सोशल नेटवर्किंग (भाग ४)

लाडू.'s picture
लाडू. in जनातलं, मनातलं
9 Jan 2016 - 4:58 pm

आज सकाळी सकाळी facebook लावताच श्रावणीचं दर्शन. अगदी छोटा काळा मायक्रो स्कर्ट आणि त्यावर फिकट गुलाबी रंगाचा आणि स्कर्टच्या मानाने बऱ्यापैकी मोठा म्हणता येईल असा टी-शर्ट. अगदी वर
खोचून बांधलेले केस. आणि गवतावर एका कुशीवर झोपून हातात धरलेली गुलाबाची कळी. बाकी आजूबाजूला काहीच नाही. फक्त हिरवंगार गवत. अप्रतिम एकदम. मयंकला जितक्या वेळा श्रावणी आठवून छान वाटत असे, तितक्या वेळा मल्हार आठवून कमालीचा संताप येत असे. नेहमीप्रमाणे हा ही फोटो त्यानेच काढला असणार. आपल्यावरची लाईम लाईट कमी होत चाललीय हा एक राग तर होताच मल्हारबद्दल. शिवाय श्रावणी-मल्हार काय प्रकरण आहे हेपण नीट कळत नव्हत. तेवढ्यात श्रावणीने hi केलं होत . मयंक पुन्हा रोमान्टीक मूड मध्ये आला. पण आज बोललाच तिला, फोटो मस्त आहे ते. मुद्दामच. त्याला वाटत होत तिने मल्हारबद्दल बोलाव. निदान आतातरी. आणि त्याच्या अपेक्षेनुसार तीच म्हणाली, "हो अरे. मल्हारने काढलाय. आता नको विचारूस मल्हार कोण? बेस्ट फोटोग्राफर आहे एकदम." मयंकने काही रिप्लायच दिला नाही. शिताफीने विषय बदलत तो नेहमीप्रमाणे तिच्याशी बोलू लागला. तिला विचारले 'आज कशी काय आठवण आली माझी?' तर तिचा रिप्लाय 'अरे मल्हारला फोन केला होता. साहेब खूप busy आहेत बहुधा. घेतलाच नही फोन. एनीवे माझे फोटो मस्त काढतो ना मल्हार' . मयंक च्या अंगाचा तिळपापड झाला. पण श्रावणीला त्याचे काहीच वाटले नाही. पुन्हा एकदा विषय बदलत मयंकने बोलणं चालू ठेवलं. मग थोड्या वेळाने कुठे गडी रुळावर आली. पुढचं मयंकला माहित होत. मुलींशी कसं बोलायचं. अर्थात सगळेच संवाद मयंकला सरावाचे. मिसींग यू म्हटलं कि सेम हिअर म्हणायचं. luv u ला luv u 2 , हे सगळ आजपर्यंत मयंकने इतक्या वेळा केलं होत की आता त्याच्या बोटांना सवय झाली होती. थोड्या फार फरकाने हे रोजच घडत होते.

मयंक आणि श्रावणी आता एकमेकांच्या बऱ्याच जवळ आले होते. म्हणजे ऑनलाईनच. पण दोघानाही एकमेकांशिवाय करमत नसे. मयंकला खात्री होत चालली होती कि श्रावणी आपल्या प्रेमात पडतेय. पण तरीही मल्हारचा विषय श्रावणी टाळत असे. किंवा असे काहीतरी बोलत असे ज्याने मयंक दुखावला जाईल. त्यामुळे मयंकपण आता मल्हारचा विषय श्रावणी समोर काढत नसे. त्याला आता आपल्या श्रावणी बरोबरच्या सुखी आयुष्याची स्वप्न पडू लागली होती. श्रावणीचा वाढदिवस जवळच होता. त्याचवेळी काहीतरी मोठा प्लान करून श्रावणीला प्रपोज करावे अस मयंक ठरवू लागला. श्रावणीच्या आवडीनिवडी, तिला कुठल्या स्टाईलणे प्रपोज केल तर आवडेल या सगळ्याचा तो खूप विचार करू लागला. तिच्या वाढदिवशीच तिला तो पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटणार होता. त्याने जय्यत तयारी सुरु केली. वाढदिवसासाठी आता एकच आठवडा उरला होता. श्रावणीला कसलाही संशय येऊ न देता त्याला हे करायचं होत.

श्रावणीचा अजून एक फोटो अपलोड पाहिला मयंकने. लाईट ब्लू जीन्स आणि नेवी ब्लू शर्टमध्ये कुठल्यातरी CCD मधला. पुन्हा फोटो कर्टसी मल्हार. आणि CCD ओळखीचे वाटत नव्हते. न राहवून त्याने श्रावणीला मेसेज केला. थोडासा कुत्सितपणेच. ‘कॉफी विथ मल्हार??’ आणि श्रावणी पुन्हा हर्ट झालीच. यापुढे मल्हारला काहीही बोलायचे नाही अस म्हणत जवळपास भांडलीच ती त्याच्याशी. मयंकला sorry म्हणण्यावाचून उपाय नव्हता. पुन्हा कधीही मल्हारचा विषय काढायचा नाही, कितीही राग आला तरी श्रावणीला मल्हार वरून काही बोलायचे नाही असे जवळपास त्याने मनाशी ठरवून टाकले. म्हणून निमुटपणे फोटो like करून त्याने फोटो मस्त असल्याचा मेसेज टाकला श्रावणीला. ती online होती. मेसेज वाचला गेला. पण मयंकला कोणताही रिप्लाय आला नाही. म्हणून मयंकने पुन्हा मेसेज केला. तरीही तेच. मयंकने तिची मनधरणी करण्यासाठी बरेच मेसेज केले. पण ऑनलाईन असतानाही श्रावणीने एकही मेसेजला उत्तर दिले नाही. थोड्याश्या हिरमुसल्या अवस्थेतच facebook लॉग आउट करून मयंक कॉलेजला निघाला.

खालीच अनिकेत भेटला. त्याच्याशी बोलणे बाकीच होते मल्हारबद्दल. आता बोलावे का असा विचार करेपर्यंतच अनिकेत घाईघाईत निघूनही गेला. बहुतेक थोडा टेन्शनमध्ये होता. कॉलेज सबमिशन्स आणि एक्झाम्स जवळ आल्या होत्या त्यामुळे असेल कदाचित. आपल्यालाही बघायला हव काहीतरी. हा श्रावणीचा वाढदिवस एकदा झाला कि लगेच अभ्यासाला सुरवात. नाहीतरी हल्ली कॉलेजमध्ये मजा येत नव्हती. मयंकपेक्षा मल्हारची चर्चा जास्त होत होती. जो तो उठ सुठ मल्हार-श्रावणी-संयुक्ता बद्दल बोलत असे. मयंकला चिडण्याचे हे एक अजून कारण होते. अख्ख्या गावाने श्रावणीच्या कपड्यांची आणि फिगरची चर्चा करावी हे मयंकला अजिबात पटत नव्हते. रात्रीपर्यंत पण श्रावणीने मेसेज केला नाही. आता मयंकचा धीर सुटत चालला होता. तो एकामागून एक मेसेज करत होता. मेसेज समोरून वाचले पण जात होते पण तरीही रिप्लाय नाही. हा काय मूर्खपणा आहे हेच मयंकला कळत नव्हते. काय झालंय कि श्रावणीला आपल्याशी बोलावेसे वाटत नाहीये. आपण तर कायम तीच मन जपण्याचा प्रयत्न केलाय. मयंक कडे प्रश्न तर खूप होते. पण उत्तर द्यायला कोणीच नव्हते. अचानक एका थंड झुळकीसारखी आलेली श्रावणी आता अचानकच निघून गेल्यासारखी वाटत होती. आपण तिला प्रपोज करणार हे तिला कळले असेल का? हो. नक्कीच असच असणार. म्हणूनच श्रावणीने बोलण थांबवलंय. आपल्याकडे तर दोघींचा फोन नंबर पण नाही. ना तिच्या घरचा पत्ता. कस शोधणार तिला? कॉलेज मध्ये? सर्वेश- श्रावणीचा क्लासमेट. त्याच्याशी बोलाव का? उद्या जाऊया तिच्या वर्गात आणि विचारू तिला काय झालंय. रिलेशन नको तर नको सांग. पण मैत्री का संपवतेयस. पण नको. तस ही नको. तिचा प्रोब्लेम अजून कळलाच नाहीये. काहीतरी वेगळा प्रोब्लम असेल तर अख्ख्या कॉलेज समोर इज्जत काढेल ती. आणि ते माझ्या इमेजला परवडणारे नाही. त्यापेक्षा नकोच. असही असेल कि काहीतरी वेगळाच प्रोब्लम आहे. बोलेल ती आज न उद्या. राग आलाच असेल तर शांत झाल्यावर. वाढदिवस ५ दिवसांवर होता. मयंकने पूर्ण तयारी करून ठेवली होती, अगदी गिफ्ट, बुकेची ऑर्डर, हॉटेलमधल टेबल बुकिंग. बोललीच ती आदल्या दिवशीपर्यंत तरी आपला प्लान पूर्ण करू. नाहीतर बघू मग काय ते. मयंकने विचार केला पण वाढदिवसापर्यंत काहीच घडल नाही.

त्यादिवशी रात्री १२ ला मयंकने तिला बर्थडे विश केल पण तरीही त्याला रिप्लाय नाही आला समोरून. बाकी तिच्या wall वर जेवढ्या जणांनी तिला शुभेच्छा दिल्या त्यांना सगळ्यांना तिने एका सेकन्दात thank you म्हटलं होत. आता मात्र हे सहन करण्यापलीकडे होत. आपल्याला कोणी इतक इग्नोर करू शकत ते हि कारणाशिवाय हे पचवण मयंकला खूप जड जात होत. आयुष्यात पहिल्यांदा तो एका मुलीसाठी इतका सिरिअस होता. आणि त्या मुलीने त्याच्या भावनांचा खेळ मांडला होता. त्या रात्री तो झोपूच शकला नाही. आपण आजपर्यंत बाकीच्या मुलीना जस कॅजुअली घेतलं तस आता आपल्याला कोणीतरी वागवतंय. आपण खूप चुकीच वागलोय सगळ्यांशी असे सगळे विचार रात्रभर चालूच राहिले. सकाळी तर अजून वाईट अवस्था होती ज्या दिवसासाठी त्याने इतकी मेहनत घेतली होती, त्यादिवशी तो रडकुंडीला आला होता. मयंकचे अश्रू कोणालाही दिसले नव्हते आजपर्यंत. आणि ते दिसू नयेत म्हणूनच त्याने आज ड्रिंक्स घेण्याचा निर्णय घेतला. तो Poptates ला जाण्याच्या तयारीतच उठला आणि निघणार तोच अनघाचा call.

नेहमीच्या मयंकने कदाचित कट केला असता पण आज मयंकला तिची गरज वाटली. त्याने फोन घेतला तोच अनघाची उत्साही बडबड चालू. कुठे आहेस? काय करतोयस? भेटूया का? मयंकला आश्चर्यच वाटले. आपण कायम हिच्याशी तुटकपणे वागतो तरी हि सगळ विसरून एवढ गोड गोड कस काय वागू शकते? खरच हिच प्रेम असेल का माझ्यावर? भेटाव का हिला एकदा? मग मयंकने सहजच सांगितले कि तो poptates ला जातोय. यावर अनघाही म्हणाली तुला काहीतरी महत्वाच सांगायचंय. मी पण येते. आता हिला काय सांगायचय याचा विचार करतच मयंक घरातून बाहेर पडला.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Jan 2016 - 6:28 pm | पैसा

इंटरेस्टिंग

एस's picture

10 Jan 2016 - 5:06 am | एस

पुभाप्र.

पद्मावति's picture

15 Jan 2016 - 2:19 pm | पद्मावति

खूप इण्टरेस्टिंग आहे. एका मागून एक भाग वाचत चाललेय.