मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 11:42 pm

दिलखेचक! रापचिक! धमाल!
हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा!
सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला.
Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली.
मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला.
मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला.
फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती!
शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो -
जे कट्ट्याला आले त्यांना सलाम!
जे नाही आले त्यांनाही सलाम!
जे वेळ काढून आले त्यांना सलाम!
जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम!
लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम!
या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम!
आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!

हे ठिकाणवावरसमाजराहणीमौजमजाप्रकटनविचारबातमीअनुभव

प्रतिक्रिया

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 6:53 pm | धनंजय माने

ही सान्दय, होऊ अरे उ? आल इस वेल नो?

चांदणे संदीप's picture

5 Jul 2016 - 6:58 pm | चांदणे संदीप

इ मी फिने, थँक यौ! होव अरे यौ? लॉन्ग तिने नो सी!!

सान्द्य

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 7:04 pm | धनंजय माने

में तू फिने. नो सी कॉज़ अस ऑफ़ नाउ अ बी अ बी अ बी

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 8:35 pm | कैलासवासी सोन्याबापु

ससुरे तुमको दसीयन बार बोले रहे, ऊ मुगलसराय स्टेशन के बाहेर का भांग मत खाया करो! हल्ला मचाने लागते हाओ भाईबा

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 9:25 pm | धनंजय माने

वोही वाला गांजा का भाईबा.
अबै आदत लग गया है तो लग गया है, का कर सकते है बताइये!

खटपट्या's picture

5 Jul 2016 - 9:41 pm | खटपट्या

अध्यात्मिक वाटतंय का ?

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 11:23 am | धनंजय माने

एकदम ट्रान्स.
आता स्वतःची स्वतः काही थिअरी बनवायची, चार glorified फोटो काढायचे आणि करायचं सुरु!

नूतन सावंत's picture

6 Jul 2016 - 2:28 pm | नूतन सावंत

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.
वाशी,नवी मुंबई कट्ट्याचे जोरदार वारे व्हायला लागले आणि पावसाला जोर चढायला लागला.कोण कसे येणार ठरायला लागलं.उल्काने मला फोन करून आपण सोबत जाऊ असे सांगितलेले.बोरीवलीहून वाशी बसने जाऊ किंवा ड्रायव्हर मिळाला तर गाडीने जाऊ.एकतर पाऊस आणि मला सोबत न्यायची होती हिरव्या गुलाबाची रोपे.ती रोपे छत्री,पाण्याची बाटली सावरत बोरिवलीपर्यंत धोधो कोसळणाऱ्या पावसात रिक्षा किंवा बसने जाणे म्हणजे निघाल्या निघाल्या सचैल स्नान घडणार होते.म्हणून गाडीचालकाचा शोध अपरिहार्य ,तो सापडलाही,पण त्याला पण तीन दिवसांची ऑफर आल्याने त्याला एका दिवसासाठी अडकवून ठेवणे योग्य वाटले नाही.मग ओला कॅबच्या नादाला पहिल्यांदाच लागायचे ठरले.उल्काने आदल्याच दिवशी मुलाला बरे नाही म्हणून येऊ शकत नसल्याचे कळवलेले.

सकाळी ओला कॅब बोलावून निघाले.कांदिवलीला पोचले तर उल्काचा फोन,”अग तू केव्हा निघणार?”माझे लोकेशन सांगितल्यावर, तिने कुठे घेऊन पाणी साचलंय का?पाऊस कितपत पडतोय वगैरे हवामानाचा अंदाज घेऊन मी उशिरा येईन असा,निरोप दिला..रविवार असल्याने ट्रॅफिक नसल्याने मी तासाभरात म्हणजे ११ वाजताच NMSA ला पोहोचले.तिथे पोचल्यावर लक्षात आलं, ”मी पयली.”(हाहाहा).

रिसेप्शन काऊंटरवर चौकशी केलीत्यांनी पहिल्या मजल्यावर जा असे सांगितले.पण तिथेच लॉबीमध्ये बसले.इतक्यात यजमान पतीपत्नी आले.ते रिसेप्शन काऊंटरवर बोलत होते,पण ओळख नव्हतीच.थोड्यावेळाने ते उभयता माझ्याजवळ येऊन विचारपूस करू लागले.मिपाकर हा पासवर्ड घातल्याबरोबर लॉगिन झाले.मिपाधर्माप्रमाणे ओळख नाहीय असे वाटलेच नाही.

आम्ही बोलत असतानाच प्रचेतस,सगा आणि गणामास्तर(यांना पूर्वी पहिले नव्हते पण काही कट्ट्यांच्या वृतान्तातील फोटोंमुळे चेहरा ओळखीचा वाटत होता.)आले.वल्लीच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे लगेच लक्षात आले,कि हे पिंचीकर.वल्ली यानेकी प्रचेतस आणि सागा यांना मागच्या पुणे कट्ट्याला भेटले होतेच.त्यांचे काही मुंबईकरांकडे लक्ष नव्हते.मीच पाटील पतीपात्नीना हे पिंचीकर असल्याचे सांगितले.आम्ही त्याच्याकडे जाईपर्यंत त्यांनी कंजूसकाकांना फोन लावून ते पोचल्याचे सांगितले.आम्हा तिघांची नजर चुकवून ते पहिल्या मजल्यावर पोहोचलेले.काय करणार? आम्ही तिघेही त्यांना भेटलोच नव्हतो.

इतक्यात पुणेकर आणि रसायनीकर,बोईसरकर,ठाणेकर,सानपाडाकर,पनवेलकर मिपाकर येऊन पोचल्या आणि पोचले.आणखी .काही मिपाकरही आले. त्यांची ओळख नव्हती पण त्याने काही बिघडले नाही.आणि आम्ही त्या अवाढव्य रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला.बघता बघता कोरम पूर्ण झाला.बसण्यासाठी यूटाईपमध्ये टेबले लावण्याची मागणी व्यवस्थापकांनी फेटाळून लावली.मंडळी त्याचे काही वाटून न घेता पटापट खुर्च्या पकडून बसली सुद्धा.

पुणेकर आणि ठाणेकरांनी आणलेला खाऊ उघडून खायला सुरुवात केली आणि तिथले व्यवस्थापक धावून आले.”ये खाना आप नाही खा सकते.”त्यांनी फतवा काढला.पण मिपाकर कसले?शिबिआयच्या आप्प्याची चव मांडीवर डबा ठेऊन घेत होते.टकाने सुरळीच्या वाड्या आणल्या होत्या तर सगाने चितळ्यांची बाकरवडी आणलेली.त्याही हळूहळू संपल्या असत्या.पण विलास पाटील साहेबांनी त्यांच्यातर्फे सगळ्यांसाठी मंचाव सूपची ऑर्डर दिल्मुळे त्या लपवण्यात आल्या.(सगा,एक पाकीट माझ्याकडे आलाय बरं का. पुढच्यावेळी पण आणा बरंका आणि टका,अशावेळी गोड आणायचं ना राव.’ऐतिहासिक’ कट्टा होता.)

इथून पुढे गप्पा ,गप्पा आणि फक्त गप्पाच.सूप घेतल्यावर सगळे अर्ध वर्तुळात उभे राहून फोटोसेशन आणि ओळखीचा कार्यक्रम पार पाडला.स्वीटटॉकर आणि अजया यांनी तेवढ्या गडबडीत डोके जागेवर ठेऊन सर्वांच्या जेवणाची ऑर्डर दिली आणि व्यवस्थापकांच चेहरा हसरा होऊन जीव भांड्यात पडला.एव्हाना काहीजण (कंजूस काकांमुळे कळलं की त्यला सोनेरी धान्यपेय म्हणतात.) घेत खुलू लागले होते.

इथून पुढे किसन शिंदेंचा हा प्रतिसाद वाचावा.

तिथून पुढे ;-आदितीजोशी त्याच्या एका मैत्रीणीला घेऊन उरणहून आल्या.तीनच्या सुमाराला उल्का आली.तोपर्यंत जेवण संपत आले होते.त्याची भरपाई तिने दोन कुल्फी खाऊन केली. गप्पा मारत मारत सगळे निघालो.व्यवस्थापकांनी सगळे व्यवस्थित झाले का?जेवण आवडले का?इत्यादी व्यावसायिक चौकशा केल्या.इतक्या सुंदर सोहळ्याला गालबोट म्हणून तुम्ही फिन्गरबोल दिले नाहीत याची तक्रार करण्यात आली.पुन्हा बाहेर पायऱ्यांवर फोटोसेशन झाले.गप्पा चालूच होत्या.मुविनी टकाच्या लग्नाचे फारच मनावर घेतलेले दिसले.गॅरी ट्रुमन येणार म्हणून अजून थोडावेळ थांबायचे ठरले.
पुणेकर आणि पिंचीकर,सानापाडाकर, पनवेलकर निघाले. चहा मिळेल का?, अशी विचारणा कोणीतरी केली.एव्हाना मूवी आमन्त्रिताच्या भूमिकेतून आयोजकाच्या भूमिकेत शिरलेले होते.(जाणकारांनी कारण ओळखले असेलच).(मुविह.घ्या.,)”कोणाकोणाला हवाय चहा ?’’त्यांनी विचारणा केली.पटापटा हात वर झाले.कोणीतरी शंका काढली,”पण मिळेल का?”आयोजकाच्या भूमिकेत शिरलेले मुवि,”मी आहे ना?चला माझ्याबरोबर म्ह्णत CLOSED चा बोर्ड लागलेले दार ढकलतत रेस्टॉरंटमध्ये शिरले.त्यामागून सगळे मिपाकर आणि सगळ्यात शेवटी पाटील पतीपत्नी.पेमेंट काऊंटरवर कॅशियरबरोबर हिशेब पाहत असलेला व्यवस्थापक आ वासून पाहताच राहिलेला.
पुन्हा गप्पा सुरूच होत्या,चहा आला,गॅरीभाऊसुद्धा आले. त्याच्याबद्दल ते एखाद्या स्कॉलरसारखे दिसत असतील ह् अटकळ खरी ठरल्याचे पाहून आनंद वाटला.पुन्हा ओळखपरेड होऊन समारंभ आटोपता घेण्यात आला.उरलेल्या चौदाजणांचा आवाजही चाळीसजणांएवढाच होता हे नमूद करणे आवश्यक आहे.निघताना व्यवस्थापकांनीपुन्हा एकदा,” व्यवस्था कशी वाटली?” हे विचारताना,”आपका कौनसा ग्रुप?’हेही विचारले ,तेव्हा आजच्या पाहुण्यामध्ये निम्मे एकमेकांना पाहिल्यान्दा भेटले होते आणि पाटील पतीपात्नीना सगळेच पाहिलांदा भेटले होते , हे ऐकून पुन्हा आ वसाला.

मग मात्र तिथून आम्ही सगळेच निघालो आणि कट्टा सुफळ संपन्न झाला.

अवांतर:-श्री विलास पाटील यांना असोशिएशनच्या व्यवस्थापने नोटीस दिली पाहिजे असे तिथल्या कर्मचाऱ्यांचे मत उघडपणे दिसून येत होते.

मस्त सविस्तर वृत्तांत.

मिपाकर हा पासवर्ड घातल्याबरोबर लॉगिन झाले. मिपाधर्माप्रमाणे ओळख नाहीय असे वाटलेच नाही.

अगदी खरं.
हा वृत्तांत वाचून रविवार महाकट्टा डोळ्यासमोर आला.
एक दुरुस्ती - मी दोन नाही दीडच कुल्फी खाल्ली गं. हो, उगीच सगळे खादाड समजतील ना. :प =))

अदि's picture

7 Jul 2016 - 7:49 pm | अदि

इतक्यात प्रतिसाद लिहिणारच नव्ह्ते मुळी.. आम्ही उशिरा येउन लवकर गेलो तरी काय झालं, बोका सरांनी आमचा फोटो टाकायला हवा होता.. :( :( :P ;) सुरन्गी तै, अदिती जोशी नाही, अदिती पाटील म्हात्रे. आणि ती माझी बहिण होती.. :) :D...

त्यांच्या हातून राहून गेला असेल.

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 9:08 pm | धनंजय माने

लग्नात येऊन सुद्धा अल्बम मध्ये नसल्यावर काय दुक्ख होतं ते यांना काय ठाऊक ;)
(सगळ्या पार्ट्यांनी हलकं घेऊन लवकरात लवकर करवलीचा रुसवा काढावा. ;) )

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 9:08 pm | धनंजय माने

लग्नात येऊन सुद्धा अल्बम मध्ये नसल्यावर काय दुक्ख होतं ते यांना काय ठाऊक ;)
(सगळ्या पार्ट्यांनी हलकं घेऊन लवकरात लवकर करवलीचा रुसवा काढावा. ;) )

नूतन सावंत's picture

9 Jul 2016 - 2:42 pm | नूतन सावंत

कान पकडून आय माय स्वारी बरंका!

सविता००१'s picture

6 Jul 2016 - 4:18 pm | सविता००१

वृत्तांत, कट्टा आणि फोटोज.
जबराट

चांगला लिहिलाय वृतान्त सुरन्गी.मिपाकरांचा हा पहिलाच महाकट्टा झाला म्हणून सगळे अतिउत्साहात होते.तसा एक वार्षिक कट्टा करण्याचा प्रयत्न कशेळे येथे मागच्या वर्षी झाला होता.ती जागा एवढी दूर रानात असूनही २६ जण जमलेले.त्याअगोदर घारापुरी लेण्यासाठीही २८ जण होते.शहरांमध्ये जागेची अडचण होत आहे आणि महागही होत आहेत.हॅाटेलात घरून/बाहेरून आणलेले पदार्थ खाऊ देत नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवलेच पाहिजे.उगाच बोलून घेण्यात काय मजा? पुढच्या वेळेस अशा जागा निवडायला हव्यात अथवा हे टाळायला हवे.

अजया's picture

6 Jul 2016 - 4:43 pm | अजया

=)))
माझ्या डोळ्यासमोर कुल्फीमागुन कुल्फी हादडणारी उल्का आलीच!!!

उल्का's picture

6 Jul 2016 - 4:52 pm | उल्का

=)) =))
तुझा एक वाटा व शिबीआय चा एक वाटा जास्तीचा खाल्ला. टुक टुक

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 5:36 pm | धनंजय माने

दोनशे करा आता! जवळ आलंय.

आणि ह्या जागी जेवण करण्यासाठी मेंबर असावं लागतंय का?
खर्च किती आला होता? (जेवण/ स्टार्टर/ सोनेरी पेय)
किती मेंबर कमीत कमी लागतात टेबल बुक करायला?

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 5:36 pm | धनंजय माने

दोनशे करा आता! जवळ आलंय.

आणि ह्या जागी जेवण करण्यासाठी मेंबर असावं लागतंय का?
खर्च किती आला होता? (जेवण/ स्टार्टर/ सोनेरी पेय)
किती मेंबर कमीत कमी लागतात टेबल बुक करायला?

सुबोध खरे's picture

6 Jul 2016 - 8:35 pm | सुबोध खरे

स्टार्टर + जेवण रुपये ३००/- फक्त माणशी. मेनू मी वर लिहिला आहेच. इतक्या स्वस्त फक्त मिसळ पावाचा कट्टा होऊ शकतो.
सोनेरी पेयांचे माहीत नाही. ते वायले.

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 9:33 pm | धनंजय माने

चंगळ केलासा की लोकहो!
नेष्टाइम आमी येनार. ठरवू कट्टा!
चालंन का यजमान पाटील सायेब?

केव्हाही या. NMSA घरचेच आहे.

टवाळ कार्टा's picture

6 Jul 2016 - 9:38 pm | टवाळ कार्टा

सोनेरी पेय माणशी २०० , ३ ग्लास

संदीप डांगे's picture

6 Jul 2016 - 11:49 pm | संदीप डांगे

माला दोन् च मिळाले.... :(

हा मेंबर साठीच क्लब आहे . त्यामुळे जेवण करण्यासाठी मेंबर असावं लागतं. म्हणूनच ईवडी स्वस्ताई होती !

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 10:21 pm | धनंजय माने

विवेक पाटील यांना खरंच मानायला पाहिजे मग!
(पुढच्या कट्टयासाठी फील्डिंग च्या प्रयत्नात) प्यारेमाने

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Jul 2016 - 11:17 pm | माम्लेदारचा पन्खा

खूब जमेगा रंग... जब मिल बैठेंगे मिपा के सब यार....

सोनेरी पेयासाठी होवू द्या एक कट्टा

विपा's picture

7 Jul 2016 - 7:48 am | विपा

NMSA ला सोनेरी पेय 365 दिवस मिळते. निवडणुकांच्या वेळी आचार संहितेचे दिवस सोडल्यास. ड्राय डेला पाहुण्यांसाठी प्रवेश फी मात्र चौपट असते. नाहीतर आतमध्ये फक्त पाहुणे व सदस्य बाहेरच राहायचे.

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 4:57 pm | धनंजय माने

जियो!

अरे यिउन यिउन यनार कोन
सायबानशिवाय हायेच कोन!

(थोड़ी मजा बरंका)

वाशी कट्टा बुकिंग सुरु करा.
गणपती नायतं दिवाळी नक्की हाय!

या कट्ट्याला आलेल्या प्रत्येकाने कट्टा enjoy केला हे समाधान बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठं आहे! _/\_ सर्वांचे आभार!

बोका यांच्या लागोपाठ दोन धाग्याने डबल सेंचुरी केल्यामुळे त्यांना मिपाचे "विनोद कांबळी" असा पुरस्कार द्यावा असे जेपी, नाखु यांना सुचवतो.

बोका यांच्या लागोपाठ दोन धाग्याने डबल सेंचुरी केल्यामुळे त्यांना मिपाचे "राहुल द्रवीड" असा पुरस्कार द्यावा असे जाहीर करण्यात येत आहे.

(कांबळी म्हणून उगा अवमुल्यन करू नै) धीराची फलंदाजी राहुल द्रवीडच करू शकतो

त्याबरोबर कट्टा याचा विशेष सत्कार करण्यात येईल (त्या निमीत्तने पुनरुज्जीवीत झालेला, त्याचा बहुचर्चीत धागा कुठलाही नैराश्यावाद न येता पाचशेकडे धावत आहे)

नाखु दुरुस्तीवाला

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 9:39 am | धनंजय माने

नाखु काका, तेव्हा विनोद कांबळी खरंच खूप छान खेळायचा. त्याचा अप्प्रोच तेव्हा खुपायचा पण आजच्या युवराज, कोहली वगैरेंच्या समोर तो काहीच नाही असं वाटतं. त्याच्या लागोपाठ दोन डबल सेंच्युरी खरंच सुन्दर आणि प्रशंसनीय आहेत.
(नंतर स्वहस्ते डबडं करुन घेतलं ती गोष्ट वेगळी.)

नाखु's picture

8 Jul 2016 - 9:57 am | नाखु

त्याच्या खेळन्याबद्दल कधीच आक्षेप नव्हता आणि नाही पण स्वतःच्या हाताने माती करून घेऊन वर इतरांवर दुगाण्या झाडल्यामुळे पुरता मनातून उतरला. खेळातील दर्जाबाबत गांगुलीपेक्षा काकणभर सरसच होता हे नक्की.

या कट्ट्याला येण्याची पुर्ण तयारी केलेली होती. मात्र ऐनवेळी उदभवलेल्या काही व्यक्तीगत अडचणींमुळे येऊ शकलो नाही.
असो
कट्टा सुरेख झाला याचा आनंद वाटतो.
आयोजकांचे विशेष अभिनंदन !!!

जगप्रवासी's picture

12 Jul 2016 - 6:58 pm | जगप्रवासी

भावाला पण नेमकं त्याच दिवशी घर शिफ्ट करायला सुचावं..... आयला इतका झक्कास कट्टा हुकला.

दीपा माने's picture

12 Jul 2016 - 10:57 pm | दीपा माने

मिपा कट्ट्याची धमाल वाचुन आणि फोटो पाहून खुपच आनंद वाटला कारण तेथे आलेले काही मिपाकर प्रथमच जरी भेटत होते तरीही त्यातील आत्मीयता फारच आवडली.
न्युयाॅर्कच्या आमच्या कट्ट्याला पायाच्या दुखापतीमुळे जाणे ठरवू शकले नाही.
भारतात येणे होईल तेव्हा जर महाकट्टा (आता यापुढे महाकट्टेच होत रहातील) असल्यास नक्कीच भेटेन.
आयोजकांचे मन:पुर्वक अभिनंदन.