मिपा शासन
आहार, आरोग्य आणि मनोरंजन विभाग
ठाणे उपविभाग ठाणे
बैठक ठिकाण - हॉटेल अँब्रोसिया, ओवळे गाव, घोडबंदर रोड ठाणे
दि . ०२ ऑक्टोबर २०१६ वेळ सायंकाळी ७ वाजता
वाचा :- दि . ३०/०९/२०१६ रोजीची आमंत्रणपत्रिका http://www.misalpav.com/node/37535
प्रस्तावना :- सन २०१६-१७ या वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या मिपाचे आहार तसेच उद्योगमंत्री श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या झंझावाती ठाणे दौऱ्याच्या निमित्ताने दि २ ऑक्टोबर २०१६ रोजी म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याआधी जाहीर झालेल्या परंतु पार न पडू शकलेल्या "पुणे" येथील बैठकीची पुनरावृत्ती होऊ नये याची पुरेपूर काळजी स्थानिक आयोजकांनी घेतली होती व त्या दृष्टीने खबरदारीचे उपाय घेण्यात आले होते . कोणतीही बैठक यशस्वी होण्यासाठी तेथील व्यवस्थेचा सतत आढावा घेणे गरजेचे असल्यामुळे योग्य त्या सूचना सर्व सभासदांस देण्यात आल्या होत्या.
सद्यस्थितीत मिपा शासनाच्या बैठका अतिशय कमी होत असल्यामुळे सदरची बैठक यशस्वीरीत्या पार पाडणे गरजेचे होते. त्यानुसार श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या सूचनेनुसार बैठकीचे ठिकाण ठरवण्यात आले होते. बरेच सभासद आणि इतर मंत्रिमंडळ ऐनवेळी ठरलेल्या ह्या दौऱ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही मिपाचे आरोग्यमंत्री श्री. सुबोध खरे, पणनमंत्री श्री मुक्त विहारी, वनमंत्री श्री सर्वसाक्षी, उच्चशिक्षणमंत्री श्री शॅम्पेन आणि मनोरंजन मंत्री श्री टकेश, अवजड उद्योगमंत्री श्री विनोदराव तसेच खाली सही करणार यांनी जातीने उपस्थिती लावली होती. काही नवीन सभासद जसे की श्री धर्मराज मुटके, वरून मोहिते, श्री हेमंत वाघे,श्रीमान योगी आणि टुकुल देखील या बैठकीस उपस्थित होते. गांधी जयंतीनिमित्त दुष्काळी दिवस असल्यामुळे काही नाराजीचे सूर उमटत होते परंतु शासनाच्या धोरणानुसार गांधीजींचा योग्य तो आदर राखला पाहिजे ह्यावर सदस्यांचे एकमत झाले.
ऐनवेळी जगाचे मध्यवर्ती ठिकाण "० मैल डोंबोली" येथून बैठकीच्या ठिकाणी पोचण्यासाठी लाल दिव्याच्या गाडीची व्यवस्था न झाल्यामुळे आणि भारतीय रेल्वेमधून सामान्य जनतेबरोबर प्रवास केल्यामुळे स्वतःच लालेलाल झालेले पणन मंत्री तसेच अवजड उद्योग मंत्री ठाणे स्थानक येथे उशिरा पोचल्याने त्यांना घेऊन तसेच मध्ये उच्च शिक्षण मंत्र्यांना घेणे ठरल्यामुळे स्वतः संयोजकांना सभेच्या ठिकाणी पोचण्यास उशीर झाला. तरीही श्री प्रभाकरराव पेठकर यांनी श्रीमान योगी यांच्या साथीने बैठकीचे ठिकाण गाठले आणि धोरणात्मक चर्चा करण्यास सुरूवात केली. दरम्यानच्या काळात इतर सभासद आपापल्या वाहनातून ठरलेल्या ठिकाणी येऊन पोचले. साधारण एक दीड तास उलटूनही संयोजक तसेच उर्वरित सभासद न पोचल्यामुळे सभा आणि चर्चा तशीच पुढे चालू राहिली. अखेरीस ८. ३० च्या सुमारास संपूर्ण कोरम पूर्ण झाल्यामुळे मुख्य सभेला सुरुवात झाली.
सुरुवातीला सभेचा ताबा आरोग्यमंत्री श्री सुबोध खरे यांचेकडे होता आणि त्या अनुषंगाने सर्व सदस्यांनी सध्याच्या आरोग्यविषयक सोयीसुविधांचा साधक बाधक आढावा घेतला. खानपान सेवा लगेच सुरु झाल्यामुळे थम्स अप आणि स्वीट लाईम सोडा यांचा आग्रह होत होता. एक व्हेज आणि एक नॉन व्हेज प्लॅटर यांचीही मागणी नोंदवली गेली. जसजसे पदार्थ येत होते तसे बैठकीलाही रंग चढत होता. पणन मंत्र्यांनी शेतीविषयक आणि जमीनविषयक माहिती, तदनुषंगाने बोकाळलेला भ्रष्टाचार याविषयी सविस्तर माहिती दिली. नवीन सभासदांना सभेची कार्यपद्धती समजावून देण्याच्या उद्देशाने एकमेकांची ओळख करून देण्यात आली व गप्पांना रंग चढला. बैठकीचे टेबल आयताकृती असल्यामुळे काही काळ सभासदांचे थोडे गट पडले आणि तिहेरी चर्चाही सुरु होत्या. दरम्यानचे काळात पनीर लाहोरी , चिकन रारा मसाला, नान आणि ग्रीन सलाड यांची फर्माईश पेश झाली. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता घेता स्वयंचित चारचाकी वाहने आणि त्या अनुषंगाने विविध मॉडेल्सची चर्चा झाली. सभेच्या उत्तररंगात श्री धर्मराज मुटके यांनी प्रत्येकासाठी पहिलीच भेट म्हणून आणलेले पेढे सर्व मंत्रिमंडळाला आश्चर्याचा धक्का देऊन गेले. घड्याळाचे काटे पाहून सभा आवरती घेणे भाग पडले. टी टी एम एम तत्वानुसार आपापले बिल सर्व सभासदांनी मनोरंजन मंत्री श्री टकेश यांचेकडे जमा केले . त्यानंतर सगळ्या मिपा मंत्रिमंडळाचे समूह छायाचित्र घेण्यात आले आणि एकमेकांचा सुमारे अर्धा तास निरोप घेऊन सगळे मंत्री आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले.
मिपा शासन निर्णय :
१) सदरच्या बैठका ह्या नियमित तत्वावर आणि जास्तीत जास्त सभासदांबरोबर पार पाडल्या जाव्यात असा निर्णय एकमताने घेण्यात आला.
२) बैठकीसाठी अहोरात्र काम करणाऱया स्थानिक कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहारार्थ एक विशेष बैठक ठेवली जावी असा प्रस्ताव मांडला गेला आणि मंजूर झाला.
३) उपरोक्त लेखावशर्षाखाली मंजूर करण्यात आलेली बैठक लवकरात लवकर आयोजित करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ शासनास सादर करावा.
४) सदर बैठकीची जळजळयुक्त छायाचित्रे मनोरंजन मंत्री यांनी प्रकाशित करावीत.
५) हे ज्ञापन मिपा ठाणे विभागाचा अनौपचारिक संदर्भ तसेच त्यामधील तरतुदी अन्वये कायदा विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
5. सदर शासन निर्णय मिपा शासनाच्या www.misalpav.com या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा क्रमांक ठरवण्यात आलेला आहे.
हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
- मिपाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.
माम्लेदारचा पंखा
उप सचिव , कायदा विभाग
प्रति,
१) महामिपामालक, मिपाराज्य .
२) नियमित बैठक कट्टा समन्वय समिती , पुणे (१२ प्रती)
३) मा. कार्यासन अधिकारी
४) आहार व उद्योग मंत्री कार्यालय
५) निवडक "नस्ती उठाठेव मंडळ"
प्रतिक्रिया
3 Oct 2016 - 9:13 pm | प्रचेतस
खी खी खी.
जबराट वृत्तांत.
3 Oct 2016 - 9:16 pm | बोका-ए-आझम
आधीचा एक पंचनामा वृत्तांत आणि आता हा शासकीय वृत्तांत! जबराट!
3 Oct 2016 - 9:36 pm | आदूबाळ
लोल! काय जबरदस्त वृत्तांत आहे!
3 Oct 2016 - 9:47 pm | पैसा
हाहाहा! जबरदस्त वृत्तांत. पुण्यातले कट्टे ठरवण्यासाठी तीन धागे आले पाहिजेत ही अट न पाळल्यामुळे परवाचा कट्टा बारगळला वाटते! तसे झाले तर ती पुणेकरांसाठी नामुष्कीची गोष्ट असेल.
3 Oct 2016 - 10:13 pm | टवाळ कार्टा
खी खी खी, लय भारी, बाकी माझ्याकडे मनोरंजन खाते असले तरी त्याचे नामकरण सांस्कृतिक खाते असे करावे असा प्रस्ताव पुढील लवकरच होऊ घातलेल्या बैठकीत पास करणेत यावा
3 Oct 2016 - 11:23 pm | माम्लेदारचा पन्खा
फोटो लोडवा की राव ! खातेप्रमुख तुम्ही आहात....
3 Oct 2016 - 11:28 pm | नीलमोहर
टाका की फोटो :)
(कोणी हात पण लावणार नाहीये फोटोला, टेन्शन नका घेऊ )
4 Oct 2016 - 12:55 am | पिलीयन रायडर
टेरर आहे टेरर!!! तू असताना काय बिशाद आहे फोटो टाकायची?!!
टक्याच्या फोटोला हात लावलाच तर तो सर्क्युलेट करायला तरी एक गुप्त दालन बनवा! परवाचा तो फोटो फार मस्त होता! =))
वृतांत एक नंबर जमलाय!! मनोरंजन मंत्री टकेश ह्यांनी फोटो लोडवावेत. कधी तरी काही तरी उपयोगी करायचं जमवा! ;)
4 Oct 2016 - 10:24 pm | नीलमोहर
भारी होता किनई तो फोटो, किंमत नाही बघ कष्टाची,
इथे तो फोटो लोडवत नाही तोपर्यंत तोच टाकून देऊ का,
संमं परत उडवेपर्यंत काय ते सर्क्युलेट करून घ्या ;)
4 Oct 2016 - 4:19 am | खटपट्या
तुम्ही असे घाबरवता, मग आम्हाला फोटो बघता येत नायत....
6 Oct 2016 - 8:14 pm | मी-सौरभ
फुकट डोक्याला शॉट होतो मा मं म च्या
3 Oct 2016 - 10:18 pm | शिव कन्या
खमंग!
3 Oct 2016 - 10:34 pm | जव्हेरगंज
लय भारी =))
3 Oct 2016 - 10:41 pm | रातराणी
जबरदस्त स्टाइल व्रुतांताची!
3 Oct 2016 - 10:48 pm | एस
फायलीवरचा शेरा- जावक क्रमांक टाकावा. ;-)
3 Oct 2016 - 10:58 pm | नीलमोहर
=)
3 Oct 2016 - 11:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी !
परंतू, फोटो नसल्याने हा फार कमी वेळात ठरवलेला सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असे पाकिस्तानी माध्यमांत चर्चिले जात आहे.
तसेच जावक क्रमांक नसल्याने हा अहवाल खरा नसून कोणत्या तरी "अल्टेरियर मोटीव्हने" पसरवलेली अफवा आहे अशीही चर्चा चालू असल्याचे आमच्या वार्ताहराकडूण कळते.
=)) =)) =))
3 Oct 2016 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या! =))
लै भारी लिवलया
3 Oct 2016 - 11:53 pm | पद्मावति
मस्तं वृत्तांत.
4 Oct 2016 - 12:01 am | खटपट्या
लै भारी व्रुतांत लीवल्याबद्द्ल श्री मापं यांना उपमुख्यमंत्रीपदावर बढती देणेत येत आहे.
शपथविधी आगामी अधिवेशनात...
4 Oct 2016 - 12:33 am | सूड
बराय, टक्याने निमंत्रण देऊनही एकाच धाग्यात आटपल्याने काही मजा आली नाही.
4 Oct 2016 - 4:57 am | रेवती
वृत्तांत आवडल्या गेला आहे.
4 Oct 2016 - 6:36 am | कंजूस
वृतान्त एका जुनाट ठागदावर हाताने टाइप करून त्याचा फोटो मिपाच्या गोल शिक्क्यासह दिला तर मजा येईल.
4 Oct 2016 - 7:26 am | हेमन्त वाघे
"आमच्याकडे " हातानेच टाइप करतात !!
4 Oct 2016 - 8:30 am | टर्मीनेटर
"गांधी जयंतीनिमित्त दुष्काळी दिवस असल्यामुळे काही नाराजीचे सूर उमटत होते परंतु शासनाच्या धोरणानुसार गांधीजींचा योग्य तो आदर राखला पाहिजे ह्यावर सदस्यांचे एकमत झाले."
lol
या पुढील बैठक हि शक्यतो गटारी अमावास्येच्या मुहूर्तावर आयोजित करावी म्हणजे सदस्यांची नाराजी टाळता येईल. :-)
4 Oct 2016 - 8:52 am | नाखु
मा,उपसचीव,
कायदा विभाग
आमच्या पुणे महानगर शाखेत पाचवी प्रत पोहोचली आहेच्,साधक बाधक चर्चेचा धावता आढावा घेतला असला तरी उपस्थीतांनी त्यांच्या वयक्तीक टिपण /नोंदवह्या जास्तीत जास्त सभासदांसाठी मिपा व्यासपीठावरच खुल्या करण्यास आम्च्या शाखेची अजिबात हरकत नाही.इतर शाखांचेही अनुमोदन असावे.
मनोरंजन मंत्र्यांनीही टिपणे काटछाट न करता तशीच द्यावीत.
छायाचित्रे नसल्याने कट्टा झालाच नाही असे जे म्हणतायत त्यांना केजरीवाल समजून माफ करणे.
आपल्या नीट आणि नेटक्या आयोजनाबद्दल मंडळ अभिनंदनास पात्र आहे.
पत्र पोहोच देणे
उपसचिव नाखु
"नस्ती उठाठेव मंडळ"(पुणे महानगर विभाग) पिंचि शाखा
4 Oct 2016 - 9:07 am | औरंगजेब
कल्पना आवडलेली आहे.
पालकमंत्री-नौपाडा-ठाणे
4 Oct 2016 - 9:07 am | औरंगजेब
*स्वयंघोषित लिहायचे राहिले :-)
4 Oct 2016 - 10:42 am | टवाळ कार्टा
पालकमंत्री म्हटले कि पिलावळ पण आलीच...इसी बात पे एक वाघ पेश है
दुनीया में आये हो...तो करो कुछ ऐसा काम
दुनीया में आये हो...
...तो करो कुछ ऐसा काम
जो भी गली से गुजरो...तो आवाज आये...अब्बा जान अब्बा जान
=))
4 Oct 2016 - 8:22 pm | माम्लेदारचा पन्खा
फोटो कधी लोडवताय ?
4 Oct 2016 - 9:24 pm | खटपट्या
ह्याला म्हंतेत सर्कारी पाठपुरावा...
6 Oct 2016 - 8:05 pm | माम्लेदारचा पन्खा
मी या धाग्यावरुन राजीनामा देतो !
4 Oct 2016 - 11:58 pm | रातराणी
त्याचे फोटो चांगले आले नसतील ;)
4 Oct 2016 - 9:50 am | अजया
जबरदस्त वृत्तांत पण फोटो नसल्याने वृत्तांताच्या सत्यतेबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.
4 Oct 2016 - 10:33 am | संत घोडेकर
हेच म्हणतो.
4 Oct 2016 - 10:41 am | टिके
अद्भुत !! शासकीय वृत्तांत !!
4 Oct 2016 - 11:34 am | स्वाती दिनेश
वृत्तांत मस्त!
स्वाती
4 Oct 2016 - 1:21 pm | वेदांत
जबरी लिहिलय ..
4 Oct 2016 - 2:04 pm | सविता००१
खंग्री आहे वृत्तांत
4 Oct 2016 - 3:13 pm | सूड
१२ प्रती पुरतील का?
6 Oct 2016 - 8:16 pm | मी-सौरभ
अजुन लागाल्या तर स्वखर्चाने छायाप्रती काढून घेणे
4 Oct 2016 - 4:03 pm | टुकुल
लै बेस्ट.
कट्ट्या सारखाच कट्याचा भारी व्रुतांत :-)
--टुकुल
4 Oct 2016 - 7:07 pm | माझीही शॅम्पेन
वृतांत वाचून वारल्या गेलो आहे , काही काळासाठी मी परिवहन मंत्री पण झालो होतो
जबरट वृतांत , तुझ्या मध्ये एक होत्करु लेखक दडलेला आहे !!! :)
5 Oct 2016 - 12:15 am | बोका-ए-आझम
पण मापं फारसं लिहित नाहीत. सगळ्या गोष्टी sub-judice असल्यासारखे असतात. ;) (ह.घ्या.)
4 Oct 2016 - 8:01 pm | वरुण मोहिते
1 नंबर कट्टा
थोडी थोडी भर टाकण्यात येईल आमच्याकडून पण पुढे ..
4 Oct 2016 - 10:27 pm | सस्नेह
एक वंबर वृत्तांत. फोटो ?
5 Oct 2016 - 3:31 pm | दिपक.कुवेत
पण फोटो आणि सोनेरी पेय नसल्यामूळे...छ्या काय मजा नाही आली.
5 Oct 2016 - 4:07 pm | नितिन थत्ते
हा कट्टा झाला असल्याचे पुरावे द्या (फटु कुठायत?)
नितिन केजरीवाल.
5 Oct 2016 - 4:54 pm | धर्मराजमुटके
२ ऑक्टोबरचा कट्टा घरापासून काही अंतरावरच असतांना तो टाळणे म्हणजे घोर पातक ठरले असते. पण मामलेदारांचा पंखा यांनी वारंवार आठवण करुन दिली असतांना देखील मी आगावू आरक्षण मागीतले नाही.
एकतर मी एक मराठा, लाख मराठा. त्यामुळे लाख लोकांसाठी आरक्षण करण्याइतपत ते हॉटेल मोठे नव्हते. दुसरे मन म्हणत होते की अरे, तु भले आरक्षण मागशील, पण बाकीचे ते मान्य करतील काय ? त्यामुळे काय होईल ते होवो पण आरक्षण मागायचे नाही असे ठरवून टाकले.
कट्ट्याची वेळ ६.३० ची असल्यामुळे मी बरोब्बर ७.१५ वाजता कट्टास्थळी पोहोचलो. तर योगी९०० आणि पेठकर काका ६.३० वाजताच आले होते असे कळाले. पेठकर काका सध्या अनिवासी भारतीय असल्यामुळे त्यांना वेळेत यायची वाईट सवय असेल असे समजून दुर्लक्ष केले पण मग योगी ९०० यु टू ? अहो भारतात राहता ना ? मग तुम्ही वेळेआधीच कसे पोहोचू शकता ? अशाने भारताची प्रतिमा जगात मलीन होईल हे लक्षात घ्या. असे काही बाही विचार मनात आले पण नंतर कळाले की माझ्याप्रमाणेच ३-४ जण मिसळपाव कट्ट्यावर "पहिलटकर" होते. त्यामुळे त्यांची घाई समजू शकतो. असो.
गांधीजी आज आपल्यात असते तर त्यांना कोरडी श्रद्धांजली वाहवी लागली नसती असे बरेच जणांचे मत पडले. मात्र खास गांधीजींचा बड्डे असल्यामुळेच बर्याच गुणी जनांच्या गृहमंत्र्यांनी कट्यास परवानगी दिली होती ही विशेष बातमी समजली.
साधारण १०-१२ सभासद जमले. वक्त्याचे काम डॉ. खरे, पेठकर काका, सर्वसा़क्षी, हेमंत वाघे यांच्याकडे होते आणि बाकी सगळे श्रोत्याची भुमिका निभावत होते. डॉ. खरे हे रेडीओलॉजिस्ट असल्यामुळे त्यांना इमर्जन्सी केसेस नसतात आणि त्यामुळे ते कसे सुखी आहेत ह्या वाक्यावरुन चर्चा डॉक्टर आळीला गेली आणि डॉक्टरी पेशातील विविध किस्से ऐकायला मिळाले. मात्र मिपावर धिंगाणा घालणारे आयटी वाले कट्ट्यात चक्क शांत होते. थोडक्यात जालीय माणूस प्रत्यक्षात वेगळा असू शकतो याचे प्रत्यंतर त्यांनी दिले.
काही वेळाने मुवी आले आणि कट्यात अजून एका वक्त्याची भर पडली. मुवी आले तसे त्यांनी चर्चेची सुत्रे आपल्या हाती घेतली आणि ते डायरेक्ट डायरेक्ट जमिनीत घुसले. (म्हणजे जमिनिंसंदर्भात / शेतीसंबंधात चर्चा चालू केल्या ). मी त्यांना महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण डोंबिवली वरुन आलात काय असे विचारले तेव्हा कुणीतरी डोंबिवली हे महाराष्ट्राचे नव्हे तर सकल जगाचे मध्यवर्ती ठिकाण आहे याची आठवण करुन दिली. माझ्याकडून झालेली एवढी मोठी अक्षम्य चुक मुवींनी मोठ्या मनाने खिशात घातली (पदर नसल्यामुळे) त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.
त्यानंतर बाईका ( शब्दआभार : श्री. अभ्या ) आणि चारचाकी गाड्यांवर चर्चा करण्यात आली.
एवढे होईपर्यंत खाद्यपदार्थांचा समाचार घेण्यात आला होता. आताशा बर्याच जणांची होम डिपार्टमेंटकडून वारंवार चौकशी होऊ लागली. "दहा च्या आत घरात" असे संस्कार असलेली गरीब पुरुष मंडळी ह्या चौकशी ने नक्कीच गांगरुन गेली असणार पण चेहर्यावरुन त्यांनी तसे दिसू दिले नाही किंवा मग "मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही" या न्यायाने अगोदरच कोंबडी फस्त केल्यामुळे त्यांच्या अंगात धैर्याचा संचार झाला असेल असेही असू शकते.
मी ठाण्याची स्पेशालिटी असलेले "प्रशांत कॉर्नर" चे पेढे आणले होते पण ते असे रविवारच्या रात्री, अवेळी देऊ की नको याबाबत मनात संभ्रम उत्पन्न झाला होता. मात्र मिपाकरांनी पेढे कधीही दिले तरी चालतात असे सांगीतल्यामुळे मग त्याचे वाटप केले. मात्र या पेढ्यांच्या/ बॉक्स चा फोटो काढू नये अशी मी विनंती केली. कोणत्याही ब्रॅन्डची मी मिपावर जाहिरात करत नाहिये असे मी सगळ्यांना आवर्जुन सांगीतले.
शेवटी बिल आल्यावर टीटीएमएम तत्त्वावरचा कट्टा असल्याने बिलाची विभागणी करण्यासाठी दोन चार जणांनी आपापल्या मोबाईलवर आकडेमोड केली. मात्र प्रत्येकाच्या मोबाईलवरील आकडा वेगवेगळा आला. कदाचित वेगवेगळ्या ब्रॅन्ड चे फोन असल्यामुळे असे झाले असावे. नंतर मात्र अचानक एवढा बारीक हिशेब करणे गरजेचे नाही हे लक्षात आल्यामुळे किंवा आपल्या मोबाईल्चे वैगुण्य झाकण्यासाठी "फिगर वॉज अप्रुव्हड अॅनानिमसली" ! बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप दिली गेली नाही हे लक्षात येऊन मापं यांना वाईट वाटले मात्र पेठकर काकांनी आपल्या व्यवसायबंधूंची अगोदरच काळजी घेतली होती हे सांगीतल्यावर माझा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला. पण तो मी बोलून दाखविला नाही. श्री. टका यांनी सगळ्या नोटा हातात घेऊन हिशोब बरोबर असल्याची खातरजमा करुन मग ती रक्कम हॉटेलच्या कर्मचार्याकडे सुपुर्द केली.
हॉटेल वाल्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी सर, सर म्हणून गप्पांमधे व्यत्यय आणला नाही.
नंतर ग्रुपचे काही फोटो काढण्यात आले. हॉटेलच्या सेवकवर्गापैकी एकाने हे कार्य केले. एकंदरीत तो ह्या कार्यक्रमात चांगलाच हुशार होता असे दिसते. कारण अगदी प्रोफेशनल फोटोग्राफर समोर जितका वेळ दात विचकत उभे राहावे लागते तितका वेळ त्यानेही घेतला.
सत्यनारायण पुजेत ज्याप्रमाणे मुख्य पुजा, उत्तर पुजा असते त्याप्रमाणे मुख्य कट्टा झाल्यावर कट्टेकरी रस्त्यावर येऊन परत उत्तर कट्टा करण्यात रंगले. मग तुझ्या मोबाईलमधे किती पिक्सेल चा कॅमेरा, माझ्या मोबाईलमधे अमुक जीबीची रॅम, थ्री जी, फोर जी, जी जी र जी जी असे करत उत्तर आख्यान रंगले.
साधारण ११.१५-११.३० वाजता कट्टेकरी आपल्या घराच्या दिशेने स्थानापन्न झाले.
वरील कट्ट्यात सर्वश्री. प्रभाकर पेठकर, योगी९००, डॉ. खरे, वरुन मोहिते, धर्मराज मुटके, मामलेदारचा पंखा, विनोद१८ (चुकभुल देणेघेणे). मुवी, माझीही शँपेन, हेमंत वाघे, टवाळ कार्टा आणि सर्वसाक्षी हे मिपाकर सहभागी झाले होते. ( सभासदांची नावे खुर्च्यांवर बसलेल्या क्रमाने, चुक झालेली असल्यास उपस्थितांनी दुरुस्ती करावी)
काही जणांनी फोटो काढले पण ते इथे डकवले नाही. मी कोणत्याही कार्यक्रमात मोबाईलने, कॅमेर्याने फोटो काढत नाही. माझ्या घरच्यांच्या मते मी एक उत्तम फोटोग्राफर आहे. ( हा डायलॉग नटसम्राटच्या तु नट म्हणून xxxx आहेसच रे! च्या चालीवर वाचावा). काये की मोबाईलमधील फोटो कधी कधी चुकुन डिलीट होतात पण मी मनाच्या कॅमेर्याने काढलेले फोटो मला वर्षानुवर्षे जतन करुन ठेवता येतात. ते कोणाला मुळ स्वरुपात दाखविता येत नाहीत मात्र ते शब्दचित्रात दाखविणे कधी कधी शक्य होते.
मुळ वृत्तांतापेक्षा पुरवणी मोठी झाली असल्यास माफ करावे.
कळावे
आ. नम्र
धर्मराज मुटके
10 Oct 2016 - 9:23 am | योगी९००
जबरा वृत्तांत...!!
कट्ट्याची वेळ ६.३० ची असल्यामुळे मी बरोब्बर ७.१५ वाजता कट्टास्थळी पोहोचलो. तर योगी९०० आणि पेठकर काका ६.३० वाजताच आले होते असे कळाले. पेठकर काका सध्या अनिवासी भारतीय असल्यामुळे त्यांना वेळेत यायची वाईट सवय असेल असे समजून दुर्लक्ष केले पण मग योगी ९०० यु टू ?
प्रत्येक गोष्ट वेळेत करण्याची सवय ..दुसरे काय? मागच्या वेळी अशाच एका कट्ट्याला वेळे आधी गेलो होतो आणि येणार्या जाणार्या प्रत्येकाला मिसळपाव मिसळपाव असे विचारत होतो. काहीजणांना हॉटेलचा वेटर दारातचऑर्डर घेतोय असेच वाटले होतो. तर हॉटेलवाल्याला मी त्याचे गिर्हाईक पळवतोय असे वाटले असावे. नशिब यावेळी पेठकर काका बरोबर होते. त्यामुळे तुम्ही सर्वजण येण्याआधी आमचा छानसा मिनी कट्टा झाला.
बाकी मेन कट्टयाला खुप मजा आली. बर्याच जणांना भेटायची ईच्छा या निमित्त पुर्ण झाली. ट.का. जसा वाटला तसाच निघाला हे विषेश. नाहीतर काही खेळकर आयडी गंभिर चेहर्याचे निघतात. तसे नाही झाले हे बरेच.
बाकी धर्मराज मुटके यांचे सरप्राईझ गिफ्ट मिटक्या मारत खाल्ले. तुमचे आणि सर्व कट्टेकरांचे आभार.
कट्ट्याचा वृत्तांत अतिशय छान लिहीला आहे. या वृत्तांतासाठी तसेच कट्टा अरेंज केला म्हणून मा.प. यांचे खास आभार.
5 Oct 2016 - 6:48 pm | अजया
झकास वृत्तांत!
फोटो नाही त्यामुळे सगळीच मनकी बातें की कांय!
5 Oct 2016 - 6:56 pm | सुबोध खरे
बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप दिली गेली नाही हे लक्षात येऊन मापं यांना वाईट वाटले
सेवक वर्गाची काळजी घेतली गेली आहे. २५० रुपये टीप बिलात वाढ करून त्याप्रमाणे सर्वाकडून त्याचे पैसे घेतले गेले हि नोंद व्हावी( हिशेब मीच केला होता).
5 Oct 2016 - 7:00 pm | धर्मराजमुटके
हे लिहिलयं की ! काका म्हटले होते ना की मी हॉटेलवाला आहे म्हणून
5 Oct 2016 - 7:17 pm | अभ्या..
एक कटींगवाला दुसर्या कटिंगवाल्याचे कटिंगचे पैसे घेत नाही म्हणे. ;)
5 Oct 2016 - 8:41 pm | माम्लेदारचा पन्खा
इथे फौज होती.....धुपला असता तो !
5 Oct 2016 - 8:23 pm | सुबोध खरे
मी ठाण्याची स्पेशालिटी असलेले "प्रशांत कॉर्नर" चे पेढे आणले होते पण ते असे रविवारच्या रात्री, अवेळी देऊ की नको याबाबत मनात संभ्रम उत्पन्न झाला होता.
आम्ही पेढे कोणत्याही वेळेस कितीही खाऊ शकतो तेंव्हा "असा" किंतु मनात आणू नये.
काजू लावलेल्या खमंग पेढ्याचा दर्जा "अत्युत्तम" होता त्यामुळे ते लगेच संपले सुद्धा.
मुटके साहेबाना खास धन्यवाद
बाकी "धर्मराज मुटके" असे भारदस्त असलेली व्यक्ती भारदस्त असेल असे वाटले होते पण ते तर एकदम तरुण आणि आमच्यासारखे बारीकच निघाले.
हे म्हणजे एकदा मी कोल्हापूरला एका सरदार घराण्यात गेलो असता "रणजित राव" हाक मारल्यावर एक चार पाच वर्षाचे चिरंजीव बाहेर आले असे झाले.
6 Oct 2016 - 12:01 am | खटपट्या
श्री मुटके यांचा खास व्रुत्तांत आवडला.
6 Oct 2016 - 8:23 pm | मी-सौरभ
मस्त वृत्तांत आणि मुटकेंची पुरवणि पण अप्रतिम.
जाता जाता, टुकूल राव लै जुने सदस्य (क्र. १४२६) आहेत. फक्त मधे अज्ञातवासात होते आणि आता त्यांची घरवापसी झाली असावि असा अंदाज आहे .
7 Oct 2016 - 12:55 pm | टुकुल
हा हा.. मिपा सोडुन अज्ञातवासात जास्त दिवस राहण जमलच नाही, वाचनमात्र होतो. हा कट्टा घराच्या एवढा जवळ होता आणी ड्राय डे असल्यामुळे होम मिनिस्टर नी पण परवानगी दिली, म्हणुन जमुन आले.
--टुकुल
7 Oct 2016 - 1:04 pm | नाखु
प्रतिसादात रिलायनस्ची जाहीरात केली असा आळ येऊ शकतो याची नोंद घ्यावी..
7 Oct 2016 - 2:12 pm | प्रीत-मोहर
अरे पण अजुन्पर्यंत एकही फोटो नाहीये.
टका फोटो कुठेत?
7 Oct 2016 - 3:17 pm | पैसा
कट्टा झाला नसावा अशी शंका घेण्यास जागा आहे. माणणीय अरविंद केजरीवाल यांचा आदर्श ठेवून सर्जिकल ऑपरेशनचा पुरावा प्रस्तुत करावा अशी मागणी मिपा आर्टीआय अॅ़क्टाअंतर्गत करण्यात येत आहे.
8 Oct 2016 - 1:12 pm | माझीही शॅम्पेन
मागील रविवार झालेल्या कट्याची क्षणचित्रे
पुन्हा एकदा हे सिध्द झाले की ठाणेकरच यशस्वी कट्टे आयोजित करू शकतात :)
8 Oct 2016 - 1:15 pm | माझीही शॅम्पेन
अर्र साइझ चुकली
8 Oct 2016 - 1:17 pm | माझीही शॅम्पेन
परेड (डावी कडून) : 1) मामालेदार पंखा, 2) विनोद18, 3) माझीही शॅम्पेन (अस्मदिक), 4) टका,
5) सर्वसाक्षी, 6) टुकुल, 7) हेमंत वाघे, 8) डॉ सुबोध खरे, 9) पेठकर (सत्कार मूर्ती), 10) मुवि,
11) वरुन मोहिते, 12) योगी900, 13) धर्मराज मुटके
8 Oct 2016 - 2:38 pm | माम्लेदारचा पन्खा
मनोरंजन मंत्र्याला तातडीने बिनखात्याचा मंत्री करण्यात येत आहे !
11 Oct 2016 - 2:28 pm | प्रभाकर पेठकर
11) वरुन मोहिते.
वरून मोहिते की वरूण मोहिते?
वरून मोहिते म्हंटले तर मनांत वात्रट प्रश्न येतात.
8 Oct 2016 - 1:25 pm | पद्मावति
मस्तं फोटो आणि ओळख परेड.
8 Oct 2016 - 5:06 pm | नाखु
फोटो छान आला आहे.
11 Oct 2016 - 4:47 pm | अजया
नवीन मेंबरं पण दिसली ठाणे कट्ट्याला.
असे शहाण्यासारखे ठरवुन पार पडलेले कट्टे याच साईडला होतात बहुतेक ;)
11 Oct 2016 - 6:33 pm | टवाळ कार्टा
हो कारण हे पुणे नाही ना ;)
9 Oct 2016 - 2:19 am | नंदन
कट्ट्याचा वृत्तांत एक नंबर लिहिला आहे!
यात एक किंचित दुरुस्ती. वरून मोहिते हे ठाणे-कट्टा-व्हेटरन आहेत. अगदी गविंच्या वृत्तांताने गाजलेल्या पॉप-टेट्स कट्ट्यासहित!
9 Oct 2016 - 7:50 am | माम्लेदारचा पन्खा
पुढील वेळी तेही क्याबिनेट मंत्री असतील !
10 Oct 2016 - 2:24 am | संदीप डांगे
दणकट्टा!!
11 Oct 2016 - 2:52 pm | प्रभाकर पेठकर
ठाण्याच्या कट्ट्याला मज्जा आली. ड्राय डे नसता तर खुप मज्जा आली असती असं मला वाटतं. गप्पा मस्तं रंगल्या, हास्य विनोदाच्या फोडणीसह रंगल्या. डॉ. खरे ह्यांनी टिटवाळाच्या गणपतीची ख्याती आहे हे सप्रमाण सिद्ध केले. ज्ञानात एक नविन भर पडली. जमिनीच्या व्यवहारांबद्दल ही उद्बोधक चर्चा झाली. त्यामुळे आपणही जमीनीचा एक तुकडा घेण्याच्या विचारात आहोत हा अपराधी गंड मी सार्वजनिक न करता आपली झाकली मुठ झाकलीच ठेवली.
योगी९०० ह्यांनी माझी जाण्यायेण्याची व्यवस्था चोख पार पाडली. त्यामुळे मुंग्यांच्या गर्दीत चालणार्या मुंगीसारखे वैफल्य आले नाही. तो भार योगी९०० ह्यांनी एखाद्या योग्याप्रमाणे शांत डोक्याने उचलला आणि मी निवांत प्रवास केला. धन्यवाद योगीसाहेब.
पुन्हा पुढच्या महिन्यात भारतभेटीचा योग आहे. तेंव्हा पुन्हा गांधीजयंती (आडवी) येणार नाही ह्याची काळजी घेण्यात येईल.
11 Oct 2016 - 3:51 pm | वरुण मोहिते
नावात दुरुस्ती करण्यात येईल पेठकर काका लवकर. बाकी कट्टा छानच झाला. सगळ्यांना भेटूनही मजा आली. पेठकर काकांनी गिफ्ट आणलेलं पण ड्राय डे असल्यानी नको असं सर्वांचं मत पडलं. वास्ताविक तिथेही घोडबंदर रोड ला बसून देतात बऱ्याच हॉटेलात ड्राय डे ला पण नेक्स्ट टाइम म्हणून आम्हीही गप्प राहिलो.नंतर गप्पा इतक्या रंगल्या कि कोणाला आठवलं नाही.असो असेच कट्टे होत राहोत मिपा चे .