रिओ ऑलिम्पिक २०१६

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
4 Aug 2016 - 9:29 pm

रिओ ऑलिम्पिक २०१६

गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली.

यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच.

भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते.

तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा.

भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा !

काही दुवे
स्पर्धेचे संस्थळ
पदकतालिका

धोरणसमाजजीवनमानक्रीडाप्रकटनशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाबातमीमाहिती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Aug 2016 - 11:28 am | यशोधरा

धागा पाहिल्याची पोच.

ओह पोच वेग्रे हुच्च एकदम

भारतीय खेळाडुंना शुभेच्छा!!

आणि भारताने चमकदार कामगीरी करावी अशी दृढ इच्छा !!!!

याध्यावर नियमीत येणारच..

नितवाचक मिपॉलींपकवाला नाखु

विनायक प्रभू's picture

5 Aug 2016 - 3:00 pm | विनायक प्रभू

सहमत

साधा मुलगा's picture

5 Aug 2016 - 2:59 pm | साधा मुलगा

सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा!!!
दुवा आणि लेखासाठी धन्यवाद !
यावर्षी भारत अत्तापार्यान्त्ची सर्वोकृष्ठ कामगिरी करेल अशी आशा आहे.
कबड्डी चा समावेश ऑलिम्पिक मध्ये व्हावा असे वाटते.
google चांगली माहिती देत आहे एका क्लिक वर.

आज पुरुष आणि स्त्रीयांच्या तिरंदाजीची "रँकिंग राऊंड" आहे. बोंबाल्या देवी हेच एक त्यातल्यात्यात माहीत असलेलं नाव.

पाटीलभाऊ's picture

5 Aug 2016 - 7:43 pm | पाटीलभाऊ

पुरुषांच्या तिरंदाजीच्या वैयक्तिक रँकिंग राऊंडमध्ये भारताचा अतनु दास हा ६८३ गुणांसह पाचवा क्रमांकावर राहिला.
तर दक्षिण कोरियाच्या किम वूजिन याने ७०० गुणांसह जागतिक विक्रम नोंदविला.

नारसिंग यादव काय करतो याकडे लक्ष आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Aug 2016 - 10:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतिय चमूतील सर्व खेडाळूंना उत्तुंग यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !

उद्घाटन तर मस्त झाले. थेट न पहाता आल्याने नंतर पाहिले.
आता पाचला नौकानयन स्पर्धा आहे. दत्ता भोकनाळ हा एकमेव खेळाडू आहे. तो म्हणे तीन वर्षांपूर्वी पाण्याला घाबरायचा!
साडेसातला आयर्लंड बरोबर हॉकी सामना आहे, शिवाय पेस बोपन्नाचा दुहेरी सामना आहेच.
याशिवाय नेमबाजी व टे.टे. आहेत.
भारत खेळत नसलेले अन्य खेळ बघण्यात रस आहेच.

आदूबाळ's picture

6 Aug 2016 - 7:35 pm | आदूबाळ

भोकनाळ उपांत्य फेरीत!

आज प्रार्थना ठोंबरे आणि सानिया मिर्झा दुहेरी सामनाही आहे ना?

हो, पण् इथे रात्री दीडला आहे.
तुमच्याकडे पहाता येईल.,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2016 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धागा काढल्याबद्दल आभारी. धाग्यावर आणि खेळावर लक्ष असेलच.

-दिलीप बिरुटे

साधा मुलगा's picture

6 Aug 2016 - 9:34 pm | साधा मुलगा

दत्तू बबन भोकनाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल.
शुटींग मध्ये भारताच्या पदरी निराशा.
हॉकी मध्ये बराताने आयर्लंड ला ३-२ ने हरविले.
तिरंदाजी मध्ये महिला वैयक्तिक आणि सांघिकच्या पुढल्या फेरीत.

अमितसांगली's picture

6 Aug 2016 - 10:46 pm | अमितसांगली

पेस-बोपान्ना बाहेर....

शेवटचे तीस किमि आहेत. लाईव बघतोय.

http://stream.nbcolympics.com/mens-cycling-road-race-part-2?nid=23060_2542

पाटीलभाऊ's picture

7 Aug 2016 - 2:34 am | पाटीलभाऊ

टेबल-टेनिस वैयक्तिक स्पर्धेत भारताच्या आशा संपुष्टात.

अमितसांगली's picture

7 Aug 2016 - 8:25 am | अमितसांगली

सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे पराभूत....जितू राय बाहेर...

पहिला सेट भारतीय महिलांनी जिंकला.

साधा मुलगा's picture

7 Aug 2016 - 6:56 pm | साधा मुलगा

दुसरा सेट एका पोइंट ने हरलो :( ,टाय झालाय

साधा मुलगा's picture

7 Aug 2016 - 7:02 pm | साधा मुलगा

तिसरा सेट टाय झालाय, त्यामुळे आता हो चौथा सेट जिंकेल तो पुढे जाईल

साधा मुलगा's picture

7 Aug 2016 - 7:10 pm | साधा मुलगा

चौथा सेट जिंकून पुढील फेरीत प्रवेश केलेला आहे.
भारतीय चमूचे अभिनंदन!!!

खेडूत's picture

7 Aug 2016 - 10:25 pm | खेडूत

फारच छान झाला.
आता रशियासोबत आहे, पहातोय.

साधा मुलगा's picture

8 Aug 2016 - 9:00 am | साधा मुलगा

नेमबाजी मध्ये आपल्या महिला संघाला रशियाकडून पराभव पत्करावा लागला.
खरेतर आपल्या संघाने चांगली लढत दिली. तिसऱ्या सेटपर्यन्त आपण 2-1 ने पुढे असताना आपण तय ब्रेकर मध्ये हरलो.
आपल्या पोरी खरेतर चांगल्या खेळत होत्या, एखादी चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे ह्यावरून कळते.
रशियाचा संघ पण चान्गला होता , पहिल्याच सेट मध्ये 10,9,9 असा स्कोर केल्यावर आपल्या पोरींचे खरे नाही असे वाटले, पण आपल्या पोरींनीही कौतुकास्पद लढत दिली.

असंका's picture

8 Aug 2016 - 2:52 pm | असंका

+1

साधा मुलगा's picture

8 Aug 2016 - 9:37 am | साधा मुलगा

दीपा कर्माकरच्या खेळाचे नीट कव्हरेज करत नव्हते, तिची एक उडी पहिली पण upto the mark वाटली नाही पण तिने बाकी राऊंड्स मध्ये चांगली कामगिरी केलेली दिसते कारण सकाळी उठलो तेवहा ती फायनल ला पोहोचल्याचे कळले!!! तिलाही फायनल साठी शुभेच्छा!
हॉकी मध्ये महिला संघाने जपनशी बरोबरी साधली.
अजून तरी भारताच्या पदरी मेडल नाही, सुरुवात थोडी निराशाजनक असली तरी अजून संधी आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

8 Aug 2016 - 11:03 am | अप्पा जोगळेकर

Leg Break
काल ही दुखापत पाहिली आणि काळजाचा ठोका चुकला.

ऋतुराज चित्रे's picture

8 Aug 2016 - 11:30 am | ऋतुराज चित्रे

Vault मध्ये दीपा कर्माकर बिनधास्त वाटतेय व धोकादायक Produnova प्रकार करायला अजिबात कचरत नाही.

दीपाने लहान वयात इतकी मोठी कामगिरी केलीय.
तिचा आणि नेमबाजांचा खेळ जागून पाहिल्याचं सार्थक झालं.
नेमबाजीत रशियन काकू सुसाट होत्या तर भारताकडून छोटी मुलगी चमकली. मुकाबला जबरदस्त झाला. प्रेशरमधे आपले खेळाडू गडबडतात. हॉकीतही तसेच झाले.
दोन भागांऐवजी चार पन्धरा मिनिटांचे भाग केलेत. या बदलाचा जपानी मुलींनी फायदा घेतला.
आज जर्मनीशी हॉकी मुकाबला, साडेसातला घरी पोहोचायला हवं ...!

नाखु's picture

8 Aug 2016 - 11:50 am | नाखु

संघाला शुभेच्छा...

काहीही (ठळक+वादग्रस्त) राजकारण न होता गेलेला संघ म्हणून दोन्ही संघानी चांगली कामगिरी करावी ही ईच्छा..

धाग्यावर आणि खेळावर लक्ष असेलच.

महासंग्राम's picture

8 Aug 2016 - 3:22 pm | महासंग्राम

ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील.

नियोजन फसलंय ब्राझीलच. रोईंग सारख्या खेळात खेळाडूंना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.

अभिनव बिंद्रा फायनल मध्ये...

असंका's picture

8 Aug 2016 - 8:52 pm | असंका

अभिनव बिंद्रा ... चौथा....

वेल प्लेड बिंद्रा....!

आणि त्याच वेळी हॉकीत... १३९ मिनीटे ५५ सेकंद सुंदर खेळ करून भारत २:१ ने पराभूत. शेवटच्या पाच सेकंदात गोल खाल्ला.

तोंडाची चव गेली आता...

थॉर माणूस's picture

9 Aug 2016 - 6:07 am | थॉर माणूस

मुली इंग्लंडकडून पराभूत.

असंका's picture

8 Aug 2016 - 8:57 pm | असंका

१३९ नाही ...५९ मिनीटं ५५ सेकंद...सॉरी.

साधा मुलगा's picture

8 Aug 2016 - 9:21 pm | साधा मुलगा

आजचा पण दिवस खराब जातोय, एका एका पोइंत्स नि हरतोय आपण.
पण बिंद्रा चानागाला खेळला, hats ऑफ !!! जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणे सोपे नाही, पण शेवटच्या ४ मध्ये पोहोचून आपलाच माणूस ४था यावा याला काय म्हणावे.

साधा मुलगा's picture

8 Aug 2016 - 9:38 pm | साधा मुलगा

अभिनव बिंद्रा ४ था आला.
नेमबाजी महिला एकेरीमध्ये बोम्बयाला देवी आणि दीपिका पुढे, लक्ष्मि राणी माझी बाहेर.
हॉकीमध्ये शेवटच्या क्षणात २-१ ने जर्मनीने भारताचा केला पराभव.
जलतरण butterfly event चालू आहे.
रात्री महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनशी लढत आहे.

खेडूत's picture

8 Aug 2016 - 10:46 pm | खेडूत

जलतरणातही प्रकाश चौथा!
आजचा दिवस आपला नाहीच....

थॉर माणूस's picture

8 Aug 2016 - 11:54 pm | थॉर माणूस

त्याच्या हीट मधेच चौथा. या कामगिरी वर फाइनल साठी पात्र ठरण्याची शक्यता नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Aug 2016 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिंद्राचं चौथ्या क्रमांकावर राहणे आणि हॉकीत उत्तम खेळ करूनही शेवटची तीन सेकंद बाकी असतांना गोल झाला, हे पाहतांना वाईट वाटलं.

-दिलीप बिरुटे

साधा मुलगा's picture

9 Aug 2016 - 10:48 am | साधा मुलगा

अभिनव बिंद्र काय किंवा आणखी कुणी काय सगळे अगदी ०.५ च्या फरकाने हरत आहेत, याचा अर्थ हरलेले लोक काही कमी होते असा भाग नाही , पण मोक्याच्या वेळी जो कुणी आपला खेळ उंचावेल तो बाजी मारून नेतो.
मागे एकदा मी हर्ष भोगले यांचे achievers of excellence या विषयावर असलेले भाषण मिपावर धागा काढून शेअर केलेले. आजच्या ऑलिम्पिकच्या अनुषंगाने त्याची आठवण झाली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते कि नुसता अंगीभूत टॅलेंट तुम्हाला सर्व काही देवू शकत नाही, तो तुमचे एक दार उघडेल, नशिबाने दुसरे हि उघडेल पण शेवटचे दार उघडायला तुम्हाला तुमची मेहनत, तुमच्या मनाचा तोल आणि प्रत्येक क्षणी आपल्यातले १००% देण्याची तयारी लागते.
काल पर्वाचे जे सामने पहिले त्यातही हेच प्रकर्षाने दिसून आले. आपला एखादा शॉट चुकतो, आपला प्रतिस्पर्धी त्याच वेळी सर्वोत्तम कामगिरी करत असतो, पुढील दोन शॉट वर आपल्याला सर्वोत्तम खेळ करायचा असेल आपल्या मनाचे संतुलन , एकाग्रता न ढळता आपल्याला कामगिरी केली पाहिजे, हे सारे नुसते TV वर बघत असताना आपल्याला टेन्शन येते, प्रत्यक्ष खेळाडूचे काय होत असेल याची कल्पना करा. आणि हेच खेळाडू गेले दोनेक वर्ष यावर मेहनत घेत असतात आणि अक्षरशः काही सेकंदात होत्याच नव्हते होत. भारतासाठी अजूनही वेळ गेलेली नाही काही खेळाडून कडून अजूनही आशा आहे.

बरोबरे..आवडलं! चार वर्षाची मेहनत क्षणात मातीमोल होते. पण खेळाचे हेच स्वरुप असते. सगळेच जिंकू शकत नाहीत. हेच म्हणून काल स्वतःची समजूत काढून घेतलेली...

शेवटच्या सेकंदात खाल्लेल्ले गोल विसरू म्हणलं तरी विसरत नाहीत. अगदी विरेन रस्किन्हा, धनराज होते तेव्हाही हे झालेलं आणि अजूनही तेच होतंय.

असंका's picture

9 Aug 2016 - 4:48 pm | असंका

आज काय काय ?

साडेसातला अर्जेंटिनाबरोबर हॉकी आहे.
पिस्तोल आणि धनुष्यबाण नेमबाजी सुरु होईल दहा मिनिटांत.

असंका's picture

9 Aug 2016 - 5:20 pm | असंका

दत्तू भोकनाळ..रोविंग... त्याची पण मॅच आहे ना आज?

खेडूत's picture

9 Aug 2016 - 5:22 pm | खेडूत

हो...आत्ताच आहे!
आज दीपा कर्माकरचा २३ वा वाढदिवस आहे असे समजले, तिला शुभेच्छा!

असंका's picture

9 Aug 2016 - 5:27 pm | असंका

अरे वा...+१!

खेळणार आहे का ती आज?

वेल प्लेड दत्तू ... त्याच्या हीटमध्ये चौथा आलाय.

रिओ ऑलिम्पिकः रोईंगपटू दत्तू भोकनळ पदकाच्या शर्यतीतून बाहेर, चौथ्या उपांत्य फेरीत दत्तू चौथ्या स्थानावर

असंका's picture

9 Aug 2016 - 6:13 pm | असंका

नै हो...

ही उपांत्य फेरी नवती. ही उप-उपांत्य फेरी होती. उपांत्य फेरी उद्या असेल. आणि दत्तू चौथा आल्याने, सी/डी सेमी फायनल मध्ये त्याला जागा मिळेल. अजून आहे तो स्पर्धेत.

थॉर माणूस's picture

9 Aug 2016 - 8:23 pm | थॉर माणूस

पदकासाठी A/B semi आणि final A असते. A/B semi -> medal finals. Quarterfinals मधले पहिले 3 खेळाडू A/B semi ला पात्र ठरतात. बाकीच्या रेस रॅकींग ठरवण्यासाठी असतात.

ह्म्म्म... आता आलं लक्षात...!!
धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2016 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टेंशन देणा-या सामन्यात मजा आली. भारत २ आणि अर्जेन्टीनाचा ०१ गोल असतांना शेवटची चार मिनिट असतांना तीन पेनाल्टी त्यांना मिळाले, आपला बचाव भारी होता. आनंद वाटला. :)

-दिलीप बिरुटे

साधा मुलगा's picture

9 Aug 2016 - 11:50 pm | साधा मुलगा

हे आणि नेमबाजी यामध्ये आपण पूढे गेलो. दत्तू उपांत्यपूर्व फेरीत हरला, हीना कडून पुन्हा निराशा,
बाकी रात्री 2.45 ला बॉक्सिंग आहे 75 किलो वजनी गटात, विकास कृष्णन यादव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2016 - 9:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंतनु दास ही जिंकून पुढील फेरीत गेला. बरा दिवस गेला.

-दिलीप बिरुटे

थॉर माणूस's picture

9 Aug 2016 - 9:19 pm | थॉर माणूस

त्याचे 2 सामने होते आज. दोन्ही जिंकून 1/8 राऊंड गाठलाय. पण आता पुढचा सामना कोरीयाशी असणार आहे. जिंकण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार.

साधा मुलगा's picture

10 Aug 2016 - 12:02 am | साधा मुलगा

प्रकाश नंजाप्पा , जितू रे 50 मी पिस्तूल नेमबाजी, 5.30 वाजता
तिरंदाजी बोम्बयला देवी 6.09 वाजता
दीपिका 1.27 वाजता
जुडो-अवतार सिंग 7.19 वाजता
महिला हॉकी 7.30 वाजता भारत वि. ऑस्ट्रेलिया
दत्तू भोकनल रँकिंगची मॅच 7.50 वाजता
64 किलो वजनी गटात बॉक्सिंग मध्ये 3.00 वाजता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2016 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहिती बद्दल, आभार..!!!

-दिलीप बिरुटे

साधा मुलगा's picture

10 Aug 2016 - 10:53 am | साधा मुलगा

सानिया, बोपनां मिक्स दुहेरी रात्री 12 वाजता, वि ऑस्ट्रेलिया

थॉर माणूस's picture

10 Aug 2016 - 9:00 pm | थॉर माणूस

जीतू रे बाहेर. बोम्बयला देवी विजयी. अवतार सिंग 1/32 राऊंड मधे हरला. हाॅकीमधे भारताची वाईट हार.

असंका's picture

10 Aug 2016 - 9:34 pm | असंका

. हॉकीत...किती वाईट हार?

थॉर माणूस's picture

10 Aug 2016 - 11:08 pm | थॉर माणूस

1-6 नी हरल्या. तिरंदाजीमधे बोम्बयला देवी प्री-क्वार्टर्स मधे आहे आणि आता दिपिकाचे सामने सुरू होतील.

थॉर माणूस's picture

11 Aug 2016 - 2:06 am | थॉर माणूस

दीपिका कुमारी पुढच्या फेरीत पोहोचली

असंका's picture

11 Aug 2016 - 7:47 am | असंका

अरे वा! चांगला दिवस...!

थॉर माणूस's picture

10 Aug 2016 - 4:20 am | थॉर माणूस

बाॅक्सिंगमधे क्रिश्नन विजयी. प्री-क्वार्टरस् मधे पोहोचला.

लालगरूड's picture

10 Aug 2016 - 8:33 am | लालगरूड

β शोध मराठमोळ्या दत्तूच्या
पराभवाचा ( संजय दुधाणे )
10 ऑगस्ट 2016 - 07: 55 AM IST
माझी शेवटची इच्छा एकच आहे , माझ्या गावाला
पिण्याचे पाणी मिळू दे असे सांगून बीबीसीवर
मुलाखत देणार्या मराठमोळ्या दत्तू भोकनळची
ऑलिम्पिक पदकाची तहानही तृप्त होऊ शकली
नाही . खिन्न मनाने तो लागोवा स्टेडियममधून
बाहेर पडला तेव्हा तो एकाकी दिसत होता . ना
त्यांच्यासोबत प्रशिक्षक दिसले , ना चाहते , ना
रोईंग संघटनेचे पदाधिकारी, ना भारतीय
ऑलिम्पिक महासंघाचे कारभारी . मला अधिक
चांगले प्रशिक्षण लाभले असते तर मी देशासाठी
अजून मोठा पल्ला गाठला असता , माझ्या
पाठीमागे केवळ आईचे आशीर्वाद होते ही त्याची
प्रतिक्रियाही खूप बोलकी ठरली .
अवघ्या तीन वर्षात भोकनळने नाशिक ते रिओ
अशी मजल मारून सार्या देशाचे लक्ष वेधून घेतले
होते . ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठेपर्यंत
त्याला फारसे कोणी ओळखत नव्हते . रिओमध्येही
तो कमालीचा एकटा पडला होता . सेनादल आणि
भारतीय रोईंग संघटनेची तू - तू -मे -मे असल्याचाही
मोठा फटका भोकनळला बसला. पहिल्या फेरी
जिंकली तेव्हाही त्याचे अभिनंदन करण्यास
भारताचे कोणीच लागोवा स्टेडियममध्ये नव्हते .
त्याने धडाकेबाज कामगिरी करताच
क्रीडाग्रामत त्याचे नाव चर्चेत आले . उपांत्यपूर्व
फेरी पहाण्यासाठीही बोटावर मोजण्या
इतकेची भारतीय प्रेक्षक हजर नव्हते . काही मराठी
पत्रकार आणि एक दिल्ली आकाशवाणीचा
समालोचक. इनमीन चारच भारतीयांनी त्याचा
खेळ पाहिला . अमेरिका , रशिया , इंग्लंड, पोलंडचे
ध्वज स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या हाती फडकत
असताना तिरंगा कोठेच दिसत नव्हता.
रिओत लाटेवरील हालत्या पाण्यात भोकनळचा
वेग मंदावला . पहिल्या फेरीपेक्षा थोडी
कामगिरी सुधारली तरी वाहत्या पाणीतील
सराव मिळाला नसल्याने तो मागे पडत गेला .
त्यात स्पर्धेपूर्वी त्याने अमेरिकेत प्रशिक्षण घेतले
होते . तेथिल सराव काहीच फायदेशीर ठरला
नाही . त्याचे प्रशिक्षकांचे घर अमेरिकेत असल्याने
त्यांनी सेनादलाला अमेरिकेत प्रशिक्षण
घेण्याची विनंती केली . मितभाषी दत्तूू
सेनादलाच्या शिस्तीत खेळाडू घडला आहे . तो
सेनादलात साधा जवान असल्याने त्याला
आपल्या प्रशिक्षणाबाबत काहीच बोलता आले
नाही . प्रशिक्षक अमेरिकेतील घरी राहत होते तर
भोकनळ हॉटेलवर एकटाच असायचा . ना फिजिओ ,
ना मानसतज्ञ, ना मदतीला कोणी . असा लढा
देत तो रिओत दाखल झाला होता . तरीही
त्याच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने परिपक्व
असणार्या खेळाडूंची तो झुंजत राहिला.
महाराष्ट्रही पाठीशी उभा राहिला नाही
अशी भोकनळची खंत आहे . महाराष्ट्र शासनाने
पाच लाख दिले असले तरी ते खूप उशिरा. मूळात
रोईंग आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्याला
विशेष सहकार्य केले नाही . सेनादलाचा असल्याने
खेळातील छोट्या- छोठ्या पण महत्वपूर्ण
बाबींपासून तो वंचित राहिला. मूळात
मानसिकदृष्टया तो दुबळा पडला होता . आई
रूग्णालयात असल्याने तो सरावात पूर्ण लक्ष
केंद्रित करू शकला नाही . रिओत एकाकी झुंज
अपुरी ठरली तर त्याने माघार घेतली नाही . पदक
हे एकटा खेळाडू जिंकू शकत नाही , त्याच्या
यशासाठी अनेक हात गरजेचे असतात हे त्याला
रिओ ऑलिम्पिकने शिकवले आहे . मला यशासाठी
सहकार्य हात लाभो , असे सांगत भोकनळ रिओत
शेवटी म्हणाली की , मी सच्चा सैनिक असून मला
तिरंगा फडकताना पहायचायं हीदेखिल आता
माझी शेवटची इच्छा बनली आहे .

साधा मुलगा's picture

10 Aug 2016 - 11:21 am | साधा मुलगा

असे कितीतरी गुणी खेळाडू वंचित राहतात, ऐकून वाईट वाटलं. सहानुभूतीच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही.

निओ's picture

19 Aug 2016 - 10:49 pm | निओ

रोईंग मध्ये दत्तू बबन भोकनल हे अस्सल मराठी नाव वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तो नॅशनल चॅम्पियन आहे, मिळवेल अजून. ऑल द बेस्ट.

माथाडी कामगार आई-बापांचा मुलगा. तो रोईंग करायला म्हणे २०१२ चं ऑलिंपिक पाहून शिकला, बाकी सगळी कमाई गेल्या चार वर्षांच्या कष्टांची आहे.

खेळाडू ग्रेट्च आहेत आपले, व्यवस्था अन राजकारणात समस्येचं मूळ दिसतंय. दीपा किंवा पूर्वी साईना, त्यांना पालकांनी घडवले त्यांना. मग क्रीडा मंत्रालय काय कामाचे?

चतुरंग's picture

10 Aug 2016 - 10:35 am | चतुरंग

आपल्या बहुतांश खेळाडूंमध्ये कौशल्याची कमी नाहिये. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरेसा सराव, योग्य आहार, शारीरिक तंदुरुस्ती या आघाड्यांवरती जाम बोंब असते, कारण तिथेपर्यंत कसं जायचं हे कोणालाच नीट माहीत नसतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची वर्णी लागेल, कोण वशिल्याचे तट्टू पुढे घुसेल यातली अनिश्चितता भेडसावत असते बर्‍याचदा. त्यामुळे मानसिक तणाव उत्पन्न होतो. मनःस्वास्थ्य हरवले तर कामगिरीवर जोरदार परिणाम होतोच. क्रीडामंत्रालयातले आणि विविध खेळांच्या पदाधिकार्‍यातले अंतर्गत हेवेदावे आणि राजकारण यात खेळाडूंचा, खेळाचा आणि पर्यायाने देशाचा बळी जातो! अन्यथा भारतासारख्या देशाने किमान ५० पदके खेचून आणायला काहीच हरकत नसावी!!:(

(उद्विग्न)रंगा

नाखु's picture

10 Aug 2016 - 11:17 am | नाखु

आवाजम्श्ये का जत्रा मध्ये खेळाडूंपेक्षा बरोबरच्या बाजार बुणग्यांचा ताफा जास्ती (आणि खर्चीकही) असल्याचे व्यग्नचित्र आले होते. ज्यावर्षी अत्यंत निराशाजनक कामगीरी होईल त्या वर्षी त्या अधिकार्यींची दुसर्या खात्यात (आणि मूळ खात्यासी संबध नसलेल्या विभागात पदावनती करावी) तसेच उत्तुंग यश मिळाल्यास प्रशिक्षक आणि मदतनीस सहकार्याम्चा य्थोचित सन्मान्+बढती करावी म्हणजे जरा उत्तेजन प्रोत्साहन मिळेल.

अर्थात ही माझी मते आहेत याला अनेक अडचणी किंवा आक्षेप असू शकतात.

झारीतील शुक्राचार्यांनी जवळच्या मित्राची केलेली परवड पाहिलेला नाखु

दुर्दैवाने केवळ हळहळ व्यक्त करण्यापलिकडे आपण फारसं काही करू शकत नाही. दत्तू भोकनळचा अभिमान वाटतो. त्याला किमान एखादं पत्र लिहून आपण त्याचा हुरूप वाढवू शकतो.

गडी लढला पण, अंतनु दास बी चान्गल खेळतय, योगेश्वर दत्त च्या कुस्ती ची वाट बघतोय, रविवारी २१ ऑगस्ट
कुस्ती कडुन अपेक्षा आहेत.

चतुरंग's picture

11 Aug 2016 - 7:34 am | चतुरंग

फ्रीस्टाईल फायनल सुरु होतेय!! :)

चतुरंग's picture

11 Aug 2016 - 7:43 am | चतुरंग

अमेरिकन नेट अ‍ॅड्रिअनला हरवून ऑस्ट्रेलियाचा काईल चामर्स विजेता!! :)

काय तयारी राव एकेकाची, कसल्या संट्या बॉड्या!! आपले खेळाडू कधी दिसायचे असल्या ठिकाणी??

खेडूत's picture

11 Aug 2016 - 8:06 am | खेडूत

:)
काल महिला हॉकीत पण सर्व ऑस्ट्रेलियन भारतीय मुलींपेक्शा फारच उंच आणि फिट होत्या.

आज बॅडमिंटन. नक्कीच पहाणार.

चतुरंग's picture

11 Aug 2016 - 9:41 am | चतुरंग

किती वाजता?

ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा- तिकडे ८ वाजता. भारतात साडेचारला आहे.
साडेपाचला अत्री मनू आणि सुमित रेड्डी. त्याच वेळी दीपिका कुमारी आणि बोमल्यादेवी- धनुष्यबाण चालवतील.
साडेसहाला पी सिंधूची मॅच, त्यचवेळी हॉलंडसोबत हॉकी!
अन साडेसातला साईना नेहवाल्चा सामना!
एकूण काय, आज मेजवानी आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2016 - 12:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त मेजबानी.

-दिलीप बिरुटे

लालगरूड's picture

11 Aug 2016 - 6:00 pm | लालगरूड

अपडेट टाका

थॉर माणूस's picture

11 Aug 2016 - 8:30 pm | थॉर माणूस

मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर
गुट्टा-पोनप्पा बॅडमिंटन बाहेर
बोम्बयला देवी तिरंदाजी बाहेर
दीपिका तिरंदाजी बाहेर
शिव थापा बाॅक्सिंग बाहेर
पुरूष हाॅकी सामन्यात हरले
सिंधू बॅडमिंटनमधे विजयी

असंका's picture

11 Aug 2016 - 8:33 pm | असंका

नवते अपडेट तेच बरं होतं म्हणायची पाळी आली ना?

:(

थॉर माणूस's picture

11 Aug 2016 - 10:00 pm | थॉर माणूस

बॅडमिंटन मधे चुकून बाहेर लिहीले गेले आहे. आजचे सामने हरले तरी अजून पुढच्या फेरीत जाण्याची संधी आहे. चोप्य-पस्ते करताना घोळ झाला. ☺

बॅडमिंटन एकेरीमधे साईना आणि सिंधू आपापल्या पहिल्या फेरीत विजयी झाल्या.

हाॅकीचा खेळ मस्त झाला.. अगदी interesting..