सोशल नेटवर्किंग (भाग २)

लाडू.'s picture
लाडू. in जनातलं, मनातलं
5 Jan 2016 - 11:38 am

पुढच्याच सेकंदाला श्रावणीने मयंकला मित्र म्हणून स्वीकारले होते. आणि मयंकला आभाळ ठेंगणे वाटू लागले. ताबडतोब तिला hi पाठवलं त्याने. पण तिचा reply आला नाही. ती online असल्याच दाखवणारा हिरवा ठिपका पण नाहीसा झाला होता. मनात भयंकर चरफडत मयंकने कॉम्पुटर बंद केला. तोवर फोन थरथरला. सवयीप्रमाणे वरुनच मोबाईल चा ट्रे खेचत त्याने मेसेज पहिला. अनघा. त्याच्या fan following मधली एक मैत्रीण. तिला कधीपासून मयंक आवडत होता देव जाणे. पण त्याचं नुसत अवडंबर माजवलं होत तिने. आपल मयंकवर किती प्रेम आहे हे जगाला दाखून द्यायची एक संधी सोडत नसे ती. मयंकने आपल्याला गर्ल फ्रेंड म्हणावं यासाठी काहीही करायला तयार होती ती. आणि मयंक तिच्यामुळे अगदी त्रासून गेला होता. या मुलीला आपली गर्ल फ्रेंड होण्यात का एवढा इंटरेस्ट आहे हे ते तो नीट ओळखून होता. अनघाला मयंकची प्रसिद्धी हवी होती. त्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांनी ओळखावं आणि आपला हेवा करावा अस काहीसं तिला वाटत असे. शिवाय मयंकच्या सुंदर सुंदर फोटोंमध्ये आपण दिसावं. त्यानिमित्ताने सिद्धांतशी आपली ओळख व्हावी. मग आपलं स्वतःच किमान एक फोटोशूट वेगवेगळ्या लोकेशन्सवर .. या सगळ्या तिच्या long term इच्छा होत्या.

पण मयंक समोरच्या मुलीच्या मनात काय चालू आहे हे न कळण्याएवढा मूर्ख नव्हता. अनघाचे मेसेजेस कायम न वाचताच तो आपली कामे करीत असे. आजही पुन्हा मोबाईल लॉक करून तो उठला पण तेवढ्यात काहीतरी आठवलं त्याला. श्रावणीच्याच कॉलेजला आहे अनघा. तिला भेटण्याच्या निमित्ताने कॉलेजची टेहळणी करून येऊ शकतो आपण. दिसलीच श्रावणी तर सोन्याहून पिवळे. नाहीतर तिचा क्लासरूम वैगरे बघून ठेवला तरी पुरे. त्याने अनघाला मेसेज केला. “hey babe, बरेच दिवस भेटलो नाही आपण. तुझ्या कॉलेजला येऊ का? आज पूर्ण दिवस तुझ्यासाठीच असेल मग.” अनघाचा लगेच मेसेज. “वाट पाहतेय. लवकर ये.” आता विचार करण्याची पाळी अनघाची होती. आजपर्यंत अस कधीच घडलं नव्हत. मयंकशी तिची ओळख facebook वरचीच. मयंकने स्वतःहून तिला भेटण्यात कधीच रस दाखवला नव्हता. तिलाच हौस म्हणून ती त्याच्या कॉलेजला जाऊन तो म्हणेल तेवढा वेळ थांबून त्याला भेटली होती. आणि मयंक मुद्दामून तिला टाळत होता हे हि तेव्हाच तिला कळल होत, जेव्हा कॉलेज मध्ये असूनही तब्बल दीड तासानंतर मयंक तिला भेटायला आला होता. म्हणूनच आज अचानक असं काय झालं असेल याचा विचार करत ती कॉलेजच्या गेट वरच उभी होती.

१५ मिनिटातच मयंक तिच्यासमोर होता. तिला वाटलं मयंकबरोबर बाहेर कुठे जाता येईल. CCD तर बाजूलाच हाकेच्या अंतरावर. पण ती जवळ येण्याआधीच मयंकने बाईक पार्क केली आणि तो तिच्यासमोर आला. “आज तुझ्या कॉलेजची सफर करव. माझ कॉलेज पाहून गेलीस ना, चल आता मला तुझ्या कॅन्टीन मध्ये घेऊन चल.” मयंक हसत हसतच तिला म्हणत तिच्या उत्तराची वाटही न बघता, तिच्या हाताला धरून आत शिरला. अनघा त्यानेही सुखावलीच. मयंकला आपल्याबरोबर सगळ्यांनी पाहावं हेच तर वाटत होत तिला इतके दिवस. ती मयंकला अजूनच बिलगून चालू लागली.

तिच्यासोबत बराच वेळ पूर्ण कॉलेज फिरूनही मयंकला श्रावणीची काहीही चाहूल लागली नव्हती. अनघाला तिच्याबद्दल काहीही विचारून मयंकला धोका पत्करायचा नव्हता. श्रावणी B.Com. च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. सहज म्हणूनच अनघाला मयंक B .Com च्या वर्गापर्यंत घेऊन गेला. तिथे त्याला त्याच्याच कंपूपैकी एक मित्र दिसला – सर्वेश. मयंकला एकदम लक्षात आले. हा श्रावणीच्याच वर्गात असणार. म्हणजे श्रावणीशी contact कारण आणि वाढवण सोप्प आहे आता. पण घाई नको. त्याला दुरूनच hi करत मयंक तिथून निघाला. अनघालाही bye करत मयंक निघूनही गेला. अनघाला त्याचे आजचे एकूणच वागणे खूप विचित्र वाटले होते.

मयंकने घरी येताच क्षणी पुन्हा facebook पाहिले. श्रावणीने तिचा फोटो अपलोड केला होता. झुळझुळीत कपड्याचा आकाशी रंगाचा अनारकली, कानात तशाच रंगाचे छोटेसे झुमके, मोकळे सोडलेले केस आणि मागे तर इतकं छान लोकेशन, एका कारंज्याला टेकून उभी असलेली ती. पायापर्यंत आलेली आणि त्याही खाली मागे लोळणारी सुंदर सोनेरी ओढणी, आणि तिच्यामागची अतिभव्य वास्तू म्हणजे राजवाडाच जणू. फोटो नक्कीच मुंबईतला नाही. फोटो like करण्यावाचून मयंकला गत्यंतरच नव्हते. एरवी तो कोणताही फोटो like करताना तो हजारदा विचार करायचा. स्वतःचे celebrity status त्याला गमवायचे नव्हते. आणि तो easily available आहे अस लोकांना वाटू द्यायचं नव्हत. पण श्रावणीची गोष्टच वेगळी होती. फोटो like केल्यावर त्याने तिची बाकीची profile पाहिली. या फोटोच्या खाली असलेल फोटोच श्रेय पाहिलं. मल्हार तावडे म्हणून कोणी फोटोग्राफर. कसला भारी आहे हा म्हणत सिद्धांत साठी मयंकच्या तोंडून शिवीच आली. हा काय करत असतो देव जाणे. या मल्हार सारखे फोटो कधी जमतील यार. सगळचं उत्कृष्ट कॅटेगरीमध्ये. श्रावणीच्या जवळपास सगळ्याच फोटोखाली मल्हारच नाव, तिने काढलेले काही सेल्फी वगळले तर. मयंकला थोडे अस्वस्थ वाटू लागले. हा मल्हार हिचा boy-friend तर नाही? न राहवून त्याने मल्हारची profile उघडली.

श्रावणीची profile जितकी बोलकी होती तितकी याची अबोल. स्वतःबद्दल काहीच नाही फक्त शाळेचं नाव आणि फोटो, फोटो, फोटो. त्याने काढलेले. सुंदर सुंदर, मुलींचे आणि ठिकाणांचे, तारीख, वार, ठीकाणासहित सगळे अपलोडस. खूपशा फोटोंमध्ये श्रावणी, काही फोटोंमध्ये संयुक्ता म्हणून अजून एक सुंदरशी मुलगी. आणि होत्या काही मुली. संयुक्ता बहुधा श्रावणीची मैत्रीण होती. कारण तिच्या फोटोंवर श्रावणीने कमेंट्स केल्या होत्या. मयंकला ती पण आवडली. एकंदरीत यांचा ग्रुपच मस्त होता. पण श्रावणी त्याच one-sided पहिलं प्रेम होती. आता तिचे आणि मल्हारचे काय संबंध आहेत ते फोटोवरून कळत नव्हत. पण अस काही नसाव ज्याची मयंकने काळजी करावी. कारण मल्हार ने खूप मुलींचे असे छान छान फोटो काढले होते. त्याचा स्वतःचा डिस्प्ले फोटो मात्र अंधारात काढलेला होता. सूर्यास्तावेळी एका दगडावर बसून. पण तो फोटोही अफलातून होता.

हा मल्हार खूप creative आहे यात शंकाच नाही. दिसायला चांगला नाहीये म्हणून असा फोटो. ज्यात त्याचा चेहरा दिसत नाहीये नीट पण तरीही फोटोवरून नजर हटत नाहीये. आणि त्याची अंगकाठीही किरकोळ. मयंकने नकळत स्वतःशी तुलना करून पाहिली. पण त्याची जिम बॉडी त्याच्या टी-शर्ट्स मधून कायमच मस्त दिसायची आणि हा मल्हार म्हणजे अगदीच पाप्याचं पितर. श्रावणीसाठी मल्हार हा आपला प्रतिस्पर्धी असूच शकत नाही, मयंकने विचार केला. आणि टेन्शन गेल्यासारखं स्वतःच हसला. शिवाय मल्हारच्या कॉलेजचं नाव कुठेही नसल्याने हा माणूस कॉलेजची पायरी तरी कधी चढला असेल का याचीही शंका आलीच मयंकला. संयुक्ताच्या profileमध्ये मात्र मयंकच्याच कॉलेजचे नाव होते. संयुक्ता जर श्रावणीची मैत्रीण वैगरे असेल तर कोण जाणे श्रावणी कदाचित तिला भेटायला आपल्या कॉलेजलाही येत असेल मयंकच्या डोक्यात किडा वळवळला त्याच क्षणी श्रावणीने संयुक्ताच्या wall वर केलेली पोस्ट मयंकच्या डोळ्यांमधून सुटली नाही. “आजच्या स्पेशल दिवशीची पार्टी संयुक्ताच्या कॉलेजमध्ये” अशी पोस्ट आणि त्यात ती आणि संयुक्ता tagged. म्हणजे आज श्रावणी आपल्या कॉलेज मध्ये होती आणि तसे असेल तर आज आपण आपल्या कॉलेजला न जाता अनघाला भेटून खूप मोठी चूक केलीय. मयंकने खूप चांगली संधी वाया घालवली होती आज.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पूर्वाविवेक's picture

5 Jan 2016 - 1:10 pm | पूर्वाविवेक

मस्त..... interesting

वाचतोय. इंटरेस्टिंग.