अ‍ॅलीना रोमरः मराठी विषयाची विद्यार्थिनी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
27 Apr 2015 - 1:21 am

नमस्ते,

माझे नाव अ‍ॅलीना रोमर आहे. मी नॉर्वेची नागरीक आहे. मी पुन्यात शिकते. मी पुने युनिवर्ससिटी मदे मराठी सब्जेक्टमदे बीए करते आहे. मला मराठी खुप खुप आवडते. मी रोज युनिवर्ससिटी मदे जाते. मला माझे कॉलेज खुप आवडते.
मी माझ्या घरमालकांकडे पेईंगगेस्ट आहे. मी कोथरूडला राहते. मी दररोज पायी चालत कॉलेजला जाते. चालत जातांना मला नागरीक दिसतात. दुकानदार दिसतात. रिक्षा दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यामुळे मला दररोज नविन गोष्टी समजतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यावेळी मला भारतातले नागरीक दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते.

जातांना रिक्षा चालवणारे डायवर (येथे Drivers कसे लिहायचे?) मला हात हलवत विचारतात, मॅडम हूं हूं??? मला समजत नाय की ते सरळ का बोलत नाही. त्यांच्या तोंडात काहीतरी असते?

येथले नागरीक काहीतरी खात असत चालत असतात. रस्त्यातच ते spit करतात. टू व्हिलर मधले नागरीक , कारमधले नागरीक spit करतात. मोबाईलवर बोलतात. spit करतात. सस्त्यात उभे राहतात. spit करतात.

रस्त्याने नागरीक असलेले मुले टू व्हिलर जोरात चालवतात. ते मस्त सिग्नल हिरवा होणेपर्यंत जोरात मोटार चालवतात. त्यांच्या मागे मुलगी बसलेली असतात. त्यामुळे ते जोरात चालवतात.

येथल्या मुली तोंड बांधतात. रस्तेत धुळ, माती असल्याने ते तोंड झाकून जातात. आपल्या तोंडाची खुप प्रोटेक्शन करतात. रस्त्याने चालतांना ते तोंड सोडत नाहीत. म्हणजे पुने किती हवा खराब झाली आहे. खुप.

मला पण तोंडाला कापड बांधायचे आहे. पण मला असेच मोकळे चालायला आवडते. मी चालत कॉलेजला जाते. मी कोथरूडला राहते. तेथून मी कॉलेजला चालत जाते.

येथे नागरीक रस्त्यावर वडापाव खातात. मी पण खाते. कधी कधी. मला पण वडापाव आवडतो. पण खुप मसालेदार असतो.

ईव्हीनिंगमदी मी भाजी घेवून येते. ती भाजी घरमालक लेडीला देते. ते खुप दयाळू आहे. घराचे रेंट टाईमबरोबर घेतात. ते खुप चांगले आहे. ते वरती टेरेसवर जावू देत नाही. मी त्यांना तेथे स्मोक करतांना पाहीले असल्याने.

भाजी घेत असतांना, रिक्षामंदी बसतांना ते नागरीक जास्त चार्ज सांगतात. कारण माझा स्किन गोरा आहे. मग मी त्यांच्या भाषेत बोलते. मग ते बरोबर चार्ज सांगतात. आता आमच्या ओळखीचे काही झाले आहे.

मला अजून पुढे मराठी शिकायचे आहे. पुढे भेटू.

संस्कृतीसमाजराहणीप्रवासराहती जागाप्रकटन

प्रतिक्रिया

वाव्वा. मराठी उत्तम बोलतेस की. कोथरूड ते यूनि. चालत जाऊ नको, लांब आहे ना. आणि उगाच जास्त साहस करु नको. गेल्या वर्षी एका जर्मन कलीगच्या बायकोला पुण्यातल्या ट्रेनने फिरायची हौस होती. म्हटलं नका जाऊ, ऐकलं नाही. मोबाइल, पर्स गायब. इतरही 'वाईट अनुभव' आलेच. तेंव्हा "व्हेन यु आर इन इंडिया, डोंट डू व्हाट इंडियन्स डू, थोडं जपूणच डू."
बाकी शुभेच्छा. उत्तरेचे रंग दाखवायला घेऊन चल मला कधीतरी. ;)

कापूसकोन्ड्या's picture

27 Apr 2015 - 4:40 am | कापूसकोन्ड्या

अहो यसवायजी, ती नॉर्वे ची ना, मग तिला "Når du er i India, ikke gjør som inderne gjør" म्हणजे समजेल.

चित्रगुप्त's picture

27 Apr 2015 - 3:24 am | चित्रगुप्त

सरजी, खरंच नार्विणीनं लिवलंय, का मस्करी करतायसा ?

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2015 - 4:17 am | श्रीरंग_जोशी

हे अनुभवकथन इथे प्रकाशित केल्याबद्दल पाषाणभेद यांचे आभार.

परदेशी व्यक्ती मराठी शिकतांना पाहून कौतुक वाटते. मला वाटते तिने जो युनिवर्सिटीचा उल्लेख केला आहे तो कुठल्या तरी कॉलेजचा असावा. ग्रॅज्युएट डिग्री अन पुढचे शिक्षण जेथे घेतले जाते त्या जागेस आपला देश सोडून इतर बर्‍यांच देशांत युनिवर्सिटी असे म्हणायची पद्धत आहे.

अवांतर - परदेशी लोकांनी जुजबी मराठी बोलणे शिकवण्यासाठी बनवलेले हे हे व्हिडिओज रोचक आहेत - .

यावरून आठवले - आठवीच्या मराठी कुमारभारती पुस्तकातला पॅट व नान हा पाठ.

अगम्य's picture

27 Apr 2015 - 6:59 am | अगम्य

एक सहज कुतूहल. मराठी मध्ये BA करून पुढे काय करायचा विचार आहे? तुम्ही मराठी साहित्य तुमच्या भाषेत भाषांतरित केले तर नॉर्वे च्या लोकांना मराठी चा आस्वाद घेत येईल.

सौन्दर्य's picture

27 Apr 2015 - 7:52 am | सौन्दर्य

जर खरेच नॉर्वेच्या मुलीने लिहिले असेल तर कौतुकास्पद आहे. पण हे थोडे गुजराती व्यक्तीने मराठी लिहिण्यासारखे वाटले.

सतिश गावडे's picture

27 Apr 2015 - 8:23 am | सतिश गावडे

मला पारशी वाटले. :)

मात्र ते नॉर्वेच्या मुलीचे मनोगत असेल असे वाटत नाही. हा सातपूर यमायडीशीवाल्यांचा काहितरी नवा किस्सा असावा. ==)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2015 - 8:30 am | अत्रुप्त आत्मा

मागे आमच्या ब्रम्हवृंद मंडळात अशीच एक जण आली होती. रोज यायची पुरोहितांचे मराठी कसे असते ते बोलाय/शिकायला.. त्याची आठवण झालि.
आम्ही कुणी तिला समजत नाहिये म्हणुन (आमच्या भयाण! :-D ) विंग्रजित काही सांगु लागलो,की ती लगेच आंम्हाला , " नको नको, क्रिप्या नको इंग्लिश मधे बोलू. मराठितच बोला मज्यशी. मला नाही खळ्ळे तरी चालेल." असं आग्रहानी म्हणायचि. हे विशेष!

प्रशांत हेबारे's picture

27 Apr 2015 - 12:37 pm | प्रशांत हेबारे

खूप छान. माझ्याकडे पण sweeden चा मुलगा होता शिकायला. खूप शिकलो तेच्याकडून. विशेषता पयशे कशे वाचयाचे त्या मुलाला पण खूप तयार केले. मराठी बोलायला शिकला, भाजी करायचा, vegetarian झाला almost. आला तेव्हा खूप घाबरत होता. निर्णय घ्यायला शिकला. एक वर्ष होता. त्येना इंडिअन food आवडते.

चित्रगुप्त's picture

27 Apr 2015 - 12:38 pm | चित्रगुप्त

मला हात हलवत विचारतात, मॅडम हूं हूं??? मला समजत नाय की ते सरळ का बोलत नाही. त्यांच्या तोंडात काहीतरी असते?

अत्यंत गूढ वाक्य. हात नेमका कसा हालवतात हे सांगितले, तर काही बोध होऊ शकेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Apr 2015 - 12:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

एकदा रोटरी क्लब चे मेंबर असलेल्या एका कड़े एक जर्मन पोरगा आला होता, तो जेवण फार मजेशीर करत असे, पापड़ आमटीत बुडवून खाई कोशिंबीर भातात कुस्करून चपाती नुसतीच वगैरे मग त्याला शिकवले नीट, वर्षाच्या शेवटी परत जाइ पर्यंत तो कढ़ी किंवा ऱश्या चे भुरके मारायला शिकला होता मात्र

सिरुसेरि's picture

27 Apr 2015 - 1:28 pm | सिरुसेरि

पाषाणभेद यांचे खरे नाव 'अ‍ॅलीना रोमर' आहे का ?

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2015 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

ख्याक! या हो पा.भे. आता.

चित्रगुप्त's picture

27 Apr 2015 - 2:56 pm | चित्रगुप्त

या हो पा.भे. आता.

आमी ते पयलंच वळंकलं व्हतं.

धाग्यात बरेच वादाचे पोटेंशिअल, नजाकत, हरकत आहे ते कुणी ओळखले नाही काय? बाकी एलीना रोमर हिने मिपावर सदस्या होण्यासा ठी केलेला इमेल व्यवहार आमचेकडे आहे.
एलीनाशी ओळखीबाबत उगाचच माझ्याकडे लग्गा लावू नका. :-)

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 4:12 pm | टवाळ कार्टा

मग ताकाला जाऊन भांडे का लपविता ;)

सतिश गावडे's picture

28 Apr 2015 - 8:50 am | सतिश गावडे

कारण त्यांना तांब्या पुढे करायचा असेल. ;)

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 4:08 pm | टवाळ कार्टा

अ‍ॅलीना रोमर...तुला व्यनी आनी खरड पन कर्ता येत नै म्हून हिथेच ईच्च्यारतो

माज्याशी मयत्री कर्नार कं? ;)

मोहनराव's picture

27 Apr 2015 - 4:19 pm | मोहनराव

पुण्यात आहेस म्हणजे उत्तम मराठी शिकुन घेशील हो!! (पुणे ३०)
(...चला धागा पेटवून पळ काढू....)

रवीराज's picture

27 Apr 2015 - 5:15 pm | रवीराज

"ईव्हीनिंगमदी मी भाजी घेवून येते. ती भाजी घरमालक लेडीला देते. ते खुप दयाळू आहे. घराचे रेंट टाईमबरोबर घेतात. ते खुप चांगले आहे."

प्रचेतस's picture

28 Apr 2015 - 8:46 am | प्रचेतस

येकदम पाभेस्टाईल.

दफोराव बर्‍याच दिवसांनी लिहते झाले !
अशी एक जर्मन पोट्टी वाडीला पाहिली होती, दत्त संप्रदायवर काही तरी रिसर्च करीत व्हती म्हणे !
बाकी यावरुन मला एक गोष्ट आठवली... { ही वार्ता मराठीतुन झाली नाही }बहुतेक उजैनला एक फिरंगी आणि त्याची मैत्रीण फिरता फिरता माझ्या समोर आले होते... त्याने मला काही तरी विचारले... नंतर मग मी तुम्ही कुठुन आलात? इथे किती वेळा आलात ? इं विचारले, नंतर थोडे-फार बोलणे झाल्यावर त्याला सहज इथे वारंवार यावेसे का वाटते ? आणि येउन काय मिळते ? असा प्रश्न विचारल्यावर मात्र तो फिरंग्या बराच विचारात पडला... त्याने काही उत्तर दिल्यावर मी त्याला मला जमेल तसा आध्यात्मिक "डोस" दिला, त्यानंतर त्याचा विरक्त झालेला चेहरा पाहुन त्याच्या मैत्रिणीने त्याला तिथुन घेउन जायची केलेली घाई आठवली ! ;)
आपला देश एका फिरंगी नागा साधुस तो तसा होण्या आधीच मुकला ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt

द-बाहुबली's picture

28 Apr 2015 - 4:26 pm | द-बाहुबली

डिटेल लिहा, मोघम नको, नक्कि काय संभाषण झाले ? विषेशतः त्याने तुमच्या प्रश्नांची उत्तरे काय दिली ?

डिटेल लिहा, मोघम नको, नक्कि काय संभाषण झाले ? विषेशतः त्याने तुमच्या प्रश्नांची उत्तरे काय दिली ?
नक्कीच लिहले असते... पण या घटनेस तशी बरीच वर्षे झाली आहेत... त्यामुळे आता तितकेसे स्पष्ट आठवत नाही ! उगाच मनात येइल ते टंकण्यात अर्थ नाही.
बाकी बॉमकेस बॅक्षी हे तोंडात रोसोगुल्ला धरुन आयडी ग्रहण केल्यासारखे वाटते आहे... ;) व्योमकेश बक्षी या मालिकेचा मी प्रचंड पंखा होतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt

अत्रुप्त आत्मा's picture

28 Apr 2015 - 4:47 pm | अत्रुप्त आत्मा

@ बॉमकेस बॅक्षी हे तोंडात रोसोगुल्ला
धरुन आयडी ग्रहण केल्यासारखे वाटते आहे...>> छ्छे!! आहो किती जुना आहे तो!
निष्कारण परंतु मुद्द्याला पकडून पाठी पडायचि पद्धत पहा, लगेच कळेल कोण तो!

निष्कारण परंतु मुद्द्याला पकडून पाठी पडायचि पद्धत पहा, लगेच कळेल कोण तो!
हा.हा.हा... बॅक्षी साहेबांचा जन्मकाळ आत्ताच पाहिला... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt

@अत्रुप्त ए बाबा दुर्लक्ष कर ना प्रतिसाद पटत नसेल तर ? तुला वैयक्तीक काही लिहलयं का ? जो मुद्दा उपस्थीत केलाय त्यावर चर्चा कर नाही तर शांत हो.

निष्कारण परंतु मुद्द्याला पकडून पाठी पडायचि पद्धत पहा, लगेच कळेल कोण तो!

स्वप्नातुन जागा हो. इतरांचे विचार प्रदुषीत आणि नियंत्रितही करु नकोस. बाकी प्रतिसादाचे मुल्यामापन करुन योग्यायोग्य ठरवणारे इथे असताना तुला काय त्रास होतोय रे ?

@मदनबाण आपण त्याला जे प्रश्न केले ते रोचक व मनोरंजक होते म्हणून त्यावर त्याने दिलेली उत्तरे जाणन्यात मला रस होता. म्हणून जास्त माहिती विचारली. असो... जन्मकाळ न्हवे कर्मकाळ महत्वाचा. आणी जे आपल्याला महत्वाचे वाटत नाही ते जगालाही निष्कारण, निरर्थक आहे असली विचारसरणी बाजुला ठेवुन कर्म करत रहाणे त्याहुन महत्वाचे. आभार्स.

मदनबाण's picture

29 Apr 2015 - 9:53 am | मदनबाण

जन्मकाळ न्हवे कर्मकाळ महत्वाचा. आणी जे आपल्याला महत्वाचे वाटत नाही ते जगालाही निष्कारण, निरर्थक आहे असली विचारसरणी बाजुला ठेवुन कर्म करत रहाणे त्याहुन महत्वाचे
अगदी मान्य !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling report

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2015 - 12:29 am | अत्रुप्त आत्मा

@अत्रुप्त ए बाबा दुर्लक्ष कर ना प्रतिसाद पटत नसेल तर ? तुला वैयक्तीक काही लिहलयं का ? जो मुद्दा उपस्थीत केलाय त्यावर चर्चा कर नाही तर शांत हो.>>> ब्वॉर! ठीक हाय..आता शांत. ;) आनी म्या क्याल्याली चेष्टा तुमाला लै लागली असं जानवल्यामुळे...एक सॉरी मान्य करा बगू आमचं! :)
.
.
.
आता आमी चिडिचॉप.. बॅक्षी , आपलंतुपलं काय नाय बगा यापुडं..

नाखु's picture

28 Apr 2015 - 5:08 pm | नाखु

प्रतीकात्मक सृजन्लेखास तूर्त पोच.

प्रतीसाद धुराळ्यात अद्द्यापी पुरेसा वेग आणि "फोड्-बातमी मूल्य" नाही तेव्हा पन्नाशीपर्यंत वाट पाहू.

असो मराठी शिकण्याला शुभेच्छा !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2015 - 5:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

तेव्हा पन्नाशीपर्यंत वाट पाहू.

तुमचे आजचे वय माहीत नसल्याने "पन्नाशीपर्यंत म्हणजे किती वर्षे?" हे कळले नाही :) ;)

नाखु's picture

29 Apr 2015 - 10:13 am | नाखु

धाग्याची पन्नाशी होईपर्यंत !!!
म्हंजे सत्काराची तयारी करता येइल.

कविता१९७८'s picture

28 Apr 2015 - 5:14 pm | कविता१९७८

मस्तच, मजेशीर लेखन, पण तीची मराठीची आवड पाहुन खुप बरे वाटले.

प्रसाद गोडबोले's picture

28 Apr 2015 - 10:02 pm | प्रसाद गोडबोले

छान !!

प्यारे१'s picture

28 Apr 2015 - 10:26 pm | प्यारे१

आली ना 'रुमर'????

रवीराज's picture

28 Apr 2015 - 11:06 pm | रवीराज

हाहाहा....मराठी विषय सोडुन देईल आता बहुतेक.

"मराठी दशेची विद्यार्थिनी"

पैसा's picture

28 Apr 2015 - 10:27 pm | पैसा

पुण्यातले लोक आणि मराठी इतरांना कसे दिसतात याची एक झलक!

कौशिक लेले's picture

19 Oct 2017 - 11:39 am | कौशिक लेले

या चित्रफितीत तो छान बोलला आहेच पण तो कुठल्याही संहितेशिवाय उत्स्फूर्तही छान बोलतो.
या वर्षी एप्रिल मध्ये मी आणि मार्टिन त्याच्या पुण्याच्या घरी/हॉस्टेल मध्ये भेटलेलो . तेव्हा माझ्या आग्रहाखातर आम्ही एक चित्रफीत बनवलेली. ती पण तुम्हाला बघायला आवडेल.
Martin
https://www.youtube.com/watch?v=KuovUJo1I3M