नवीन प्रकल्पावर रुजू झाले आहे. आत्तापर्यंत थोडेच सहकारी मिळाले आहेत.
पैकी एक बराच संबंध येणारा सहकारी - त्याला आल्याआल्या ओळख झाल्यानंतर पहीला प्रश्न विचारल्याशिवाय रहावलं नाही - "फॅमिली इथे आहे का?" बर्याच जणांना नसत्या चौकशा लागतात तेही लगेच.
नंतर २ दिवसात क्युबमधे येऊन विचारलं " तू काम सुरू केलंस का? तुला काही काम दिलय का?" मी म्हटलं "नाही फक्त फन्क्शनॅलिटीच शिकतेय." जरी मला काम दिलं असलं तरी मी कशाला माझे पत्ते उघडे करू हा काय माझा बॉस आहे का अपडेट्स मागायला? नोझी पीपल.
परवा माझ्या क्युबिकलमधून खुर्ची मागुन घेऊन गेला ती परत केलीच नाही. हे साधे एटीकेट्स नाही का? मी ती खुर्ची लांबून ओढत ओढत आणली होती की कोणी माझ्या क्युबमधे चर्चा करायला आलं तर त्या व्यक्तीला बसायला होईल म्हणून. एनीवे.
याउलट अनुभव. एक सुस्वभावी स्पॅनिश बाई पण ओळखीची झाली आहे. ती तिच्या कामात तरबेज आहे.मला खूप मदत करतेच वर नसत्या काय एकही चौकशी करत नाही. तिच्यात भरपूर नेतृत्व गुण आहेत, संवाद्कौशल्य आहे, प्रेझेंटेबल आहे मुख्य म्हणजे ऑर्गनाइज्ड आहे. बरय आम्ही एकाच गटात जरी भिन्न पातळीवर आहोत.
मला तरी ऑफीसमधे स्वतःच्या कामात रहाणारे, कामाशी काम ठेवणारे लोक खूप आवडतात. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. भले त्यांचं नेट्वर्कींग मार खात असेल पण नसते इश्यूज नसतात.
प्रतिक्रिया
30 Aug 2010 - 11:58 pm | शुचि
कृपया हाच लेख कलादालनात पडलाय तो संपादकांनी उडवावा. सॉरी अबाऊट दॅट.
30 Aug 2010 - 11:59 pm | चिंतामणी
हा विषय/लिखाण दोनदा टाकण्याचे प्रयोजन काय?
31 Aug 2010 - 12:02 am | शुचि
कलादालनात चुकून पडलय.
31 Aug 2010 - 1:27 am | स्वछंदी-पाखरु
तै, खर म्हणजे ना हे सगळ ऑफीस म्हणलं कि आलच समजा.....
कोण कस आहे हे पहा, उदा.
-->>पैकी एक बराच संबंध येणारा सहकारी - त्याला आल्याआल्या ओळख झाल्यानंतर पहीला प्रश्न विचारल्याशिवाय
रहावलं नाही - "फॅमिली इथे आहे का?" बर्याच जणांना नसत्या चौकशा लागतात तेही लगेच.
तो ह.खो. सहकारी चान्स मारायचा मूड मधे असुपण शकतो...... किंवा एखादा चांगला सहकर्मचारी म्हणुन तुम्हाला
मदत पण करु शकतो.....
-->>नंतर २ दिवसात क्युबमधे येऊन विचारलं " तू काम सुरू केलंस का? तुला काही काम दिलय का?" मी म्हटलं "नाही फक्त फन्क्शनॅलिटीच शिकतेय." जरी मला काम दिलं असलं तरी मी कशाला माझे पत्ते उघडे करू हा काय माझा बॉस आहे का अपडेट्स मागायला? नोझी पीपल.
तुमच्या आधी पासुन तिथे काम करतो ना तो असपण असु शकत कि त्याच्या ओळखीच्या अजुन कोणी प्रकल्प व्यथापकाची
मदत घेउन तो तुम्हाला काही चांगली मदत करेल?????
आपणहून का वाईट विचार करायचे???
-->>परवा माझ्या क्युबिकलमधून खुर्ची मागुन घेऊन गेला ती परत केलीच नाही. हे साधे एटीकेट्स नाही का? मी ती खुर्ची लांबून ओढत ओढत आणली होती की कोणी माझ्या क्युबमधे चर्चा करायला आलं तर त्या व्यक्तीला बसायला होईल म्हणून. एनीवे.
हॅ... कहीतरीच......
-->>याउलट अनुभव. एक सुस्वभावी स्पॅनिश बाई पण ओळखीची झाली आहे. ती तिच्या कामात तरबेज आहे.मला खूप मदत करतेच वर नसत्या काय एकही चौकशी करत नाही. तिच्यात भरपूर नेतृत्व गुण आहेत, संवाद्कौशल्य आहे, प्रेझेंटेबल आहे मुख्य म्हणजे ऑर्गनाइज्ड आहे. बरय आम्ही एकाच गटात जरी भिन्न पातळीवर आहोत.
ती तिच्या कामात तरबेज आहे हे तुम्हाला बघण्यासाठी खुप वेळ मिळतो अस दिसतय.... ती तुम्हाला खूप मदत करते म्हणजे ती चांगली का??? अस करुन तीने तुमच्यातल्या उणीवांचा गैरफायदा घेतला तर????
-->>मला तरी ऑफीसमधे स्वतःच्या कामात रहाणारे, कामाशी काम ठेवणारे लोक खूप आवडतात. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. भले त्यांचं नेट्वर्कींग मार खात असेल पण नसते इश्यूज नसतात.
एक सांगतो (वाईट वाटुनघेउ नका) तुमच्या मधे Team spirit नाही दिसत.... तुम्ही ह्या सगळ्या लोकांमधे odd नका राहु. मिळून मिसळुन रहा. मस्त पुर्ण Team तुमची स्वत:ची आहे अस रहा आणि मग बघा सगळे तुमच्यासाठी सुरळीत होईल..... खेळी-मेळीचे वातावरण जर असेल तर कामाचा ताण पण होत नाही........
31 Aug 2010 - 1:51 am | शुचि
नाही नाही चान्स मारायच्या बद्दल वगैरे नाही म्हणायचं मला. मी मोठी त्रैलोक्यसुंदरी नाहीये. पण "फॅमिली" दूर असली की असा प्रश्न बोचतो, नको वाटतो.
टीम स्पिरीट म्हणाल तर असेल बुवा कमी. पण अनुभव हाच आणी त्रिवार हाच की लोक फायदा घेतात आणी मदतीच्या वेळी हात झटकतात, स्वतःचे गट बनवतात. शेवटी आधीच्या अनुभवांवरून माणूस काही आडाखे बांधत असतो.
ऑड रहायचं म्हणाल ते पटतय. प्रयत्न करेन. पण स्वतःवर बळजबरी नक्कीच करणार नाही. इटस अ सिंबायॉटीक रिलेशन्शिप. शेवटी नातं कोणतंही आपोआप फुलतं ते स्वतःचं वळण घेऊन आलेलं असतं- अगदी कलीग्समधलं सुद्धा.
तो पहीला कलीग नवखा आहे, व्यवस्थापक किंवा रुळलेला नाही. मी जेव्हा संवाद सुरू करते तेव्हा अपली माहीती देते मग दुसर्याची विचारते, त्यामुळे मी तिच अपेक्षा करत असेन. पण कामाच्या बाबतीत मी कधीच कुणाला तू काय करतोस्/तेस विचारत नाही. मला आवडत नाही. विचारायलाही आणि विचारलेलंही (बॉसखेरीज अन्य कुणी).
ती बाई मला साधारण सध्या मेंटर आहे त्यामुळे मला तिची कामातील निपुणता लक्षात येतेय.
31 Aug 2010 - 3:56 am | मिसळभोक्ता
ह्याला स्टॉकहोम सिंड्रोम अशी संज्ञा आहे.
31 Aug 2010 - 4:13 am | शुचि
नीटसं कळलं नाहीये पण समथिंग टेल्स मी आय डोंट वॉन्ट टू नो अबाऊट इट.
31 Aug 2010 - 5:30 am | मुक्तसुनीत
स्टॉ. सिं. बद्दल: http://en.wikipedia.org/wiki/Stockholm_syndrome
हा न्याय या पोस्ट ला लागू कसा होतो हे समजलेले नाही.
31 Aug 2010 - 5:34 am | मिसळभोक्ता
ती बाई मला साधारण सध्या मेंटर आहे त्यामुळे मला तिची कामातील निपुणता लक्षात येतेय.
ह्या वाक्यावरून ....
31 Aug 2010 - 10:14 am | विजुभाऊ
ओ स्टॉक होमसिन्ड्रोम वेगळा असतो.
ती बाइ तिची मेन्टॉर आहे किडनॅपर अतीरेकी नव्हे.
31 Aug 2010 - 7:02 pm | विनायक प्रभू
मेंटॉर हा एक किडनॅपर होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
31 Aug 2010 - 8:07 pm | पुष्करिणी
किडनॅपरच मेंटर आहे असच वाटायला लागलं असेल तर बरोबर आहे..:)
1 Sep 2010 - 12:13 am | मिसळभोक्ता
१००/१०० गुण ! तुम्ही बोर्डात आल्या होतात का ?
1 Sep 2010 - 2:31 am | पुष्करिणी
अय्या, तुम्ही कसं ओळखलं? कसले हुशार आहात...तुम्हीपण बोर्डात आला होता की काय ? :)
1 Sep 2010 - 2:59 am | मिसळभोक्ता
आम्ही बोर्डात नाही, पण बोर्डावर बरेचदा आलो होतो.
2 Sep 2010 - 11:20 am | परिकथेतील राजकुमार
हा हुच्च होता. सकाळी सकाळी मिपा उघडल्याचे सार्थक झाले.
2 Sep 2010 - 12:44 pm | पुष्करिणी
:)
31 Aug 2010 - 10:16 am | विजुभाऊ
परवा माझ्या क्युबिकलमधून खुर्ची मागुन घेऊन गेला ती परत केलीच नाही. हे साधे एटीकेट्स नाही का? मी ती खुर्ची लांबून ओढत ओढत आणली होती की कोणी माझ्या क्युबमधे चर्चा करायला आलं तर त्या व्यक्तीला बसायला होईल म्हणून. एनीवे.
ती खुर्ची सुद्धा तुम्ही कोणाच्या तरी क्यूबिकल मधून आणली होती ना
31 Aug 2010 - 3:09 pm | शुचि
नाही मीटींग रूम मधे बाहेर कॉरीडॉर मधे ३ खुर्च्या पडीक होत्या त्यातली उचलली. खरच. :)
31 Aug 2010 - 10:51 am | वेताळ
परदेशी लोकच भारतिय लोकांपेक्षा मनमिळाऊ व सुस्वभावी कामतत्पर असतात.
बाकी तुमच्या बद्दल इतर लोकांचे देखिल विचार वाचायला आवडातील.
31 Aug 2010 - 2:28 pm | Pain
नक्की ऑफिसमधे आहात का शाळेत ? नशिब बॉसला त्याचा नाव सांगायला नाही गेलात.
खुर्चीच वजन ते किती आणि ती; जाउदे.
तुम्ही मागेही असाच एक लेख लिहिला होता फुटकळ कागाळ्या करणारा.
31 Aug 2010 - 2:29 pm | स्वछंदी-पाखरु
सहमत.....
31 Aug 2010 - 2:38 pm | मेघवेडा
कदाचित तुमचा हा प्रतिसाद येणार हे त्यांस ठाऊक असावे. लेखाचे शीर्षक अगदी विचारपूर्वक दिले आहे! ;)
1 Sep 2010 - 1:58 am | शिल्पा ब
ते झालं..
पण तुम्ही तर काहीच लिहित नाहीत अन दुसर्या कोणी लिहायचा प्रयत्न केला कि मग टम टम टम तुमचं सुरु..
2 Sep 2010 - 5:33 am | Pain
ते झालं..
पण तुम्ही तर काहीच लिहित नाहीत अन दुसर्या कोणी लिहायचा प्रयत्न केला कि मग टम टम टम तुमचं सुरु..
१) मी लेखक नसून वाचक आहे.
२) मी जे काही वाचतो त्यावर कधी प्रतिक्रिया देतो, कधी नवीन माहिती देतो तर कधी शंका विचारतो. त्यासाठीच प्रतिसादाची सुविधा देण्यात आलेली आहे.
या लेखिका आणि अनेक बनावट आयडी लेखनाच्या सुविधेचा गैरफायदा घेउन मिपा आपल्या उपद्व्यापांनी भरून टाकतात. चांगले लेखन वाचण्यापेक्षा शोधण्यातच जास्त वेळ जातो आणि नियमात बसत असल्याने संपादक ते उडवत नाहीत.
तुम्हीही आल्या आल्या "खातो तसे बनतो" नामक भंपक धागा टाकला होता. पण त्यानंतर पुन्हा तसे केले नाहीत.
या लोकांना कोण आवरणार?
2 Sep 2010 - 9:45 am | शिल्पा ब
त्या धाग्यात भंपक असे नेमके काय होते? माझ्या माहितीनुसार कोणीतरी श्लोकसुद्धा दिले होते कि काय खावं आणि काय टाळावं याबद्दल...निकृष्ट खाणारा माणूस तसेच विचार करतो असेच म्हणणे आहे...आणि नंतर अडाणी यांनी अजून चांगला लेख लिहिला होता याच विषयावर...नव्हे त्या धाग्याच काश्मीर झाल्यावर..
आधी माहिती घ्यायची नाही अन मग नंतर मुलांना काय खायला देऊ, काय योग्य आहे अमुक तमुक सुरु होते..
31 Aug 2010 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार
मराठी संस्थळावरील दखल घेण्याजोग्या काही लेखांमधील एक लेख आहे हा.
डोळ्यात फक्त पाणी यायचं बाकी राह्यलय.
सुंदर!!
शुचि फॉर्मात! मस्त शुचि मस्त. खूप आनंद दिलात या लेखानी.
31 Aug 2010 - 6:50 pm | विजुभाऊ
अरे बाबा यू नो. हल्ली त्याना मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला फारच डिफीकल्ट जातं
तुला टीज करायला काय जातय. नस्ते एखाद्याला लँग्वेजवर तेवढी मास्टरी म्हणून इतके सरकॅस्टीकली टॉन्ट मारायला नको. आपण मराठी फोक्स लेन्ग्वेबद्दल इतके चुझी रहातो म्हणून आपण इतर वर्डच्या मानाने ब्याकवर्ड रहातो
31 Aug 2010 - 6:56 pm | राजेश घासकडवी
टारझनच्या काही लेखांची आठवण आली. त्यावेळीदेखील अंडरलाईन करकरून पराची पेन्सिल झिजायची, आणि डोळ्याला पाणी यायचं बाकी असायचं ;)
31 Aug 2010 - 2:46 pm | सुहास..
मला तरी ऑफीसमधे स्वतःच्या कामात रहाणारे, कामाशी काम ठेवणारे लोक खूप आवडतात. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. >>
एक नंबर !! आमच्या ऑफिसातल्या खडुस वागण्याची कोणीतरी तारीफ केल्याने अंमळ खुश झालो आहोत.
31 Aug 2010 - 8:11 pm | पुष्करिणी
सगळीकडेच असतात हो असे लोक शुचीतै, फार मनाला लावून घेउ नका. खूप लोकांना बिइंग फ्रेण्ड्स आणि बिइंग फ्रेंडली यातला फरक नाही कळत....
2 Sep 2010 - 10:28 am | विसोबा खेचर
छोटेखानी प्रकटन छान..
2 Sep 2010 - 10:31 am | वेताळ
प्रतिसादा बद्दल कि लेखाबद्दल?
2 Sep 2010 - 10:36 am | विसोबा खेचर
शुचिच्या मूळ लेखाबद्दल..
का बरं?
तात्या.
2 Sep 2010 - 10:31 am | मदनबाण
शुचे तुझे धागे मी नेहमी वाचतो...लिहत रहा.
2 Sep 2010 - 4:25 pm | इंटरनेटस्नेही
मस्तच लेखन.. अस अनुभव आजकाल अनेकदा येतो लोकांकडुन. कदाचित busy life style मुळे असेल!