कल्पना सरोज --रोपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा.

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in जनातलं, मनातलं
5 Feb 2011 - 10:10 pm

कमानी ट्यूब ची मालकीण कल्पना सरोज रुपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा.

मुंबई जवळच्या औद्योगीक आजाराने जर्जर (एकूण ₨ १६० कोटी कर्ज) झालेली बि आय एफ़ आर लिस्टेट कंपनी त्याब्यात घेणारी सरोज एक दलित समाजात जन्माला आलेली अत्यत खडतर प्रवास करत आलेली एक धडाडीची इन्ट्र्प्रुनर
--तीन हजार कोटी रूपयाची मालकीण असलेल्या कल्पनाची कहाणी चित्तथरारक आहे.
सुमारे ४८ वर्षांचे वय असलेल्या कल्पना ताईंचा एक मुलगा पायलट आहे आणि मुलगी उच्च शिक्षण घेत असलेली आहे.
एका झटक्यात कामगारांचे ७५ कोटींचे देणे देऊन टाकणार्‍या कल्पनाताई.
मुंबई च्या बेलार्ड इस्टेट सारख्या पॉश ठिकाणी दोन मोठ्या बिल्डींग मालकीच्या आहेतच शिवाय अनेक कंपन्या मालकीच्या आहेत.
अशा ह्या महीलेची आता एक विमान कंपनी काढायचा मानस आहे. कारण त्यांचा मुलगा पायलट आहे!
आपण भारतीय आहोत आणि महाराष्ट्रीय आहोत याचा खूप अभिमान वाटतो.
कल्पनाताईंना सलाम!
लिन्क्स
http://pustkalya.com/detail_success.php?sno=10
http://www.indianstudentsnetwork.com/ISNforums/showthread.php?p=1509

गुंतवणूकसमाजजीवनमानतंत्रअर्थकारणशिक्षणप्रकटनमाध्यमवेधमाहिती

प्रतिक्रिया

कौतुकास्पद कामगिरी. खेड्या पाड्या तुन असे हिरे जर वर आले तर भारत एक दिवस वेगळा दिसेल.
फक्त ४८ व्या वर्षि हि कामगिरी करणं म्हणजे खरच अजब आहे.

लेखा बद्दल अभिनंदन !
( फोटो नीट दिसत नाहिये , मोठा करुन लावता आला तर बघा)

शिल्पा ब's picture

6 Feb 2011 - 12:06 am | शिल्पा ब

छान. माहीतीबद्द्ल धन्यवाद.

मराठि आन्त्रप्रोनर साठि एक विशेष विभाग काढला तर मराठी माणसाचा खुप फायदा होईल. इमेल फोन वैगरे नमुद केले तर उत्तम.
ज्याना पाहिजे असेल त्याना अशा हिरया सारख्या आन्त्रोप्रोनर्स शी जवळुन संपर्क साधता येइल. जी हवी ती देवाण घेवाण करता येइल व अधिक प्रगती हि होउ शकेल असे वाटते.

ही अशी कामगिरी करणारी एक दलित महिला कुठे... आणि.. असो..!

बाकी.. जातियवादावरून वादळे पेटवणार्‍यांनी या स्त्रीकडून १% जरी अक्कल उसनी घेतली तरी महाराष्ट्राचे.. पर्यायाने मराठी माणसाचे जीवन फर सुखकर होईल.

हॅट्स ऑफ टू कल्पना ताई..!!

अगदि छान..
प्राजु ताईं नी जातिय वादि मिपाकरांना छान दम भरलाय.

कोणी म्हणेल अमेरीकन कॅपिटलिझम / कॉर्पोरेट मेन्टालिटि मुळे हे शक्य झाले. तर कोणी म्हणेल सरकारी प्रोत्साहना मुळे हे शक्य झाले. तर कोणी म्हणेल इथे जाती, धर्म, प्रांत वैगरे चा काहि संबध नाहि. हि स्त्री स्व कष्टा ने हे सर्व करु शकली. जर एखादि सामान्य स्त्री असती तर घरी बसुन स्वयंपाक घर, नवरा आणि मुल ,सिरियल्स बघत जमलं तर रडत-रडत एक दो कविता,गाणी ,पुस्तके लिहित बसली असती.
पण हि स्त्री तशी नाहि.
कसली हि कारणे न देता हि जगा शी झुंझत यशस्वी होत आहे आणि लोक हिच्या वर पुस्तके लिहित आहेत !

स्वाती२'s picture

6 Feb 2011 - 3:55 am | स्वाती२

लेखाबद्दल धन्यवाद!

दादा बापट's picture

6 Feb 2011 - 7:59 am | दादा बापट

लेख छान आहे. पण कल्पनाताईंचा दलीत म्हणून उल्लेख खटकला. त्या असतीलही दलित पण ते एक्षप्लिटली नमूद करण्याची काय गरज होती ते कळले नाही.
दगडांच्या देशाला अशा अनेक कल्पनाताईंची गरज आहे.

इन्द्र्राज पवार's picture

6 Feb 2011 - 10:38 am | इन्द्र्राज पवार

"...पण कल्पनाताईंचा दलीत म्हणून उल्लेख खटकला. ..."

+ सहमत. पण तरीही मला वाटते धागाकर्ते श्री.कापूसकोंड्या यानी निव्वळ कल्पनाताई दलित आहेत म्हणून या धाग्याचे प्रयोजन केले नसणार. राज्यातील सुदूर आणि मागासभागातील एक युवतीच्या [जिच्या वयाच्या १२ व्या वर्षापासूनच प्रापंचिक हालअपेष्टांना सुरुवात झालेली आहे....आणि जी केवळ ८ वी पर्यंतच पारंपारिक शिक्षण घेऊ शकली] 'मी हे करून दाखविन' अशा जिद्दीची लोकविलक्षण कहाणी, जी यशाने झळाळून गेली आहे. हेच सांगणे हे त्याना (श्री.कापूसकोंड्या याना) उचित वाटले असणार....पण अशा व्यक्तीची केवळ यशाची कहाणी सांगताना तिचा गतैतिहासही थोडाफार सांगितला तर वाचकाला मग ती दलित असली काय किंवा उच्चवर्णीय असली तरी फरक पडत नाही. मुळात 'यश' हा असा एक प्रसाद आहे, ज्याचे सेवन करायला सर्वांचेच हात पुढे आले पाहिजेत.....येतातच.

एका कर्तृत्ववान महिलेची सार्थ ओळख करून दिल्याबद्दल धागाकर्त्यांचे अभिनंदन.

वरील प्रतिसादातील प्राजुताईंचाही प्रतिसाद सुंदर आहे.

इन्द्रा

कापूसकोन्ड्या's picture

6 Feb 2011 - 8:42 pm | कापूसकोन्ड्या

खरं म्हणजे मी काही चार ओळी खरडल्या.
कलपनाताईंचे कर्तृत्व पाहून उर भरून येतो. अशा कथा वाचून आमच्या सारख्या सामान्य परिस्थितीतून थोड्या थोड्या प्रसंगातून गांगरून जाणार्‍या ना एक मनाची उभारी मिळावी अशी साधी अपेक्षा ठेवून हे लिखाण केले.

अ‍ॅट्रिब्युशन पहा. दलित, स्त्री,अडाणी,विधवा,खेडेगावात राहणारी,दोनकच्चेबच्चे सांभाळणारी यासर्वांचा उल्लेख होणे आवश्यकच होते.

दलित असा उल्लेख होणे आवश्यकच होते. असे माझे मत आहे. आपण कितीही बढाया मारल्या तरी जात सहजासहजी जात नाही.
इतिहासाचे राहू द्या पण आत्ता २०११ अकरा साली सुद्धा दलित असणे हे इतर तथाकथित पुढारलेल्या समाजातील स्त्रियांची तुलना केली तर वेगळी गोष्ट ठरते.

आणखी लिहायला हवे होते हे मान्य !

पंकज's picture

6 Feb 2011 - 3:17 pm | पंकज

तसेच कल्पनाताईंचा महिला म्हणून उल्लेख खटकला.

नरेशकुमार's picture

6 Feb 2011 - 11:09 am | नरेशकुमार

सरोज रुपरखेडा या हीर्‍याला सलाम.

असे अनेक हीरे या भुमिवर तयार होवो.

चिगो's picture

6 Feb 2011 - 11:21 am | चिगो

स ला म... जिद्द आणि चिकाटीने एक स्त्री काय करुन दाखवू शकते ह्याचं उत्तम उदाहरण...

"Since my son is not interested in managing my business, I may even launch a private airline for him," she laughed. <<

स्साला.. ह्याला म्हणतात जिगर !! ऑल द बेस्ट, कल्पनाताई...

धन्यवाद, काको..

उत्तुंग कर्तृत्वाला सलाम.. खरंच असे धवल यश मिळवायला जिगर लागते.. चिगोला अनुमोदन..

- पिंगू

स्वाती दिनेश's picture

6 Feb 2011 - 12:41 pm | स्वाती दिनेश

कर्तबगार महिला,
ही माहिती येथे दिल्याबद्दल आभार,
स्वाती

मुलूखावेगळी's picture

6 Feb 2011 - 1:39 pm | मुलूखावेगळी

कर्तबगार महिलेची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद

बाकि चिगो ला +१

निवेदिता-ताई's picture

6 Feb 2011 - 8:58 pm | निवेदिता-ताई

त्रिवार सलाम....

कापूसकोन्ड्या's picture

7 Feb 2011 - 9:20 pm | कापूसकोन्ड्या

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.

प्रकटन खुप अपुरे पडले असा एकं दरीत सर्वांचा सूर दिसला. आणि ते खरे ही आहे.माझा अभ्यास कमी पडला.

माझ्यासारखाच एक परदेशस्थ मराठी माणूस भेटला. सहज गप्पा मारताना त्याने ही माहीती दिली. वेळ काढून जे चार शब्द सुचले ते लिहीले.

सध्या मिपावर भ्रष्टाचार, जाती, सुरक्षेची चिंता असे गंभीर आणि निगेटीव्ह विषय हाताळले जात असताना एखादा आशा दाखवणारा धागा काढावा असे वाटले म्हणून हा खटाटोप.

सुचना लक्षात ठेवली आहे. आणि काही विषय डोक्यात आहेत. ते लिहीताना अधिक सविस्तर आणि समर्पक आणि गृहपाठ करून लिहीण्याचा प्रयत्न करीन.

प्रतिसादा बद्दल सर्वांचे परत एकदा आभार.