जे करणार ते इथे धागा काढून करा की!! म्हणजे सर्वांनाच उपयोग होईल, नै का?

महासंग्राम's picture

10 Oct 2016 - 2:43 pm | महासंग्राम

सहमत म्हणजे काय होईल ती माहिती सर्वानाच समजेल... तसंही संतांनी म्हंटलंच आहे जे जे आपण वाचावे, ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे, सकळ जन हे ग्रुप करणं म्हणजे १६ व्य शतकात इल्युमिनाटी, मेसन वगैरे नावाचे पंथ होते जे गुप्त रीतीने ज्ञान प्राप्त करून जतन करून ठेवायचे त्यातला प्रकार वाटतो.

उपयोजक's picture

10 Oct 2016 - 2:50 pm | उपयोजक

मिपाची ताकद ही खुप मोठी आहे.लाखो करोडो लोक इथे येऊन लिहू वाचू शकतात.त्यामुळे मिपा हे मिपाच राहील.WhatsApp शी त्याची तुलना योग्य नाही.

Law of attraction संबंधी निघालेल्या मिपावरच्याच धाग्याला ट्रोलिंग बघा.म्हणजे WhatsApp group का काढावा लागतोय ते कळेल.

बंधी निघालेल्या मिपावरच्याच धाग्याला ट्रोलिंग बघा
एक आदा-पादा ग्रुपपण काढा आता !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan

महासंग्राम's picture

10 Oct 2016 - 2:57 pm | महासंग्राम

मिपाची ताकद ही खुप मोठी आहे.लाखो करोडो लोक इथे येऊन लिहू वाचू शकतात

मग त्याच लाखो करोडो लोकांचा पण फायदा होईल कि इथेच धागा काढला तर.

मिपाची तुलना करत नाहीये. उलट मिपाचा असा केवळ जाहिरातीसाठी वापर करु नका, अशी विनंती आहे. व्यवस्थित, मुद्देसूद लिहिलंत तर काही होत नाही ट्रोलिंग.

रघुनाथ.केरकर's picture

10 Oct 2016 - 4:59 pm | रघुनाथ.केरकर

१००%

बरखा's picture

10 Oct 2016 - 3:01 pm | बरखा

सूड - यांच्याशी सहमत. मिपा हे एक प्रभवी साधन लेखना करीता उपलब्ध असतना बाकी कुठल्या मध्यमाचा वापर का करावा?, ग्रुप केला की तो सिमित होइल. त्याचा व्यापक अशी संख्या असलेले मिपाचे वाचक आणि लाभक (मिपाच्या चर्चेचा बर्याच जणांना लाभ होतो) यांना तितका उपयोग होणार नाही.

कृपया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची धुणी धुण्यासाठी मिपा वापरू नये.

नाखु's picture

10 Oct 2016 - 3:25 pm | नाखु

कृपया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची धुणी धुण्यासाठी मिपा वरचे पाणीही वापरू नये. वेगळा धोबीघाट बघावा.

रघुनाथ.केरकर's picture

10 Oct 2016 - 5:01 pm | रघुनाथ.केरकर

इतर धोबीघाटांवर असले धागे घाटावर मारत असतील.

उपयोजक's picture

10 Oct 2016 - 3:22 pm | उपयोजक

मंदारजी आपल्या मताशी सहमत.तिकडची चांगली माहिती इथेही देता येईल.सुचना चांगली आहे.पण या धाग्यावर http://www.misalpav.com/node/34883 बघा की
काय झालंय ते!आपल्याला पटणारे विषयच मिपावर यावेत अशी काहिजणांची धारणा आहे.
असं जर होत असेल तर काय करणार?
शिवाय मूळ विषय सोडून भलतीकडेच नेलं जातं.

महासंग्राम's picture

10 Oct 2016 - 3:56 pm | महासंग्राम

केअशु धागा पहिला तिथे २-३ उपहासात्मक प्रतिसाद सोडले तर बऱ्यापैकी गंभीर चर्चा झाली असल्याचे जाणवते. आणि आपण लिहितो तर थोड्या प्रमाणात ट्रोलिंग ( मराठी शब्द नाही माहित) होण्याची पण तयारी असावी असे मला वाटते.

काय झालंय ते!आपल्याला पटणारे विषयच मिपावर यावेत अशी काहि जणांची धारणा आहे.

माफ करा हा गैरसमज सर्वप्रथम आपण हि विनंती. मिपा सुरवातीपासूनच विषय वैविध्यतेसाठी जाणले जाते. इथे भरपूर इतिहास, संस्कृती, राजकारण, कला, साहित्य इ विषयांवर सकस लिखाण झाल्याचे उदाहरणे देता येतील. जयंत काकांचा कोणताही लेख घ्या अगदी मुद्देसूदपणे लिहिला असतो, आणि याच कारणाने त्यावरचे प्रतिसाद पण अगदी संतुलित असतात. मी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर उत्तम आणि सुदृढ चर्चा झाल्याची उदाहरणे देतो ती आपल्याला पटतील
अशी आशा आहे.

मराठा लाईट इनफंट्री
राजाराम सीताराम.
East India Company
ब्रायन क्लोज - द मॅन ऑफ स्टील!
प्रचेतस
मोसाद - भाग १३
अकादमी

इथले प्रतिसादही ट्रोलिंग झाले नव्हे का?

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2016 - 3:35 pm | टवाळ कार्टा

खि खि खि...प्रॅक्टिकल्स असतील तर कळवा मला

उपयोजक's picture

10 Oct 2016 - 3:59 pm | उपयोजक

अहो WhatsApp ही मिपाची replacement नव्हे! मिपा आणि WhatsApp या वेगळ्या गोष्टी आहेत.मघाशीच सांगितलं की मिपाची ताकद मोठी आहे.तसंच मिपाला काही तांत्रिक मर्यादाही आहेत.तशाच WhatsApp ला सुध्दा तांत्रिक मर्यादा आहेत.दोघांची तुलना करु नका. whatsapp वर video upload करता येतात. मिपावर येतात का करता?
आणि ही जाहिरात नाही.हे केवळ आवाहन आहे.झालीच तर मदत व्हावी हा उद्देश आहे.
अगदी आजसुध्दा आंतरजालावर मराठीतून माहिती शोधताना मिपाचेच बरेचसे रिझल्टस दिसतात.एवढी मिपाची ताकद आहे.
मी स्वत:सुध्दा एवढी माहिती देणारं हे संकेतस्थळ आहे तरी काय या उत्सुकतेनेच आलो.चार वर्षांपासून मिपाचा वाचक आहे.मग WhatsApp ग्रुपचं नुसतं आवाहन केल्यावर एवढा गदारोळ का? एवढंच काय दुसर्या एखाद्या WhatsApp group वर तुम्ही असाल आणि admin ला नम्रपणे विनंती केली की तर तो आपल्या समुहावर दुसर्या समुहाची आवाहन करणारी पोस्ट टाकू देतो.तिथे जर विरोध होत नाही तर इथे का? आणि WhatsApp मुळे मिपाचा लेखक,वाचक कमी होईल ही भिती मनातून काढून टाका.
असाच विरोध होत असल्याने मिपा दुसर्या क्रमांकावर गेलं असावं का?असं आता वाटू लागलंय.ते पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी नावडत्या विषयाला ट्रोलिंग करणं थांबलं पाहिजे. मिपाची तांत्रिक बाजू सुधारली,विषय समजून न घेता होणारं ट्रोलिंग बंद झालं तर मिपावरही हे विषय सुरु करायला कोणाचीच हरकत असणार नाही.

यशोधरा's picture

10 Oct 2016 - 4:07 pm | यशोधरा

दुसर्‍याच काय विसाव्या क्रमांकावर गेलं तरी चालेल. इथे उत्तम लिखाणही होतं आणि ते वाचायला आणि खफ गप्पा करायला यायचे ते येतीलच. नुसत्या कायप्पाच्या जाहिरातींच्या धाग्याने पहिल्या क्रमांकावार आलेल्या मिपावर येण्यापेक्षा विसाव्या क्रमांकावरच्या मिपावरील उत्तम लिखाण वाचायला यायला अधिक बरं वाटेल.

अवांतरः मिपा प्रथम क्रमांकावर यावे असे लेखन मिपावर करण्यामध्ये/ असे कोणी लिहित असेल तर त्यांना मिपाचा रस्ता दाखवण्यामध्ये/ चांगल्या लिखाणाला प्रतिसाद देऊन दाद देण्यामध्ये आपण कितीसा सहभाग नोंदवला आहे? उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारत आहे.

चांगल्या लिखाणाला प्रतिसाद देऊन दाद देण्यामध्ये आपण कितीसा सहभाग नोंदवला आहे?

हा प्रश्न मिपाविषयी कोकलणार्‍या/फुकाचे उमाळे आणणार्‍या बर्‍याच जणांना विचारता येईल.

उपयोजक's picture

10 Oct 2016 - 5:20 pm | उपयोजक

मराठीतून आंतरजालावर माहिती शोधणार्यांना मिपा हमखास आढळतंच.
पण मिपावरचे माहितीपूर्ण संदर्भाने भरलेले लेख वाचून आपल्याला ते जमेल की नाही याची भिती मिपा नवीन असणार्या बर्याच जणांना वाटते.त्यामुळे जी काही चांगली माहिती मिळतेय ती वाचून गप बसतात असे लोक.
नवीन लेखक पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने निराश होतात.काहीजण लिहिण्याच्तया बाबतीत चक्क आळशी असतात.
हे मराठीतून माहिती शोधणार्यांबद्दल.

बरेचसे असेही मराठी लोक आहेत;ज्यांना मिपा काय आहे हेच माहिती नाही.मिपाची कुठे जाहिरातही नाही.

शिवाय मिपावर लेख कसा प्रकाशित करायचा? मराठीतून कसं लिहायचं हे बाजूलाच देऊनही काहीजणांना ते जमत नाही.यासाठी स्टेप बाय स्टेप समजावणारा धागाही कुणीतरी उघडा.
मिपावर फोटो कसे द्यायचे याचेच धागे बर्याचदा का काढावे लागतात?
काही वेळा मिपा मध्येच बंद पडतं.
मिपा हा विना जाहिरात चालणारा स्तुत्य उपक्रम आहे.त्यामुळेच तांत्रिक मर्यादाही आहेत.हे का नाही समजून घेत?

मिपाचा उल्लेख बर्याचदा WhatsApp group वर होतो त्यावेळी हे सदस्य मिपा काय आहे असं विचारतात.त्यावेळी आवर्जून माहिती देतो.सदस्य होण्याबद्दल सुचवतो.मिपासारख्या माहितीच्या महासागराची माहिती द्यायला नेहमीच तयार असतो.

WhatsApp group काढला म्हणजे हमखास मिपाचा विरोधक असा का समज करुन घेताय? तसाच चांगला विषय असेल तर मिपावर लिहूच की.

आता मिपा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी काय काय केलंत ते माझ्या उत्सुकतेपोटी तुम्हीही सांगा.

यशोधरा's picture

10 Oct 2016 - 5:23 pm | यशोधरा

तुम्हांला जे प्रश्न मी विचारलेत ते सर्व मी ८ वर्षं करतेय.

सूड's picture

10 Oct 2016 - 7:23 pm | सूड

WhatsApp group काढला म्हणजे हमखास मिपाचा विरोधक असा का समज करुन घेताय?

हे विरोधक वैगरे तुम्हीच लिहीताय बरं का!! आम्ही, पक्षी मी इतकंच म्हटलंय की जे काही व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप उघडून ज्ञानदान करणार आहात ते इथे करा. म्हणजे आम्हालाही ज्ञानाचे कण वेचता येतील. अनोळखी माणसाला एखाद्या व्यक्तीने आपला संपर्क क्रमांक का म्हणून द्यावा?

पेपरात कशा छोट्या झैरातींचे क्लासिफाइड पेज असते तसा अशा ग्रुपिपासू लोकांसाठी एक पेड धागा काढा म्हणले होते. ;)
तिथे खाली व्यवस्थापनाचा मजकुराशी संबंध नाहि, व्यवहार स्वतःच्या जबाबदारीवर करावे अशी टिप पण देता येईल.
गरज आहे ते बघतील अन नंबर देतील.
बादवे... विनाकारण फुल्ल मापं काढणार्‍यांचा ग्रुप करायचाय. हाय का कोण? ;)

विनाकारण फुल्ल मापं काढणार्‍यांचा ग्रुप करायचाय.

आयाम इन!! =))

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Oct 2016 - 11:37 pm | माम्लेदारचा पन्खा

मला तर यावंच लागेल !

अस्वस्थामा's picture

12 Oct 2016 - 5:00 am | अस्वस्थामा

बादवे... विनाकारण फुल्ल मापं काढणार्‍यांचा ग्रुप करायचाय. हाय का कोण? ;)

आता तू ग्रुप काढणार म्हंजे हळदच.. ;)

नीलमोहर's picture

12 Oct 2016 - 11:46 am | नीलमोहर

+ लालेलाल कुंकू म्हणजे मग फुल्ल हळदीकुंकू =))

अभ्या..'s picture

12 Oct 2016 - 12:10 pm | अभ्या..

लावला बुक्का?
हे असं असतंय. नेमका शब्द अन त्याचा उपयोग माहीत नसला की अशा उपमा सुचतेत. :(
निमोबाई अभ्यास वाढवा.

नीलमोहर's picture

12 Oct 2016 - 3:23 pm | नीलमोहर

ते म्हटले तुम्ही ग्रुप काढणार म्हणजे हळद, हळद खेळणे हा प्रकार अर्थातच माहिती आहे,
आमचा अ भ्या स पक्का आहे त्यामुळे लाल रंग तुमची खास निशाणी आहे हेही माहित आहे,
म्हणून तो ऍड करुन हळदकुंकू कॉम्बो करून टाकला, शब्द अन त्याचे उपयोग बरोबर विच्चार करून करतो हो आम्ही,
इथे आल्यापासून जास्तच :)

आता तू ग्रुप काढणार म्हंजे हळदच.. ;)

म्हंजे?

महासंग्राम's picture

10 Oct 2016 - 4:13 pm | महासंग्राम

एवढंच काय दुसर्या एखाद्या WhatsApp group वर तुम्ही असाल आणि admin ला नम्रपणे विनंती केली की तर तो आपल्या समुहावर दुसर्या समुहाची आवाहन करणारी पोस्ट टाकू देतो.तिथे जर विरोध होत नाही तर इथे का?

तुम्हीच वरती दिलय कि मिपा आणि WhatsApp या वेगळ्या गोष्टी आहेत

राहता राहिला ट्रोलिंग चा प्रश्न तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो कि २-३ प्रतिसादांचच्या ट्रोलिंग बद्दल एवढी भीती का ??? सरळ दुर्लक्ष करायचं

आणि खरोखरी तुम्हला ट्रोलिंग पहायचं असेल तर गंगाधर मुटे यांचे धागे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल होते आणि याला जबाबदार कोण असतं.

सतिश गावडे's picture

10 Oct 2016 - 4:13 pm | सतिश गावडे

ओ, तुम्ही ग्रुपात तसल्या आकर्षणाबद्दल काही चर्चा करणार आहात का?

तसल्या म्हंजे कसल्या रे भाऊ?

सतिश गावडे's picture

10 Oct 2016 - 4:22 pm | सतिश गावडे

दोन वस्तुमधील गुरुत्वाकर्षण बल.

मदनबाण's picture

10 Oct 2016 - 4:23 pm | मदनबाण

छ्या... कामदेव अप्सरा इं नै वाटतं... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan

सतिश गावडे's picture

10 Oct 2016 - 4:27 pm | सतिश गावडे

तुमच्या सोयीसाठी तुम्ही वस्तूच्या जागी हवं ते घाला ;)

मदनबाण's picture

10 Oct 2016 - 4:29 pm | मदनबाण

तुमच्या सोयीसाठी तुम्ही वस्तूच्या जागी हवं ते घाला ;)
अश्लिल अश्लिल ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan

महासंग्राम's picture

10 Oct 2016 - 4:28 pm | महासंग्राम

म्हणजे newटन चा चौथा नियमाबद्दल बोलत आहेत का तुम्ही ???

सतिश गावडे's picture

10 Oct 2016 - 4:32 pm | सतिश गावडे

होय. त्याला मनोकामनेचा नियम म्हणतात.

धरा मनी हो कामना
नाही होणार संभावना

मदनबाण's picture

10 Oct 2016 - 4:39 pm | मदनबाण

हँ... हँ... हॅ...
इथं मंत्र पुटपुटला कि तिकडं पाखरु जीव फडफडला ! ;)

अशा खास गुप्त मंत्रासाठी संपर्क करा...
बामा मिया आल्लाउद्दिन वल सुलतान वल कामुद्दिन
पता :- अहमदाबाद स्टेशन के पिछे, बुलेट ट्रेन प्लॅटफॉर्म १ के पहिले छोर से सिधा रस्ता...
१०० % गारंटी ! पाखरु न फसने पर पैसा वापस, मेरे मंत्र का तोड / जोड हो नही सकता इसकी पर्सनल गारंटी. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan

आकर्षणाने ग्रुप बनवुन दाखवा... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan

उपयोजक's picture

10 Oct 2016 - 8:05 pm | उपयोजक

सामील होऊ इच्छिणार्या सर्वांचे आभार.उद्यापासून उपक्रमाच्या कार्यास सुरुवात करु.

कलंत्री's picture

10 Oct 2016 - 11:17 pm | कलंत्री

व्हाटस अ‍ॅप ग्रुप ही वेगळी चूल नाही आहे. हे एक वेगळे माध्यम आहे. मराठीच्या हितासाठी जितकी काही माध्यमे येतील ती सर्व वापरली गेली पाहिजे आणि आत्मसातही केली गेली पाहिजे.

आता मिपावर चर्चा करण्यात काय हरकत आहे हा मुद्दा. तशी चर्चा होऊही शकते. परन्तु व्हाटस अ‍ॅपला त्या विषयातच रस असणारे लोक असतील. मिपावर आला तर विषय आला आणि त्याला तत्कालिक प्रतिक्रिया देण्यायच सर्वसाधारणपणे लोकांना रस असतो किंवा इतकी विषये येत असतात ती पूर्णपणे वाचूनही होत नाही.

अजून एक मूद्दा, स्मार्टफोनावर व्हाटस अ‍ॅप असतो तर मिपा हे डेस्कटॉप वर वाचण्यातच मजा असते. कधीही जूने संदर्भ शोधता येतात.

असो. सध्यातरी शुभेच्छा देऊ या.

निनाद's picture

11 Oct 2016 - 1:47 am | निनाद

द्वारकानाथजींशी सहमत आहे.

chitraa's picture

11 Oct 2016 - 9:22 am | chitraa

मिपाचा आय्डी कधी मिळणार याची वाट पहात ह्तो.

आकर्षण ग्रुप जॉइन केल्यावर लगेच अयडी मिळाला.

सतिश गावडे's picture

11 Oct 2016 - 11:59 pm | सतिश गावडे

"पहात ह्तो" की "पहात ह्ते"?

टवाळ कार्टा's picture

12 Oct 2016 - 7:11 am | टवाळ कार्टा

Old wine in new bottle

नीलमोहर's picture

12 Oct 2016 - 11:42 am | नीलमोहर

डूआयडी कसे काय ओळखू येतात, म्हणजे बिफोर, आफ्टर कसं काय कळतं म्हणे,

chitraa's picture

12 Oct 2016 - 12:05 pm | chitraa

त्याना स्वप्नात दृष्टांत मिळतो

टवाळ कार्टा's picture

12 Oct 2016 - 12:26 pm | टवाळ कार्टा

खिक्क...

सुबोध खरे's picture

12 Oct 2016 - 10:35 am | सुबोध खरे

ते मोगा खान आहेत नव्या ड्यू आयडी मध्ये. म्हणून "होतो"

संदीप डांगे's picture

12 Oct 2016 - 1:27 pm | संदीप डांगे

यशोधरा यांच्याशी सहमत!

संदीप डांगे's picture

12 Oct 2016 - 1:31 pm | संदीप डांगे

मिपावर Law of attraction या विषयावर या आधी धागे निघाले आहेत.पण मूळ विषय सोडून ट्रोलिंगच जास्त झालं.

^^^

बाकी सगळं ठीक पण प्रत्येक whatsapp समूहाच्या जाहिरातीसाठी मिपाचे subvertising कशासाठी?

उपयोजक's picture

8 Feb 2017 - 6:11 pm | उपयोजक

समुहाच्या नावात आणि विषयात काही बदल करण्यात आले आहेत.ते कोणते? आणि नावात बदल करावा लागण्याची कारणे समुहात स्पष्ट केली आहेत.
नवीन सदस्यांना याबाबतचा खुलासा समुहावर केला जाईल.