भाग 1 वरुन पुढे-
सर्वांनी रोहितची समस्या जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला. ब-याच जणांना असे वाटायचे, की श्वेताच्या बेताल वागण्याने तो चिडचिड करतोय, तर काहींच्या मते दुसरे कोणते कारण होते. रोहितच्या सिनीअर मि.अंकोलानी त्याला विश्वासात घेऊन त्याची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. रोहितला आपल्या वैदयकिय पेशामुळे स्वतःच्या खाजगी आयुष्याकडे लक्ष देता येत नव्हते. तशातच मि.अंकोलानी त्याची पगारवाढीची मागणीही धुडकावून लावली होती, त्यामुळे तर तो अधिकच चिंतित असायचा.
रोहित अश्विनची मात्र जिवापाड काळजी घेत असायचा, तोच त्याच्या जगण्याचा आधार होता. दुसरीकडे श्वेता बाळंत होणार याची बातमी त्याला लागली होती, त्यामुळे मुल झाल्यावर अश्विनचे काय होणार याचीही चिंता त्याला लागून राहिली होती. अशातच एक दिवस संजय नावाचा माणूस त्याच्याकडे एक ऑपरेशनची केस घेऊन येतो, त्याच्या भावाच्या पोटात गाठ असल्याचे निदान झाले होते, त्यामुळे ते रोहितकडे आलेले असतात. कर्तव्य म्हणून तो संजयच्या भावाचे यशस्वीरित्या ऑपरेशन करतो, आणि त्याच्या पोटातील गाठ काढून टाकतो, परंतू थोडया वेळातच संजयच्या भावाचा मृत्यु होतो. सर्व रिपोटर्स नॉर्मल असताना, ऑपरेशननंतर कोणतीही गुंतागुंत नसताना मृत्यु का होतो,याचेच रोहितला आश्चर्य वाटत असते. सत्य जाणून घेण्यासाठी तो संजयच्या भावाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवतो.
(क्रमशः)