गजरा (३)
एकाच धाग्याने बांधलेली फुले....
काही लहान काही मोठी
काही सुगंधी काही अबोल....
काही खुललेली काही हिरमुसलेली....
आयुष्यही असेच... या फुलांनी भरलेले .....
असा तो ....गजरा .....
भारलेले आयुष्य मोहून टाकायचा
सुख दुख्ख ...एक एक क्षणाची आठवण
आणि अशा आठवांनी भरलेले
शुभ्र निखळ निर्मल हसू फुलवायचा....
असा...तिचा तो ...गजरा ......
आता फुले स्वतंत्र होऊ पाहतात ....
नवी ओळख नवी दिशा नवी झेप ....
तिची तगमग ....सगळ्यांसाठीच ....
पण खात्री आहे ....
दोरा आहे तसाच आणि गाठीही घट्ट
गुंफायची फुले फक्त नवीन.....
मला ....
मला ती आवडायची आणि तिला गजरा.......
प्रतिक्रिया
3 Nov 2011 - 10:29 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त!! खुप आवडली...
आता गजर्याचा सुगंध दरवळायला लागला आहे.