गजरा (2)

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
1 Nov 2011 - 12:22 pm

गजरा (2)

मला ती आवडायची आणि तिला गजरा ....

कधी कधी उगीचच रूसायचा हा
पाकळी बंद कळीला छळायचा हा
उमलणारी कळी असो वा असो तिचीच बहिण
सगळ्यांना च भुरळ घालायचा हा ....

...असा तो असा तो ...गजरा ......

एक एक फुलागाणिक प्रेम वाढत जायचे
सुगंध दरवळायचा आणि वीण घट्ट व्हायची
फुलाच्या संगतीने दोराहि माळला जायचा
वाऱ्याच्या झोक्यातही फुलांना धरून ठेवायचा .....

...असा तो तिचा ...गजरा ........

ती एक एक फुल गुंफायची
अगदी अलगद प्रेमाने ...
गाठ मात्र घट्ट घट्ट बांधायची
अगदी नेटाने .....
आमचे आयुष्यही असेच बांधले होते तिने ....
अलगद प्रेमाने आणि घट्ट धाग्याने ........

मला ........
मला ती आवडायची आणि तिला गजरा ......

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Nov 2011 - 12:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कधी कधी उगीचच रूसायचा हा
पाकळी बंद कळीला छळायचा हा
उमलणारी कळी असो वा असो तिचीच बहिण
सगळ्यांना च भुरळ घालायचा हा ....

निव्वळ अप्रतिम!!