पहिल्या भागाची लिंक ===> http://www.misalpav.com/node/34821
आमची स्वीटी (लॅब्रेडॉर जातीची) देवाघरी गेली आणि मी मानसीक रोगी झालो.(साधारणपणे कुत्री पाळणारे बहूतेक जण ह्या स्थितीतून जातात.)
मी जिथे असेन तिथे स्वीटी माझ्या जवळच असल्याने, तिचा विरह मला सहन होईना.बायकोच्या आणि मुलांच्या लक्षांत ही गोष्ट आली.३-४ दिवस रडण्यातच गेले पण मनाला काही आराम मिळेना.शेवटी एक दिवस बायको म्हणाली की, आपण आता अजून एक कुत्री पाळू या.
ह्या वेळी मात्र एक ठरवले की, मोठे कुत्रे घेण्यापेक्षा एखादे छोटे-खानी कुत्रे घेवू.
छोट्या कुत्र्यांची माहिती घेतांना बरीच कुत्री डोळ्यासमोर आली.
१. पामेरियन
२. पग
३. बीगल
४. पूडल
५. स्नित्झू (Snih Tzu)
बायकोच्या आणि मुलांच्या बरोबर विचारमंथन केले आणि "बीगल." आणायचे नक्की केले. कुत्री आणायची आणि तिचे नांव "लिली." असे ठेवायचे हे पण त्याच वेळी ठरले.
बीगल बद्दल थोडी माहिती घेतली आणि त्यावेळी गूगलबाबाने मदत पण केली.
बीगल बद्दल मिळालेली माहिती...
१. विकिपेडिया ===> https://en.wikipedia.org/wiki/Beagle
ही माहिती मराठीत किंवा हिंदीत नसल्याने गुजरातीत वाचली.(मला इंग्रजीपेक्षा गुजराथी जास्त समजते.)
https://gu.wikipedia.org/wiki/%E0%AA%AC%E0%AB%80%E0%AA%97%E0%AA%B2
गूगलबाबाने अजून काही माहिती दिली.
http://www.yourpurebredpuppy.com/reviews/beagles.html
http://www.beagles-on-the-web.com/considering.html
http://dogtime.com/dog-breeds/beagle
http://www.petmd.com/dog/top_tens/evr_dg_top_10_for_kids (ह्या साईट मध्ये "बीगलचा नंबर ९वा असला तरी, पण ह्या वाक्यामुळे (Beagles are fit well in homes with active kids, as they are sturdily built and never too tired to play a game. Smart, friendly, and happy, the Beagle usually gets along with other pets, too (except for a bit of chasing here and there), बीगलला प्राधान्य दिले गेले.
http://www.petwave.com/Dogs/Breeds/Beagle/Personality.aspx (ह्या साईट मुळे "बीगले"ची वर्तणूक समजणे सोपे गेले.)
आता यु-ट्यूब वर काही मिळतंय का बघू या म्हणून शोधले तर बरेच व्हिडियो मिळाले...
https://www.youtube.com/watch?v=5FPbIuAKuHI
माझा एक आवडता व्हिडियो (https://www.youtube.com/watch?v=xcxnHETheH0)
https://www.youtube.com/watch?v=vVU4uea36iA
https://www.youtube.com/watch?v=CSOU88K6gSo
Funny "Beagley" Things! Why You Should Get A Beagle Dog.====> https://www.youtube.com/watch?v=f8qxlkbGGyE
वरील माहितीमुळे बीगल घ्यायचे नक्की झाले आणि आमच्या ओळखीतल्या एका पेट-शॉप वाल्याकडे फीमेल-बीगलची मागणी नोंदवली.
बीगल घ्यायचे ठरवल्या नंतर आमच्या पेट शॉप ओनरने विचारले, "क्या आप केघर में हर एक चीज़ टेबल के उपर है.और क्या आप के पास बहूत समय है."
मी हो म्हटले.
बीगल घरात आले आणि ५ मिनिटातच तिने घर आपलेसे केले.म्हणजे सगळ्या घरात शू करायला सुरुवात केली.जनरली कुत्री आपली हद्द त्यांच्या शूनेच आखून घेतात.
गेले ३-४ महिने, बीगलचा अभ्यास करून समजलेली (समजलेली म्हणण्यापेक्षा, स्वानुभवाची) माहिती.
१. बीगलच्या जीवाला स्वस्थता हा प्रकार नसतो.सतत काहीतरी चाळा हवा असतो.
२. उकडलेल्या भाज्या असोत किंवा भाजलेले दाणे, आमच्या लिलीला आवडतात.चिकन आणि अंडी विशेष प्रिय.
३. झोपण्याच्या आधी भिंत आणि गादी उकरायची सवय.
४. तिला काही हवे असेल तर माझ्या हाताशी चावा-चावी करणे. विशेषतः भूक लागली की आणि खेळावेसे वाटले की. (मी म्हणजे तिचे हक्काचे गिर्हाईक)
५. इतर कुत्र्यांच्या बरोबर फार लवकर मैत्री करते आणि चावाचावी न करता व्यवस्थित खेळते.
६. शू आणि शीचे सवय २-३ महिन्यातच लागली.(आता ह्यात आमचा अनुभव कामाला आला की "बीगल"चा तो स्वाभाविक गूण आहे, हे आता पुढे दुसरी कुत्री घेतली, की मगच समजेल)
७. सध्या तरी रात्री-बेरात्री उगाच भुंकत नाही.
८. केस गळण्याचे प्रमाण आणि संख्या बर्यापैकी कमी आहे.
९. बेलचा आवाज आला के लगेच दाराकडे धावते.
१०. भयंकर वाभरट आहे.रस्त्यावर फिरायला काढले की, सगळा रस्ताभर धावायचे असते.मुळात ही जात शिकारी, त्यामुळे घरात त्यांना कोंडल्यासारखे होते.शेतात जरी घर असले तरी ह्यांना कुंपणातच ठेवायला लागते.
११. प्रचंड माणूसप्रेमी.घरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी तिला लगट करायची असते.
१२. गंध घेत माग काढायची विलक्षण हातोटी.
एक किस्सा,
तिला फिरायला काढले की, नेहमी ती एका विशिष्ट दिशेला जायचा प्रयत्न करायची.रोज-रोज तिचे तेच नाटक.एक दिवस विचार केला आणि ठरवले की आज हिचे ऐकूया.ती माग काढत काढत एका इमारतीत शिरली आणि त्या इमारतीतल्या एका घरापाशी ठिय्या देवून बसली.त्या घरतली कुत्री पण हिचा वास आल्यावर भुंकायला लागली.त्या घरच्यांनी पण हिला आणि आमच्या कुटुंबियांना घरात घेतले.
आता तर आमची कुत्री त्यांच्या घरातली कुत्री ("बॉस्की" नावाची अल्सेशियन) चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.
बीगलेचे दुर्गूण....
१. अंगात प्रचंड उर्जा, मस्ती,सहनशक्ती आणि काटक.त्यामुळे तिच्या उडीच्या आसपास किंवा तिच्या हातात सापडणार्या प्रत्येक गोष्टीचा सत्यानाश.
२. शिस्तीची अजिबात आवड नाही.त्यामुळे बस, उठ, खा, अशा साध्या गोष्टी शिवायला पण १०-१२ दिवस लागले.अद्यापही एका जागी २-३ मिनिटाशिवाय एका जागी बसत नाही.
३. वासावरच जगत असल्याने, फ्रीजचे दार उघडे राहिले की लगेच फ्रीज मधील वस्तू पळवते.
४. सतत घराबाहेर जायचे असते.त्यात ह्यांच्या पायांचा अजिबात आवाज येत नाही आणि पटकन दिसत पण नाहीत, त्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवता येत नाही.
थोडक्यात काय तर, एका वाक्यात सांगायचे म्हणजे, लॅब्रेडॉर जर देखणे असतील तर बीगल म्हणजे कलंदर.
पुढच्या भागात आपण ओळख करून घेणार आहोत एका अतिशय रुबाबदार कुत्र्याची, म्हणजेच जर्मन शेपर्ड उर्फ अल्सेशियनची.
प्रतिक्रिया
25 Feb 2016 - 2:32 pm | एस
अरे वा! फोटो टाका की.
25 Feb 2016 - 5:44 pm | मुक्त विहारि
25 Feb 2016 - 6:17 pm | यशोधरा
अग्गं बैइइइइइइइइइइ! कित्ती म्हंजे कित्ती गोडूलं!!!
25 Feb 2016 - 6:32 pm | मुक्त विहारि
पण अंगात ज्याम मस्ती भरलेली असते.
आत्ता पर्यंत ३ प्लॅस्टिकच्या बाटल्या, ४ मग (बाथरूम मधून केंव्हा मग घेवून पळते, ते पण समजत नाही.) आणि २ उशांची वाट लावून झाली.
अर्थात आमची मुले पण लहानपणी हेच धंदे करत असल्याने, आम्हाला तरी त्यात काही वावगे जाणवत नाही.
सुरुवातीला तिला खेळायला म्हणून कुत्र्यांचा बॉल घेवून आलो, पण हिला आपल्या प्लॅस्टिकच्या मगातच इंटरेस्ट जास्त.
काही मुलींना "बार्बी" पेक्षा "ठकी"च जास्त आवडते, त्यातलीच गत.
जमल्यास बीगल आणि अल्सेशियन ह्यांच्या खेळीमेळीतल्या पळापळीचा व्हिडियो टाकीन.
26 Feb 2016 - 7:19 am | यशोधरा
मज्जा हो मुवि. :)
मलाही बीगल भूभू हवेय खरे तर. घरच्यांचा विरोध कसा संपवायचा ते सांगा.
आताचा पण एक फोटो टाका लिलीचा, तीट लावून.
25 Feb 2016 - 7:01 pm | एस
वा! आमचा 'टॉमी' ही बीगल होता म्हणजे! त्याची आठवण झाली तुमच्या लिलीला पाहून!
26 Feb 2016 - 12:47 am | अभ्या..
हायला जनाब मुवि, लिलि ला काजल घालता की काय? कसले भारी डोळे.
घराच्या लादीच्या स्वच्छतेबद्दल मुविकाकूंना पैकीच्या पैकी गुण. लिलिचे पंजे साक्ष देताहेत त्याची. ;)
26 Feb 2016 - 7:16 am | मुक्त विहारि
बीगलच्या डोळ्या भोवती जन्मजात काजळ असते.
16 Mar 2016 - 1:54 pm | ज्योत्स्ना
बिगल मी पाहिलेच नव्हते , हे पिलु फार गोड आहे.
25 Feb 2016 - 2:35 pm | पियुशा
प्लिझ लिलिचा फोटु टा़का ना :)
25 Feb 2016 - 2:38 pm | उगा काहितरीच
वाचतोय वाचतोय ! माझ्या सारख्या श्वानअडाणी व्यक्तीसाठी प्रचंड उपयुक्त मालिका . आता प्रतिक्रियांमधून पण बरीच उपयुक्त माहिती कळेलच...
25 Feb 2016 - 2:46 pm | जेपी
वाचतोय..
25 Feb 2016 - 2:47 pm | गॅरी ट्रुमन
मस्त. सगळ्या लेखांची वाचनखूण साठवणार आहे.म्हणजे प्रत्यक्ष श्वान पाळेन त्यावेळी ही माहिती उपयोगी होईल.
(लिलीच्या फोटोंच्या प्रतिक्षेत) ट्रुमन
25 Feb 2016 - 3:10 pm | गवि
उत्तम.
25 Feb 2016 - 5:28 pm | अद्द्या
बेस्टच .
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ..
आणि हो.. फोटू टाका
25 Feb 2016 - 6:32 pm | सुमीत भातखंडे
हाही भाग मस्त.
पुभाप्र.
25 Feb 2016 - 6:38 pm | प्रसाद१९७१
@ मुवि - दृष्ट काढा लिलीची लगेच.
25 Feb 2016 - 9:28 pm | गवि
घरात कसं मॅनेज करता? स्वतंत्र कंपाउंडवालं घर आहे का?
फ्लॅटमधे कुत्र्याला फारच कैद होते असा अनुभव.
26 Feb 2016 - 7:39 am | मुक्त विहारि
१. घरात कसं मॅनेज करता?
कुठल्या बाबतीत?
शी-शू"च्या बाबतीत म्हणत असाल तर, बाथरूम मध्ये किंवा पॅसे़ज मध्ये.
खाणे-पिणे बाथरूम मध्ये किंवा पॅसेज मध्ये. (आमच्या ह्या घराला गॅलरी नसल्याने, पॅसेज हाच एकमेव पर्याय उपलब्ध राहतो.)
२. स्वतंत्र कंपाउंडवालं घर आहे का?
नाही.
पण "बीगल"ला कंपाउंड लागते असे बर्याच श्वान पालकांचे मत आहे.ह्यांना मोकळे सोडून चालत नाही.
३. फ्लॅटमधे कुत्र्याला फारच कैद होते असा अनुभव.
१००% सहमत.पण माणसांपेक्षा कुत्री फारच सहनशील असतात आणि लहान असतांना परिस्थितीशी पटकन जुळवून घेतात.अर्थात लहान कुत्री घरात आणली की, घरात २४ तास कुणीतरी हवेच.साधारण १-२ वर्षांची झाली की मग, ती एकटी रहायला लागतात.
लॅब्रेडॉरच्या बाबतीत आम्हाला हाच अनुभव आला.लॅबूला खेळायला जागा कमी असल्याने आणि पावसाळ्यात घराबाहेर काढणे जिकिरेचे असल्याने (रिक्षावाले आणि चिखल) लॅबूचे थोडे हालच झाले.गच्ची हा एकच पर्याय होता.
म्हणूनच ह्यावेळी फ्लॅटच्या आकारमानानुसार "बीगल" घेतले.
26 Feb 2016 - 7:52 am | गवि
थोडे हाल नाही. मोठं नुकसान असतं.
फ्लॅटमधे कुत्रा केवळ तेवढ्यासाठी आणलेला नाही. बाकी कुत्र्याच्या पूर्ण लाईफभर अगदी २४ बाय ७ घरी रहावं लागत नसलं तरी दिवसातून दोनदा घराचा भोज्या (खाणं, बाहेर राऊंड यासाठी) शिवणं आवश्यक असल्याने वीकेंड, ओव्हरनाईट हेही एकत्र जाता येत नाही सर्वांना. आठवडाभर ट्रॅव्हल तर फारच दूर. त्याग जनरली घरातली आई / स्त्री हिच्याच वाट्याला येतो. सतत कठीण फरशीवर आणि विना ऊन राहून अनेक समस्या कुत्र्यांना येतात.
कुत्र्याच्या मानसिक फायद्यांसोबत सर्व निगेटिव्हज, आणि कमिटमेंटची तीव्रताही नवीन पाळू इच्छिणार्यांसमोर आली पाहिजे.
शहरात कुत्रापालन म्हणजे स्वातंत्र्याचा पूर्ण नाश, कुत्र्याच्याही आणि त्याहून जास्त, मालकाच्याही.(विशेशतः पत्नी, आई) .
तुमच्याकडे असं नसेल पण इन जनरल असे अनेक आधी लक्षात न आलेले मुद्दे नंतर कळतात. त्यामुळे तीही माहिती पूर्ण यावी. शहरात लसीकरण आणि अन्य बंधनंही असतात.
26 Feb 2016 - 9:16 am | मुक्त विहारि
"बाकी कुत्र्याच्या पूर्ण लाईफभर अगदी २४ बाय ७ घरी रहावं लागत नसलं तरी दिवसातून दोनदा घराचा भोज्या (खाणं, बाहेर राऊंड यासाठी) शिवणं आवश्यक असल्याने वीकेंड, ओव्हरनाईट हेही एकत्र जाता येत नाही सर्वांना. आठवडाभर ट्रॅव्हल तर फारच दूर."
======> सहमत. सध्या तरी घरात २४ तास घरात कुणीतरी असतेच.
=======================================================
त्याग जनरली घरातली आई / स्त्री हिच्याच वाट्याला येतो.
====> कुत्रीचे खाणे-पिणे आमच्या सासूबाई आणि बायको सांभाळतात आणि कुत्रीला फिरायला नेणे आणि तिची शी-शू आवरणे, ही कामे मी करतो.
============================================================
सतत कठीण फरशीवर आणि विना ऊन राहून अनेक समस्या कुत्र्यांना येतात.
=====> पॉइंट नोटेड. ह्या समस्येवर काही तरी इलाज शोधायला पाहिजे.
===========================================================
कुत्र्याच्या मानसिक फायद्यांसोबत सर्व निगेटिव्हज, आणि कमिटमेंटची तीव्रताही नवीन पाळू इच्छिणार्यांसमोर आली पाहिजे.शहरात कुत्रापालन म्हणजे स्वातंत्र्याचा पूर्ण नाश, कुत्र्याच्याही आणि त्याहून जास्त, मालकाच्याही.(विशेशतः पत्नी, आई)
======> मान्य.१००% मान्य. म्हणूनच मी पहिल्या भागात ह्या गोष्टीचा थोडा-फार, माझ्या (अ)ज्ञानानुसार, उल्लेख केला आहे.तिथे जे लिहिले आहे तेच परत लिहितो.
"आली लहर आणि घेतला कुत्रा, असे अजिबात करू नका.कुत्रा पाळणे हे तिन्ही-त्रिकाळ करायची गोष्ट आहे.घरात २४ तास कुणी ना कुणी असेल तर (विशेषतः जेष्ठ लोक) कुत्रा जरूर पाळा.मला तरी ह्या बाबतीत कुत्र्यांचा खूपच उत्तम अनुभव आला आहे.आमच्या सासूबाई आता घर सोडून जावू शकत नाहीत.घरात कुत्री आणल्यापासून, त्यांना ह्या कुत्र्यांची छान सोबत होते."
=============================================================
तुमच्याकडे असं नसेल पण इन जनरल असे अनेक आधी लक्षात न आलेले मुद्दे नंतर कळतात. त्यामुळे तीही माहिती पूर्ण यावी. शहरात लसीकरण आणि अन्य बंधनंही असतात.
======> मला पण सुरुवातीला खूप त्रास झाला.स्वानुभव पण न्हवता आणि अज्ञान तर होतेच.(अज्ञान तर अजूनही आहेच.अद्यापही मी कुत्र्यांच्याच कशाला, ब-याच बाबतीत अज्ञानी आहे.)
अज्जूनही काही गोष्टी नव्याने समजतात. उदा. तुम्ही आत्ताच दाखवलेली माझी चूक (सतत कठीण फरशीवर आणि विना ऊन राहून अनेक समस्या कुत्र्यांना येतात.)
आणि लसीकरणाच्या बाबतीत किंवा कुत्र्याच्या आरोग्यविषयक बाबतीत म्हणाल तर, एकतर "कुत्र्यांचा डॉक्टर" घराजवळ किंवा घरी येणारा असावा अथवा कुत्र्याला पटकन डॉक्टरकडे जायचे साधन (रिक्षा, स्कूटर किंवा चारचाकी) हाताशी असावे.
हा मुद्दा बहूदा पहिल्या भागात टाकायला हवा.
--------------------------------------------
25 Feb 2016 - 11:22 pm | निशदे
मस्त लिहित आहात. ह्या सगळ्या लेखांना एकत्र करून बायकोला वाचायला देतो म्हणजे श्वानपालनासाठीचा तिचा विरोध संपविता येईल
26 Feb 2016 - 9:12 am | प्रचेतस
झक्कास.
16 Mar 2016 - 10:34 am | मुक्त विहारि
काही अपरिहार्य कारणांमुळे, मला अल्सेशियन बद्दलची माहिती, किंवा कुठलाही लेख लिहायला सध्या वेळ मिळत नाही आणि अशीच परिस्थिती पुढील २-३ महिने तरी राहिल असे वाटते.
एका मिपाकराला, अल्सेशियनबद्दल माहिती लिहायची विनंती केली आहे.त्यांनी न लिहिल्यास, इतर कुणीतरी ही माहिती द्यावी हे नम्र विनंती.
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ.
तसदीबद्दल क्षमस्व.