बाटली आणि दारू.....

Primary tabs

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
23 May 2015 - 12:17 pm

खर्‍या आयडीने बोलता येईना

मनातले गरळ ओकता येईना...

डुआयडीने आता सगळे....

"स्कोअर सेटल" करू.....!!

उपद्र्व हा अनंत काळचा...

मिपाबरोबर कायम रहायचा...

घरात चारच माणसे आणि...

दारात चारशे चपला सारू.....

नव्या आयडीच्या बाटलीत भरली

शिळ्या विचारांची जुनीच दारु....

त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही...

मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !!

आडून आडून सगळे करिती हल्ला...

भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला....

एकटा दुकटा कोणी लागता हाती....

चला त्याला आडवे करू !!

येता जाता शरसंधान.....

मिपाकरांचे कार्य महान....

संस्थळ घेतले साफ कराया....

कोळी,झुरळांची लगबग सुरु !!

---(सगळ्या डुआयडींना चारोळी अर्पण)

काहीच्या काही कविताफ्री स्टाइलभयानकबिभत्सअद्भुतरसइतिहासचारोळ्याविडंबनभाषाव्युत्पत्तीसुभाषितेजीवनमानराहणीराजकारणछायाचित्रण

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 May 2015 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो, ही चारोळी नाही... वीसोळी आहे !

माम्लेदारचा पन्खा's picture

23 May 2015 - 1:17 pm | माम्लेदारचा पन्खा

नका काळजी करू एवढी !!

विवेकपटाईत's picture

23 May 2015 - 1:06 pm | विवेकपटाईत

मीपाकर खरोखरंच महान आहते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2015 - 1:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ळोळ!!!

पैसा's picture

23 May 2015 - 1:46 pm | पैसा

लै भारी! यातले काहीजण आपला एक आयडी धराशायी झाला की परत दुसरा घेऊन येतात. त्यांचं मिपावर एवढं प्रेम की कितीही वेळा बॅन झाले तरी परतून येतात आणि येताना आपण कोण आहोत हे लपवायचा प्रयत्नही करत नाहीत. आणि दुसरा प्रकार म्हणजे पकडले गेले तरी त मी नव्हेच वाले!

टवाळ कार्टा's picture

23 May 2015 - 2:25 pm | टवाळ कार्टा

खिक्क
मस्तय

त्वरा करा !त्वरा करा!त्वरा करा !
कोळी, झुरळे, मुंग्या ई.पासून त्वरित मुक्ती!
आजच संपर्क करा
दमामि किटकनाशक सेवा!

द-बाहुबली's picture

23 May 2015 - 7:29 pm | द-बाहुबली

याच कारणासाठी माझे हात जोडून सर्वांना सांगणे आहे, नेहमी ओरीजनल राहा. म्हणजे पहिला आयडी बॅन झाल्याशिवाय दुसरा काढायच्या फंदात अजिबात पडु नका. *

खर्‍या आयडीने बोलता येईना

मनातले गरळ ओकता येईना...

खिक्क... मिपाबद्दलच हे भाष्य आहे की आणखी कशाबद्दल हे जरा विस्कटुन सांगाल काय ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2015 - 7:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डिटेक्टीव्ह चा आयडी ना तुमचा मग काढा शोधुन.

पाटील हो's picture

25 May 2015 - 11:36 am | पाटील हो

लोळा …… ळोळ!!!