काय अवस्था होती माझ्या मनाची अनुभववाचुन समजने कठीन! ह्रदयाच्या फाटक्या वस्त्रात चूर झालेल्या मनाचे तुकडे कितपत सांभाळले जातील? सात वर्षाची सोबत काही क्षणातसोबत तुटणार! नियतीला हे मंजुर होत? माझ्यावर तर दुख:चे आभाळच कोसळले होते, स्वतःला संपवून टाकण्याचे विचार मनात येत होते, प्रेमात जेंव्हा विरह होतो ना तेंव्हा त्या दुखा:पेक्षा जगातलं कुठलचं दुख मोठ नसतं, मीही त्याच विरह अग्नीत जळत होतो, किती स्वप्न सजवली होती आम्ही पण ती सर्व उध्वस्त होणार, नियतीच्या काटेरी चाकानं सर्व आठवणी रक्त बंबाळ होत होत्या, नियतीच्या अदृश्य शक्तीपुढे आज हतबल झालो होतो, साखरपुड्याला आम्हाला आमंत्रण नव्हतं तरी चुपचाप आईला न सांगता साखरपुड्याला ला गेलो आणि एका कोपर्यातुन पाहू लागलो अवनी खूप रडलेली दिसत होती, डोळे आणि चेहरा फार सुजलेला दिसत होता, तीच्या सर्व हालचाली निर्जीव वाटत होत्या आणि तीचं अचानक माझ्याकड लक्ष गेलं, तीच्या डोळ्यातुन अश्रृ ओघळू लागले, मला ही रडू येऊ लागले आणि मी तिथुन निघालो घरी येऊन खूप रडलो, कारण वेदना असह्य होऊ लागल्या, आपली अवनी दुसर्याची होणार ह्या विचारानेच जास्त वाईट वाटत होतं, मी विचार केला आपलीच ही अवस्था आहे तर अवनीचं काय होत असेल, मी तीला त्याच रात्री भेटायचं ठरवलं
क्रमशः
प्रतिक्रिया
13 Jul 2016 - 2:43 pm | Bhagyashri sati...
तांत्रिक कारणामुळे थोडा थोडा भाग प्रकाशित करत आहे.
13 Jul 2016 - 3:30 pm | मराठी कथालेखक
लेखन जमत आहे.
पुढील भाग लवकर येवू द्या..
शुभेच्छा.
13 Jul 2016 - 4:58 pm | Bhagyashri sati...
मनापासुन धन्यवाद