---भाग - १ ---
---भाग - २ ---
---भाग - ३ ---
---भाग - ४ ---
आज तर पार्टी झालीच पाहिजे शेखर्या. मी काहीही ऐकणार नाही" - असं म्हणत तुषारने पुन्हा बाटल्या रुमवर आणल्या.
नाही नाही म्हणत ती पार्टी पण झाली. आणी सारीका प्रकार मी विसरलो नसलो तरी बालाच्या पाठींब्यावर हळु हळु पुन्हा पार्ट्यांचे चक्र सुरु झाले. अर्थात प्रेरणापासुन लपवुनच.
पण हे किती दिवस चालणार होतं. निसर्गाचे काही अलिखित नियम असतातच ना
"मी तुला का आवडते? तुझा चेहरा कायम माझ्यासमोर असतो, आपण लग्नानंतर हे करुया, ते करुया" इथुन प्रेमाची सुरुवात झालेली वाक्ये आता "तु माझा फोन का नाही उचललास?, तुला माझी काहीच किंमत नाही का?" इथवर पोहोचली होती. दरम्यान तरुणाईच्या सागरात रुपेश-दिप्ती, सचिन्-शीतल यांच्याही प्रेमकहाण्या तरत होत्या. ग्रुपमधे भांडणे वाढु लागली होती, मित्रांमधे ताटातुट जाणवु लागली होती. पार्ट्या आणी गर्लफ्रेंडस यावर होणार्या खर्चामुळे सर्वांनाच पैसे कमी पडु लागले होते, उधार्या अव्वा च्या सव्वा झाल्या होत्या, म्हणुन मी पार्ट टाईम नोकरी करण्याचा निर्णय घेतला. एका कॉल सेंटरमधे रात्रपाळीची नोकरी मला मिळाली.
पण या नोकरीमुळे आयुष्य एकदमच विस्कळीत झाले. कॉलेज आणी मित्रच काय तर प्रेरणासाठीही मला वेळ देता येईना. दिवसा झोप, थोडंफार कॉलेज आणी नोकरी यात मी पुर्णपणे बांधला गेलो.
"तु हे ह्या पार्ट्या, दारु, सिगारेट सोडुन का देत नाहीस शेखर?, आजकाल तुझं कशातही लक्ष नसतं, रात्रीची नोकरी करुन तुझी तब्येतही खालावली आहे" - प्रेरणा
"मी खुप मनापासुन प्रयत्न करतो गं, पण माझा स्वतःवर ताबा नाहीये. तु जवळ असलीस की मला कशाची गरज वाटत नाही गं, पण पुन्हा त्या दुनियेत गेलं की मी मी रहातच नाही, कुणी दुसराच शेखर असतो तो." - माझ्या डोळ्यात अश्रु तरारले.
"मी तुझ्यावर खुप प्रेम करते, तुला कोणताही त्रास झालेलं मला बघवणार नाही शेखर." - प्रेरणा. तिचा एक अश्रु गालावर ओघळला.
मी तिला हलकेच मिठीत घेतले आणी तिचे डोळे पुसले आणी गंभीरपणा घालवण्यासाठी म्हणालो "रडु नकोस गं, चेहर्यावरचा मेक अप पुसला जाइल आणी उगाच मी घाबरुन पळेन इथुन."
या विनोदावर ही हलक्च हसली आणी मिठी आणखीनच घट्ट झाली. ओठांना ओठ भिडले आणी दोन जीव एका क्षणासाठी जग विसरले.
हळु हळु प्रेरणाला मी फारच "टेकन अॅज ग्रांटेड" समजायला लागलो होतो. तिच्या काही ईच्छा-अपेक्षा असतील याचा मला विसर पड्ला होता. तिला जर मी भावी साथीदार म्हणून पहात होतो तर तिला पुरेसा वेळ देणं, तिच्य एक दोन का होईना गोष्टी ऐकणं गरजेचं होतं. तिच्यावर माझं नितांत प्रेम होतं यात तिळमात्रही शंका नव्हती. पण मी सुद्धा देव नव्हतो, चुका करण मला भाग होतं, त्यातुन शिक्षा मिळेपर्यंत. थोडा खर्च आवरला असता तर नोकरीची गरज पडणर नव्हती, पण एकदा माणुस एका जीवनपद्धतीला रुळला की मग त्याच्यासाठी ती लाईफस्टाईल बेंचमार्क होऊन बसते. माझही काहीस असच झालं होतं. धागा तुटेल तिथे गाठ मारुन पुढे जात राहिलो. एक दीड वर्ष हे चालु होतं.या वर्षीचे रिझल्ट आले होते. मी, रुपेश, सचिन सगळे नापास झालो होतो. एक वर्ष वाया गेलं होतं. सगळ्यांच्या गर्लफ्रेंड्स पुढे निघुन गेल्या होत्या.
प्रेरणाशी बोलुन आज तीन चार दिवस झाले होते. ती माझा फोन उचलत नव्हती आणी कॉलेजलाही आलेली नव्हती. काय झालयं कळायला काही मार्ग नव्हता.
संध्याकाळी अचानक माझा मोबाईल वाजतो, प्रेरणाच्या घरचा नंबर बघुन मी खुश होतो. पलिकडुन अनोळखी आवाज येतो. "शेखर, मी प्रेरणाचा मामा बोलतोय. तुझ्या आणी प्रेरणामधे जे काही होतं ते सगळं विसरुन जा. आम्हाला सर्व कळालं आहे, आणी पुढे काहीही प्रॉब्लेम नकोत म्हणुन हे सर्व आताच थांबायला हवं. मी जे बोलतोय ते तुझ्या लक्षात आलं असेलच." - मामा
"मला आधी प्रेरणाशी बोलायचं आहे" - मी.
"ते शक्य नाही. जे बोलायचं आहे ते माझ्याशी बोल." - मामा
"ठीक आहे. नीट ऐका. एकदाच सांगतो, प्रेरणाला विसरणं मला शक्य नाही आणी तुम्हीच काय तर तिचे आई वडील सुद्धा आम्हाला अडवु शकणार नाहीत." - मी
"काय समजतोस स्वतःला? अजुन शिक्षण पुर्ण झालं नाही, नोकरी नाही, कोणत्या गोष्टीचा रुबाब करतोस?" - मामा
"माझ्या प्रेमाचा. आणी मला खात्री आहे की प्रेरणासुद्धा माझ्याशिवाय कुणाशी लग्न करणार नाही. मी उद्या प्रेरणाच्या घरी येतो आहे. काय तो सोक्ष मोक्ष तिथेच लागेल." - मी.
"ठीक आहे. तिच्या बापाचा जीव घ्यायचा असेल तर नक्की ये." - मामा
"म्हणजे?" - मी
"तिच्या वडीलांना तुमचा हा प्रकार ऐकुन हृदयविकाराचा झटका आला होता तीन दिवसांपुर्वी. आजच सकाळी हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज मिळालाय. मी तुला हात जोडुन विनंती करतो. माझ्या बहिणीचं घर उध्वस्त करु नकोस" एवढं बोलुन मामाने फोन ठेवला.
त्या दिवशी रात्री मी पहाटेपर्यंत प्यालो, आणी प्रेरणाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी साडेसात वाजता मी प्रेरणाच्या घराची बेल वाजवली.
प्रेरणाच्या आईने दरवाजा उघडला. मे शेखर आहे सागितल्यावर तिने धाड्कन दरवाजा बंद केला. मी तिथेच थांबलो. डोकं शांत ठेवण्याचं मी ठरवलं होतं. दरवाजा पुन्हा उघड्ला.
"तु इथुन निघुन जा. का आलास? प्रेरणाच्या बाबांची तब्येत बरी नाही. तु माझ्या मुलासारखा आहेस. तु आता इथुन निघुन जा आणी सर्व विसरुन जा" - प्रेरणाची आई.
"मी इथे सर्वांशी शांतपणे बोलायला आलो आहे. मला कोणालाही कोणताही त्रास द्यायचा नाही." - मी
प्रेरणाच्या आईने पुन्हा दार लावुन घेतलं.
मी पण हटणार नव्हतो. दुपार होईपर्यंत मी खिडकीखाली उभा राहिलो. प्रेरणाचा गोंडस लहान भाऊ मला बोलवायला आला. मी आत गेलो. प्रेरणाची आई आणी मामा सोफ्यावर बसले होते, आणी वडील आरामखुर्चीत बसले होते. प्रेरणाचा चेहरा तिच्या बाबांवर गेलाय असा एक विचार माझ्या मनात चमकुन गेला. सर्वांच्या चेहर्यावर काळजी, भिती, चिंता सगळं एकत्र दिसत होतं. प्रेरणाच्या भावाने मला एक ग्लास पाणी आणुन दिलं.
"प्रेरणा कुठे आहे? - मी
"ती आत आहे, पहिले मला तुझ्याशी बोलायचं आहे्." - प्रेरणाच्या आई आणी मामाने मला अर्धा तास लेक्चर दिले. मी सुद्धा न चीडता शांतपणे माझी बाजु मांडत होतो पण "प्रेरणाला सुद्धा तुझ्याशी लग्न करायचं नाहीये" असं आईने म्हणताच माझा भडका उडाला, पण प्रेरणाच्या बाबांची अवस्था पाहुन मी पुन्हा राग गिळला आणी म्हणालो - "तुम्ही जे म्हणता ते मला प्रेरणा जर समोर येऊन म्हणाली तरच मी मान्य करेन. तिला माझ्यासमोर बोलवा."
प्रेरणाची आई आत गेली आणी पाचदहा मिनिटांनी प्रेरणाला घेऊन बाहेर आली. प्रेरणाचा कोमेजलेला चेहरा, रडुन सुजलेले डोळे मला स्पष्ट जाणवले आणी पाण्यातुन बाहेर पडलेल्या माश्याप्रमाणे माझा जीव तडफडला.
"प्रेरंणा, सांग त्याला की तुला त्याच्याशी लग्न करायचं नाही म्हणुन" - आई.
माझे कान तिचा आवाज ऐकायला तरसले होते आणी मला तिच्यावर पुर्ण विश्वास होता. माझे प्राण माझ्या कानात गोळा झाले.
"शेखर, मला तुझ्याशी लग्न करायचे नाही. तु प्लीज ईथुन निघुन जा" - ती माझ्याकडे न पहाताच म्हणाली आणी पुन्हा आत निघुन गेली.
कानात उकळतं तेल कुणी ओतावं असं झाल, अचानक वादळ सुटावं, सर्वात मजबुत वृक्षावर वीज कोसळावी, तो वृक्ष उम्हळुन पडावा आणी त्याने लागलेल्या आगीत सगळं जंगल बेचिराख व्हाव अशीच काहीशी लहर माझ्या अंतरात उठली. माझं निश:ब्द, निष्प्राण शरीर तिथुन उठलं भिंतीचा आधर घेत घराच्या बाहेर पडलं आणी पुन्हा रुमवर परत आलं.
साधी मुलगी, कधी घराबहेर न पडलेली, वडिलांच्या जीवापुढे आणी आई-मामाच्या ब्रेन वॉशिंगमुळे तुटली, झुकली, ते म्हणतील तसं करायला तयार झाली. पण माझं काय? मी काय करु? मी केलं होतं प्रेम, जीवापाड. आयुष्यभराची स्वप्न पाहिली होती मी तुझ्याबरोबर आणी तु मला या आगीत एकट्यालाच सोडुन निघुन गेलीस? का अशी वागलीस माझ्याशी प्रेरणा. का?
ती कोणत्या परिस्थितीत अशी वागली हे मला माहित होतं पण माझं मन हे मानायला तयार नव्ह्तं. त्याला तिची ती शेवटची वाक्य ऐकायला यायची अन मग ते फितुर, बेलगाम व्हायचं. माझा स्वत:वरचा सुटलेला ताबा, माझं फितुर मन आणी भोसकलेला आत्मा यांनी माझं जगणं अवघड करुन टाकले होते.
दरम्यान प्रेरणाच्या वडीलांनी दुसर्या शहरात बदली करुन घेतली आणी तिचे अॅडमिशनही तिथल्याच एका कॉलेजात करुन घेतले असे कळाले. माझ्या देवदास बनण्याचा प्रक्रीयेला आणखीनच वेग आला.
रुपेश आणी सचिन दोघांचे त्यांच्या गर्लफ्रेंड्स बरोबर काही ना काही कारणाने ब्रेकअप झाले आणी "कौन बनेगा देवदास?" च्या खेळात सामील झाले आणी फक्त ब्रेकअप वाले देवदास बनु शकतात याला अपवाद हवा म्हणुन तुषार आम्हाला सामील झाला. आम्ही पुन्हा एकदा चांगले मित्र झालो होतो. दारु आणी दारु आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाली होती. शिव्या, चीडचीड, राग कॉलेजात आणी कॉलेजबाहेर मारामार्या, फ्रस्टेशन ही आमची नविन लाईफस्टाईल होती.
चौघं गांजा पीत बसलो होतो.
"चायला. आपल्या आयुष्यात काही एक्साइटींगच नाहीये. आपलं आयुष्य उध्वस्त करुन ह्या पोरी मस्त मजेत जगतायेत. अशा पोरींना सोडलं नाय पाहीजे" - रुपेश
"मग. काय एक्साइटींग करायचं आपण" - सचिन
"मग काय अशा पोरींचा खुन करायचा आणी शिक्षा द्यायची" - तुषार
"हो. असंच करायला पाहिजे" - रुपेश चडफडुन शिव्या देऊ लागला.
"अरे भो**च्या, आपण फासावर नाही का लटकणार?" - मी
"नाही. असंही कोणतं आयुष्य जगतोय आपण. प्लॅनच असा करायचा की कुणाला खबर लागली नाही पाहिजे. पण ह्या पोरींना शिक्षा झालीच पाहिजे" - सचिन.
"ज्या पोरी पोरांवर जाळं टाकायला सुरुवात करतात, त्त्यांच्यावर नजर ठेवुन मोका मिळताच त्यांना खलास करायचं" - रुपेश
सगळ्यांचे रक्ताळलेले सैतानी डोळे एकमेकाकडे बघत होते. आतल्या ज्वालामुखीला वाट मिळाली होती. सैतान जागा झाला होता.
क्रमशः
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 11:51 pm | यशोधरा
ममो, हे रे काय.. :(
13 Jul 2010 - 11:57 pm | स्वप्निल..
:S
14 Jul 2010 - 12:29 am | श्रावण मोडक
कलाटणी तंत्र? चालू द्या. वाचतोय.
14 Jul 2010 - 2:04 am | Pain
"मी खुप मनापासुन प्रयत्न करतो गं, पण माझा स्वतःवर ताबा नाहीये. तु जवळ असलीस की मला कशाची गरज वाटत नाही गं, पण पुन्हा त्या दुनियेत गेलं की मी मी रहातच नाही, कुणी दुसराच शेखर असतो तो."
=)) =)) =))
14 Jul 2010 - 2:26 am | गणपा
बाबौ काय लिहितोय बे :O
14 Jul 2010 - 2:53 am | रेवती
बापरे!!
ममोसाहेब, काय हो हे?
बरं ,आता लिहा पुढचा भाग लवकर!
रेवती
14 Jul 2010 - 3:02 am | भडकमकर मास्तर
हे राम
14 Jul 2010 - 7:19 am | छोटा डॉन
कथानक मजेशीर वाटत आहे.
वाचतो आहे, पटकन पुढचा भाग येऊद्यात शेठ !
------
छोटा डॉन
14 Jul 2010 - 7:52 am | स्पंदना
=((
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
14 Jul 2010 - 1:03 pm | रंगोजी
तुम्ही तर गुगली टाकली की राव..
त्रिफळाचीत झालो. पुढचा भाग लवकर टाका!!
-रंगोजी
14 Jul 2010 - 1:08 pm | स्मिता चावरे
भलत्याच मार्गाला लागली की ही मुलं!!
पुढील भाग वाचण्याची उत्कंठा वाढली आहे.
14 Jul 2010 - 6:50 pm | प्रभो
काय रे ममो, कुलकर्ण्यांच्या विशल्याची ट्युशन लावलीस काय???
जबरा कलाटणी...