“बसणे” या शब्दाचे तसे वैकल्पिक आणि व्यावहारिक अभिप्रेत अर्थ बरेच आहेत. जसे “गाडीवर बसणे”, “खुर्चीवर बसणे”, “सकाळी सकाळी १५ मिनिटे एकांतवासात बसणे” इत्यादी इत्यादी. या सर्व प्रचलित अर्थांबरोबरच “बसणे” या शब्दाला एक स्पेशल अर्थ आहे. या “बसण्यात” सगळंच येतं, मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद या सगळ्यांच्या व्याख्या या शब्दाला तंतोतंत लागू होतात. अगदी “उभयान्वयी” अव्ययाला “आडवे” करण्याची ताकद आहे या “बसण्या” मध्ये. असा हा “बसणे” शब्द विश्वव्यापक आहे. खरं तर ही एक साधना आहे, पण त्या साठी तुम्ही साधक असण्याची अट अजिबात नाही. एकदा का बसण्यातून आनंद मिळायला लागला की आपोआपच तुम्ही साधक होता. ;) . सूचक अर्थाने उच्चारलेला हा शब्दसुद्धा अंगात एक नवं-चैतन्य निर्माण करतो. कधी कधी तर १०० हत्तींचे बळ येतं असं पण वाचण्यात आलंय. पण हे अनुमान नोंदवताना सदर व्यक्ती साधनामग्न अर्थात “बसलेली” असावी असे माझे ठाम मत आहे.
बसणे या क्रिये मध्ये स्थळाला जसे महत्व आहे तसेच काळाला देखील आहे. सूर्यास्त ते सूर्योदयाचा काल हा या साधनेस सर्वोत्तम मानला जातो. तसेच स्थळाविषयी देखील काही नियम नाहीत. अर्थात “पोचलेल्या” साधकांसाठी स्थळ-काळाची कुठललीही बंधने नसतात हे आवर्जून नमूद करावे लागेल. देवकृपेने आपणांस चौका चौकात सेवाकेंद्र, स्वेच्छागृह सापडतील जिथे आपण एकटेच किंवा सह-साधकांच्या साथीने साधने साठी बसू शकता. आणि त्यांची नावे देखील एकदम स्पेशल ….. आध्यात्मिक, हिंदू संस्कृतीशी जवळीक साधणारी. साईपूजा, साई प्यालेस, साई दरबार …. वा वा वा … कसं एकदम मस्त वाटतं. साईबाबांच्या नावे असलेली सेवाकेंद्रे सर्वात अग्रणी. तसं बाकी मीरा, माधव, मल्हार, शंकर यांची नावे पण झळकतात पण त्या मनाने कमीच. संध्याकाळी ७ नंतर सेवेकरी आणि साधक यांचा जंगी “बार” उडतो. बहुतांशी सेवेकरी हे पुरुष असतात पण ललनांची संख्या पण काही कमी नाही. काही वर्षांपूर्वी तर अश्या ठिकाणी साधनेला सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची जोड होती. साधने बरोबरच विरंगुळा आणि श्रमपरिहार व्हावा हाच उदात्त हेतू होता. पण या ठिकाणी मूळ अभिप्रेत साधने ऐवजी भलतीच साधना जोर धरू लागल्याची ओरड कट्टर “बसेकरींनी” केल्या मुळे हा प्रकल्प जवळ जवळ बंद पडल्यात जमा आहे. त्यामुळे अभिजात कलावंतीणीचे अतोनात नुकसान झाले असल्याचे प्रकल्प समर्थक म्हणतात.
सेवाकेंद्रामध्ये तुमची बैठक रंगण्यासाठी टेबल, खुर्ची सकट सगळी बडदास्त ठेवली जाते. तुमची साधना योग्यरीतीने बिनबोभाट पार पडण्यासाठी एक – दोन सेवेकरी देखील दिले जातात. ते सेवेकरी तुम्हाला अपेक्षित असलेली साधन सामुग्री आणून देतात. तुम्ही घेतलेल्या सामुग्रीचा रीतसर हिशेब ठेवतात. आणि नंतर … म्हणजे तुमची साधना पूर्ण झाल्यावर घरी जाण्याच्या आधी या सर्व सेवेसाठी तुम्हाला “कर” भरावा लागतो. येथे “कर” दाखवून किंवा जुळवून काही फायदा होत नाही हे कितीही “साधनामस्त” असले तरी लक्षात ठेवावे. या ठिकाणी वेळेचे बंधन देखील असते. आजूबाजूला असलेले इतर साधक आपल्या साधनेत व्यत्यय आणू शकतात. म्हणावी तशी शांतता लाभत नाही. उगाच अती झालं तर साधकांच्या गटांमध्ये सुसंवाद, वार्तालाप होण्याची शक्यता असते. “बसण्याच्या” विरोधात असलेले काही समाजकंटक कधी पण छापा मारून उगाच गुणी साधकांना पण त्रास देतात. त्यामुळे तसं बघायला गेलं तर सेवाकेंद्र हा मामला जरा खर्चीक आणि त्रासदायक आहे. तेथे मिळणाऱ्या सुविधांप्रमाणे “सेवाकर” आकाराला जातो. या सगळ्याची तयारी असेल तरच तेथील पायरी चढावी. अन्यथा तेथील सेवेकरी तुम्हाला सालंकृत “अनुग्रह” द्यायला नेहेमीच तयार असतात. ;) . साधनेसाठी दुसरा कुठलाही पर्याय नसेल तर हाच सुलभ, सोपा आणि सहज उपलब्ध असलेला “बस”मार्ग आहे.
दुसरा आणि उत्तम पर्याय म्हणजे “साधना करी … घरच्या घरी”. पण या साठी सगळी धावपळ करावी लागते. बरोबर अजून काही साधक असतील तर ठीक आहे, म्हणजे निदान कामाचे वाटप तरी करता येते. मोजकीच साधन सामुग्री उपलब्ध असते त्यामुळे कुठलीही गोष्ट आणायची राहून जाऊ नये म्हणून सरळ यादी बनवून घ्यावी लागते. कारण मध्येच काही लागले तर साधना सोडून जाणे तसे कष्टप्रद आहे. आणि एकदा का सगळा मामला जमला की या साधने सारखी मजा नाही. संपूर्ण रूम प्रसन्न वाटायला लागते. वेळेचे बंधन नाही की दुसऱ्या कुणी साधकांचा त्रास नाही. तन आणि मन आसमंतात हलकं होवून भिरभिरत असतं. सगळे साधक झुलत असतात. नयनरम्य वातावरणाने रूम भारलेली असते. हे सगळं एकदम माफक खर्चात शक्य होतं. लेकिन इसमें भी थोडा प्रॉब्लेम है. सर्वात वैताग म्हणजे नंतर करावयाची आवराआवरी. मस्त साधना झालेली असते आणि सगळी आवराआवरी करावी लागते. त्या वर कडी म्हणजे एखाद्या साधकाला जर अती साधने मुळे त्रास झाला तर मग बघायलाच नको. केलेले सगळे कष्ट वाया. त्यामुळे साधनेच्या वेळी सगळ्यांकडे वक्र डोळ्यांनी कटाक्ष ठेवायला लागतो. पण सगळाच मामला जर “लिमिटेड” स्वरुपात ठेवला तर या सारखा आनंद आणि अनुभूती या भूतलावर कुठेही मिळणे शक्य नाही. त्यामुळे शांत “बसा” … निवांत “बसा” … साधना करा … साधक व्हा पण बाधक होवू नका.
प्रतिक्रिया
10 Sep 2012 - 1:16 pm | अरुण मनोहर
परमानंद परमानंद!
10 Sep 2012 - 1:43 pm | गवि
वा.. पोचलेले साधक दिसताय..
बाकी आहाराविषयी फार लिहिलं नाहीत ते?
साधनेदरम्यान उपवासाचा हलका फराळ करावा असं म्हणतात. तळलेल्यांपेक्षा उकडलेले सात्विक पदार्थ अधिक उत्तम असा अनुभवही आहे.. (साधनोत्तर त्रास कमी व्हावा यासाठी..)
10 Sep 2012 - 2:13 pm | आनंद भातखंडे
साधना महत्वाची असल्याने त्या दरम्यान घेण्यात येणारा आहार हा एक दुय्यम किंवा ऐच्छिक विषय होऊ शकतो. त्यामुळे या लेखा मध्ये त्याचा जास्त उहापोह न करता स्थलकालादी महात्म्य सांगण्यावर भर दिला आहे.
आणि पोचलेला साधक वगैरे नाही ... तितकी उंची गाठायची आहे आजून. ;)
10 Sep 2012 - 2:07 pm | अनुरोध
व्वा खुमासदार लेखन .... :)
10 Sep 2012 - 2:23 pm | अरुण मनोहर
>>साधनेसाठी दुसरा कुठलाही पर्याय नसेल तर..<<
साधना ऐवजी अर्चना चालेल का?
10 Sep 2012 - 2:42 pm | आनंद भातखंडे
साहेब तुम्हांला जे पटेल/झेपेल/योग्य वाटेल तो पर्याय घ्या. ;).... परमानंदाची अनुभूती महत्वाची.
10 Sep 2012 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार
तरंगदार लेखन भावले.
पण
हे काय पटले नाय बॉ.
यादी ?
साधन सामुग्री मोजकीच असावी. फाफट पसार्यात मजा नाही.
काही भक्तांचे लक्ष तिर्थात कमी आणि प्रसादात जास्ती असते. अशा लोकांमुळे ही यादी वैग्रे भानगड निर्माण होते. शक्यतो अशा लोकांना टाळावेच. उगाच साधनेत व्यत्यय येतो.
10 Sep 2012 - 2:40 pm | आनंद भातखंडे
हे बाकी १००% खरं .... साधनेत व्यत्यय नसावा.
10 Sep 2012 - 7:43 pm | पक पक पक
काही भक्तांचे लक्ष तिर्थात कमी आणि प्रसादात जास्ती असते.
असे भक्त फारच त्रास दायक ठरतात... त्यांच्या मुळेच बरेचदा साधनेत व्यत्यय येतो . ;)
10 Sep 2012 - 2:29 pm | मोहनराव
भावना पोहोचल्या. साधना कळाली. आनंद जाहला!! :)
10 Sep 2012 - 2:44 pm | sagarpdy
नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण, ओघवती लेखनशैली
पुलेशु.
10 Sep 2012 - 2:44 pm | मी_आहे_ना
आनंदराव, मस्त खुमासदार लेख, आवडला. "साधक व्हा पण बाधक होवू नका."-अगदी अगदी...परमानंदी!
10 Sep 2012 - 2:51 pm | ज्ञानोबाचे पैजार
आनंदराव,
"बसणे" या शब्दाचे अजुनही काही अर्थ आहेत. बसणे या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहेत. तो इतक्या मर्यादीत अर्थाने तो ही विनोद निर्मीती साठी वापरलेला पाहुन मनाला अतिशय क्लेश झाले. बसणे या विषयावर कमीत कमी चार ते पाच भागांची मालिका लिहीता येईल इतका मसाला त्या शब्दात ठासुन भरला आहे.
मोठे झाल्यावर तुम्हाला ते अर्थ आपोआप कळतील. त्या साठी मोठ्या अभ्यासाची गरज आहे. या वयात इतके ठीकच आहे.
तरी सध्याचा निबंध फारसा जमला नाही. दारु विषयी लिहावे ते दारु पिणार्यानेच. उगाच काठावर बसुन पोहणार्यांना खडे मारु नये.
अनेक महत्वचे मुद्दे सुटले आहेत. निबंध फार घाईघाईने लिहील्या सारखा वाटला. विनोद निर्मीती फारशी जमली नाही. बरेचसे विनोद बळेबळेच केल्या सारखे वाटतात.
हे म्हणजे बाबांशेजारी बार मधे बसुन मोसंबी ज्युस किंवा बोर्नव्हीटा घातलेले दुध पीत केलेले निरीक्षण वाटले.
साला दारुच वर्णन कराव तर आमच्या सोत्रीनेच. नुसते फोटो बघत वर्णन वाचले तरी ऑफीसातच नशा चढते.
यापेक्षा चितळेकाकांवर लिहीलेला निबंध बरा होता.
२ /१०.
10 Sep 2012 - 3:08 pm | sagarpdy
+1
10 Sep 2012 - 3:12 pm | स्पा
दारु विषयी लिहावे ते दारु पिणार्यानेच. उगाच काठावर बसुन पोहणार्यांना खडे मारु नये.
बुवा.. एका वाक्यात सर्व सारांश मांडलात..
बहुत काय बोलणे
10 Sep 2012 - 6:21 pm | तिमा
लेख फारच बाळबोध वाटला. द्वयर्थी लिहायचेच तर ते असे हातचे राखून कशाला ? सुरवातीला तुम्हाला बसण्याचे सर्व अर्थ माहीत असतील असे वाटले होते. जसे की,
अगदी “उभयान्वयी” अव्ययाला “आडवे” करण्याची ताकद आहे या “बसण्या” मध्ये. असा हा “बसणे” शब्द विश्वव्यापक आहे.
पण पुढे एकदम पुळकवणी झालं हो!
दादा कोंडके 'उभयान्वयी अव्ययाला' 'उभयान्वयी अवयव' म्हणत. (विच्छा माझी मधे)
10 Sep 2012 - 9:03 pm | ५० फक्त
+१००, अगदी लहानपणीच्या हागायला बसणे ते मोठे झाल्यावर दवाखान्यात बसणे पासुन ते बारीला बसणे, गल्ल्यावर , गादीवर बसणे , गणपती बसणे आणि अगदीच समानता * हवी असेल तर असो..... बरंच काही राहिलंय,
10 Sep 2012 - 5:57 pm | इरसाल
पुर्वीचे काही ग्रह दुषित झालेले दिसत्त्त्तात आहेत बुवा.(पर तिसाद पुर्व ग्रह दूशित दिसु र्हायले काइ, २०० चा चटका तर नव्हं ह्यो?)
10 Sep 2012 - 6:02 pm | विजुभाऊ
बहुतेकदा नुसती प्रासादीक मंडळी टाळावीच. प्रसाद लवकर संपतो.
10 Sep 2012 - 6:18 pm | अत्रुप्त आत्मा
आपण केलेल्या संपूर्ण आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आपणास आमचे सादर शतशः प्रणाम... >>>
@कट्टर “बसेकरींनी” >>>
@“बस”मार्ग>>>
@“साधना करी … घरच्या घरी”.>>>
समांतरः- आनंदराव... आपण टाकळकर क्लासचे इद्यार्थी आहात काय....??? ;)
10 Sep 2012 - 6:22 pm | आनंद भातखंडे
अवांतर: नाही. ;)
10 Sep 2012 - 6:39 pm | अत्रुप्त आत्मा
@अवांतर: नाही. >>>
10 Sep 2012 - 6:57 pm | कपिलमुनी
कोणी "चल !! बैठेंगा क्या" असे विचारले आहे का ??
या बसु या चा अर्थ लैच भारी असतो ;)
10 Sep 2012 - 7:35 pm | chipatakhdumdum
+++++++++++++++
10 Sep 2012 - 10:34 pm | सोत्रि
वाहव्वा! मस्तच.
पण अजुनही धमाल करता आली असती. 'न बसताच' लेख लिहील्याने असे झाले असावे ;)
आता तुम्ही टाकळकर क्लासचे विद्यार्थी नसल्याने तुम्हाला 'बसायचे का?' असे धड विचारतही येत नाही :(
- (बसण्यास सदैव तयार असलेला) सोकाजी
11 Sep 2012 - 10:02 am | मी_आहे_ना
हाहाहाहा, सोत्रि -^-
11 Sep 2012 - 10:45 am | आनंद भातखंडे
सोत्री,
अनावधानाने टाकळकर चा मतितार्थ नीटसा कळला नव्हता. आम्ही टाकळकरचे रेग्युलर विद्यार्थी नसलो तरी त्यांची एक दिवसीय शिबिरे, अधून मधून होणाऱ्या कार्यशाळा तसेच सदिच्छा भेटी वगैरेना हजेरी लावतो. पण तुमच्या तोडीचे नं. १ चे विद्यार्थी नाही. (आणि नजीकच्या भविष्यातच काय पण या जन्मी देखील ते शक्य नाही)
खरं आहे. अजूनही धम्माल करता आली असती. आता ज्यांना ही कमतरता वाटते त्यांनी ज्ञानात भर घालावी. नुसते प्रतिसादाच्या चौकटीत राहून लेखाला नावे ठेवण्यात काय मजा नाही का? ;)
11 Sep 2012 - 10:51 am | गवि
ओ.. काय टाकळकर टाकळकर लावलंय हो सोत्रि,
आम्ही नाही बुआ टाकळकर क्लासचे विद्यार्थी.. आता गूढ सोडा आणि आम्हालाही ती टाकळकर क्लासची बसण्याची काय गंमत आहे ती सांगा पाहू...
11 Sep 2012 - 12:30 pm | विजुभाऊ
टाकळकर क्लासचे विद्यार्थी विद्यार्थी बरेचदा त्या सोबत ओक सरांच्या ब्याचला पण बसतात
11 Sep 2012 - 2:51 pm | अत्रुप्त आत्मा
@ओक सरांच्या ब्याचला>>>
11 Sep 2012 - 2:59 pm | sagarpdy