==================================================================
चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...
====================================================================
...बरेच चालणे, भुयारातले रांगणे, नेमबाजी, इ ने आलेला थकवा थोडासा दूर झाला आणि व्हिएतनामी लोकांच्या कल्पकतेला आणि लढाऊपणाला सलाम करत परतीच्या मार्गाला लागलो.
कु ची वरून परतताना वाटेत पोटोबांनी परत आरोळी दिली. त्यांच्या विनंतीला मान देऊन वाटेवरच्या एका रेस्तराँमध्ये शिरलो...
व्हिएतनामच्या सुंदर ग्रामीण निसर्गसौंदर्यात बनवलेले ते ठिकाण एकदम मन मोहून गेले. बसायला मुद्दाम आजूबाजूचे सौंदर्य नीट दिसेल अशी एका बाजूची जागा घेतली...
.
आज शनिवार असल्याने मी शाकाहारी होतो. पण व्हिएतनाममध्ये शाकाहारींची अजिबात हेळसांड होत नाही. त्याचे मार्गदर्शकाने सांगितलेले कारण असे की प्रत्येक बौद्ध व्हिएतनामी काही काळ बुद्ध भिख्खूचे जीवन व्यतीत करतो आणि त्या वेळेस त्याला पूर्णपणे शाकाहारी असावे लागते. पण इतर लोकही आवडीने शाकाहार करत असावे. कारण आमच्या रेस्तराँमध्ये भिख्खू कधी दिसला नाही (तसे रेस्तराँमध्ये जेवणेही भिख्खूला वर्ज्य असणार म्हणा.) पण सगळीकडे मांसाहारी पदार्थांएवढेच शाकाहारी पदार्थही मेन्युत होते. तर हा असा एक बेत...
सुरुवात नारळाच्या पाण्याने झाली. चित्रात सागरच्या बाजूचे पदार्थ बहुतांश मांसाहारी आणि दुसर्या बाजूचे माझ्यासाठी पूर्ण शाकाहारी आहेत. मात्र गंमत अशी की बरेचसे शाकाहारी पदार्थ सोयाबीन वापरून बनवलेले पण दिसायला अगदी मांसाहारी पदार्थांसारखेच होते. दोन तिनदा विचारून खात्री करून मगच हात लावला... खरोखरच सोयाबीनचे होते ! (खर्या) वांग्याची भाजी मस्त झणझणीत होती.
शहरात परत शिरलो तेव्हा चिनी नववर्ष (टेट) समारंभ एका दिवसावर येऊन ठेपल्याच्या खाणाखुणा दिसायला लागल्या...
====================================================================
हॉटेलवर जरा आराम करून संध्याकाळी सायगाव नदीच्या रात्रीच्या जलसफरीला निघालो. बंदर चालत पाचदहा मिनिटांच्या अंतरावर होते. आमच्या सहलीतला हा अचानक समोर आलेला टेटचा समारंभ एक आनंददायक अनुभव होता. जणू आमच्या स्वागताला केलेल्या रोषणाईतून राजासारखे चालत बंदरावर गेलो...
.
.
.
.
.
तेथे अनेक बोटी नटून सजून प्रवाशांची वाट पाहत उभ्या होत्या...
.
व्हिएतनाममधले पर्यटन किती विकसित आहे याचा (परत एकदा) दाखला देणारी व्यवस्था बोटीवर होती...
आम्ही मार्गदर्शकाकरवी बोटीच्या बाजूची जागा राखून ठेवली होती त्यामुळे बोटीवरचा कार्यक्रम आणि बंदरावरची रोषणाई यांचा मस्त आस्वाद घेता आला. बोट हलू लागली आणि थोड्याच वेळात चहाचे छोटे चिनी कप चिपळ्यांसारखे वाजवत दोन नृत्यांगनांनी मंचावर प्रवेश केला...
नंतर एका कसलेल्या वादकाने व्हिएतनामी खेड्यांत वापरात असलेली अनेक प्रकारची वाद्ये अशा कौशल्याने वाजवली की ते प्रात्यक्षिक पाहिले नसते तर अश्या वाद्यातून इतके सुंदर संगीत वाजवता येऊ शकते यावर विश्वास बसला नसता...
.
कार्यक्रमाचे अजून एक क्षणचित्र...
एका बाजूला हा कार्यक्रम आणि दुसर्या बाजूला रोषणाईने नटलेल्या बंदराचे सौंदर्य यात काय पाहू आणि काय नको असे झाले...
या सगळ्या गडबडीत तेवढेच चविष्ट असलेल्या जेवणाचे फोटो काढायला विसरलो :( .
परतताना आरामात रमत गमत परतलो. त्यामुळे रस्त्याच्या रोषणाईबरोबरच आमच्या हॉटेलसमोरच्या रस्त्यावर तयारी चालू असलेल्या पुष्पप्रदर्शनाची झलक पहायला मिळाली...
.
.
लोक एक दिवस अगोदरपासूनच तेथे फेरी मारून कुतूहलाने तयारी पाहत होते... आम्हीही त्यातलेच ! ...
मात्र रक्षक दल काटेकोरपणे सुरक्षा ठेवून होते. पण उगाचच तयारीला उपद्रव होईल असे काही न करता लोक शिस्तीने दुरूनच डोकावून जात होते...
हा अचानक समोर असलेला उद्याचा टेट समारंभ कसा असेल बरे असा विचार करत आनंदाने बिछान्याला पाठ टेकवली.
(क्रमशः )
==================================================================
चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...
====================================================================
प्रतिक्रिया
15 Dec 2013 - 11:15 pm | मुक्त विहारि
नेहमी प्रमाणेच लेख साठवून ठेवला आहे..
15 Dec 2013 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा
जबर्या..............................!!!
काय ते फोटू! 
ती माश्याचं तोंड केलेली होडी तरंगणार्या स्मायली सारखी दिस्ते.
15 Dec 2013 - 11:35 pm | संजय क्षीरसागर
मस्त फोटो!
16 Dec 2013 - 12:14 am | प्यारे१
मस्तच!
दोन तीन वेळा नवीन भाग आला का नाही म्हणून ७च्याखाली क्रमशः आहे की समाप्त ते पाहून आलो होतो.
16 Dec 2013 - 3:55 am | रेवती
मस्त फोटू. माश्याच्या आकाराची बोट चांगली दिसतीये. पुष्प प्रदर्शनाची तयारी आवडली.
16 Dec 2013 - 7:30 am | सुधीर कांदळकर
देखील जबरदस्त. पण झर्रकन आटोपते घेतलेले दिसते. भाग कधी सुरू झाला कधी संपला कळलेच नाही. मुख्य ‘शो’ची वाट पाहात आहे.
16 Dec 2013 - 9:44 am | प्रचेतस
मस्त सफर आणि मस्त वर्णन.
व्हिएतनाम मध्ये चिनी नववर्ष इतक्या मोठ्या प्रमाणावर का साजरे केले जाते? व्हिएतनाम जरी कम्युनिस्ट देश असला तरी चीनच्या (दडपशाहीमुळे) शत्रूपक्षातच मोडला जातो अशीच समजूत आहे.
16 Dec 2013 - 11:35 am | डॉ सुहास म्हात्रे
चीन व्हिएतनामचा आताचा शत्रू असला तरी जवळ जवळ १,००० वर्षांच्या प्रभावाचा परिणाम म्हणून अनेक व्हिएतनामी परंपरा चिनी परंपरेवर बेतलेल्या आहेत, नववर्षदिन समारंभ त्यातलाच. एक मात्र नक्की, अमेरिकेला आम्ही आमच्या देशातून हाकलले आणि आताही चिनी दादागिरीला आम्ही धिराने तोंड देत आहोत हे अभिमानाने सांगणार्या मार्गदर्शकाच्या आवाजात प्राचिन चिनी सम्राटांच्या राजसत्तेच्या कहाण्या सांगताना कोठेही कडवटपणा नव्हता. चिनी प्रभावाच्या कन्फ्यूशियसचे मंदिर आणि विश्वविद्यालयासारख्या चांगल्या प्राचिन शैक्षणिक संस्था व्हिएतनामने आपुलकीने जपून ठेवलेल्या आहेत. कन्फ्यूशियसने खूप प्रयत्न करूनसुद्धा त्याचा धर्म मात्र स्विकारला नाही. आपला बौद्ध धर्मच राखला. ही सारासारविवेकबुद्धी दाखवल्याबद्दल व्हिएतनामचे कौतूक केल्याशिवाय राहवत नाही !
16 Dec 2013 - 10:57 am | जेपी
हा पण भाग मस्त.
टिन्ग टिन्ग चलो ....................................
16 Dec 2013 - 11:04 am | डॉ सुहास म्हात्रे
मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा, संजय क्षीरसागर, प्यारे१, रेवती, सुधीर कांदळकर, आणि तथास्तु : अनेक धन्यवाद !
16 Dec 2013 - 11:10 am | दिपक.कुवेत
भीषण भालो! बहोत खुब. मजा आया.
16 Dec 2013 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
16 Dec 2013 - 3:37 pm | कवितानागेश
पहिला फोटो पावसला घेउन गेला. मग परत रंगित रंगित व्हिएतनामला आले. :)
16 Dec 2013 - 5:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
नकाशात पाहिलं तर व्हिएतनाम उत्तरपूर्वेची कोकणपट्टीच आहे +D
17 Dec 2013 - 4:25 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!!!! पावस असं नै म्हण्णार पण भार्तात आल्यागत वाटलं खरं. :)
16 Dec 2013 - 6:07 pm | अनिरुद्ध प
पुढील भाग हा बर्याच वेळाने आल्याने सहल मध्येच थांबली का असे वाटले,आता पुढे सुरु झाल्यावर हायसे वाटले,उत्तम वर्णन तशीच प्रकाशचित्रे,पुभाप्र.
16 Dec 2013 - 7:13 pm | पैसा
नव्या वर्षाच्या स्वागताचे फोटो बघून त्या वातावरणाची कल्पना आली! लेखही अप्रतिम आहे. इतकी वर्षे युद्ध, यादवी यात घालवून व्हिएतनामी लोक इतके उत्साही कसे हा प्रश्न पडला आहे!
17 Dec 2013 - 9:12 am | देशपांडे विनायक
आपली हि सफर पाहून आणि वाचून एका जेष्ठ जोडप्याने इच्छा प्रगट केली हे सारे पाहण्याची
मी पण जाईन म्हणतो [अमेरिकाचा व्हिसा नाकारला गेला याचा सूड म्हणून नव्हे हे नमूद करतो ].
तरी मार्गदर्शन व्हावे म्हणून काय करू ?
18 Dec 2013 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
नक्की काय प्रश्न आहे ते सांगितलेत तर माहिती देण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करेन.
17 Dec 2013 - 11:18 am | सौंदाळा
बेष्ट
गेले काही दिवस वाचनात खंड पडला होता. पहिला लेख तुमचाच वाचला आणि तरतरीत झालो.
17 Dec 2013 - 3:57 pm | विशाल चंदाले
मस्तच आहे सफर. हि सफर दाखवल्या बद्दल धन्यवाद. पुभाप्र.
भाग ४ चे फोटोस पाहून तर 'अवतार'(तो पंडोरा ग्रहवाला) सिनेमाची आठवण झाली, भारीच.
18 Dec 2013 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
अनिरुद्ध प, पैसा, सौंदाळा आणि विशाल चंदाले : धन्यवाद !
19 Dec 2013 - 7:28 pm | अनन्न्या
आणि सर्वच फोटो मस्त!