गजरा (४)
नेहमीचाच असायचा हट्ट माझा
गजऱ्याचा चा नाहीतर मग फुलांचा
माझा वेळ जायचा कागदावरची फुले गुंफण्यात
त्याचा मात्र कागदावर हिशोब लिहिण्यात
पण कागदावर न उमटलेली एक लय मात्र
घेऊन यायचा ...
तो.... असा तो ......असा तो गजरा ...........
रुसवे फुगवे तर नेहमीचेच असायचे
भांडण किंवा अबोला कमीच पडायचे
मग गजऱ्याचे देणे आणि घेणे व्हायचे ....
आणि सुगंधाने त्याच्या दोघे मोहून जायचे ...
डोळ्यात दाटलेली एक नीर ओळ पाहायचा
आणि विरघळणारा राग झेलायचा ......
असा तो असा तो गजरा .........
क्षितिजाकडे पाहणारी नजर आणि हातातला हात...
गुंतलेले भाव आणि गहिवरलेले श्वास ....
'माझे असणे' सार्थक करणारे त्याचे मोहक हसू ,
आणि उगीचच वाहणारे माझे डोळ्यातील अश्रू ,
भारलेले हे आयुष्य अजूनच सुगंधित करून टाकायचा ......
असा तो असा तो गजरा .........
मला ........
मला तो आवडायचा .....आणि त्याला माझा 'गजरा' !!!
प्रतिक्रिया
23 Jan 2012 - 12:29 pm | रघु सावंत
क्षितिजाकडे पाहणारी नजर आणि हातातला हात...
गुंतलेले भाव आणि गहिवरलेले श्वास ....
'माझे असणे' सार्थक करणारे त्याचे मोहक हसू ,
आणि उगीचच वाहणारे माझे डोळ्यातील अश्रू ,
भारलेले हे आयुष्य अजूनच सुगंधित करून टाकायचा ......
असा तो असा तो गजरा .........
मला ........
मला तो आवडायचा .....आणि त्याला माझा 'गजरा' !!!
तुमच काय ? तुम्हाला तो आवडायचा पण त्याला तुमचा गजराच ;;;;;;;
परत त्याला विचारा कि तुला मी आवडते कि नाही. ते सांग ?
----- रघु सावंत
23 Jan 2012 - 12:50 pm | फिझा
गजरा ...१,२,३,,वाचा !! आधि !!
23 Jan 2012 - 5:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
माफ करा, पण या प्रतिसादाचा नक्की अर्थ कळला नाही.
23 Jan 2012 - 5:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त!! आवडली.
24 Jan 2012 - 12:00 am | गणेशा
पुन्हा अप्रतिम