सर्वत्र काळोख पसरलेला होता पाऊलं कुठल्या दिशेनं पडत होती याचाही संदर्भ लागत नव्हता मी भ्रमिष्टा अवस्थेत चालत होतो, मला मन आहे विचारशक्ती आहे याचं भानचं नव्हतं! गत आयुष्यातील घटनांचा आढावा घेतांना खरचं वाटतं नव्हतं आपण इतकं काही भोगलय पण आता त्या आठवणी सुध्दा सोबत सोडतील, कळलच नाही चालता चालता घरा पर्यंत येऊन पोहोचलो मी घरात आलो बाजारातुन घेतलेलं सामानं घेतलं आई आणि भाऊ झोपलेले होते मी त्यांना अखेरचं डोळे भरुन पाहिलं आणि मागच्या पाईपने अवनीच्या रुममध्ये प्रवेश केला ती माझीच वाट पाहात होती मी आत आलो, तीने माझा धरुन मला गणपतीच्या मुर्ती जवळ आणलं आणि म्हणाली आपण यांच्याच साक्षीनं लग्न करु! मी मंगळसुत्र तीला घातलं नंतर कुंकू लावलं कारण काही क्षणांसाठी का होईना आम्हांला एकमेकांच व्हायचं होतं आणि त्यावर लग्न हाच पर्याय होता कारण लग्नानंतरची स्वप्न पुर्ण करायला आम्ही जिवंत नसू आणि जिवंत राहिलो तरी हा समाज आमची कुटुंब आम्हांला जगू नाही देणार, मी अवनीच्या हातात विषाची बाटली दिली,तीने विषन्न मनाने पाण्याच्या ग्लासात बाटली रिकामी केली, दोघांनी पाण्याचा ग्लास हातात घेऊन एका दमात प्यालो....! 'हातात हात गुंफले गेले' आम्ही दोघेही जिव सोडून ही ईहलोकातील वस्त्रे त्यागुन अनंतात विलीन झालो! आम्ही निघुन गेलो, खूप दूर! जिथे आम्हाला प्रेम करण्यापासुन कोणिचं नाही थांबवणार ह्या निर्दयी जगात आमच्या सारखे कित्येक जिवआत्महत्या करतात फक्त प्रेमाखातर....
प्रतिक्रिया
13 Jul 2016 - 7:17 pm | Bhagyashri sati...
वाचक वर्ग आमच्यावर रुसलेला दिसतोय:(
13 Jul 2016 - 7:35 pm | मराठी कथालेखक
भाग्यश्री ,
तुझं लेखन निश्चितच सुधारत आहे...ही तुझी पहिलीच कथा होती. प्रतिसादांचा विचार करु नकोस, लिहित रहा.
लिहिण्याची फक्त एक अट आहे की , कोणतंही लेखन प्रथम तुझ्या पसंतीस उतरायला हवं..तुला स्वत:ला पुन्हा पुन्हा वाचूनही ते नेहमीच आवडत रहायला हवं..प्रतिसाद मिळत रहातीलच.
समस्त मिपाकर मंडळी,
इथे एक बारावीची विद्यार्थिनी लेखन करत आहे..कृपया तिचे मनोधैर्य उंचवूयात
14 Jul 2016 - 9:07 am | पेशवा भट
तेच म्हणतोय नको त्या धाग्यावर लोक पिंगा घालतात...
तै तुम्ही प्रत्येक पुढच्या धाग्यात मागच्या सगळ्या धाग्याची लिंक द्या की.
14 Jul 2016 - 11:51 am | नितिन५८८
छान लिहिलंय भाग्यश्री
14 Jul 2016 - 8:03 pm | Bhagyashri sati...
तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद पण सर लिंक कशी द्यायची?
14 Jul 2016 - 11:26 pm | टवाळ कार्टा
पिच्चर
15 Jul 2016 - 12:01 am | एस
काय लिहिलंय!
15 Jul 2016 - 8:53 am | Bhagyashri sati...
सर्व भाग वाचा की, मग कळेल......
1 Aug 2016 - 5:47 pm | कुणाल धस
सर्व भाग वाचलेत. छान लिहिले आहे.
उत्तम.
लिखाण थोडे सुधारावे. काही ठिकाणी वाक्य रचना थोडी चुकलेली वाटते.
पुढील लेखास शुभेच्छा.