झ झ झ झ झोपडीत

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
9 May 2012 - 1:58 pm

झझझझ झोपडीत चचचच चारपाई

झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी

माका तुझा प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे
कुकरू कुकरू हू
तुझ्याच सारखा यार पाहिजे यार पाहिजे हा हा यार पाहिजे
सूर्य न पाही चंद्र न पाही तुझाच बस दीदार पाहिजे

कुकरू कुकरूहू
झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी

रोखू नका, करुद्या की प्रेम तरी दिलवाल्यांना
कुकरू कुकरू हू
टोचू नका भरुद्या की मनात तनाच्या उजाळ्यांना
तू तुझ्या घरवाल्यांना समजाव गं मी माझ्या घरवाल्यांना

कुकरू कुकरूहू
झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी

तुझा मला साथ पाहिजे साथ पाहिजे हो हो साथ पाहिजे
कुकरू कुकरू हू
ओठांची तुझ्या बात पाहिजे बात पाहिजे अरे बात पाहिजे
कपडा नको मज, गेहना नको मज, आपल्याला तुझा बस हात पाहिजे

कुकरू कुकरूहू
झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी

झझझझ झोपडीत चचचच चारपाई...
------

मराठी शब्द माझेच आहेत. मूळ हिंदी शब्द ओळखू येतात का?

शृंगारहास्यवीररसअद्भुतरसकलासंगीतप्रेमकाव्यकविताविनोदक्रीडामौजमजाचित्रपट

प्रतिक्रिया

हायला.. जब्री.. खंग्री..

बाकी

कपडा नको मज,

इथे एकदोन ठोके चुकले.. पुढे परत चालू झाले.

स्मिता.'s picture

9 May 2012 - 2:18 pm | स्मिता.

वाचताना फक्त एवढीच प्रतिक्रिया उमटली... __/\__

याच सुमधूर आणि आशयगर्भ गीताचा इंग्रजी आणि संस्कृतात अनुवाद देता येईल का?

प्रीत-मोहर's picture

9 May 2012 - 2:43 pm | प्रीत-मोहर

संस्कृत आणि इंग्रजी अनुवाद हवा होता. चार चाँद लागले असते गीताला.

परिकथेतील राजकुमार's picture

9 May 2012 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार

प्राध्यापक घासकडवींचा 'पागल सिद्धांत' आवडला.

स्पा's picture

9 May 2012 - 2:49 pm | स्पा

=))
=))
=))

सुहास झेले's picture

9 May 2012 - 3:55 pm | सुहास झेले

हा हा हा ... लैच !!

पैसा's picture

9 May 2012 - 4:00 pm | पैसा

=)) =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2012 - 4:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गाणं काही ओळखू आलं नाही. पण..... ;)

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

या झोपडीची आठवण झाली. :)

-दिलीप बिरुटे

पहाटवारा's picture

9 May 2012 - 4:15 pm | पहाटवारा

अहो मराठित अनुवाद करित आहात ना .. मग असे खालचे शब्द बदला पाहू .. मग बघा कसा स्वादिष्ट जिलबीसारखा अनुवाद होतोय तो ..
सुहानी = ऊत्फुल्ल
यार = सखा
दीदार = डोळार
दिलवाल्यांना = र्‍ह्दयवाल्यांना
बात = गोश्ट
आणी हे मधेच कोकणी (कि मालवणी) का बॉ?
माका तुझा प्रेम पाहिजे

छ्या .. तुम्हि जरि गुर्जी असला तरी या बाबतीत तुम्हालाच शिकवणीची गरज आहे ..

राजेश घासकडवी's picture

10 May 2012 - 8:33 pm | राजेश घासकडवी

तुम्ही अनेक शब्दांसाठी चांगले प्रतिशब्द दिलेले आहेत. विशेषतः उत्फुल्ल आणि डोळार हे आवडले.

'उत्फल्ल सफर आणि हा ऋतूही सुंदर
मला भिति कुठे मी हरवलो तर'

असं एका गाण्याचं भाषांतर करता येईल. ओळखा पाहू कुठचं ते?

मात्र यार (तिचा एक यार आहे), दिल (माझ्या दिलाचा दिलवर भेटला), बात (काहीही बाता मारू नकोस) हे शब्द मराठीच आहेत.

आणी हे मधेच कोकणी (कि मालवणी) का बॉ?
माका तुझा प्रेम पाहिजे

मूळच्या सुंदर गाण्याला गोवन पद्धतीचं संगीत आहे. ते कोकणातच घडत असावं असा माझा अंदाज आहे. मूळ शब्द आहेत
माका तुझा प्यार पाहिजे प्यार पाहिजे प्यार पाहिजे
तेव्हा ती भाषेची डूब ठेवण्यासाठी शब्द तसेच ठेवले.

आगामी भाषांतर...
'उई अम्मा उई अम्मा मुष्किल ये क्या हो गई, मेरे बदन में तुफां उठा तो साडी हवा हो गई' या गाण्याचं
'अय्याई गं अय्याई गं, पंचाईत ही काय झाली, माझ्या शरीरात वादळ उठलं अन् साडीची हवा झाली'

परिकथेतील राजकुमार's picture

11 May 2012 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार

'अय्याई गं अय्याई गं, पंचाईत ही काय झाली, माझ्या शरीरात वादळ उठलं अन् साडीची हवा झाली'

च्या ऐवजी 'साडी हवा झाली' असे योग्य वाटेल.

माझ्या मते, कितीही कठीण विषय असला आणि जाणण्यास उत्सुक सामान्य माणसास जर आपण मायबोलीत सांगून त्याला समजला तर, मायबोलीतले वर्णन साध्य झाले आहे, असे मानता येईल. म्हणून त्या पूर्व-अर्हतेच्या अटींकडे दुर्लक्ष करून खुल्या मंचावर प्रस्तुत करण्याचा हा एक प्रयोग आहे. त्याचे यश संवादास खुल्या असलेल्या वाचकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. साधते आहे असे वाटू लागले आहे......

मूकवाचक's picture

9 May 2012 - 4:52 pm | मूकवाचक

_/\_

jaypal's picture

9 May 2012 - 9:36 pm | jaypal

गुर्जी क लिवलास ;-)

जबर्‍या,

गुर्जी लैच भारी! मजा आवी गयो!

-(काव्यासाठी गुर्जीचे शिष्यत्व पत्करावे अशी आस असलेला) सोकाजी

अवांतरः झोपडी वरून 'रंभा माझ्या झोपडीत ये...' हे एक झोपडीगीत आठवले, सहजच ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 May 2012 - 10:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काव्यासाठी गुर्जीचे शिष्यत्व पत्करावे अशी आस असलेला

ही आस इंग्लिश का मराठी?

(आस लगा के सुनने बैठी) अदिती

सोत्रि's picture

10 May 2012 - 9:09 pm | सोत्रि

त्याचे काय आहे ना माझे विंग्रजी लहानपणा पासूनच जरा कच्चे आहे.

माझे विंग्रजी चे मास्तर मला नेहमी 'यु आsssस' आसं म्हणायचे त्यामुळे महत्प्रयासाने त्याचा एक अर्थ शोधला होता.
पण तु एवढी शिकली सवरलेली आहेस (असे म्हणतात ब्वॉ लोक, चू. भु. दे.घे.) तर काही वेगळा अ(न)र्थ असेल तर सांग ब्वॉ मज पामराला. तेवढीच ज्ञानात भर हो!

- (विद्यार्थी) सोकाजी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 May 2012 - 1:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हॉय रे हॉय. लौकीकार्थाने माझ्याकडे एखाद-दोन जास्त कागद आहेत.

पण अर्थ इथे नको. दुसरीकडे सांगते.

राजो's picture

11 May 2012 - 12:43 pm | राजो

यावरून एक विनोद आठवला...

सरदारनी (गुरुद्वारामधे) : पापाजी मैं बडी आस लेके आईयां.....
सरदार (मागून) : ओये मैने देख्या जब तु मथ्था टेक्या!!

दादा कोंडके's picture

9 May 2012 - 10:57 pm | दादा कोंडके

हा विनोद आठवला!

साती's picture

10 May 2012 - 12:52 am | साती

मस्त!
अंबो!

Nile's picture

10 May 2012 - 2:56 am | Nile

घासकडवींसारखे लोक त्यांची प्रगल्भ बुद्धी असली टुकार विडंबन पाडण्यात घालवत आहेत हे पाहून आश्चर्य वाटले.

मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी विडंबक तयार झाले आहेत त्यामुळे गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो.

घासकडबी गुर्जी आमच्यासारख्या पामरांसाठी अनुवाद थोडा मराठी भाषेत करा ना
चारपायी म्हणजे नक्की काय........ गाईबैलासारखे चतुष्पाद जनावर की बाजलं खुर्ची पलंग यासारखे काही सामान?
सुहानी म्हणजे काय?
घडी म्हणजे काय? कपड्यांची घडी वगैरे सारखा शब्द आहे का?
गेहना म्हणजे काय? कंगना नावाची एक नटी आहे म्हणे बालिवुडात. गेहना ही तिची धाकटी बहीण तर नव्हे?
बाकी तुमच्या प्रगल्भ परीपक्व बुद्धीमत्ते बद्दल आम्ही काय बोलणार?

राजेश घासकडवी's picture

10 May 2012 - 8:42 pm | राजेश घासकडवी

हे पहा, उगाच माझ्या अनुवादात छिद्रान्वेषीपणा करण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो माझ्या लक्षात आलेला आहे. एखाद्या नवीन, अननुभवी अनुवादकाला उत्तेजन देण्याऐवजी तुम्ही चेष्टा मांडली आहे. हे काही बरोबर नाही.

चारपायी म्हणजे नक्की काय........ गाईबैलासारखे चतुष्पाद जनावर की बाजलं खुर्ची पलंग यासारखे काही सामान?

तो शब्द चारपाई आहे. तिपाई असते ना, तशीच चारपाई. आधीच मराठीत सर्वमान्य झालेल्या शब्दांसाठी नवीन संस्कृतप्रचूर शब्द का काढायचे?

सुहानी म्हणजे काय?

उत्फुल्ल

घडी म्हणजे काय? कपड्यांची घडी वगैरे सारखा शब्द आहे का?

हा मराठी शब्दच आहे. 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' हे सुंदर गाणं तुम्हाला माहीत नाही काय? एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात त्याला मी काय करू? 'घंटा' या शब्दाचे किती अर्थ आहेत माहीत आहे का तुम्हाला? खड्डा आणि दगड यांचेही वेगवेगळे अर्थ तुम्हाला माहीत नाहीत का?

सोत्रि's picture

10 May 2012 - 9:02 pm | सोत्रि

एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात त्याला मी काय करू?

खुर्चीतुन सांडल्या गेले आहे :crazy:

- (दगड) सोकाजी

कपिल काळे's picture

10 May 2012 - 2:32 pm | कपिल काळे

ची आठवण झाली. तेही असेच हिंदी गीतांचा अनुवाद करुन द्यायचे ओळखायला.

झुमका सांडला रे बरेलीच्या बाजारामध्ये. हा अनुवाद त्यांना ट्रेडमीलवर्ती सुचला होता.

उपरोक्त अनुवाद आप्ल्याला कुठे स्फुरला?

की सामंतकाका हा आप्ला डु. आय्डी ब्वा???

राजो's picture

11 May 2012 - 9:35 am | राजो

हिडिस!!

एमी's picture

11 May 2012 - 10:10 am | एमी

:-D :-D

बिपिन कार्यकर्ते's picture

12 May 2012 - 1:37 pm | बिपिन कार्यकर्ते

=)))))))))))))))))