ओपी नय्यर व निरनिराळी वाधे यांचे अफेअर -
ओपीनी कोणकोणती वाद्य प्रामुख्याने वापरली याचा उल्लेख वर आलाच आहे. तंतू वाद्यांचा उपयोग तालवाद्ये म्हणून करणे
ही ओपींची खास विशेषता.
ओपी व हार्मोनियम-
ओपीनी हारमोनियम हे वाद्य ज्या पातळी वर वापरले त्याला तोड नाही. बाबु सिंग हे बिनीचे वादक हारमोनियम हा संयोग हे नय्यर साहेबांच्या ऑर्केस्ट्रातील महत्वाचे बलस्थान आहे. ही हारमोनियम ऐकताना त्याचे नोटेशन कसे काढावे असा प्रश्न पडावा इतके बारकावे व ठसके त्यात आढळतात.
त्यातील काही तुकडे ओपी व हार्मोनियम इथे ऐका
ओपी व अॅकोर्डियन
निष्णात वादक गुडी सिरवई ( जे बार बार देखो या चायना टाउन मधील गीतात हे वाद्य वाजवताना दिसतात) यानी ओपींच्या ऑर्केस्ट्रात वाजविलेले तुकडे केवळ अजोड आहेत मासला म्हणून हावडा ब्रीज मधील देख के त्तेरी ये नजर हे गीत ऐकून पहा. तसेच " नीले आसमानी" हे गीता दत्तचे गीत ऐका वा " बाबुजी धीरे चलना " हे ही ऐका .
ओपी व पियानो-
पियानो हे वाद्य व ओ पी नय्यर यांचे नातेही घट्ट आहे. मिट्टीमे सोना या चित्रपटातील 'पूछो न हएम हम उनके लिये 'यातील intro व interlude मधील काम हे संगीत काराचा व वाद्काचा दर्जा किती उच्च कोटीचा आहे याचे प्रत्यंतर देणारा आहे.तसेच मग 'सौ साल जियो तुम जान मेरी" हे दिलराजकौर यांचे गीत ऐका .
ओपी व ढोलक
ओ पी नय्यर हे पंजाबी असल्याने पंजाबी लोक गीतांचा त्यांच्या वर प्रभाव असणे सहाजिकच आहे.मराठी लोकगीतात जे स्थान ढोलकीचे आहे तेच पंजाबात ढोलक या वाद्याचे. ओपींचे सहायक जी एस कोहली हे स्वता: उत्तम संगीतकार असल्याने ते ओपींच्या गाण्यातील रिदम सेक्शन सांभाळीत.ढोलक वाजवीत. घुमारेदार आवाज करीत वाजणारा ढोलक म्हणजे गुरुशरण कोहली. "हमपे दिल आया तो बोलो कया करोगे या " दो उस्ताद " या चित्रपटातील गीतात वाजलेला ढोलक रसिकानी जरूर अनुभवावा असा आहे.
ओपी व सारंगी संतुर चेलो , सितार गिटार व मेंडोलीन
तंतू वाद्यात प्लकिंग व फिडलिंग अशी दोन प्रकारची वाद्य असतात.प्लकिंग झंकाराचा तर फिडलिंग मानवी गळ्याच्या जवळ जात आसयुक्त स्वरांचा आनंद देत असतात. ओपीनी या दोन्ही वाद्यगुणांचा वापर आपल्या संगीतात केलाय. पण वायलिन चा मोठा ऑर्केस्ट्रा त्यांच्या संगीतात दिसत नाही. तर त्यांचे संगीत जास्त करून ठोस ( स्टकॅटो) स्वराचा भरणा असलेले दिसते."मी गणिकेच्या माडीवरची सारंगी मध्यम वर्गीयाच्या दिवाणखान्यात आणून बसविली" असे ओपीनी एका मुलाखतीत म्हटले होते. पंडित रामनारायण याना साथीला घेउन हा प्रयोग अनेक वेळा करण्यात आला.तसेच पंडित शिवकुमार शर्मा याचे संतुर नय्यर यांच्या निर्देशनात सर्वात जास्त बहरले. आज कोई प्यारसे ( सावनकी घटा) या गीताचा इन्ट्रो ऐका. मी काय म्हणतो त्याचा प्रत्यय येईल. गिटारची तीच गत. हजारासिंग व दिलीप नाईक यांचे गिटार
हा ओपींचा सुभा राहिला आहे. 'मुहाब्बत कर लू जी भर लो, अजि किबला मोहतरमा , उफ ये वेकरार दिल ', या गीतातील गिटारचे तुकडे एक पुरत्या मैफलीचा आनंद देउ शकतात. त्यातील मीडकाम लाजवाब .तारीफ करू क्या उसकी
या गीतातील सुरूवातीचे गिटार मात्र सॅम्यल नसरोदीन द्दौल्ला यानी वाजविलेय.
या खेरीज त्यांच्या गीतात डबल बेस या वाद्याच्या संगतीत बेस गिटार वाजते ते वेगळेच.डबल बेस हे माणसाच्या उंचीचे वाद्य " बंदा परवर " होटोंपे हंसी आँखोंमे नशा या गीतात आपल्याला ऐकायला मिळेल . पण खास वाजले आहे मेरा दिल मेरी जान" या लव्ह अॅन्ड मर्डर या चित्रातील आशाबाईनी गायलेल्या गीतात .
आसमान या आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच ओपी साहेबांचे सितार या वाद्याबरोबर " अफेसर" आहे. देखो जादूभरे तोरे नैन या तीनतालात बद्ध केलेल्या व गीता दत्त यांच्या नाजुक आवाजातील गीतात नाजुक सतार वाजते. आंखो ही आखोमे इशारा होगया ( सी आय डी) , न जाने क्यु ( मोहब्बत जिंदगी है ) या गीतातील सितारचे पीसेस उस्ताद रईसखान यानी वाजविले आहेत ,पण ओपीनी सितारीचा कहर केलेली तीन गाणी म्हणजे आज कोई प्यारसे ( सावनकी घटा) व तुम सबसे हंसी हो ( मुहब्बत जिदगी है) मेरी जान तुमपे सदके ( सावनकी घटा )
ओपीची सतार ओपी व सतार इथे ऐका
. आता मेडोलीन व ओपी नय्यर ही काय जादू आहे हे ऐकायचे असेल तर हे क्या कर डाला तू ने ( हावडा ब्रीज) कही पे निगाहे ( सी आय डी) बदल जाये अगर माली (बहारे फिर भे आयेगी) व हम दम मेरे मान भी जाओ ( मेरे सनम) यांच्या अग्रसंगीतात आपले कान तृप्त करा .ओपी व मेंडोलिन इथे ऐका
ओपी नय्यर व सॅक्सोफोन , बासरी, ट्रम्पेट, क्लरिनेट ई
ओपी नी मनोहारीसिंग या प्रख्यात सॅक्स वादकाला घेउन काही अप्रतिम पिसेस तयार केले. उदा. हुजुरेवाला या गीताच्या इन्ट्रो मधील दोनदा वेगवेगळ्या प्रकारे वाजणारा धुंद करणारा पीस ऐका. ये दुनिया उसीकी जमाना उसीका या रफीनी गायलेल्या गीताच्या इन्टरल्यूड मधील पीस व सगळ्यात कहर म्हणजे आओ हुझूर तुमको ( किस्मत) या गाण्यातील आशा बाईंच्या आलापीची मनोहारी सिंग यांच्या सॅक्सशी असलेली जुगलबंदी ऐका. कमालीची रिपीट व्हॅल्यू नय्यर यांच्या कलेला का आहे ते कळून येईल. हरिप्रसाद व बर्वे याना घेउन ओपीनी बासरी काही प्रमाणातच वाजविली. च्यनसे हमको कभी या गीतात बासरी व आशा बाईंच्या आवाजाचा सुरेख पेड घातलाय ओपीनी. ट्रेंपेट ची उदाहरणे म्हणजे तारीफ करू क्या उसकी चे फिलर पीस , मुझे देखकर आपका मुस्कुराना चे इंटरलूड व कमरपतली नजर बिजली ( कहीं दिन कही रात ) या गीताचे इन्ट्रो यात भन्नाट वाजला आहे ओपींचा ट्रंपेट.
आता खास उल्लेख करायचा तर क्लारिनेट या वाद्याचा कारण हे वाद्य म्हणजे ओपी नय्यर या जादूगाराची सिग्नेचरच आहे. इतर संगीत कारानी वाळीत टाकलेले हे वाद्य ( मेरी प्यारी बहनिया यात कल्याणजीनी वापरलेय पण त्यात वाजविणारा पडद्यावर बॅन्डवालाच आहे ) नय्यरनी प्रामुख्याने विशेषत: पनाशीच्व्या दशकात वापरला.
हम सब चोर है या पटातील " तेरे आगे बोलना दुशवार हो गया " वा त्याच चित्रातील " बेईमान बालमा मान भी जा " ही दोन वानगी दाखल उदाहरणे ओपींच्या क्लॅरिनेट वेडाची. हे वेड त्यानी " निश्चय " या चित्रपटातील " चल मेरे घोडे चल चल चल" या गीता पर्यंत जपले.
ओपी नय्यर व माउथ ऑर्गन -
आपल्याला" है अपनी दिल तो आवारा " ( सोलवा साल एसडी बर्मन) जाने वालो जरा ( दोस्ती एल पी - हा पीस आर दी बर्मन ने वाजविला आहे) तसेच मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू ( आराधना ) यातील
माउथ ऑर्गन चांगलाच परिचयाचा आहे ओपीनी या अशा छोट्या वाद्याशीही आपले अफेअर जमविले. ऐ दिल है मुशकिल ( सी आय डी) चे इंररल्यूड , तुम्हारी मुलाकात ने ( मुहाब्बत जिंदगी है ) इन्ट्रो, किसी ना किसी से ( कशमीरकी कली) इन्ट्रो, इंटरल्यूड व पोस्टल्युड , यू तो हमने लाख हंसी देखे है ( तुम्सा नही देखा) - पोस्टल्यूड , नाजनी बडा रंगी है वादा तेरा ( फिर वही दिल लाया हू - पोस्टल्यूड ही ओपीच्या संगीतातील माउथ ऑर्गनचे उच्च दर्जाचे स्थान दर्शवितात.
ओपीनी हाताळलेले गीत प्रकार
उडत्या चालीची काही गीते
१) रुक रुक र्क कहां चली ( दो उस्ताद - रफी व आशा भोसले)
२)ओ मिस्टर बॅन्जो ( हम सब चोर है रफी व आशा भोसले)
काही मुजरा गीते -
१)खुदा हुजूरको मेरी ही जिंदगी दे दे -( सावनकी घटा - उषा मंगेशकर आशा भोसले )
२)मेरे घर सरकार आये- एक तू है पिया- प्राण जाय पर वचन ना जाये - आशा भोसले)
काही भांगडा गीते
१)मेरी जा बल्ले बल्ले -( कस्मीरकी कली - महंमद रफी ० आशा भोसले )
२)उडी जब जन जुल्फे तेरी ( नया दौर ० आशा भोसले ० रफी )
काही शांत गीते
१) चैनसे हमको कभी ( प्राण जाये पर वचन न जाये - आशा भोसले)
२) मै सोया अखिंया मीचे ( फागुन - महंमद रफी - अशा भोसले )
काही कव्वाली टाईप गीते
१) कजरा मुहब्बत वाला - किस्मत आशा भोसले शमशाद बेगम )
२)ओ यार जुल्फो वाले एक मुसाफिर एक हसीना - रफी
काही टांगा गीते
१) मांग के साथ तुम्हारा ( नया दौर- रफी व आशा भोसले )
२)यारोंकी तमना है ( कही दिन कही रात - महेम्द्र कपूर )
काही क्लब गीते
१) अरे तौबा अरे तौबा - १२ ओ क्लॉक - गीता दत्त )
२) मेरा नान चिन चिन चू हावरा ब्रीज - गीता दत्त
काही नशा गीते
१) ये है रेशमी जुल्फोका ( मेरे सनम आशा भोसले )
२)उफ य बेकरार दिल ( दिल और मुहब्बत - आशा भोसले )
काही गंभीर गीते
१) रात भरका मेहमा अंधेरा ( सोनेकी चिदिया रफी - आशा भोसले )
२) आना है तो आ ( नया दौर- रफी)
काही गजल टाईप गीते
१) हमपे इल्जाम है _ कही दिन काही रात् - आशा भोसले)
२) आप की हसीन रुख पे ( बहारे फिर भी आयेगी - रफी)
काही विनोदी गीते -
१) मै बम्हईका बाबू ( नया दौर - रफी
२) ये पुरनुर अ चेहरा ( मोहब्बत जिंदगी है - रफ )
काही यॉडलिंग गीते
१) सुरमा मेरा निराला ९ कभी अंधेरा कभी उजाला - किशोर कुमार )
२) पिय पिया पिता मोरा ( बापरे बाप ० किशोर आशा भोसले )
काही शास्त्रीय संगीतावर आधारलेली गीते
१) देखो बिजली डोले बिन बादल की ( रागिणी)
२)मै खुद हूं......पिया आ ( संबंध)
ओपी व राग ताल ई
ओपी नय्यर यानी कुठेही हिंदुस्र्थानी शास्त्रीय संगीताचे गंडाबंद शिक्षण घेतलेले नव्हते. त्यानी केलेल्या कामात शास्त्रीय संगीताचा वापर अगदी शास्त्रीक्त पद्धतीने न होणे साहजिकच आहे.त्यांच्या चित्रपटात तशा जागा ही नव्हत्या.नौशाद ( मधुबनमे राधिका- हमीर ) रोशन( लागा चुनरीमे दाग- भैरवी), एस एन त्रिपाठी (सप्त सुरन तीन ग्राम - संगीत सम्राट तानसेन - यमन)या सारखी राग नियम न सोडणारी गीते ओपीनी केली नाहीत. उलट लोकसंगीतातून उदभवलेल्या "पिलू"
या रागात तब्बल ५१ गीते केली असे जाणकार सांगतात. फागुन या चित्रपटातील सर्वच्या सर्व गीतांचा पाया " पिलू" आहे म्हणे. पण ताना , मुरक्या, खटके हे हरकतीचे प्रकार वापरण्यात ओपी हे शिखरावर होते यात शंकाच नाही. शिवरंजनी, भैरवी, दरबारी, मालकंस ही हिंदी संगीतातली चलनी नाणी त्यानी वापरलेली दिसत नाहीत. सारंग,( ये दिल लेकर नजराना, मेरी जा बले बले, यारो़ई तमना है ) केदार( आप यंही अगर हमसे , दर्दे दिलकी क्या है दवा, जाने तमाना क्या कर डाला)छायानट( हमको तुम्हारे ईश्कने ) जोगिया( रात भरका मेहमा अंधेरा) मिश्र भैरवी( हुजुरे वाला ) देस ( बेकसी हदर जब गुजर जाये ) भीमपलासी ( तुम्हारा चाहने वाला खुदाकी दुनियामे) बसंत (( आना है तो आ राहमे )रागेश्री ( दिल तो पहलेही मदहोश है ) पहाडी ( तारीफ करू क्या उसकी, आज कोई प्यारसे ) ही काही उदाहरणे त्यानी शास्त्रीय संगीताचा वापर केल्याची आहेत .काही वेळेस त्यांच्या गीतात एखाद्या वळणावर एखादा राग पटकन डोकावून जात असे. उदा छोटासा बालमा या रागात बागेश्री, देखो जादूभरे तोरे नैन यात बिहाग, दिवान हुआ बादल यात रागेश्री, साथी हाथ बढाना यात मालकंस , कह दो इस रातको ( रूना लैला ची खाजगी रेकॉर्ड ) यात शिवरंजनी .
कितना हंसी है जहां मधे शुद्ध कल्याण .
नय्यर साहेबाना स्वरांचा बादशहा हे बिरूद लावतात तसे तालांचा सम्राट असेही लावतात. खरे पहाता त्यानी तेच तेच ताल परत वापरलेले आहेत. त्यात निम्याहून गीते कहरवा या तालात आहेत.मार्च ,वॉल्ट्झ , व स्विंग यांचा विशेशत: मार्च या तालाचा उपयोग त्यानी सढळपणे केलेला आढळतो. दादरा ,अर्घा दीपचंदी ( ७ मात्रांचा) क्वचित प्रसंगी तीनताल , अद्धा त्रिताल , अगदी क्वचित झपताल यांचा समावेश त्यांच्या ताल विभागात आहे.रूपक हा ताल वापरल्याचे मला तरी आठवत नाही. भजनी ठेका ( धुमाळी) हा ताल एका खाजगी रेकॉर्ड मधे वापरल्याचे दिसते. सांगायचे म्हणजे आर डी बर्मन यानी जेवढे ताल जगातून हिंदी संगीतात ओढून आणले तसे नय्यननी नाहीतच.तरीही त्याना ताल सम्राट म्हणण्याचे कारण असे असावे की तालांसाठी चर्मवाद्यांबरोबर सर्रास पणे तार वाद्य वापरण्याची त्यांची पध्द्दत व एका गीतात एकच ताल व त्याचे एकच वजन हा नियम वरचेवर मोडण्याची त्यांची शैली. त्यांच्या ताल वापराची काही ठराविक
उदाहरणे खालील प्रमाणे-
१) तीन ताल - देखो बिजली बिन बिन बादलकी
२) अधा त्रिताल- रूप नगरकी कुंवरी तरसे - पिया आ
३) झपताल- सवेरेका सूरज तुम्हारे लिये
४) अर्धा दीपचंदी- हमपे दिल आय तो बोलो क्या करोगे
५)मार्च- दिवान हुवा बादल
६) दादरा- दिल की आवाज भी सुन
७)वॉल्टझ- तुम जो हुवे मेरे हम सफर
८)भजनी धुमाळी= कटते है दिन कैसे रे - खाजगी रे़कॉर्ड रून लैला
९)रॉक एन रोल- मेरा नाम चिन चिन चू
१०) स्विंग - जवानिया ये मस्त मस्त बिन पिये
११) कहरवा-( भांगडा वजन) - तुम सवसे हंसीन हो
१२) कहरवा-प्रकार १- टकडे है मरे दिलके
१३ कहरवा प्रकार २- रोका की बार मैने दिलकी उमंग को
जाता जाता - ओपी व मी याविषयी-
एकोणीसहशे पासस्ठच्या सुमारास लेखक गो नी दा यानी नकळत माझा परिचय ओपी नय्यर यांचे संगीताशी करून दिला.त्याना आशाबाईनी " ये है रेशमी " ची तबकडी भेट दिली होती. ती म्हणे नय्यर साहेबानी आशाबाईना भेट दिलेली होती. ते गीत गोनीदांच्या घरच्या फोनो ( किल्ली मारून तबकडी फिरविणारा) वर मी पहिल्यांदा ऐकले व जन्मोजन्मीचा ऋणानुबंध असल्यासारखा मी नय्यर साहेबांच्या संगीत शैली कडे खेचला गेलो. तेथून आजतागायत असा एकही दिवस नाही ही मी त्यांचे गीत ऐकले नाही. प्रवासात असलो तर गुण्गुणलो तरी आहे. पाश्च्यात संगीताचे वेड व भारतीय शास्त्रीय संगीताचे आकर्षण नय्यरना होते त्याचाच सुरेख संगम त्यांच्या गीतात दिसून येतो. वैयक्तिक जीवनात आग्रही ( काही बाबतीत दुराग्रही) स्वाभिमानी, करारी,पैसेखोर असलेल्या नय्यरनी आपल्या कलेचे दाम कसे वसूल करायचे हे इतराना शिकविले म्हणतात. वादकाना वेळेवर लगेच पैसे देंण्याची प्रथा त्यानी पाडली. मी त्याना घरी दोनदा भेटलो काही गप्पा केल्या . त्यांचे मते आशा ही लता पेक्षा उजवी गायिका आहे. त्यांच्या संगीत शैलीत 'लता" या अद्वितीय पण पातळ आवाजाच्या एकसुरी कलाकाराला स्थानच नव्हते. असे त्यांचे लताबाईना न घेण्याचे समर्थन आहे. लताबाईंच्या पाठीशी सी रामचंद्र ( अनारकली, अलबेला, नौशेरवाने आदिल ई ई बहारदार सिनेमे ) मदनमोहन( अनपढ, वो कौन थी.ई) रोशन( बरसातकी रात, ताहमहल ई) मेलडी किंग उभे होते.नय्यरच्या संगीतातील मेलडीला मादकतेची डूब आहे . तीत आशा व गीताच बसत होत्या. त्यात गीता दत्त यांच्या आवाजाची फेक उचलून आशाबाईंनी त्यात आपला " पक्का" तयारीचा शास्त्रीय आवाज मिसळला. गीता द्त्त यांचे चाहते ( डाय हार्ड) असे म्हणत असतात की काही व्यक्तिगत भावनिक कारणानी आशा बाईनी नय्यर च्या संगीत राणीचे स्थान पटकाविले .तब्बल ३२५ गीते अशी " खाजगी" कारणाने मिळायला चित्रपटकला काय " पागल" लागून गेली आहे काय ? निर्मात्यानी स्वत: च्या बायकांचे दागिने देखिल पणाला लावलेले असतात अशा दुनियेत असा काही निकष असेल असे मला वाटत नाही.
नय्यर यांचे संगीत ऐकताना मी त्यांची कधी व्यक्तीपूजा मात्र मांडली नाही. मराठीत ज्याप्रमाणे बाबुजी व खळेकाका एकाचा गाण्यात वेगवेगळ्या कडव्याना वेगवेगळी चाल ( परंतू मुख्य चालीशी इमान राखणारी) लावू शकतात त्याच प्रमाणे हिंदीत बर्याच वेळा हा प्रयोग करणारे नय्यर हे एकमेव संगीतकार आहेत असे माझे निरिक्षण आहे. तसेच दोन कडव्याना वेगवेगळी इंटरलूड करणे इन्ट्रो व पोस्ट्ल्यूड करणे यात नय्यर दादा आहेत.
१९९४ च्या सुमारास त्यान कळून आले की आपण जे संगीत करतो ते लोकाना आवडणार नाही व लोकाना ज्या प्रकारचे संगीत हवे ते आपण करू शकणार नाही. त्यानी हे मनोमन जाणून आपला मोहरा होमिओपाथीच्या प्रॅक्टीसकडे वळविला.
ओपींना चाली काव्य पाहिल्यावर व हार्मोनियम हातात आल्यावरच सुचत. संडासात , फूटपाथवर जिन्यात अशा अचानक चाली त्याना सुचलेल्या नाहीत. दुसरे असे की एका गीताला वीस चाली काय चाळीस चाली काय असा प्रकार त्यानी केलाच नाही. बहुतेक चाली या काव्य तयार झाल्यावर व एकच एक अशा झाल्या आहेत.घरी भरपूर होमवर्क करणे गायकांकडून वादकांकडून घरीच सराव करून घेऊन रेकोर्डिंग स्टुडिओ गाठायचा व वनटेक ओके करायचे या त्यांच्या खाक्या होता.
त्याच्या परफेक्शनिस्ट स्वभावाला साजेसे वादक, गायक , रेकोर्डिस्ट त्याना भेटले हे आपले रसिकांचे केवढे भाग्य.दि
२७ जाने २००७ ला आपली पृथ्वीलोकाची यात्रा संपवून हा शापित गंधर्व आपल्या स्वर्गातील जादूनगरीला गमन करता झाला. त्यांची आठवण म्हणून
www.youtube.com/watch?v=PazOYKiWHFg त्यांच्या गीतातील काव्य ओळी इथे ऐका
रफी त्याना नेहमी म्हणत " यूं तो हमने लाख मौसीकार देखे तुमसा नही देखा !"
रफींच्याच आवाजात आवाज मिसळायला मला संकोच कशासाठी ?
प्रतिक्रिया
26 Jan 2013 - 3:17 pm | चित्रगुप्त
क्या बात है चौकटराजाकी..
आता तुम्ही दिलेली गाणी पुन्हा खास त्या त्या वाद्यांच्या उपयोगासाठी ऐकणार.
सिनेसंगीतात 'अरेंजर' या प्राण्याची भूमिका काय असते, ओपींसाठी काम करणारा अरेंजर कोण? (सबॅस्टियन, असे वाचले आहे) वगैरेंवरही प्रकाश टाकावा.
वाचता वाचता सहज आठवलेले:
१. "वो हस के मिले हमसे, हम प्यार समझ बैठे" मधे माउथ ऑर्गन चा वापर
२. हावडा ब्रिज (१९५८) मधील "ये क्या कर डाला तूने" च्या इंटरल्यूडमधे पुढे काही वर्षांनी (फिर वहीं दिल लाया हूं' व त्याकाळच्या अनेक सिनेमातील)त्यांच्या गाजलेल्या मादक संगीताची लागणारी चाहूल, तसेच शिटीचा वापर..
३. "अकेली हुं मै पिया आज" हा अगदी वेगळ्या धर्तीचा मुजरा
४. 'हाँगकाँग' मधील "होनोलूलू..." या गाण्याचा आशाबाईंच्या केवळ अप्रतिम आलापीने नटलेला शेवटला भाग.
५. 'सीआय डी ९०९'(१९६७) मधील "यार बादशाह यार दिलरुबा" गाण्यासाठी ओपींनी मुद्दाम 'हार्प' हे वाद्य परदेशातून मागवले होते म्हणे.
१९७० च्या सुमारास माझ्याबरोबर आर्टस्कुलात शिकणार्या एकाशी अलिकडे चक्क बेचाळीस वर्षांनंतर पुन्हा फोनवर बोलणे झाले. हा ओपींचा अगदी दीवाणा. भाड्याचे पैसे कसेबसे जमवून इंदुरहून मुंबईला मुद्दाम ओपींना भेटायला गेला. त्यांनी दार उघडून 'मी आता बिझी आहे' असे सांगून दार बंद केले (त्यावेळी आत गीतादत्त व रफी गाण्याची रिहर्सल करत होते) असे तीनदा झाले. चवथ्या वेळी मात्र त्यांनी आत घेऊन चवकशी व गप्पा केल्या. पुढे मग ते खास एकादे गाणे असले की फोन करून बोलवायचे सुद्धा. १९९३ की ९४ मधे ओपींना अपमानित होऊन त्यांचा चर्चगेट्चा फ्लॅट सोडून निघावे लागले ... वगैरे सांगत होता. आता मला त्या मित्राला प्रत्यक्ष भेटून गप्पा करायची उत्सुकता लागलेली आहे.
26 Jan 2013 - 4:42 pm | चौकटराजा
अमर अकबर अंथोनी यातील माय नेम इज अँथनी गोन्साल्विस या गीतातील अँथनी गोन्साल्विस हे गोवन आसामी हे प्रत्यक्षात एक उत्तम अरेंजर असलेले होते. त्याच प्रमाणे सबॅस्टीयन डिसूझा हे ही, त्यानी सुरूवातीच्या काही चित्रपटात ओपींचे अरेंजर् म्हणून काम केले एकूण १२५ चित्रपटात व सुमारे १००० गीतात अरेंजर म्हणून या गृहस्थांची कामगिरी आहे.
१९५२ ते १९७५ या काळात त्यानी शंकर जय किशन यांच्या बरोबर काम केले. सिनेमात मेलडी काउंटर मेलडीचा वाद्यवृंद आणण्याचे श्रेय सबॅस्टीयन डिसोझा यानाच दिले जाते.( उदा म्हणून दिलके झरोकोमे याचे अरेंजमेट ऐका ) " आपल्याला पाश्चिमात्य संगीत पद्ध्तीबद्द्ल र का ट येत नव्हते स्टकॅटो, आब्लेगादो याबद्द्ल मी सबॅस्टीयन डिसोझा कडून शिकलो असे ओपीनी आकाशवाणीवर दिलेल्या प्रदीर्घ मुखाखतीत सांगितले होते.
26 Jan 2013 - 3:28 pm | अत्रुप्त आत्मा
स्वालिड मांडलत हो ओ.पिं.ना या भागात..... १ नंबर...
तरीही-काही गंभीर गीते- या ऑप्शन मधे १ ओपी गीत नोंदवल्या शिवाय रहावत नाही,म्हणून नोंदवतो....''चल अकेला,चल अकेला,चल अकेला...तेरा मेला पिछे छुटा राही चल अकेला...''
26 Jan 2013 - 7:52 pm | मुक्त विहारि
लेख एकदम म्हणजे एकदम इस्पिक एक्का स्टाईल झाला आहे.
26 Jan 2013 - 8:19 pm | पैसा
छान लेख.
27 Jan 2013 - 2:36 pm | संजय क्षीरसागर
चौरा, मस्त लेख!
27 Jan 2013 - 5:56 pm | चौकटराजा
तर...ठसकेबाज, दिलफेक, मादक गाणी ! ( लताने गायलेले एल पी,चे 'आ जाने जा '( इन्तकाम) हे गीत हाँन्टिंग वाटते सेनशुअस नाही ! )
27 Jan 2013 - 8:30 pm | तर्री
ओ.पी नय्यर यांचे संगीताचे रसग्रहण आवडले. मस्त.
27 Jan 2013 - 8:43 pm | अग्निकोल्हा
.
27 Jan 2013 - 9:04 pm | मस्त् राम
देखो बिजली डोळे बिन बदल कि या गीताचा आरंभीचा भाग हा मला वाटते "लक्ष्मिताल " आहे. जाणकारांनी खुलासा करावा.
27 Jan 2013 - 9:35 pm | मराठी_माणूस
दुसरा भागही सुरेख आणि खुप दुर्मिळ माहीत देणारा. धन्यवाद.
तुम्ही उल्लेख केलेलि गाणि परत एकदा नव्या संदर्भात ऐकेन.
माउथ ऑर्गन वाजवणार्या कलाकारचे नाव माहीत आहे का ?
27 Jan 2013 - 9:55 pm | मराठी_माणूस
सोलो व्हायोलीन चा अफलातुन काँट्रा खालील गाण्यात ऐका. कडव्यात रफीला हाय पिच आणि आशा ला बेस मधे . कहर आहे.
http://www.youtube.com/watch?v=EiwtPdDELpo
28 Jan 2013 - 7:51 pm | तिमा
ओपींविषयी तुमचे हे लेख अप्रतिम आणि संग्राह्य आहेत. बुकमार्क केले आहेत.