संपादकांचे अभिनंदन

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
3 Aug 2010 - 2:47 pm

गेल्या दोन दिवसांपासुन मिपावर अनेक सुरेख चर्चा चालु आहेत.

अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत.
विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत. कधी कधी अवांतर प्रतिसाद पण येत आहेत. पण एक मात्र नक्की की विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे

अशा या धाग्यांमधले अवांतर प्रतिसाद, अनाठायी प्रतिसाद या नावाखाली प्रतिसाद उडवणे हे संपादकांनी केलेले नसल्याने धाग्याचा मजा लुटणे शक्य झाले आहे. अन्यथा तोंड दाबुन मुक्क्यांचा मार होते... मनापासुन हसता पण येत नाही. (जास्त बोलत नाही धागा उडायचा ;) )

याबद्दल संपादकांचे अभिनंदन आणि जाहीर आभार.

असेच वातावरण राहु द्या... एवढीच अपेक्षा ! अजुन काय मागणार !!

पुन्हा एकदा संपादकांचे अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!

हे ठिकाणधोरणमांडणीसंस्कृतीवावरप्रकटन

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

3 Aug 2010 - 2:50 pm | ऋषिकेश

माताय!
प्रत्येकाला आपल्या रेझ्युमेवर १००+ धागे हवेत.. :P

परिकथेतील राजकुमार's picture

3 Aug 2010 - 2:56 pm | परिकथेतील राजकुमार

तहाची प्रक्रिया सुरु झालेली दिसते.

असा धागा काढल्याबद्दल नानाचे देखील अभिनंदन.

ह्या धाग्यावर उर्मटपना न करणारा प्रतिसाद दिला म्हणुन 'रुशिकेश्' चे पण अभिनंदन.

शेखर's picture

3 Aug 2010 - 3:40 pm | शेखर

>> असा धागा काढल्याबद्दल नानाचे देखील अभिनंदन.

सहमत...

अर्धवट's picture

3 Aug 2010 - 3:44 pm | अर्धवट

नाना, तह आहे का.. मैत्रीकरार..

अवांतर - च्यायच्ची स्मायली कुठायत.

हा धागा सुरू झाल्या झाल्या मागच्या बेंचावरुन एक आवाज आला.."संपादकांचेच का अभिनंदन? माझे का नाही.. तुमच्या ईतकी नसेल पण माझ्याही लेखनाला कोलिती आहे"... कुणाचा बरे असेल हा आवाज..?

सविता's picture

3 Aug 2010 - 4:09 pm | सविता

मला मंगेश पावस्कर नामक सदस्य आल्यावर त्याचे लेखन.... त्यावर झालेली विडंबने.... वगैरे वगैरे दिवस आठवले.... जाम मजा यायची.....

तसेच परत वाटतेय्..सु.कु आणि प्रविन्भाप्कर हैदोस घालताहेत.... लोक त्यावर तावातावाने प्रतिसाद देताहेत.... बरेचसे लोक बाजूला झाडावर बसून डाएट कोक आणि पॉपकॉर्न खात मजा लुटताहेत....

वाह वाह.... कोक पिवानु...मज्जानि लाईफ..... अशी मजा करण्यासाठी तर माणूस मराठी संस्थळावर जातो.... सभ्य....तात्विक (चांगल्या मराठीत पुचाट!!)चर्चा कधी कधी ठिक आहेत... पण फक्त तेवढेच?

फार बोअर होऊ लागले होते अलीकडे मला मिसळ्पाव.... तर्री हरवल्यासारखे!! पण परत मजा यायला लागली आहे...

थेन्कु थेन्कु सु.कु आणि प्रविन्भाप्कर..मिभो..अवालिया........

-सविता.

श्रावण मोडक's picture

3 Aug 2010 - 5:47 pm | श्रावण मोडक

या अशा गोष्टी नानाच करू जाणे. अभिनंदन करून मोकळे. आता कुठंही संपादकांनी काही केलं तर आधी संपादकांनी डुलक्या घेतल्या असे म्हणायला झाले मोकळे आकाश... :)
हे असं का म्हणतोय त्याचा एक खुलासा -
मला एक आठवलं. महाराष्ट्रातल्या एका गावातील आमदारांच्या मुलीनं पळून जाऊन लग्न केलं. तो मुलगा आमदारांच्या विरोधकाच्या गटातील. लग्न नोंदणीकृत. त्यामुळं गोपनीयता टिकून राहिली. काही दिवसांनी दोघांचंही लग्नानिमित्त अभिनंदन करणारी जाहिरात एकदम स्थानिक पेपरांमध्ये. ती करणारे कोण हे काही सांगण्याची गरज नाही म्हणा. आमदारांनाही जाहिरातीतूनच पोरीनं काय केलं ते कळलं.

अवलिया's picture

3 Aug 2010 - 5:49 pm | अवलिया

__/\__

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Aug 2010 - 4:51 pm | बिपिन कार्यकर्ते

भो* नाना!!!

* = संस्कृत आहे ते.

ज्ञानेश...'s picture

3 Aug 2010 - 5:24 pm | ज्ञानेश...

णाणाचे अभिनंदन ! ;)

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 6:08 pm | आमोद शिंदे

अजून तरी इथल्या ग्रामस्थांनी तक्रार न केल्याने पोलिसांच्या आडकाठी शिवाय मिभो पार्ट्या जोरात चाललेल्या दिसतात. ग्रामस्थांचे व पोलिसांचे अभिनंदन!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2010 - 6:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हम्म, धाग्यातल्या आशयाची नोंद घेतली. :)

आपल्या चर्चाप्रस्तावातील काही शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने असे हवे होते,
दिवसापासून, विचार प्रबोधन , दाबून , मनापासून

आपल्या लेखनातील अशुद्ध शब्दाबद्दल माझे निरीक्षण असे आहे की आपण उकार देतांना र्‍हस्व शब्द लिहिण्यावर भर देता थोडी काळजी घेतली तर लिहितांना चुका होणार नाहीत. किंवा फायरफॉक्स न्याहाळक वापरत असाल तर त्याला हे Add-ons जोडावे शुद्ध शब्द लिहिण्यास मदत होईल.

स्वगत: हा नाना जातो कुठे माझ्या तावडीतून. :)

-दिलीप बिरुटे

आपल्या चर्चाप्रस्तावातील काही शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने असे हवे होते

नोंद घेतली आहे. स्वसंपादनाची सोय नसल्याने कृपया ते बदलुन द्यावे. (आपण संपादक असल्याने आपल्यालाच प्रत्यक्ष सांगत आहे, तरी अंमलबजावणी व्हावी)

आपल्या लेखनातील अशुद्ध शब्दाबद्दल माझे निरीक्षण असे आहे की आपण उकार देतांना र्‍हस्व शब्द लिहिण्यावर भर देता थोडी काळजी घेतली तर लिहितांना चुका होणार नाहीत.

इतरत्र समांतर विषयावर आपण प्रतिसाद दिला होता, त्याला मी उत्तर दिले होते. कदाचित आपण ते वाचले नसावे म्हणुन त्यातला काही अंश देत आहे. मुळ प्रतिसाद - http://misalpav.com/node/13543#comment-220134

मी मराठीचा प्राध्यापक नाही, होण्याची शक्यता नाही त्यामुळे मी लिहिलेले शुद्ध लेखन असेलच असे नाही. माझ्याकडून असली भलती अपेक्षा कुणीही करणार नाही. तुम्ही सुद्धा करु नका. सबब तुमचा मुद्दा गैरलागु, तरीही तुम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन, करेनच असे नाही.

किंवा फायरफॉक्स न्याहाळक वापरत असाल तर त्याला हे Add-ons जोडावे शुद्ध शब्द लिहिण्यास मदत होईल.
सल्ल्याबद्दल आभारी.

स्वगत: हा नाना जातो कुठे माझ्या तावडीतून.

फारच हिंस्त्र विचार आहेत तुमचे. जरा देवाचे अभंग वगैरे वाचत जा. मन शांत होईल, वाईट विचार मनात येणार नाहीत. हरिपाठाच्या अभंगापासुन सुरवात करा...

मी-सौरभ's picture

3 Aug 2010 - 7:57 pm | मी-सौरभ

हाबिणंदन करणारा धागा होता ना हा?????

विकास's picture

3 Aug 2010 - 8:42 pm | विकास

वरील दोन (शुद्ध लेखनासंदर्भातील) प्रतिसाद हे या धाग्यात अवांतर आहेत. तसेच शुद्धलेखन मिपाच्या धोरणात बसत नाही.* असेच पुढे चालू राहीले तर अप्रकाशीत करण्यात येतील हे संबंधीतांनी ध्यानात ठेवावे. ;)

* शुद्धलेखन मिपाच्या धोरणात बसत नाही, म्हणून अशुद्ध विचार बसतात असा उलट अर्थ कोणी कृपया काढू नये. :-)

नितिन थत्ते's picture

3 Aug 2010 - 11:59 pm | नितिन थत्ते

>>शुद्धलेखन मिपाच्या धोरणात बसत नाही

आधिकारिक शब्द राहिला का?
(पळा आता... ;) )

नितिन थत्ते's picture

3 Aug 2010 - 8:06 pm | नितिन थत्ते

नानाने "संपादकांनी तक्रार करण्याची वेळ आणली नाही" म्हणून धागा काढला तेवढ्यात.....

इन्द्र्राज पवार's picture

3 Aug 2010 - 8:21 pm | इन्द्र्राज पवार

पण अवलिया जी.... तुम्ही अगोदरच भीती व्यक्त केल्याप्रमाणे संपादकांनी "त्या दोन" प्रतिसादावर अखेर कात्री चालविलीच. तुम्ही जिंकलात. (पण त्यामुळे या अभिनंदन धाग्यातील जोर थोडा कमी होणार.)