चला व्हिएतनामला ०५ : हो ची मिन् शहराची सफर - १

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
29 Nov 2013 - 7:16 pm

==================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

...समुद्रभटकंती करून हा लाँग शहरात परतेपर्यंत चारएक वाजले असतील. आज रात्रीला हो नोईला वस्ती करायची होती म्हणून सकाळीच हॉटेलमधून चेकआऊट करून सामान आमच्या गाडीतच ठेवले होते. गाडी बंदरावरून सरळ हा नोईच्या दिशेने निघाली.

सहलिचा चवथा दिवस हा नोईमध्ये भल्या पहाटे उगवला. सकाळी नउ वाजताचे हो ची मिन् ला जाणारे विमान पकडायला हॉटेलमधून पाच वाजता बाहेर पडताना ध्यानात आले की चिनी नववर्षोत्सव, टेट, सुरू झाला होता. हॉटेलची लॉबी लालभडक चिनी आकाश कंदीलांनी भरून गेली होती...

हा नोई - हो ची मिन् सिटी हे अंतर सरळ रेषेत १२०० किमी असले तरी उड्डाण व्हिएतनामच्या हवाई हद्दीत ठेवण्यासाठी विमान किनारपट्टीने वळसा घेऊन जाते त्यामुळे दोन तास लागले. साधारण अकराला विमान उतरले आणि अर्ध्या तासात विमानतळाच्या बाहेर आलो तेव्हा मार्गदर्शक डोंग वाट पहात उभा होता. सामान गाडीत टाकून लगेच शहराची सफर सुरू केली.

==================================================================

हो ची मिन् शहर (Ho Chi Minh City)

इ स पूर्वी या शहराच्या जागी प्रे नोकोर (Prey Nokor) नावाचे ख्मेर (आताचे कंबोडियन) कोळी लोकांचे गाव होते. प्रे म्हणजे जंगल / अरण्य आणि नोकोर हे नगर या संस्कृत शब्दाचे अपभ्रंषित रूप (नगर --> नोगोर --> नोकोर) आहे. हे नाव ख्मेर लोकांनी शहराभोवती लावलेल्या सावरीच्या झाडांमुळे आणि नैसर्गिक जंगलामुळे पडले. एका ख्मेर दंतकथेप्रमाणे त्या काळी ख्मेर भूमी असलेल्या आताच्या दक्षिण व्हिएतनामवर उत्तरेकडून सतत होणारी आक्रमणे आणि लूटालूट टाळण्यासाठी एका ख्मेर राजपुत्र आणि व्हिएतनामी राजकन्येच्या विवाहात हा भाग व्हिएतनामच्या राजाला आंदण म्हणून दिला गेला.

माहित इतिहासाप्रमाणे इ स १९२ मध्ये दक्षिण व्हिएतनाममध्ये लिन यी नावाचे राज्य होते. त्यातून पुढे चंपा राज्यांचा उदय झाला. चिंग घराण्याच्या चिनी सम्राटाने इ स १८३२ मध्ये काबीज केला तेव्हा हा भाग र्‍हीड-शिवकुमारन् (Rhead-Sivakumaran) हे चंपा राजघराणे आणि सरदार बेहान यांच्या ताब्यात होता. शिवकुमारन् हे हिंदू नाव वाचून चमकून जायचे कारण नाही. या भागातच नव्हे तर इंडोचायना समजल्या जाणार्‍या बहुतेक सर्व भागावर (इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, लाओस, मध्य व दक्षिण विएतनाम, इ) दुसर्‍या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत आलटून पालटून भारतिय संस्कृतीचा प्रभाव असणार्‍या हिंदू आणि बौध सम्राटांचे अथवा राजांचे राज्य होते. याबद्दल अधिक नंतरच्या या प्रवासात व कंबोडियाच्या प्रवासवर्णात येईलच. प्रे नोकोर हे ख्मेर साम्राज्यातले सर्वात मोठे बंदर होते.

१६९० मध्ये मेकाँग नदीच्या त्रिभुज प्रदेशावर सत्ता बळकट करण्यासाठी आलेल्या व्हिएतनामच्या राजाच्या प्रतिनिधिने ही जागा स्थानिक सत्ताकेंद्रासाठी निवडली आणि तिचे गिया दिन् (Gia Định) असे नामकरण केले. नंतर फ्रेंचांनी वसाहत स्थापन केल्यावर त्याला सायगाव (Sài Gòn) असे नाव दिले. हे शहर प्रथम फ्रेंच वसाहतिची आणि नंतर १९७५ पर्यंत स्वतंत्र दक्षिण व्हिएतनामची राजधानी होते. व्हिएतनामचे एकत्रीकरण झाल्यावर २ जुलै १९७६ रोजी त्याचे कम्युनिस्ट व्हिएतनामी राष्ट्राच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाच्या सन्मानार्थ हो ची मिन् सिटी (Thành phố Hồ Chí Minh) असे नामकरण केले गेले.

९० लाख लोकवस्तिचे हे शहर व्हिएतनाममधले सर्वात मोठे शहर आणि व्हिएतनामची मुंबई (आर्थिक राजधानी) आहे !

==================================================================

सायगाव नोत्र दाम चर्च (Saigon Notre-Dame Basilica)

हो ची मिन् मधला हा आमचा पहिला थांबा होता. शहराच्या मुख्य भागात असलेल्या या ५८ मीटर उंचीच्या चर्चची मुख्य रचना पॅरिसमधिल नोत्र दाम चर्चवरून बेतलेली आहे. या जागेवर असलेले मूळ लाकडी चर्च वाळवीने पोखरून पडल्यावर त्याच जागी विटांनी बांधलेले चर्च उभारून १८८० मध्ये वापरात आणले गेले. याच्या बांधकामात लागलेली विटां-काचांसकट बहुतेक सगळी सामग्री फ्रान्सवरून आणली गेली होती. नंतर व्हिएतनाम युद्धात हानी पोहोचलेला इमारतीचा भाग मात्र स्थानिक व्हिएतनामी सामान वापरून दुरुस्त केला गेला आहे.

==================================================================

मध्यवर्ती पोस्ट ऑफिस

येथून जवळच चालत गेले की मध्यवर्ती पोस्ट ऑफिस लागते. कम्युनिस्ट व्हिएतनाममध्ये कौतूकाने फ्रेंच वसाहतवादाची खूण दाखवायला नेले याची नाही म्हटले तरी जरा मजाच वाटली...

पोस्ट ऑफिसचा अंतर्भाग...

पुढच्या थांब्याकडे जाताना शहरातल्या एका रस्त्याचे टिपलेले चित्र...

==================================================================

पुनरेकीकरण सभागृह (Thong Nhat Conference Hall किंवा Reunification Conference Hall)

थोड्याच वेळात आम्ही पुनरेकीकरण सभागृहाजवळ पोहोचलो...

या जागेवर १९५४ पासून स्वतंत्र दक्षिण व्हिएतनामच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाचे (Ngô Đình Diệm) निवासस्थान होते. १९६३ मध्ये विरोधकांनी केलेल्या हल्ल्यात त्या इमारतिचे बरेच नुकसान झाल्याने तिचे नुतनिकरण करण्यात आले आणि काही काळाने तेथे जुनी इमारत पाडून संपूर्ण नविन इमारत उभी केली गेली आणि तिचे स्वातंत्र्यमहाल असे नामकरण केले गेले. १९७५ साली कम्युनिस्ट लिबरेशन भूदलाच्या रणगाड्यांनी सायगाव काबीज केल्यावर याला शहराच्या महानगरपालिकेचे मुख्यालय बनवले गेले. त्याच साली तेथे उत्तर-दक्षिण व्हिएतनामच्या एकीकरण सभेचे आयोजन केले गेले आणि त्यानिमित्ताने त्याचे आत्ताचे "पुनरेकीकरण सभागृह" असे नामकरण करण्यात आले.

या पाचमजली इमारतित एकूण १०० लहान-मोठे कक्ष आहेत. या इमारतित राष्ट्राध्यक्षाच्या निवासस्थानाला साजेश्या अनेक खास व्हिएतनामी शैलितल्या वस्तू व कलाकृती आहेत. हा महाल आता संग्रहालयाच्या रुपात प्रवाश्यांना खुला आहे...

 ...

 ...

सभागृह...

जेवणाचा कक्ष...

व्हिएतनामी जीवन दर्शवणारी एक कलाकृती...

तिसर्‍या मजल्यावरच्या टेरेसवर उभे केलेले दक्षिण व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाचे खास हेलिकॉप्टर...

त्याच टेरेसवरून दिसणारे इमारतिचे पटांगण आणि त्याच्या पलिकडे होणारे शहराचे विहंगम दर्शन...

चवथ्या मजल्यावर बार, डान्स फ्लोअर आणि कसिनो होता. युद्धकाळातही दक्षिण व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष कसा ऐश करत होता ते अधोरेखीत करण्यासाठी त्या जागा आजही तशाच राखून ठेवल्या आहेत.

त्यानंतर आम्ही इमारतीच्या तळघरात गेलो. युद्ध्काळात ही जागा उत्तर व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाचा खलबतखाना म्हणून वापरात होती...

 ...

 ...

भटारखाना...

 ...

तळघरातल्या खोल्या एकमेकाला बोगद्यांनी जोडलेल्या आहेत. त्यांच्यातून फिरताना आपण नकळत व्हिएतनामच्या युद्धाकालाची झलक अनुभवतो.

==================================================================

व्हिएतनाम इतिहास संग्रहालय (Museum of Vietnamese History)

तेथून पुढे आम्ही व्हिएतनाम इतिहास संग्रहालय पहायला गेलो...

येथे व्हिएतनामच्या गेल्या ५००,००० वर्षांतल्या वस्तू आणि इतिहास जतन केला आहे. सुरुवातीलाच महाभारतकालीन भारतात शोभावा अश्या व्हिएतनामच्या भूतकाळातल्या प्रसंगाचे भित्तिचित्र लक्ष वेधून घेते...

व्हिएतनामच्या मध्य आणि दक्षिण किनारपट्टीवर बरीच शतके चंपा संस्कृतीच्या शैव हिंदू राजघराण्यांचे वर्चस्व राहिले आहे. इ स च्या दुसर्‍या शतकात सुरुवात झालेला हा प्रभाव सातव्या शतकांत प्रबळ झाला होता आणि नवव्या-दहाव्या शतकात उत्कर्षाला पोहोचला होता. दहाव्या शतकात अरब व्यापार्‍यांच्यामुळे तेथे इस्लामचा प्रभाव सुरू झाला आणि सतराव्या शतकापर्यंत बहुतेक सगळी राजघराणी मुस्लीम झाली होती. चाम संस्कृतीचा कमी-जास्त प्रभाव अगदी इ स १८३२ मध्ये व्हिएतनामी सम्राटाने त्यांच्या शेवटच्या सरदारांचा पाडाव करेपर्यंत होता.


(नकाशा जालावरून साभार)

चंपा लोक कसबी दर्यावर्दी होते आणि समुद्रमार्गे त्यांचा दक्षिण चीनपासून पर्शियन साम्राज्यापर्यंत व्यापार होता. त्यांचे लाओसच्या हिंदू राजघराण्यांशी कधी रोटीबेटीचे तर कधी लढाईचे संबद्ध राहिले आहेत. त्यांनी आपल्या राजधान्यांना संस्कृत नावे दिली होती, उदा. इंद्रपूरा, अमरावती, विजया, पांडूरंग, इ. राजधान्यांचा यादीतले हे शेवटचे नाव समजल्यावर फारच आश्चर्य वाटले. तेथिल राजघराणे हे व्हिएतनामी सम्राटाच्या अधिपत्त्याखाली जाणारे चंपा लोकांचे शेवटचे राजघराणे होते.

या संग्रहालयात चंपा संस्कृतीसाठी एका मोठे दालन राखीव आहे. तेथिल वस्तू पाहताना केवळ आश्चर्यच नाही तर प्राचीन भारतियांच्या सांस्कृतीक प्रभावाबद्दल अभिमानही वाटला.

वज्र...

विष्णू...

गणेश...

नृत्यांगना...

गरूड...

 ...

दुर्गा...

प्राचीन व्यापारी जहाज...

चाम (चंपा लोकांच्या) देवळांची स्थापत्यशैली...

.

रेड्याची शिकार करणारा सिंह...

हे संग्रहालय पाहणे हा एक वेगळाच अनुभव होता. भारतिय संस्कृती कंबोडियात खोलवर रुजली होती हे माहित होते. पण तिचा इतका मोठा प्रभाव व्हिएतनाममध्ये पहायला मिळेल असे वाटले नव्हते ! असे अनपेक्षित आश्चर्य कधीकधी सहलिचा आनंद एका वेगळ्याच ऊंचीवर नेऊन सोडते ! पाय निघत नव्हता पण अजून एक खास मोठे आकर्षण, "व्हिएतनाम युद्धावशेष संग्रहालय" बघायचे बाकी होते तेव्हा तिकडे निघालो.

(क्रमशः )

==================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

29 Nov 2013 - 7:34 pm | अनिरुद्ध प

सुन्दर सहल सुरु आहे,पु भा प्र

केदार-मिसळपाव's picture

29 Nov 2013 - 7:43 pm | केदार-मिसळपाव

बाकी, तुमचे लेख वाचतांना तुमच्या सोबतच प्रवास करतो आहे असा भास होतो...

झकासराव's picture

29 Nov 2013 - 7:53 pm | झकासराव

सफरीची मजाच अनुभवतोय :)

जेपी's picture

29 Nov 2013 - 8:23 pm | जेपी

आवडल .
व्हिएतनाम फक्त अमेरीका युद्धा मुळेच माहीत होत . तुम्ही आणखीन ओळख करुन दिलीत . धन्यवाद .

प्यारे१'s picture

29 Nov 2013 - 8:51 pm | प्यारे१

सहल खूपच छान सुरु आहे.
छान इमारती, देखण्या मूर्ती नि सुंदर वास्तुशैली.

भाते's picture

29 Nov 2013 - 8:56 pm | भाते

आधीच्या धाग्यावर प्रतिसाद दिला नाही. त्याचा आणि या धाग्याचा एकत्र प्रतिसाद.
फोटो आणि वर्णन दोन्ही सुरेख. फोटो पाहुन आणि वर्णन वाचुन मलासुद्धा तुमच्याबरोबर सहल केल्याचा आनंद मिळाला.

संजय क्षीरसागर's picture

29 Nov 2013 - 11:36 pm | संजय क्षीरसागर

लगे रहो!

सुधीर कांदळकर's picture

30 Nov 2013 - 7:03 am | सुधीर कांदळकर

पुनरेकीकरण सभागृहाच्या गच्चीतून काढलेले चित्र, चाम मंदीर, संग्रहालयाची देखणी इमारत, रेड्याची शिकार करणारा सिंह ही चित्रे खास आवडली.

धन्यवाद, पुभाप्र

वाचतेय. सफर सुरेख सुरु आहे.

पुनरेकीकरण सभागृह >> मी एकदम पुणेरीकरण सभागृह वाचले! मनात म्ह्टले, बघा पुणेरीकरणाचे महत्व विदेशी लोकांनाही समजलेय! :D आणि मिपावर मात्र टीआरपीसाठी पुण्याला शिव्या घालण्याचे काम चालते अधून मधून!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2013 - 11:57 am | डॉ सुहास म्हात्रे

बघा पुणेरीकरणाचे महत्व विदेशी लोकांनाही समजलेय! आणि मिपावर मात्र टीआरपीसाठी पुण्याला शिव्या घालण्याचे काम चालते अधून मधून! नायतर काय ? कधी लोक समजूतदार होणार काय कळत नाही बॉ

प्रचेतस's picture

30 Nov 2013 - 8:55 am | प्रचेतस

फॅण्टास्टिक.
व्हिएतनाम इतिहास संग्रहालय अप्रतिम आहे.
मजा येत आहे तुमच्यासोबतच्या आमच्या प्रवासात.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2013 - 10:48 am | अत्रुप्त आत्मा

जब्बरदस्त! :)

छानच! भरपूर माहिती दिलीये या भागात. सगळे फोटू चांगले आलेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2013 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनिरुद्ध प, केदार-मिसळपाव, झकासराव, तथास्तु, प्यारे१, सुधीर कांदळकर, वल्ली, अत्रुप्त आत्मा आणि रेवती : अनेक धन्यवाद !

सौंदाळा's picture

30 Nov 2013 - 7:01 pm | सौंदाळा

मस्तच.

पैसा's picture

30 Nov 2013 - 10:36 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच अप्रतिम फोटो आणि वर्णन! तुम्ही इतकी छान ओळख करून देता की जणू आम्हीच तिकडे फिरून आलोय!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Dec 2013 - 10:13 am | डॉ सुहास म्हात्रे

सौंदाळा आणि पैसा : धन्यवाद !

दिपक.कुवेत's picture

1 Dec 2013 - 12:07 pm | दिपक.कुवेत

फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणेच सदाबहार!

सानिकास्वप्निल's picture

1 Dec 2013 - 12:44 pm | सानिकास्वप्निल

सुंदर वर्णन, मस्तं फोटो...सहलीचा आनंद घेत आहे :)
पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Dec 2013 - 6:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

दिपक्.कुवेत आणि सानिकास्वप्निल : धन्यवाद !

स्पंदना's picture

2 Dec 2013 - 4:18 am | स्पंदना

चला हे ठिकाणही पाहुन झाल एकदाच. फिरवुन फिरवु जरा डोळे अन माऊस कंट्रोल करुन एक हात दुखतओय एव्हढच! पण फिरायच म्हण्जे हे होणारच ना? ;)
मला तो डावीकडचा गरुड आवडला. किती लाडीक चेहरा आहे.
हं! कधी येणार परतुन तो हिंदु धर्माचा सुवर्णकाळ? आता तर आमच्यावर राज्यसुद्धा इटालयन करुन राह्यले राव. ;( )

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2013 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)