सोशल नेटवर्किंग (भाग ३)

लाडू.'s picture
लाडू. in जनातलं, मनातलं
6 Jan 2016 - 2:17 pm

हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मयंकच्या hi ला आज अखेर श्रावणीने उत्तर दिले होते सकाळी सकाळीच. मयंक खूप खुश झाला. ताबडतोब डोळ्यावरची झोप उडवत तिच्याशी बोलू लागला. पण तसे करताना आपल्याला ती आवडते याची पुसटशी शंकाही तिला येऊ नये याची खबरदारी तो घेत होता. हि त्याच्या नेहमीच्या ट्रिक्स मधली एक ट्रिक होती. आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याला हे माहित होते, मुलींना जास्त भाव दिला कि मग त्या गृहीत धरतात आपल्याला. आधीपासून जेवढ्यास तेवढ असेल तर मग बरोबर मागून येतात. त्यानुसारच मयंक कमीत कमी बोलून आपल्याला जास्त इंटरेस्ट नसल्याचे दाखवून देत होता. मल्हार विषयी तिला विचारावेसे त्याला खूप वाटत होते. पण पहिल्याच chat मध्ये ते योग्य दिसले नसते. ती स्वतःहून काही बोलली तर ते चालले असते. पण तीही काही कमी नव्हती. फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत होती.

उरलेल्या वेळेत मयंकचे facebook आणि instagram चाळणे चालूच होते. मल्हारची पब्लिसिटी वाढत चालली होती. त्याचे followers दर तासाला वाढत होते. आता मयंकचे खूप मित्र मैत्रिणी मल्हारचे सुद्धा फ्रेंड असल्याच दिसत होत. मल्हारच्या फोटोवरच्या कॉम्प्लिमेंटस मयंकला इनसीक्युअर करत होत्या. त्याच्या एकछत्री साम्राज्याला तडा जाण्याची लक्षणे दिसत होती. आजवर एकटाच प्रसिद्धीच्या झोतात असलेला मयंक मल्हारच्या तेजाने झाकोळून जाऊ लागलाय अस वाटत होत त्याला.

facebookच्या ढिगांनी असलेल्या notifications मधून एक होती ती अनघा – मल्हारच्या फ्रेन्डशिपची. मयंकला हे अजिबातच सहन झाले नाही. कालपर्यंत आपल्या पुढे मागे फिरणाऱ्या अनघाने त्या मल्हारबरोबर मैत्री करावी हे त्याला पटलेच नाही. त्याच तिरमिरीत त्याने अनघाला फोन केला. “अनघा, तू मल्हारला ओळखतेस?” त्यावर अनघाने मात्र अत्यंत थंडपणे उत्तर दिले “नाही. पण काल तू ज्या श्रावणीचा फोटो like केलास तिचीच profile चेक करताना दिसला हा मला. सो केली रिक्वेस्ट.” आणि मयंक वरमला. थोडा वेळ वरवरचे बोलून त्याने फोन ठेवला. मात्र अनघा भयंकर खुश झाली स्वतःवर. ज्या पद्धतीने मयंक आता बोलला तिच्याशी, त्यातून स्पष्ट होत होते तो मल्हारवर जेलस झालाय. आपण सिद्धान्तपेक्षा चांगल्या फोटोग्राफर बरोबर केलेली facebook मैत्री त्याला आवडली नाहीये. आणि तिथेच अनघाने ठरवलं. या मल्हारचाच फायदा करून घ्यायचा. मयंकला जळवायला. त्यातून मयंक आपल्याशी नीट बोलू लागला तर बरच. नाहीतरी आपल्यालाही फोटोंसाठीच हवा होता मयंक. स्सो मयंक नही तो मल्हार सही.

संध्याकाळी मयंक खूप दिवसांनी खाली क्रिकेट खेळायला गेला. हल्ली दिवसभर online असण्याच्या नादात हि सगळी मजा तो विसरूनच गेला होता. त्याचे बाकीचे मित्र खेळायचे अजून. मयंकला बोलवायचेही. पण मयंक कंटाळा करायचा. आज मात्र जाणून बुजून त्याला facebook पासून लांब राहायचे होते. श्रावणीने आपल्याला मिस कराव अस काहीसं त्याला वाटत होत. ही सुद्धा एक ट्रिकच. पण काम करते बऱ्याचदा. खूप दिवसांनी कॉलनीतले मित्र भेटले. त्यातलाच एक अनिकेत. त्याचा एकेकाळचा लंगोटी यार. बाजूलाच राहूनही मयंकला भेटण तस अवघडच होत हल्ली. त्यामुळे बऱ्याच दिवसांच्या गप्पा रंगल्या. शेवटी आठवणी शाळेपर्यंत गेल्या तेव्हा मयंक ला अचानक आठवली ती मल्हारची शाळा. अनिकेत आणि मल्हार एकाच शाळेत होते. अनिकेतला मल्हार बद्दल विचारायला काहीच प्रोब्लेम नव्हता. आपण जास्त उत्सुक नाही आहोत असे भासवत मयंक ने विचारलेच अनिकेतला. “काय रे, तू मल्हार तावडे नावाच्या कोणा मुलाला ओळखतोस का? तुमच्याच शाळेतला आहे. facebook वर भलताच फेमस होत चाललाय.” “हो रे. आमच्याच शाळेतला. पण खूप आखडू आहे यार. श्रीमंत आहे खूप. बापाचा एकुलता एक लाडावलेला पोरगा. आम्ही नाही बोलायचो त्याच्याशी फार.” मयंकला मल्हारची मिळेल तेवढी माहिती हवीच होती. पण त्यांच्या टीम चा एक player आउट झाला होता. आणि मयंकची batting होती आता. “बघ यार अनिकेत, त्याची अजून काही माहिती मिळते का. डोक्याला त्रास व्हायला लागलाय या मल्हारचा.” अस अनिकेतला म्हणतच मयंक bat घेऊन चालू लागला. इथे अनिकेत मनातल्या मनात खुश झाला होता. ‘मयंक सारख्या छाव्याला आज अनिकेतची गरज होती. लहानपणापासूनचे बेस्ट फ्रेंड दोघ. पण जेव्हापासून मयंकला glam मिळत होत, विशेषतः कॉलेजला जाऊ लागल्यापासून त्याने अनिकेतला कायम तुच्छ लेखलं होत. कारण दहावीतल्या चांगल्या गुणांमुळे मयंकला एका चांगल्या कॉलेजला सहज admission मिळालं होत. पण अनिकेतला मात्र जुनिअर कॉलेजला जाव लागल होत. आणि कॉलेजच्या नावावरच आजकाल status अवलंबून असत. शिवाय त्यानंतर आपोआप मिळालेल्या प्रसिद्धीत आणि high class मित्रांमध्ये मयंकने अनिकेतला जास्त ओळखही दाखवली नव्हती. आता वेळ आली होती मयंकला आपली किंमत दाखून द्यायची. आताच वेळ आहे’ आपल्याला मल्हार लाटेचा किती आणि कसा फायदा घेता येईल याचा अनिकेत बराच वेळ विचार करत राहिला

क्रमशः

kathaaविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

6 Jan 2016 - 7:10 pm | आनन्दा

वाचतोय..