गजरा
मला ती आवडायची आणि तिला गजरा ....
वेड लावायचा तिचा तो गजरा ....
उगीचच सगळे रुसवे फुगवे ,
गुंतलेले भाव ते सारे हळवे हळवे ,
वेड लावणारी ओढ ती खरी
,,,आणि ..आणि खरा तो गजरा...
फिरायला गेलो होतो बर्फामध्ये
मखमली बर्फ आणि उन वरती कोवळे
तिचे रूपच गोरे, माझे जरा सावळे
रंग मात्र वेगळाच घेऊन यायचा
तिचा तो गजरा ....
इतकी छान मोगऱ्याची फुले
शुभ्र तो रंग अजूनच खुले ,
अबोलीचा पण तसाच तोरा
फुलांच्या संगतीने माळलेला दोरा
असा तो असा तो ,,,,गजरा
मला ती आवडायची आणि तिला गजरा ....
प्रतिक्रिया
31 Oct 2011 - 5:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त जमलीये...
पण अजून काहीतरी हवे आहे त्यात...
31 Oct 2011 - 10:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तयं राव कविता. पण अजून काही पाहिजे होते असेच वाटते.
-दिलीप बिरुटे
31 Oct 2011 - 9:48 pm | प्रकाश१११
खूप छान -
फिरायला गेलो होतो बर्फामध्ये
मखमली बर्फ आणि उन वरती कोवळे
तिचे रूपच गोरे, माझे जरा सावळे
रंग मात्र वेगळाच घेऊन यायचा
तिचा तो गजरा ....
पु.क.शु.
1 Nov 2011 - 9:32 am | फिझा
गजरा एक एक फुलाने बनतो!! कितिहि फुले माळलि तरि अपुरा च असतो ....!!! पण हा गजरा मि करेल पुर्ण. !! धन्यवाद !!