भाग 2 वरुन पुढे-
रोहित संजयकडून सत्य जाणण्याचा प्रयत्न करत असतो, परंतू संजय त्याला काहीही सांगायला तयार होत नसतो,त्यामुळे तर रोहितचा संशय अधिकच बळावलेला असतो. काही दिवसांनी शवविच्छेदन अहवाल पाठवला जातो,त्यात संजयच्या भावाला विष दिल्याचे निदान झालेले असते. रोहितला खात्री पटते, की यात संजयचा काहीतरी कावा आहे, काही दिवसांनी संजय व त्याचा एक साथीदार येऊन रोहितला शवविच्छेदन अहवाल बदलण्याची धमकी देऊन जातात. रोहित त्यांचे ऐकायला तयार होत नाही, तेव्हा संजय रोहितला त्याच्या पत्नी व मुलाला ठार करण्याची धमकी देऊन जातो. संजयने आधीच आपला एक माणूस रोहितच्या घरावर पाळतीसाठी ठेवलेला असतो.
अखेर संजयची मागणी रोहितला मानावीच लागते. रोहितचे संजयच्या भावाचे सर्व अहवाल बदलतो, परंतू काही दिवसांनी पोलिस चौकशी होते, आणि संजय व त्याचा साथीदार पकडले जातात, पोलिस त्यांना घेऊन रोहितकडे पोचतात. प्रथम तर पोलिसांना आपल्या घरी पाहून तर रोहितला धक्काच बसतो, परंतू रोहित पोलिसांना सर्व खरेखूरे कथन करताे. पोलिस त्याच्या एक कानफाडीत ठेवून देतात, व आपल्या कस्टडीत ठेवतात. काही दिवसांनी रोहितची निर्दोष मुक्तता होते आणि तो कस्टडीतूुन बाहेर येतो, परंतू तो आता पूर्वीसारखा राहिलेला नसतो,त्याचा वैदयकिय व्यवसायावरचा विश्वास पुरता उडालेला असतो.
(क्रमशः)