नशीब भाग - ६३ गोष्ट साधी ह्या शरीराची

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in जनातलं, मनातलं
6 Aug 2010 - 9:01 am

गोष्ट साधी ह्या शरीराची - - - - -

सुबोध भावे, राहुल देशपांडे यांचे कट्य़ार नाटक बघून मी रात्री नवाच्या सुमारास दुचाकीने घरी परत येत होतो. पाऊस फार नव्हता पण सगळीकडे छान निसरडे झाले होते. मी ओला झालोच होतो. कोरेगाव पार्क भागातून एका गाडीच्या मागून जात असताना दोन छान कमरतोड खड्डे वाचवू शकलो नाही. रात्री फारसे जाणवले नाही पण पहाटे पाय हालवताना १०० सुया कंबरेत टोचल्याच्या वेदना सुरू झाल्या. दोन आठवडे हालचाल करणे फार त्रासाचे झाले. त्या गोंधळात दूरसंचावरील "१० वीतले चांगले पाच", "जेम्स लेन पुस्तक", "अफजल गुरु फाशी" बातम्या व कार्यक्रमांनी चिडचिड जास्त वाढली त्याचीच ही गोष्ट साधी आहे. गोष्ट साधीच आहे पण .. ... साध्या गोष्टीला महत्त्व नसते. म्हणून नसत्या गोष्टींना महत्त्व देणे हा एक मान्यता पावलेला खेळ झालेला आहे. त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे अंधारात ढकलता येतात. ह्याचे नमुने शोधण्याची मर्यादा तुमची संवेदनक्षमता आहे. काही नमुने हे असे आहेत.

माझे शरीर गोष्ट साधी आहे. ह्या शरीरातील प्रत्येक घटकाचे काम, क्षमता, मर्यादा वेगळ्या आहेत पण प्रत्येक घटकाचे महत्त्व सारखेच आहे. एका कोणत्याही घटकाच्या कामात अडथळा आला तर त्याचे परिणाम ह्या एकसंध शरीराला त्रासाचे असतात. ह्याची जाणीव झाल्यावर मी शरीराची काळजी घेण्याला जास्त महत्त्व देतो. त्याचे चोचले पुरवणे परवडण्या सारखे असल्यास ते पण करतो. पण ह्या शरीराला एकसंध ठेवण्याला जास्त महत्त्व देतो. तुम्ही पण हेच करत असणार हो ना?????

माझ्या शरीराची जबाबदारी मीच सांभाळतो. निदान तसा प्रयत्न असतो. ते शक्य नसेल तेव्हा जाणकारांची, तज्ञांची मदत घेतो. ते जाणकार, तज्ञ जर माणुसकीला, मनुष्य धर्माला मानणारे असतील तर मला योग्य मदत करतात नाहीतर माझे लचके तोडतात. गोष्ट साधीच आहे. पण आहे खरी!

समाज हे पण एक शरीरच आहे. मला तरी ही गोष्ट साधी वाटते. तर मग माझ्या शरीराला जे नियम, मर्यादा, सुख/दुःख: वगैरे महत्त्वाचे आहे तेच ह्या समाज रुपी शरीराला पण असणार ही पण गोष्ट साधीच आहे. पण साध्या सरळ गोष्टींना महत्त्व कमीच असते. म्हणूच साध्या गोष्टीत घोळ घालून स्वकेंद्रित घोळकर मंडळी स्वत:चे महत्त्व वाढवण्याचे मार्ग उकरण्यात मग्न असतात. एकदा का महत्त्व मिळाले की लुटालूट सुरू. माझे असे ठाम मत होण्याचे कारण म्हणजे. बेस्ट ऑफ फाईव्ह्चा घोळ, लेनच्या पुस्तकाचा घोळ, कॉमन वेल्थ खेळांचे घोळ, शाळेत नाव घालण्यात घोळ तर शाळेतून नाव काढण्यात पण घोळ. यादी फार मोठी न संपणारी आहे.

हे शरीर त्या अंधारत घडत असताना प्रत्येक अवयवाची जागा सुनिश्चित झाली होती. बाहेर ह्या जगात येताच प्रत्येक अवयवांचे संगोपन जेवढे आवश्यक होते ते वेळोवेळी पालकांनी केले. त्या संगोपनाचा क्रम व नियमांची सवय ह्या शरीराला झाली. ती सवय कशी कायम ठेवावी ह्याची शिकवण पालकांनी त्यांच्या कुवती नुसार दिली. गोष्ट साधी आहे त्यात वावगे काय????? तर मग हेच क्रम, नियम समाज रुपी शरीराचे का नसावे???? हा समाज देखील शरीरा सारखाच आहे म्हणून प्रश्न पण तितकाच साधा आहे.

पण उत्तर साधे असणे घोळकर मंडळी घडू देणार नाहीत. अहो त्यांना अस्तित्व टिकवायचे आहे. म्हणूनच घोळकरांच्या शिक्षणाच्या कारखान्यातून शिकवलेलेच मान्यता मिळवतात. कारण फक्त त्यांनीच विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, मानवी हक्क, अर्थ शास्त्र वगैरे घोळ घालणारे विषय दिवस रात्र एक करून पाठ केलेले असतात. गोष्ट कित्ती कित्ती साधी आहे.....आता तर काय  आठवी पर्यंत परीक्षाच नको. असेच चालत राहील्यास पुढे एटिएम च्या मशीन मधून प्रमाण पत्रे मिळण्याची सोय करण्यात येईल.

शिक्षण आणि ज्ञानाची गोष्ट तर अगदी साधी आहे. घोळकरांचे अस्तित्व, सुखसोयी व गरजा ज्याने साध्य होते ते शिक्षण, त्याचा उगम, अंत व मालकी हक्क सांगता येतो, मोजता येतो. फार साधे सोपे आहे हो हे. पण ज्ञानाला ना उगम ना अंत ना मर्यादा ना मालक ना मोजमाप, छे म्हणूनच घोळकरांना मान्य नाही. गोष्ट बघा ही साधी सोपी आहे.   

गोष्ट अगदी साधी आहे अहो शरीरातील प्रत्येक अवयव जन्मा पासून मरे पर्यंत जागा बदलत नाही. तसेच ह्या अवयवांची जागा बदलावी असे कोणाला कधी वाटले नाही व कोणी तसे करण्याचा प्रयत्न केला नाही. मग समाज रुपी शरीरात हेच घडले तर त्यात चूक काय? पण अशी साधी गोष्ट घोळकरांना मान्य नाही.

काय? हा घोळकर कोण? अहो हे कोणाचे नाव नाही. सरळ साध्या नियमित चालणार्‍या गोष्टींचा ह्या घोळकराला तिटकारा असतो, त्यात घोळ घालणे हा त्याचा जन्मसिध्द हक्क असल्या सारखाच तो समाजात मिरवत असतो आणि घोळ घातल्याने त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्याचे मानतो. अहो ह्या घोळकरांची सर्व पातळीवर संमेलने होतात त्यातून घोळ घालण्याच्या तंत्रांची देवाणघेवाण होते. एवढेच नाही तर जागतिक मान्यता व घोळ तंत्राच्या विकासा करता अशा घोळकरांना भली मोठी रक्कम पण मिळते. पण एक गोष्ट साधीच आहे हे घोळकर समाजाला नक्कीच घातक आहेत. शरीरात असल्या घोळकरांना निरनिराळ्या अवयवां द्वारे बाहेर फेकण्याची सोय आहे, मग समाज रुपी शरीरात असली सोय का नाही?????? प्रश्न पण तितकाच साधा आहे.

गोष्ट साधी ह्या शरीराच्या अवयवांची

शरीरातील प्रत्येक अवयवाची गोष्ट पण साधीच आहे. पाय व मेंदूची किंवा इतर अवयवांची जागा बदलू नये म्हणून समज येईस्तोवर पालक त्याची काळजी घेतात पुढे वयाने मोठे झाल्यावर मेंदू योग्य जागी असल्यास मी पायांचा उपयोग सांभाळूनच करतो. विशेष असे की पाय पण मला योग्य जागीच नेतात. पण तरीही माझे पाय भरकटावे, चुका घडाव्या असे सगळे मार्ग घोळकरांनी नेहमीच सज्ज ठेवलेले असतात.

पायाची गोष्ट साधीच आहे. ह्या शरीराला उभे राहण्यास, जागोजागी भटकण्यास, तर धावण्याच्या शर्यतीत चक्क पदके मिळवून देण्याची फार महत्त्वाची कामगिरी करतात. हे घडण्या करता मात्र मनाची तयारी करावी लागते तेव्हाच डोक्याचे पायावरचे नियंत्रणाचे काम खरे ठरते. म्हणून घोळकर मंडळी ह्या मनात घोळ माजवण्याचे सगळे मार्ग शोधत असतात.

मेंदूला सुरक्षित ठेवणार्‍या डोक्याची गोष्ट तशीच साधी आहे. मेंदूवर कोणताही दबाव नसावा म्हणून शरीरातील सगळ्यात वरच्या भागात, कडक कवचात लपलेला असतो. इथेच स्मृतीसंच (मेमरी), सूक्ष्म प्रक्रियक (मायक्रो प्रोसेसर) असतो. मन हे आधारभूत प्रवेशी-निवेशी प्रणाली (BIOS) आहे मात्र हृदयाच्या जवळ असते. मन हे राम रंगी रमू शकते तसेच एखाद्याला जीवे मारण्याचे ठरवू शकते. म्हणून मन हे प्रोग्रॅमेबल बायॉस आहे. शरीराची घडण होत असताना मनाचा मूळ दर्जा ठरवला जातो - कठोर, लवचीक, मायाळू, चंद्राच्या कलेशी संबंधीत ल्युनॅटीक वगैरे. शरीराचा हा संगणक समजणे पण सोपेच आहे.

आपल्या शरीराचा समतोल व अपघाता पासून सुरक्षितता राखण्या करता डोळ्यांचा योग्य वापर करण्याचे काम मेंदूचा एक भाग सतत करत असतो. हे किती साधे आहे मग समाजरूपी शरीरातील मेंदूचे काम पाहणारी मंडळी सतत चौफेर नजर फिरवून ह्या समाजाला सहज सुरक्षित ठेवू शकणार्‍या डोळसांचा योग्य उपयोग करतील अशी अपेक्षा करणे तितकीच साधी गोष्ट आहे. पण . . .असे घडल्यास घोळकरांचे अस्तित्वच धोक्यात येईल. म्हणून ही मंडळी मेंदूचे काम पाहणार्‍या मंडळींच्या मेंदूतच घोळ घालतात. हे समजणे तितकेच सोपे आहे. कारगिल युध्द काय, २६/११ चा हल्ला काय. ही पण यादी भली मोठी आहे.

ह्या माझ्या पोटाची गोष्ट तितकीच साधी आहे. पोटाने पचवलेल्या आहारानेच बाकीचे अवयव मर्यादा सांभाळत दिवसरात्र संबंधीत कामात मग्न असतात. म्हणून घोळकर ह्या पोटात जाणार्‍या आहाराचा दर्जा व समतोल बिघडवण्याचे नवीन मार्ग वापरतात. लहान अर्भकाला व त्याच्या आईला आवश्यक असणारे आहार - औषधे ह्यातील रोज नवीन समजणारे घोळ पुढे येणार्‍या पिढीला घोळात सामील करण्यात यशस्वी होत आहेत. भेसळीच्या गुन्हेगाराला पकडून गुन्हा सिध्द झाल्यास १००० रुपये दंड सात वर्ष तुरुंगवास (कोणता तुरुंग हे विचारायचे नाही).

जनन क्रियेची व त्या संबंधीत अवयवांची स्वच्छता व शुद्धता गोष्ट मात्र साधी नाही. आम्हा प्रत्येकाला त्याचे महत्त्व विविध प्रसंगी फार चांगले कळते. ते महत्त्व कमी करण्या करता घोळकरांनी स्वैराचार, समलैंगिकता, लिव्ह इन रिलेशन, सगोत्र विवाह, अंतर जातीय विवाह अशा कायद्यांना प्रोत्साहन व मान्यता मिळवण्यात यश मिळवले आहे. ह्याचा परिणाम म्हणजे ह्या समाज रुपी शरीराचा समतोल राखणे हे अनैसर्गिक ठरणार आहे. असे झाले म्हणजे घोळकरांचे ह्या समाजावर ताबा ठेवणे व लुटण्याचे काम सोपे होणार. ही तर गोष्ट अगदीच साधी आहे.

तुम्हाला गोष्ट साधी वाटणार नाही पण हे खरं आहे. मी हे असे लिहिल्या बद्दल माझाच तोल बिघडला असून मी हे असे लिहिणे हा माझा दोष मानणारे घोळकर भरपूर तोंडसुख घेणार आहेत. इतकी ही गोष्ट सा....धी आहे.
विनायक उवाच http://vkthink.blogspot.com - -
प्रतिमा उरी धरोनी http://vk6foto.blogspot.com - -
उपकरणे http://skillsvap2.blogspot.com/ - -
http://cepforarchitects.blogspot.com/ - -
माझी आवड - http://golikitch.blogspot.com/ - -

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

समाज रुपी शरीराचा समतोल राखणे हे अनैसर्गिक ठरणार आहे. असे झाले म्हणजे घोळकरांचे ह्या समाजावर ताबा ठेवणे व लुटण्याचे काम सोपे होणार.
सहमत...

मीनल's picture

6 Aug 2010 - 6:54 pm | मीनल

एका कोणत्याही घटकाच्या कामात अडथळा आला तर त्याचे परिणाम ह्या एकसंध शरीराला त्रासाचे असतात.

ह्यावर उपाय म्हणजे बाह्य औषधोपचार हा आहेच. पण आताच Osteopathy या विषयावरचे पुस्तक वाचण्यात आले.
नेट वर खालील माहिती ही कळली.
Osteopathy is a form of drug-free non-invasive manual medicine that focuses on total body health by treating and strengthening the musculoskeletal framework, which includes the joints, muscles and spine. Its aim is to positively affect the body's nervous, circulatory and lymphatic systems.

This therapy is a unique holistic (whole body) approach to health care. Osteopaths do not simply concentrate on treating the problem area, but use manual techniques to balance all the systems of the body, to provide overall good health and wellbeing.

अमेरिकेत फारशी प्रसिध्दी ऐकली नाही. तरी लायसस्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत.

आपले शरीर, विचार, समाज यातील समतोल साधणे आवडले.
यामध्ये व्यत्यय आणून त्यातून फायदा घेणार्‍यांचे घोळकर हे नाव आवडले.
लेखन चांगले झाले आहे. गोष्ट खरच साधी आहे पण आपणच ती गुंतागुंतीची करण्यास सुरुवात करतो आणि त्याचा फायदा दुसर्‍याला मिळतो.

विनायक रानडे's picture

7 Aug 2010 - 11:44 am | विनायक रानडे

(३५५ वाचनात / टिचक्या) प्रतिक्रिया देण्या इतपत माझे विचार तिघांना पटले हे वाचून थोडा दिलासा मिळाला.

लिखाळ's picture

7 Aug 2010 - 12:47 pm | लिखाळ

गोष्टी साध्या आहेत पण सांगण्याची तर्‍हा छान आहे.

....असे झाले म्हणजे घोळकरांचे ह्या समाजावर ताबा ठेवणे व लुटण्याचे काम सोपे होणार. ही तर गोष्ट अगदीच साधी आहे.

हे घोळकर नक्की कोण ते कळत नाही. म्हणजे समाजावर ठरावीक पद्धतीने ताबा मिळवण्याची मनिषा बाळगणार्‍या घोळकरांचा कंपू अथवा एक विचारगट आहे का? तसे नसेल तर समान प्रवृत्तीगट असे म्हणून आपण अनेकविध ईच्छा आकांक्षा असणार्‍यांना आणि भिन्न हेतू असणार्‍यांना आपण घोळकर या नावाच्या एकाच वर्गात घालत आहो का? तसे असेल तर अश्यांचा हेतू एक नाही मग ते एका गटात असे?
थोडक्यात कोणापासून सावध राहावे? ते कसे शोधावे?

विनायक रानडे's picture

11 Oct 2010 - 10:42 am | विनायक रानडे

कोणत्याही प्रसंगात काथ्याकूट करणे, घडवून आणणे, शक्य असल्यास दुफळी माजवणे, गट निर्माण करणे हे सगळे एका कुटूंबात देखील घडते हे मी अनुभवले आहे. घोळकरांचा कंपू घोळ घालण्याकरता ठरावीक उद्दीष्टाने तयार होतो, नंतर त्याला खतपाणी मिळते. ह्याचे उदाहरण म्हणजे दूरचित्रवाणी वरील चर्चा व घोळकरांचे अस्तित्व जाणवणारे मुद्दे.