भाग 3 वरुन पुढे-
अश्विनला व श्वेताला खरे कारण माहित असते,त्यामुळे ते त्याला दोषी मानत नसतात. अश्विन व श्वेता रोहितला समजावतात, की त्याची काहीच चुक नाहीये, त्याने हे सर्व संजयच्या दबावाखाली येऊन केलेले आहे, परंतू सर्व व्यर्थ. रोहित आता कसातरी वागत होता, मनाला येईल ते तो करु लागला होता. अलिकडे तर तो दारुही पित असायचा. दुसरीकडे अश्विन रोहितच्या अचानक कुठेतरी निघून जाण्याने चिंतेत होता, आणि तो सारखा रोहितला फोन लावत होता, परंतू रोहितचा फोन लागत नव्हता. सरतेशेवटी त्याने श्वेताला उठविण्याचा प्रयत्न केला, परंतू श्वेता काही उठली नाही, उलट ती त्याच्यावर जास्त भडकली.
ब-याच वेळाने अश्विन स्वत- रोहितचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडला. घराबाहेर पडताक्षणीच रोहित येताना त्याला दिसला, त्याला पाहून त्याला बराच आनंद झाला. अश्विनने रोहितला बाबा म्हणून हाक मारली,तसा तो थांबला.
त्र्क्रमशः
प्रतिक्रिया
16 Jan 2016 - 4:21 pm | इरसाल
पुभाप्र ! धन्यबाद
17 Jan 2016 - 10:37 am | DEADPOOL
मोबाईलवर टंकतोय का?
24 Feb 2016 - 11:50 am | प्रतीक्षा होडे.
पुढचा भाग कधी टाकणार