रात्री सर्व झोपल्यावर मी मागच्या पाईपने आत शिरलो, अवनी रडत होती मला बघताच ती गळ्यात पडून रडू लागली मग दोघांच्या आसवांपुढे पावसाचा वर्षाव कमी पडू लागला, मी तीला समजावून सांगू लागलो पण ती एकतच नव्हती, ती म्हणाली,सम्यंक मी तुझी नाही तर कोणाचीच नाही होणार, आणि तुझीही नाही झाले तर आत्महत्या करणार, मी अवनीला खूप समजवलं पण ती ऐकतचं नव्हती मी म्हटलो ठिक आहे तर मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकतं आपण उद्या सोबत जिव देऊ! अवनी म्हणाली अरे पण आपण पाहीलेली स्वप्न एकत्र जिवन जगण्याची ती सर्व स्वप्न? मी अवनीच्या डोळ्यात पाहात तीला जवळ घेतलं, मी तीला ती सर्व सुखं त्या एका रात्रीतचं देण्याचा प्रयत्न करत होतो आमचं प्रेम श्रृंगार पाहून नियती जणू आमच्यावर हसत होती, पहाटे पहाटे माझ्या घरी आलो, रात्रभर जागुन काढल्याने थोडा वेळ झोपलो, तासभरानंतर उठलो गावात जाऊन विष,कुंकू,मंगळसुत्र घेऊन आलो, संध्याकाळी आईच्या पाया पडलो त्या अखेरच्या आणि तडक घराबाहेर पडलो मी सर्व काही मनभरुन पहात होतो कारण आज आम्ही ह्या जगाला कायमचाच निरोप देणार होतो! जगं पुढं चाललं होतं पण माझ्या आयुष्याची गतीचं थांबली होती रस्ते ओळखीचे असुनही अनोळखी वाटत होते
क्रमशः