आवाहन

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
14 Aug 2008 - 3:05 pm

जयालागी ध्यास,
नामाची आस,
कोण श्रीमंत दास,
तयावीण.

भावाची प्रचीती,
राम स्वयें सांगाती,
प्रेमाची महती,
वर्णावी किती!!

रामाचे पायी,
जया चारी धाम,
विचारांचे काम,
तयासी कैसे.

मोजावे कशास
उरलेले दिन,
नामी समाधान,
आनंदी असावे.

राम ठेवी जोवर,
त्याचे असावे तोवर,
अन् निघावे सत्त्वर,
हाक येता!

नामी राहावे मन,
नाम असावे प्राण,
मुमुक्षूचे आवाहन,
सगळ्यांसी.

मुमुक्षू

[टिप: ही कविता आधी दुसरीकडे याच नावाने प्रकाशीत केलेली आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]

कवितासमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनाप्रतिभा

प्रतिक्रिया

श्रीकृष्ण सामंत's picture

17 Aug 2008 - 10:38 pm | श्रीकृष्ण सामंत

मुमुक्षूजी,
काव्य वाचायला आवडलं

"मोजावे कशास
उरलेले दिन,
नामी समाधान,
आनंदी असावे."
हा संदेश सुंदर आहे

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मदनबाण's picture

18 Aug 2008 - 7:50 am | मदनबाण

राम ठेवी जोवर,
त्याचे असावे तोवर,
अन् निघावे सत्त्वर,
हाक येता!
व्वा !!
नामी राहावे मन,
नाम असावे प्राण,
मुमुक्षूचे आवाहन,
सगळ्यांसी.
मस्तच..

(श्री राम जय राम जय जय राम)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

हर्षद आनंदी's picture

18 Aug 2008 - 11:01 am | हर्षद आनंदी

राम ठेवी जोवर,
त्याचे असावे तोवर,
अन् निघावे सत्त्वर,
हाक येता!

वाट्ते तितके सोपे नाही ते--

विसोबा खेचर's picture

18 Aug 2008 - 11:40 am | विसोबा खेचर

मोजावे कशास
उरलेले दिन,
नामी समाधान,
आनंदी असावे.

राम ठेवी जोवर,
त्याचे असावे तोवर,
अन् निघावे सत्त्वर,
हाक येता!

वा! सुंदर काव्य...

नामी राहावे मन,
नाम असावे प्राण,
मुमुक्षूचे आवाहन,
सगळ्यांसी.

हे मिपासंत मुमुक्षा,

भक्तिमार्गातल्या 'नामस्मरण' या अगदी साध्या, सोप्या व कुणालाही सहज करता येण्याजोग्या भक्तिचं फार छान आवाहन केलं आहेस...!

आपला,
(शृतीस्मृतीपुराणोक्तवाली कर्मकांडाधीन भक्ति कधीही न जमलेला!) नामस्मरणप्रेमी - तात्या.

राघव's picture

20 Aug 2008 - 1:23 pm | राघव

तात्या,
तुम्ही नामस्मरणप्रेमी हे बघून खूप छान वाटले. चांगले चालू द्यात.

हे मिपासंत मुमुक्षा,
बाप रे.. अहो माझे काही चुकले असेल तर चार थोबाडीत मारा पण असे काही म्हणू नका हो :(
साधा, सरळ अन् चांगला माणूस होण्याचा प्रयत्न अजून साध्य झालेला नाही मला, संतत्वाच्या पेडस्टेल वर कशाला बसवताय? त्याच्यासाठी स्वार्थ सोडावा लागतो - जे स्वप्नातसुद्धा सुटलेले नाही अजून :)

आपला
मुमुक्षू

ईश्वरी's picture

18 Aug 2008 - 11:57 am | ईश्वरी

मोजावे कशास
उरलेले दिन,
नामी समाधान,
आनंदी असावे.

राम ठेवी जोवर,
त्याचे असावे तोवर,
अन् निघावे सत्त्वर,
हाक येता!

वा! फारच सुंदर काव्य...सोपी सरळ भाषा आणि छोट्या छोट्या ओळींमधे जीवनाचे सार सांगण्याची हातोटी छान जमली आहे.

ईश्वरी

तुम्हा सगळ्यांस कविता आवडली हे बघून खूप आनंद झाला.

लिखाळ's picture

23 Aug 2008 - 11:50 pm | लिखाळ

कवीता आवडली.
-- लिखाळ.