1

अलखपैंजणी परखडमोती

Primary tabs

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
27 Mar 2012 - 1:52 am

सुशिरनभाले चरित्रक्रांता लखलख दर्जा झुरतो
दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ साहित्याला लुचतो

नवगेयाच्या शिंकाळ्यावर तीर्थ दुपारी झडतो
झळझळ जिव्हा हरित भुसनळे सम्यकधावन करतो

सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो
रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो

विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो
त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो

चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो
अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो

शरदिनी.... पुणे २६ मार्च २०१२

भयानकबिभत्सकरुणअद्भुतरसउखाणेअर्थव्यवहारमांडणीसंस्कृतीदेशांतरभाषासुभाषितेक्रीडाकृष्णमुर्तीमौजमजास्थिरचित्र

प्रतिक्रिया

छान गं.
मस्त गं
कसं जमतं गं
डोळे पाणावले गं
(खवतून साभार :))

पैसा's picture

27 Mar 2012 - 8:11 am | पैसा

काल शरदिनीतैंना ऑनलाईन पाहिल्याबरोबर त्यांच्या खवमधलं कॉपी करून ठेवलं होतं, पण कविता व्हायला उशीर झाल्यामुळे नंदोबांनी माझ्या आधी नंबर लावला. आता फक्त +१.

छान गं.
मस्त गं
कसं जमतं गं
डोळे पाणावले गं

पिवळा डांबिस's picture

28 Mar 2012 - 12:38 am | पिवळा डांबिस

नंदनशी सहमत.
साहित्यिक रूट-कॅनालच हे!!!
:)

नंदन's picture

28 Mar 2012 - 1:13 am | नंदन

>>> साहित्यिक रूट-कॅनालच हे!!!
अंत'र्मुख' करणारी 'दर्दी' प्रतिक्रिया ;)

श्रावण मोडक's picture

28 Mar 2012 - 10:17 am | श्रावण मोडक

खतरनाक रूट कॅनल आहे हे... प्रतिक्रिया अगदी दर्दी आहे. :)

यकु's picture

27 Mar 2012 - 2:03 am | यकु

छ्या!
दर्जा गंडला शरूतै.
तुम्हाला कधीपासून कथाकारी स्टान्स घावा लागतोय? तुम्ही तर नुसते वाट्टेल तसे शब्द मांडत सुटायचे आणि त्यातून अर्थ, प्रतिमा, गेयता, कथा बाहेर पडायची असे पूर्वी होत होते ब्वॉ.

चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो
अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो.

कविता पूर्ण समजली नाही , पण ह्या दोन ओळी मनात रुतल्या गेलेल्या आहेत.

शैलेन्द्र's picture

27 Mar 2012 - 7:59 am | शैलेन्द्र

"कविता पूर्ण समजली नाही "

म्हणजे थोडी समजली का? मग आंम्हालाही सांगुन टाका. :)

मुक्तसुनीत's picture

27 Mar 2012 - 4:35 am | मुक्तसुनीत

शिसानविवि शरूमौशी ;-)

स्पंदना's picture

27 Mar 2012 - 4:49 am | स्पंदना

आई आई ग! ह्या अजुन इथे आहेत?

अपर्णा बघ . सुरु कर तु पण चार शब्द खरडायला....

सहज's picture

27 Mar 2012 - 6:24 am | सहज

"पुरुषांची" खरच गरज आहे का? हा धागा अथवा कवी ग्रेस यांचे निधन किंवा या दोन्हीही या कवितेच्या प्रेरणा आहेत का? :-)

सांजसंध्या's picture

27 Mar 2012 - 7:50 am | सांजसंध्या

नाही समजले

शैलेन्द्र's picture

27 Mar 2012 - 7:57 am | शैलेन्द्र

म्हणजेच कविता चांगली उतरलीय.. :)

प्रचेतस's picture

27 Mar 2012 - 8:22 am | प्रचेतस

मास्तर, झक्कास हो.

शैलेन्द्र's picture

27 Mar 2012 - 8:24 am | शैलेन्द्र

छे छे छे.. स्पॉइल स्पोर्ट... कोड्याचे उत्तर माहीत असेल त्याने सांगायचे नसते..

इथे बहुतेकांना माहीत आहेच हो.
तरी आता तुम्ही बूच मारलतच.:P

प्यारे१'s picture

27 Mar 2012 - 9:13 am | प्यारे१

काळ सोकावतो शरदिनीतै.... काय करायचं???

गवि's picture

27 Mar 2012 - 10:10 am | गवि

शृंगाराचे सूचक वर्णन आवडले..
त्यातल्या काही ओळींना विशेष खोली आणि अन्य ओळींना लखलखती धार आहे..

मी-सौरभ's picture

27 Mar 2012 - 11:04 am | मी-सौरभ

खरचं कळलं का आपल्या टंचनिकेची कृपा आहे ही?? ;)

गवि's picture

27 Mar 2012 - 3:10 pm | गवि

तू गप रे.. तुला रे मेल्या कशाला नसत्या चवकशा.. वशाड मेलो.

काहिही कळलं नाही :-(

अमृत

जाई.'s picture

27 Mar 2012 - 10:59 am | जाई.

काही समजल नाही

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2012 - 11:21 am | परिकथेतील राजकुमार

सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो
रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो

मंडई झाली पार डोक्याची !
लै भारी.

कशी आहेस गं ? आजकाल दिसत नाहीस जास्ती ऑनलाईन ?

आई गं....!!
अलखपैंजणी हा शब्द खूपच आवडेश :)

विसुनाना's picture

27 Mar 2012 - 11:31 am | विसुनाना

विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो
त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो

-या ओळी स्पष्टपणे कळण्यासारख्या आहेत. गल्ली चुकलं काय व्हो ते, पीएल्ल? ;)
बाकी ग्रेसफुल कविता, बर्का! शरदिनीबाई.

शैलेन्द्र's picture

27 Mar 2012 - 11:49 am | शैलेन्द्र

या कवितेतील शब्दांचे, अर्थांचे.. आणी इतरही कसले कसले समीक्षण करण्यासाठी चौकट राजा यांना सादर आमंत्रीत केले जात आहे..

कॉलींग चौरा काका कॉलींग कॉलींग..

यकु's picture

27 Mar 2012 - 11:57 am | यकु

_______/\_______ !!!
हम्म.. म्हणजे ब्बास!

प्यारे१'s picture

27 Mar 2012 - 1:06 pm | प्यारे१

अ आ नी वल्लीला विडंबनाचं पण बघायला सांगा जरा....

गणपा's picture

27 Mar 2012 - 1:22 pm | गणपा

:)

(शरदिनीतैंचा फॅन) गणा

गणेशा's picture

27 Mar 2012 - 1:29 pm | गणेशा

अतिशय सुंदर कविता .
खुप आवडली. दरवेळेस पेक्षा कमी क्लिष्टता आली आहे मात्र शब्दात.

लिहित रहा... वाचत आहे...

मन१'s picture

27 Mar 2012 - 1:37 pm | मन१

जय जालिंदर बाबा की...

छान लिहीलयंस गं !! काहीही कळलं नाही.

भडक मकर हा उलटसुलटशा ओळी भलत्या खरडवतो. ;)

विजुभाऊ's picture

27 Mar 2012 - 2:58 pm | विजुभाऊ

वा वा वा ग्रेस यांच्या नंतर कोण हा प्रश्न आता नक्की सुटला.

हारुन शेख's picture

28 Mar 2012 - 8:50 pm | हारुन शेख

खपलो !!

छान आवडली..कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2012 - 7:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरदिनी, डोळे पाणावले गं :)

आपल्या रचना विशेषतः कवितेत येणार्‍या शब्दांची जी योजना असते ती पाहता अनेकदा दुर्बोध वाटावी अशी वाटत असली तरी आपल्या कवितेतून येणार्‍या शब्दाची जी सहजता आहे ती दोन बोटातून निसटणार्‍या रांगोळीसारखी आहे. आपल्या कवितेतील कोणत्याही ओळींचा कोणत्याही ओळीशी परस्पर संबंध नाही असे वाटते परंतु ती आस्वादकाची मर्यादा आहे, हे स्पष्ट जाणवते ते नम्रपणे नमूद करतो. उदाहरण म्हणून आपल्या वरील कवितेतील 'सुकल्या ओष्टी' 'डुबणे' 'विझलेल्या पणत्या' 'जळत्या वाती' अशा शब्दातून जी दु:खाची भावना व्यक्त होते त्याला मराठी साहित्यविश्वात तोड नाही. आपली कविता वाचल्यानंतर कप्पाळाला हात मारुन घेतल्यानंतर जे हलकेच 'हसू फूलतं' अशी निर्मिती काही मोजक्याच साहित्यरत्नांना जमली आहे. अशी जाणीव व्यक्त करण्याची आपली जी अद्भूत शक्ती ती मराठी काव्यपरंपरेत कुठेही दिसत नाही. आपल्या कवितेची निर्मितीप्रक्रिया आणि आपल्या काव्यप्रकृतीवर वेग-वेगळ्या अंगाने संशोधन होणे गरजेचे आहे, यात काही वाद नाही. ;)

-दिलीप बिरुटे
(शरदिनीच्या कवितेचा समीक्षक)

प्राजु's picture

27 Mar 2012 - 11:40 pm | प्राजु

भडभडून आले आहे... कित्येक महिन्यांनी शरदिनी ताईंच्या नविन काव्याचा लाभ घेता आला..!
लिहित जा शरदिनी बै!.. बरं असतं अधून मधून कर्रकट्ट.. कर्रकट्ट!!

सुहास..'s picture

28 Mar 2012 - 12:59 am | सुहास..

अग्ग्गागा !!

छान गं.
मस्त गं
कसं जमतं गं
डोळे पाणावले गं
(प्र.क्र.१ मधुन साभार :) )

# भयानक
# कृष्णमुर्ती
# बिभत्स

हे लय आवडले ;)

सांजसंध्या's picture

28 Mar 2012 - 1:13 pm | सांजसंध्या

पुन्हा पुन्हा वाचली
पुन्हा पुन्हा नाही समजली

हारुन शेख's picture

28 Mar 2012 - 8:59 pm | हारुन शेख

खूपच शब्दबंबाळ कविता. वाचून भोवंड आली. तुम्ही मोरोपंतांच्या फ्यान आहात का? असल्यास 'निरोष्ठ रामायणाप्रमाणे' 'निरोष्ठ कामसुत्रही' लिहिता येऊ शकेल अशी आशा वाटायला लागलीय.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शैलेन्द्र's picture

28 Mar 2012 - 11:09 pm | शैलेन्द्र

काय बुवा लोकांना प्रतिभेची कदरच नाही..

बघा आता हे कडव, किती गहीरा अर्थ दडलाय त्यात..

"चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो
अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो"

इथे संध्या म्हणजे संध्याकाळची वेळ नाही तर "संध्या" हा दैनीक परिपाठ अपेक्षीत आहे.. हा विचित्र परिपाठ आहे, गोजीरेसे विष खलण्याचा.. म्हणजे विषारी आठवणी ज्या मलमासारख्या लावल्या की अनुनुभुत सुख देतात त्या आठवण्याचा दैनीक परिपाठ..पण हे उद्योग का करायचे? त्याच उत्तर दुसर्‍या चरणात.. अलख पैंजनी म्हणजे न बोलावता येणार्‍या याचकाचा नाद, हा याचक एक परखडसा निरोप घेवुन येतो .. आणी तो निरोप जी जखम करुन जातो त्यावर लावण्यासाठी हा आठवणींचा विखारी मलम.. ही दुखा:ची जात तर बघा.. विषाने विषाचा उतारा..

चला बर आता सगळ्यांनी एक एक कडव सोडवायला घ्या..

अजया's picture

12 Nov 2014 - 9:14 am | अजया

शरदिनी,
छान गं.
मस्त गं
कसं जमतं गं
डोळे पाणावले गं
(प्र १ व सा)
परत ये गं
तुझी झनन झांजरी शब्दकळा घेऊन,
रुटकॅनाल काय आम्ही पण करतो!!

भडकमकर मास्तर's picture

3 Jul 2015 - 1:32 pm | भडकमकर मास्तर

:) :) :)

सुनील's picture

12 Nov 2014 - 9:29 am | सुनील

मला वाटलं नवी काही आलय काय?

नाही. जुन्या मडक्यात जुनेच दगड! ;)

अजया's picture

12 Nov 2014 - 10:53 am | अजया

असू द्या!
कोणासाठी जुनं ते सोनं!
कोणासाठी दगड!
पसंद अपनी अपनी
खयाल अपना अपना!!

पहाटवारा's picture

14 Nov 2014 - 6:50 am | पहाटवारा

हि आर्त हाक ..तुझ्याच्साठी .

मंत्रनिळाई सत्रपकाठा, खंडरात्रीला झरून ये |
झडझड्कारी किनारपंखी, वानलवारा तरून ये ||

चिंबमिठाई गोड्मस्करे,लाळरकंदी स्मरून ये |
मीनलपंखी स्वत्वमिनारे, माईनमूळी लवून ये ||

-पहाटवारा

स्वामी संकेतानंद's picture

14 Nov 2014 - 9:13 am | स्वामी संकेतानंद

इ का होला? *DASH*

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Nov 2014 - 6:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

निव्वळ भ न्ना ट!!
__/\__!!
नव्या मिपाकरांना (माझ्यासारख्या) आता हे नविन काम लागलं. शरदिनी ताईंच्या जुन्या कविता हुडकून काढायचे.

"डुडूळगावचा गोलंदाज" नक्की वाचा. माष्टरपीस.

बॅटमॅन's picture

14 Nov 2014 - 7:06 pm | बॅटमॅन

अगदी अगदी.

आजवर कविता केल्या, विडंबनेही केली, पण शरदिनीस्टाईल काही लिहू शकलो नाही. ते या जगतीचे नोहेंच मुळी!