भाग ७ http://www.misalpav.com/node/34474
हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जेमतेम ५ मिनिटे चालला असेल मयंक, तोच समोरच अनघा भेटली. मयंकच्याही नकळत तो थोडा relax झाला आणि एक छान स्माईल आले त्याच्या ओठांवर." बर झालं भेटलीस., तुझ्याकडेच यायला निघालो होतो. कुठे बाहेर जातेयस का? जात असशील तर नको जाऊस. मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला." एका दमात मयंक बोलून मोकळा झाला. "आजपण माझी आठवण आली तुला mr. busy फोटोग्राफर?? एकदम स्ट्रेंज. पण कसं आहे ना मयंक. I am dating someone more handsome and busy photographer. मला आता अजिबातच वेळ नाहीये. मल्हार साठी सरप्राईज गिफ्ट घ्यायला जातेय. त्यापेक्षा महत्वाच काम नसाव तुझ. नाही का? छदमी हसत, केस उगाच मागे सरत अनघा घुश्यातच म्हणाली. मयंक आता जवळजवळ ओरडलाच. "तुला कळतंय का अनघा, तू काय करतेयस? तो मल्हार एक नंबरचा fraud माणूस आहे. खूप मुलींना फसवलय त्याने. फोटो आणि glamour आणि प्रसिद्धीची लालूच दाखवून जाळ्यात ओढतोय तो. कस कळत नाही तूला? का इतकी प्रेमात आहेस त्याच्या? तो फेक आहे यार. मी आणि सिद्धांतने सगळ शोधून काढलंय. सगळ खोट आहे. तो खोटा, त्याचे फोटो खोटे, श्रावणी, संयुक्ता profiles सगळच खोट. क स्वतःला खड्ड्यात घालतेस?एक मित्र म्हणून सांगतोय. ऐक माझं. काही प्रेम वैगरे नाही त्याच तुझ्यावर. तो फसवणार तुला पण. आणि मी तुला गमवू शकत नाही अनघा. i love you. please अस करू नकोस." "प्रश्नाला कायम प्रतिप्रश्न करणारी अनघा आज मात्र एकदम शांत बसली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. थोडा वेळ कोणीच काहीच बोललं नाही. वातावरणातला ताण मयंकला असह्य होत होता. आज मनातलं सगळ बोलून पण त्याला शांत वाटत नव्हत. त्याने आताच अनघाला प्रपोज केलं होत आणि तरीही अनघा शांत होती याचा त्याला त्रास होत होता. रिजेक्ट व्हायची सवय नव्हती. आणि त्याहीपेक्षा मल्हारमुळे अनघा नाही म्हणेल याची जास्त भीती वाटत होती. शेवटी न राहवून तो बोललाच "please अनघा बोल काहीतरी. खूप त्रास होतोय मला सगळ्याचा. तू तरी बोल काहीतरी.please." आणि मयंक अचानक रडू लागला.
मयंक काकुळतीला येऊन हे बोलतोय हे अनघाला कळत होत. पटकन उठाव, त्याला जवळ घ्याव, आणि सांगाव की I love you too मयंक. इतके दिवस हेच तर हव होत मला. काही काळजी करू नकोस. मी आहे ना. पण अनघा यातलं काही करू शकली नाही. तिने कसबस सावरल स्वत:ला. आणि म्हणाली, "मयंक, रड. अजून रड. तुला रडताना बघून आज खूप बर वाटतय मला. गेल्या वर्षभराची मेहनत आज सार्थकी लागल्यासारखं वाटतंय. रड तू." मयंक अनघाकडे पाहतच राहिला. "सरप्राईज!!! हो ना? नेहमी आपल्या मागे मागे करणारी केअरिंग अनघा कुठे गेली म्हणून? हे असं स्वप्नात पण पाहिलं नसशील ना? तुला आठवतंय मयंक? अशीच मी सुद्धा रडले होते तुझ्या जवळ? माझ खरच तुझ्यावर प्रेम आहे हे हजार वेळा सांगितलं होत. तुला माहीतही होत आणि तरीही तू नाकारलास मला. का? तर माझा फोटो तुझ्या स्वप्नातल्या परीशी जुळत नव्हते. तुझ्या फेमच्या व्याख्येत मी बसत नव्हते. एका फेमस फोटोग्राफर आणि handsome मुलाची गर्लफ्रेंड शोभत नव्हते. हो ना? बरोबर ना mr. फोटोग्राफर मयंक?" मयंकची नजर आता पायाच्या अंगठ्यावर खिळली होती. अनघा काहीच चुकीच बोलत नव्हती. सगळा भूतकाळ मयंकच्या डोळ्यासमोरून झरझर पुढे सरकत होता आणि प्रत्येक फ्रेम मध्ये कॉमन कोण असेल तर अनघा. हेही जाणवत होत. चांगल्या वाईट प्रत्येक प्रसंगात अनघा आपल्या बरोबर असल्याच आठवत होत. आणि तरीही तिला आपली गर्लफ्रेंड म्हणून घेण्यात आपल्याला कमीपणा वाटला होता. आपण चूक केलीय हे मयंकला जाणवत होत. अनघाला दुखावल्याची जाणीव होत होती. "आठवतय का काही mr. मयंक? good good. पण आज अचानक काय झालं? मी फोटोजेनिक झालेय आता? कि तुझ फेम कमी झालाय म्हणून तुला शोभू शकतेय? का तुझ्यापेक्षा जास्त फेमस माणूस मला date करतोय म्हणून? जवळ असताना किंमत नाही केलीस कधी माझी. आता काय sorry म्हणशील, i love you म्हणशील. कि समोरच्याने विसरायचं सगळ. हो ना? तुझ्यासाठी सगळच सोप्प आहे. but हेल्लो.. मी तुला फाट्यावर मारतेय आज. तू तुझ प्रेम घेऊन बस पूजा करत, आणि रडत. मल्हार आहे माझ्यासाठी." "नाही अनघा, please मल्हार नको. कोणीही चांगला माणूस निवड. मी का नाही अस नाही विचारू शकत मी. मान्य. पण मल्हार पण नको. तू खरच आवडतेस मला. तुझ्याशी वाईट वागलो मी. पण तेव्हा नाही आलं लक्षात. आता कळतंय सगळ. पण तुला force नाही करणार मी. एकच सांगतो. उशिरा का होईना. मला कळलय आज कि मी खूप मनापासून प्रेम करतोय तुझ्यावर तुझ्याशी बोललो कि मला खूप छान आणि शांत वाटत. आजपर्यंत विचार नव्हता केला पण आज करतोय. तू जवळ असलीस कि कोणी आपलं जवळ असल्यासारखं feel होत कायम. तुझ्यावर force नाही करत. पण एक मित्र म्हणून शेवटच सांगतोय. मल्हार मध्ये अडकू नकोस please." मयंक वळला आणि जायला निघाला.
"थांब मयंक." अनघाने मागून मयंकचा हात पकडला." मयंकवर जीवापाड प्रेम करणारी अनघा आणि नंतरची बदललेली आणि त्यचा सूड घेण्याचा विचार करणारी अनघा, दोघी आतल्या आत भांडत होत्या. मयंकच्या प्रेमात कुठून कुठे आलो आपण, तिचं तिलाच कळत नव्हत. आपला मयंक आता कायमचा चालली हे सहनच झालं नाही तिला. इतका वेळ संयम ठेवला होता तिने. पण आता ती मयंकचा हात हातात घेऊन रडू लागली. "जाऊ नकोस मयंक. I am sorry. मी खूप वाईट वागलेय तुझ्याशी. मला please माफ कर." मयंकला दोन क्षण काही कळलेच नाही. "काय बोलतेयस तू अनघा? काय केलयस तू? तू नाहीयेस वाईट. फक्त मल्हार नको. बास." "नाही मयंक, चुकलाय माझं. कारण मला खूप राग आला होता तुझा. तुझ्या फोटोग्राफीचा, attitudeचा. म्हणून मी.. मी.. मयंक.. मल्हार नाही आहे रे कोणी. मीच मल्हार आहे. हे सगळ मीच केलं होत." मयंक जागेवरच थंड झाला होता. "हे सगळ मीच केलय. मल्हार नावाची कोणीही व्यक्ती अस्तित्वात नाहीये. मला तुला धडा शिकवायचा होता रे. म्हणून मीच केलय हे सगळ. मल्हार तावडे हि profile पण फेकच आहे. माझा कोणालाही फसवायचा उद्देश नव्हता. मला फक्त तुला त्रास द्यायचा होता. विश्वास ठेव. मी तुला दाखवलेलं chat, मी मल्हारला भेटले वैगरे सांगण, सगळ खोट होत. माझाच plan. त्यासाठी मी एक सीम कार्ड पण घेतलं होत." मयंकला बोलन सुचतच नव्हत. राग, संताप, चीड, आणि कीव सगळ्या भावना एकच वेळी होत्या त्याच्या मनात. "अनघा, का केलास अस? आणि काय मिळवलंस? आणि किती त्या profiles? किती मेहनत केलीस यासाठी? आणि कधीपासून चालू आहे हे? मी श्रावणीशी ५-६ महिने chat केलाय जवळपास. म्हणजे त्याधीपासूनच??.."
"हो." त्याच बोलन अर्ध्यावाच थांबवत अनघा म्हणाली. "घेतली होती मी खूप मेहनत यासाठी. एकूण २० profiles तयार केल्या होत्या. तू मला ignore करायला लागलास तेव्हा पासूनच मी या सगळ्याची तयारी करत होते. कारण मला तू हवा होतास कसंही करून. तुझ्यावरच्या प्रेमाने आंधळी झाले होते रे. म्हणून श्रावणीची profile बनवली. तुला हवी तशी ड्रीमगर्ल. मला माहित होत, यात तू अडकशील. मग तुझ्याशी chat केले. यात मला हवा तसं मयंक सापडला मला. तुझ्याशी प्रेमाने बोलण्याच स्वप्न होत माझ. पण तू कधीच नीट नाही बोलायचास. पण श्रावणीशी मात्र तू खूप छान बोलायचास. अगदी काळजीने मला हव होत .. अगदी तस्साच. म्हणून मी हे नाटक चालूच ठेवलं. पण श्रावणीची बर्थडेट टाकून मी चूक केली होती. आणि त्यादिवशी तू श्रावणीला भेटायचा हट्ट करणार हे मला माहित होत. म्हणून मला ते थांबवावं लागल. त्यामुळे तरी आपल्याला कोणी ignore केलं कि कस वाटत हे तुला कळेल अस मला वाटल. आणि तू दुखी होशील, माझ्याकडे येशील असही. आणि त्यानुसार तू आलाही होतास. तेव्हाच हे सगळ थांबवलं असत तर कदाचित आता सगळ नीट असल असत. तू माझा असला असतास. पण त्यावेळी मला तुला होणारा त्रास पाहून आनंद झाला. आणि मी माझा पुढचा गेम रद्द न करता चालू ठेवायचा निर्णय घेतला. मग तुला माझ्या आधीच्या प्लाननुसारच मल्हार आणि माझे chat दाखवले. मला वाटल तू निराश होशील आणि मी आनंद घेत राहीन. पण इथे नेमका सिद्धांत तडमडला.त्याने तुला ते app काय दिल, आणि सगळच कल्पनेपलीकडच. याचा मी कधी विचारच केला नव्हता. खूप हुशारीने मी वेगवेगळे अप्रकाशित किंवा दुर्लक्षित फोटो जमवले होते. आणि मल्हारच्या नावाने लोड केले होते. तुला हे कधीच कळल नसत. पण तुझ नशीब चांगल होत की सिद्धांतसारखा फोटोग्राफर तुझा मित्र आहे. आणि नेमक्या वेळी तुला तो आठवला. पण तू मला हे सांगण्याची घाई केलीस आणि मग मला माझा खेळ संपवावा लागला. तरीही तू माझ्या काळजीपोटी इथपर्यंत आलास. मला भेटलास. आणि समजवण्याचा प्रयत्न केलास. पण तेव्हाही तुला कळल नाही की मल्हार पण खोटा असू शकतो. एवढा विश्वास होता तुझा माझ्यावर. आणि मी मात्र त्याचा गैरफायदा घेतला. मला माफ कर मयंक. यापलीकडे बोलण्यासारख माझ्याकडे काहीही नाही."
अनघा तिथेच उभी होती. मयंककडे पाहत. मयंकने आपल्याला माफ कराव, समजून घ्याव अस तिला वाटत होत. आणि मयंक पण तिथेच उभा होता. तिच्याकडे पाहत. पण आता दोघांमध्ये एक भिंत उभी राहिली होती. कदाचित कधीच न तुटण्यासाठी.
समाप्त
----
मल्हार तावडे स्कॅम या वर्षी सुरवातीला पार्ल्यात घडला खर तर उघडकीला आला. याची सुरवात कधी झाली हे निश्चितपणे सांगण कठीण आहे. या प्रकरणात मल्हार, श्रावणी, संयुक्ता आणि जवळपास १८ अकाऊन्टस खोटी असल्याच उघड झालं. हि सारी अकाऊन्टस पूर्ण वेळ देऊन नीट बनवली गेली होती. प्रत्येकाचे डीटेल्स अगदी व्यवस्थित विचार करून भरले गेले होते. आणि या फसवाफसवीसाठी खूप मोठे management झाले होते. मयंकची कथा हा या फसवणुकीतला एक छोटासा भाग आहे, जो पूर्णपणे काल्पनिक आहे. त्यातून मला त्याची भयानकता जाणवली कि अजून काय काय होऊ शकल असत. त्यामुळे कथेमधून वास्तवातली भयानकता थोडी सौम्य करून दाखवायचा हा माझा प्रयत्न. प्रत्यक्षात कोण कुठे कशाप्रकारे फसल गेलंय याविषयी मला काही कल्पना नाही. मल्हार कोण हे आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. ज्यादिवशी मल्हार तावडे हे फेक अकाऊन्ट आहे हे सर्वाना कळल त्यानंतर बरेच दिवस त्याच्याशी chat केलेल्यांपैकी कोणीही शांत झोपू शकल नाही. मल्हार कोण, त्याचा हेतू काय होता, तो साध्य झाला का यातलं काही माहित नाही. पण त्यामुळे खूप जणांना नाहक त्रास झाला. एवढ सगळ करून त्याने काय केलं, किंबहुना त्याला जे करायचं होत ते त्याने केलं का? हे सगळच अनुत्तरीत आहे. Modeling आणि कॅमेऱ्याच्या हव्यासापायी बऱ्याच मुलींनी त्याच्याशी chat केलेयत. त्यात काय काय share केलंय हेही त्यांनाच माहित. आणि ती माहिती त्या माणसाकडे आजही सुरक्षित असू शकते आणि त्यातून black-mailing सारखे प्रकार अजूनही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या मुलांना-मुलींना हा प्रकार माहित आहे त्यातला प्रत्येक जण दुसऱ्याकडे संशयिताच्या नजरेतून पाहतोय. प्रत्येक मुलगी आपण आपली माहिती कोणाला दिली किंवा तो आपलाच भाऊ किवा प्रियकर नसेल ना या विचाराने हैराण आहे. तर प्रत्येक मुलगा आपली बहिण किबा प्रेयसी यात फसली नाहीये ना या विचारात. कथेच्या माध्यमातून वरवर साध्या वाटणाऱ्या पण गंभीर असलेल्या या घटनेवर एक प्रकाशझोत टाकावासा वाटला. आणि सोशल नेटवर्किंग करताना थोडी काळजी सर्वानीच घ्यायला हवी एवढचं.
प्रतिक्रिया
15 Jan 2016 - 11:56 am | अदि
कथा.
15 Jan 2016 - 12:00 pm | एस
वा. भन्नाट सीरीज झाली. शेवटी व्यक्त केलेले मत सोशल नेटवर्किंगच्या आहारी गेलेल्या सर्वांनीच मनन करावे असे आहे.
15 Jan 2016 - 12:20 pm | आनन्दा
माझ्या एका भाचीच्या अकाऊंटला पण आहे हा मल्हार. पण नशीबाने तिने त्याला फार भाव दिलेला नाही.
15 Jan 2016 - 12:41 pm | पैसा
!!
15 Jan 2016 - 2:34 pm | पद्मावति
जबरदस्त कथा.
तुमची लेखनशैली अतिशय खिळवून ठेवणारी आहे. फारच मस्तं.
15 Jan 2016 - 2:39 pm | लाडू.
धन्यवाद
15 Jan 2016 - 2:49 pm | पूर्वाविवेक
जबरदस्त
15 Jan 2016 - 3:05 pm | प्राची अश्विनी
सर्व भाग आताच वाचून काढले.
जबरदस्त!!!!
15 Jan 2016 - 4:59 pm | आनन्दा
बाकी लाडूतै तुमची चिकाटी जबरदस्तच.. एकही प्रतिसाद नसताना देखील आठही भाग टाकून मालिका पूर्ण केलीत.
15 Jan 2016 - 7:05 pm | असंका
फारच सुंदर सांगितलीत गोष्ट!
धन्यवाद!
15 Jan 2016 - 7:10 pm | सुबोध खरे
सुंदर आणि उत्कंठावर्धक लेखमालिका.
शेवटचा उपसंहार जास्त भावला.
जालावर नको ते फोटो आणि माहिती टाकून अडचणीत येण्याची शक्यता असूनही बरीच मुले/ मुली त्यातून धडा शिकत नाहीत हि खरी शोकांतिका.
16 Jan 2016 - 6:14 am | राघवेंद्र
सुंदर लेख मालिका.
16 Jan 2016 - 1:59 pm | alokhande
शेवट पर्यंत सस्पेन्स असल्याने वाचताना मजा आली. खरचं खूप छान लिहिलं आहे वाचताना चित्र डोळ्यासमोर उभे राहिले
16 Jan 2016 - 2:13 pm | लाडू.
सर्वांचे आभार. खर तर उपसंहार वाचावा आणि विचार करावा म्हणूनच कथा आणि सस्पेन्स
16 Jan 2016 - 5:08 pm | असंका
हं. बरोबर आहे.
पण काय हो, हे फेसबुक इ. वर खरंच एवढं अवलंबून रहातायत का आजकाल कॉलेजची मुलं?
छान छान फोटो आले, किती फॉलोअर्स आले, किती लाइक मिळाले हे सगळं आभासी असतं हा माझा गैरसमज राहिलाय का?
16 Jan 2016 - 5:20 pm | लाडू.
हो. मला स्वत:ला कॉलेज सोडून तीन वर्ष झालीत फक्त. आणि आता मी स्वत: कॉलेज मध्ये शिकवते. त्यामुळे माझे विद्यार्थी आणि मी यात वयाचे जास्त अंतर नाही. त्यातून होणार्या चर्चांमधूनच हि कथा सुचलीय. सध्यच्या मुलाचं सोशल साईटवर देपेंद असण खुप वाढलंय हे नक्की
16 Jan 2016 - 5:01 pm | यशोधरा
चांगली कथा. आवडली. लिहित रहा.
16 Jan 2016 - 5:03 pm | लाडू.
dhanyvad
18 Jan 2016 - 9:21 am | वगिश
I छान आहे कथा. एका दमात वाचून काढले.