पत्ता

टीपीके's picture
टीपीके in जनातलं, मनातलं
23 Jul 2016 - 11:34 am

नाही, मी माझा पत्ता नाही सांगत आहे इकडे, त्या आणि ह्या धाग्याचा काहीच संबंध नाही

तर आता मुख्य विषयाकडे ,

मला वाटत जेव्हा केव्हा मानवी संस्कृती निर्माण झाली , माणसाला एक ठिकाणाहून दुसरीकडे मुद्दामून जायची गरज निर्माण झाली, किंवा दुसऱ्याला पाठवायची/ बोलवायची गरज निर्माण झाली, तेव्हा पासून पत्ता या संकल्पनेची सुरवात झाली असेल. त्यातूनच एखाद्या मानवी वस्तीला गाव संबोधून त्याला नाव देणे, रस्त्याला नाव देणेही चालू झाले असेल. अर्थात पत्ता हि संकल्पना का निर्माण झाली याचा हा शोध निबंध नाही.

विकसित देशांत पत्ता देणे हे तसे सोपे काम आहे, म्हणजे घर क्रमांक, रस्त्याचे नाव, शहराचे नाव आणि पिन/पोस्ट/झिप क्रमांक दिला की झाले. ब्रिटन सारख्या ठिकाणीतर पिन क्रमांकामधे अक्षरे पण टाकल्याने अनेक पर्याय निर्माण झाले आणि एका पिन क्रमांकावर राहणारी लोकसंख्या २००-५००-१००० मधेच नियंत्रित राहू लागली , शिवाय पत्ता सांगणे/शोधणे अधिक सोपे झाले.

अनेक विकसनशील देशात मात्र रस्तेच नाहीत किंवा त्यांना नाव नाही, नियोजन नसल्याने घरांना क्रमांक नाही इत्यादींमुळे पत्ता शोधणे आणि सांगणे हि कटकट आहे. म्हणून अमुक शेजारी, तमुक समोर सारखे पत्ते लिहिले जातात , अनेक ठिकाणी nearest landmark द्यावा लागतो, आणि शोधतेवेळी पानवाला , रिक्षावाला यांना शरण जावे लागते अचूक पत्ता नसल्याने जगभर कित्येक हजार कोटी रुपयांचे नुकसान होते/खर्च वाढतो

खरं तर, पृथ्वी वर गेली अनेक(?) शतक अक्षांश रेखांश यांच्या मदतीने कोणत्याही जागेचा अचूक पत्ता सांगता येतो. परंतु सामान्य माणसाला असा पत्ता लक्षात ठेवणे आणि ठेवला तरी उपयोग करणे अशक्यच. सुदैवाने गेल्या १० वर्षातल्या स्मार्टफोन आणि इंटरनेट प्रसारामुळे लोकेशन शेअर करणे सोपे झाले आहे. परंतु तरीही ऑफलाईन वापरास हा प्रकार थोडा किचकटच आहे .

पण याच संकल्पनेचा वापर करून तंत्र जगाने २-३ सुंदर solutions (मराठी?) तयार (design ?) केली आहेत. त्यांची इथे थोडी ओळख

What ३ words

यांनी पूर्ण पृथ्वीचे ३ मीटर x ३ मीटर असे ५७ ट्रिलियन चौरस तयार केले, इंग्रजी शब्दकोशातून सुमारे ४०,०००
शब्द घेतले , यात खूप कठीण , स्पेलिंग्स मध्ये , उच्चारात गोंधळ होतील असे शब्द काढून टाकले. आणि प्रत्येक चौरसाला table.chair.spoon या format मध्ये नावे दिली , त्यातही खूप कमी, किंवा अजिबात मानवी वस्ती नसलेल्या भागांसाठी थोडे कठीण शब्द तर दाट मानवी वस्तीसाठी थोडे सोपे शब्द वापरले. जगातील १३ भाषांमध्ये हि सोया आता आहे
मंगोलिया हा जगातील पहिला देश ठरला (आणि सध्यातरी एकमेव) ज्यांनी या वर्षी अधिकृतपणे आपली जुनी पिनक्रमांक पद्धत मोडीत काढून हि पद्धत स्वीकारली आहे

फायदे
रोजच्या वापरातले शब्द

तोटे
मला व्यक्तिशः नाही आवडली हि पद्धत, इंग्रजी अद्याक्षरांपर्यंत ठीक पण भारतासारख्या कमी शिक्षित देशात इंग्रजी शब्द वापरून पत्त्ता सांगणे मला जरा कठीण वाटते
येथे sequence नाही , त्यामुळे table.chair.spoon शेजारी moon.spon.tshirt आणि त्या शेजारी ball.laptop.internet असू शकते त्या मुळे सध्या कुठे अहो यावरून जिथे जायचे तिथला असा पत्ता असूनही अंदाज बांधायला उपयोग नाही
फक्त w३w कंपनीलाच माहिती आहे की या ३ शब्दांपासून अक्षांश रेखांश कसे मिळवायचे

प्लस कोड

पद्धत तीच, पण अगदी ३ x ३ इतके लहान नाही , पण ८ x ८ , १० x १० असे भाग , अंक आणि इंग्रजी आद्याक्षरे वापरून १० ते ११ अंकी तुमचा स्वतःचा एक पोस्ट कोड तयार केला आहे. हा कोड जागेचा असतो, माणसाचा नाही. उदा. 7JCMGVC4+24 हा शनिवार वाड्याचा प्लस कोड

फायदे
प्लस कोड तुम्ही गुगल मॅप मध्ये वापरू शकता
तुम्ही 7JCMGVC4+24 इथे असाल तर 7JCMGVC२ हे जवळपासच असेल असा अन्दाज बांधता येतो
एखाद्या प्लस कोड वरून अक्षांश रेखांश कसे मिळवायचे हि माहिती (algorithm ) कोणालाही उपलब्ध आहे

तोटे
इंग्रजी अद्याक्षरांचे ज्ञान तरी आवश्यक

आत्ता पर्यंत तुम्हाला लक्षात आले असेलच की मला प्लस कोड जास्त पटला आहे

आताशा तशी पत्र फारशी लिहिली जात नाही त्यामुळे प्रत्यक्ष आपण हा कोड फक्त पत्ता देताना वापरू शकतो. तुम्ही एखाद्या विमा, फोन, ecommerce, कुरियर किंवा तत्सम कंपनीत काम करत असाल, जिथे प्रचंड प्रमाणात ग्राहकांशी संबंध येतो तर असा कोड वापरायला तुम्ही तुमच्या ग्राहकांना प्रोत्साहित करू शकता. यातून तुमच्या कंपनीच्या वेळ आणि पैशाचीही बचत होईल आणि ग्राहकही संतुष्ट होईल

स्वतःचा व्यवसाय असेल तर असा कोड तुमच्या पत्त्यात टाकू शकता, कोणीतरी नक्की विचारेल, हे काय तेव्हा हा कोड कसा वापरायचा हे सांगू शकता
.
अगदीच काही नाही तर अनेक लोकांपर्यंत हि माहिती पोहोचवून इतरांना हि पद्धत वापरायला प्रोत्साहित करू शकता

समाजतंत्रप्रकटनविचारलेखशिफारससंदर्भ

प्रतिक्रिया

दोन्ही पद्धती भारतीय जनमानसाचा विचार करता तितक्याशा सोयीच्या नाहीत असे वाटते. भारतापुरती वेगळी पद्धत शोधायला हवी असे माझे मत आहे.

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 12:48 pm | संदीप डांगे

+१

नक्की असे का वाटते? हि पध्धत संपूर्ण जगासाठी एकाच आहे. भारतासाठी नक्की काय वेगळे पाहिजे?

तुम्हाला नक्की काय अडचणी दिसतात या पद्धतीत?

मुक्त विहारि's picture

23 Jul 2016 - 11:58 am | मुक्त विहारि

आमच्या डोंबोलीचा पत्ता काय सांगायचा?

टीपीके's picture

26 Jul 2016 - 1:28 pm | टीपीके

मुवि, यात फक्त डोंबिवलीचा पत्ता नाही, ४२१२०१ ने पूर्ण डोंबिवली पूर्व ओळखली जाते , या पद्धतीत तुमच्या घरासाठी एक पिनकोड आहे. तुम्हाला कोणताही अर्ज करायचा नाही आहे, फक्त घरी असताना https://plus.codes या साईट वर गेलात हि तुम्हाला तुमचा पिन कोड दिसेल तो नोंदवून ठेवायचा आणि नंतर वापरायचा

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2016 - 1:31 pm | टवाळ कार्टा

आमच्या डोंबोलीचा पत्ता काय सांगायचा?

मध्यवर्ती ठिकाण

संदीप डांगे's picture

26 Jul 2016 - 1:34 pm | संदीप डांगे

मध्यवर्ती: मध्ये कि वरती?? ;)

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Jul 2016 - 12:42 pm | माम्लेदारचा पन्खा

आता व्यवस्थित पत्ता सांगू शकू कोणी विचारलं तर....बसा शोधत.!

आनन्दा's picture

23 Jul 2016 - 2:08 pm | आनन्दा

ह्म्म.. प्लस कोड अधिक सोपा वाटतो, पण ते बहुधा टेक सॅव्ही लोकांना सोपे पडेल असेही वाटते.

हो, सुरवातीला तसे आहे खरे पण इंटरनेट आणि स्मार्टफोन मुळे हळूहळू इतर जनतेच्याही अंगवळणी पडणे कठीण नाही.

तसेही भारतातील अडाणी जनतेने १९५० च्या दशकात आणे ते नये पैसे ; यार्ड , फर्लांग ते मीटर, किलोमीटर असा प्रवास सहज केला जो अमेरिका, इंग्लंड सारखे प्रगत देश अजूनही नाही करू शकले.

अमितदादा's picture

26 Jul 2016 - 3:20 pm | अमितदादा

पद्दत अवघड आहे पण आवडली. हे करण्यापेक्षा पृथ्वीचे चे एका ग्रीड शिट वर मॅपिंग करायचे आणि एका ठिकाणी coordinate axix चा origin घेऊन प्रत्येक चौरास च्या center चे coordinate काढायचे आणि तेच pincode मानून वापरायचे.

तेच तर आहे काही प्रमाणात , पण अक्षांश रेखांश वापरण्यापेक्षा तेच नंबर्स थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहिले आहेत जे माणसांना वाचता येतील

चित्रगुप्त's picture

14 Jan 2023 - 2:23 pm | चित्रगुप्त

आत्ताच हा धागा योगयोगाने उघडला आणि घरचा पत्ता हुडकण्याचा प्रयत्न केला. परंतु सध्या परदेशात असल्याने गूगल मॅप वर भारतातले घर शोधता आले, तरी या धाग्यात दिल्याप्रमाणे पिन हुडकता आलेला नाही. काय करावे ?

दुसरे म्हणजे या पद्धतीचे नेमके नाव काय आहे ? खूपच उपयुक्त आहे, विशेषतः कोरियर, ओला-ऊबर वाल्यांसाठी.

कंजूस's picture

14 Jan 2023 - 9:11 pm | कंजूस

Map marker ( Android app) by theandroidseb.
https://play.google.com/store/apps/details?id=com.exlyo.mapmarker

यांतून कोणत्याही जागेचे अक्षांश रेखांकन आणि गूगल मॅप लिंक मिळते.
उदाहरणार्थ
महाकाल, इंदौर -
महाकाल, इंदौर
lat/lng: 22.71557,75.85505
http://maps.google.com/?q=22.71557279792141,75.85505224764347

यामधील लिंक वेगळी काढून पाठवावी लागते.
म्हणजे
http://maps.google.com/?q=22.71557279792141,75.85505224764347
हे ब्राउजर वाचतो आणि गूगल मॅपवर दाखवतो ती जागा.

यातले अक्षांश रेखांश मात्र कोणत्याही पद्धतीसाठी देता येतील. कोणत्याही मॅपसाठी.

करून पाहा. पण हा पत्ता नाही. या ऍपमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आणि बहुगुणी वाटत आहे.

चित्रगुप्त's picture

14 Jan 2023 - 9:51 pm | चित्रगुप्त

Plus.codes या संस्थळावर जाऊन इंदौर भागातील घराचा पिन कोड टाकल्यावर नकाशा उघडला. तो झूम करून बरोब्बर घर हुडकून त्यावर क्लिकल्यावर प्लस कोड मिळाला. गंमत म्हणजे वीस गुणिले साठ फुटाच्या प्लॉटच्या या घराचा पुढला भाग, मधला भाग आणि मागला भाग या तिन्हीत (आठ आकडी कोड पैकी) शेवटले दोन आकडे वेगवेगळे येत आहेत. एवढेच काय समोरच्या आणखी मोठया प्लॉट वरील घरात शेवटले तीन आकडे बदलून दहा-बारा कोड येत आहेत.
भारतात अ‍ॅमाझॉन, ऊबर वगैरेंनी, किंवा कारमधून जाणारांनी ही पद्धत वापरणे सुरु केले आहे का ?
दुसरे म्हणजे प्लस कोड आणि गूगल मॅप यात सामंजस्य आहे का ?

टीपीके's picture

14 Jan 2023 - 11:03 pm | टीपीके

हो, गुगल मॅप ला. प्लस कोड समजतो. प्लस कोड वरून अक्षांश रेखांश आणि मग पत्ता काढण्याचा alogiritham ओपन सोर्स आहे. त्यामुळे कोणीही नवीन ॲप तयार करू शकतो.

म्हणतात.
ती एक मीटर पर्यंत जाणाऱ्या रचनाही आहेत. त्यावरच तो प्लस कोड बांधला असावा.

जगातल्या कोणत्याही जागेचा पत्ता फक्त एक विशिष्ट आठ आकडी संख्या, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. या बद्दल आणखी तपशील वा तांत्रिक माहिती कुणी देऊ शकल्यास उत्तमच.
म्हणजे पहिला आकडा काय दर्शवतो, दुसरा काय .... वगैरे. हे कसे साध्य केलेले आहे ?

टीपीके's picture

14 Jan 2023 - 11:06 pm | टीपीके

जसे जसे तुम्ही डावीकडून उजवीकडे जाता तसे तुम्ही मोठ्या चौरसातून आणखी लहान चौरसकडे जाता

१)प्लस कोड मिळवला,
२) कॉपी करून पाठवला (यात चूक होत नाही.)
३) शोधणाऱ्याने वापरला.

लिखीत स्वरूपात नेहमीचा पत्ता चालत राहील. कारण रस्ता,गाव,शहर,राज्य,देश याप्रमाणे आकडे असतात.
पोस्टल पिन कोड हा ओनलाइन शॉपिंग साईट वापरतात. सहा आकडी पिन कोडातील आकडे राज्य,शहर आणि अंतिम पोस्ट ओफिसकडे अचूक नेतात. किंवा त्या ठिकाणी डिलिवरी देणे शक्य आहे का हे कंपूटरही हो/नाही सांगू शकतो.

टॅक्सी सर्वीसवाल्यांना वाटसपमधून लिंक ( ती लिंक map marker app देते) पाठवली की काम होते.

सस्नेह's picture

15 Jan 2023 - 3:33 pm | सस्नेह

रोचक माहिती.
आपण ज्याचा पत्ता शोधणार, त्याला हे अवगत असणे गरजेचे आहे.

टीपीके's picture

16 Jan 2023 - 1:16 pm | टीपीके

नाही गरज. तुमचा प्लस कोड सांगितला की गुगल मॅप तुम्हाला बरोबर रस्ता दाखवतो

चौथा कोनाडा's picture

15 Jan 2023 - 8:02 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण रोचक धागा.
मला प्लस कोड जास्त योग्य वाटतो.

गुगल मॅप्स वरून मला माझ्या घराचा प्लस कोड कसा शोधायचा ?

कंजूस's picture

15 Jan 2023 - 9:13 pm | कंजूस

"तू कुठे आहेस?"
"Plus पाठव",
‌.
.
.
"नाही तर तू MINUS"

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jan 2023 - 12:30 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्लस कोड्स वापरुन माझा पत्ता शोधला. पण
समजा माझी १० मजली इमारत आहे. माझ्या फ्लॅटच्या खाली असणार्‍या फ्लॅटचाही कोड तोच येइल का? तसे झाले तर वेगवेगळ्या मजल्यावरचे फ्लॅट वेगळे कसे ओळखायचे?

हो, अक्षांश रेखांश हे द्वी मितिय आहेत त्या मुळे तुम्हाला फ्लॅट नंबर 2201, आणि तुमचा प्लस कोड सांगावा लागेल

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jan 2023 - 1:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद!!

मोबाईलवरून एम्बेड नाही करता येत पण हे YouTube व्हिडिओज प्लस कोड समजायला मदत करू शकतात

https://youtu.be/LJ9zEkXearU

https://youtu.be/GQAY6mTS0dQ

https://youtu.be/HhwyxmZTIvs