पुस्तकविश्व.कॉम - मराठी वाचकांसाठी नवीन संकेतस्थळ. BETA 1.0

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
16 Mar 2010 - 10:19 pm

नमस्कार,

मराठी पुस्तकांच्या चाहत्यांसाठी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर परिक्षण लिहीण्यासाठी आणि आपल्यासारखी आवड निवड असलेल्या लोकांशी मैत्री करण्यासाठी अनेक नवीन सुविधा घेऊन नवीन संकेतस्थळ आकार घेत आहे त्याचे नाव आहे पुस्तकविश्व.कॉम ( www.pustakvishwa.com).

मराठी पुस्तकांना आणि साहित्यविश्वाच्या घडामोडींना वाहलेले हे संकेतस्थळ अतिशय उत्तम व्हावे यासाठी लोकायत टीम काम करते आहे.

पुस्तक परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा आदी या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.

या प्रकल्पाच्या वेळी अनेक नवीन सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.

आज हा प्रकल्प घोषीत करतोय तो निर्मीती अवस्थेत आहे म्हणजेच BETA 1.0 या टप्प्यावर संकेतस्थळ किमान तयार आहे आणि आता ते वापरून सर्व सोयी योग्य चालतात की नाही हे तपासण्याची गरज आहे. ओळखीच्या लोकांना मेल टाकण्याचा विचार आहेच मात्र येथे सुध्दा एक मदतीचे आवाहन आहे की ज्यांना या चाचणी टप्प्यावर या प्रकल्पात सहभागी व्हायचे आहे त्यांनी admin@pustakvishwa.com येथे संपर्क साधावा. मागचा अनुभव पाठीशी असल्यामुळे यावेळी चाचणीच्या टप्प्यावर जरा जास्त भर आहे. :)

सध्या संकेतस्थळावर सदस्य नोंदणी ही आमंत्रीतांसाठीच आहे( Invite only) त्याला कारण हेच की चाचणी आटोपल्यावर निर्दोष संकेतस्थळ लोकांना सादर करावे हा प्रयत्न आहे.

या प्रकल्पाबाबत काही सूचना किंवा काही अपेक्षा असतील तर त्यांचे स्वागतच आहे.

- नीलकांत

भाषावाङ्मयसाहित्यिकप्रकटनलेखमाहिती

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

16 Mar 2010 - 10:41 pm | प्रमोद देव

माझ्यातर्फे ह्या प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा!

मुक्तसुनीत's picture

16 Mar 2010 - 11:03 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो !

श्रावण मोडक's picture

16 Mar 2010 - 10:42 pm | श्रावण मोडक

अभिनंदन. प्रकल्पाला शुभेच्छा...
संकेतस्थळावर आत्ता निघालो आहे!

Nile's picture

16 Mar 2010 - 11:24 pm | Nile

ह्येच म्हणतो. पाडव्याच्या सुमुहुर्तावर फार छान प्रकल्पाची सुरुवात! शुभेच्छा!

प्रभो's picture

16 Mar 2010 - 10:47 pm | प्रभो

अभिनंदन. प्रकल्पाला शुभेच्छा...

टारझन's picture

16 Mar 2010 - 11:04 pm | टारझन

वा रे निलकांता .. सुंदर प्रोजेक्ट आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Mar 2010 - 11:15 pm | बिपिन कार्यकर्ते

अभिनंदन / शुभेच्छा / सहभागी व्हायची इच्छा आहे.

बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२'s picture

16 Mar 2010 - 11:23 pm | शानबा५१२

मधे तात्यांना वेबसाईटबद्दल विचारल तेव्हा तुमच नाव सांगितल्,एक वेबसाईट निर्मिती बद्दल माहीती हवी sushantkadam75@gmail.com
धन्यवाद ईन अ‍ॅडव्हान्स.

_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........

शशिकांत ओक's picture

17 Mar 2010 - 12:18 am | शशिकांत ओक

उत्तम योजना. पुर्ण तयारी झाल्यावर नक्की वापरायला आवडेल. शिवाय अधिक माहिती साठी ही संपर्क करता येईल. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

देवदत्त's picture

17 Mar 2010 - 1:07 am | देवदत्त

अरे वा... अभिनंदन आणि शुभेच्छा.

हा एक मस्त योगायोग आहे. :)

आम्हीही पुस्तक परिक्षण व साहित्याला वाहिलेल्या एका संकेतस्थळाचे काम सध्या करत आहोत. आज त्याची घोषणाही करणार होतो. पण माझ्या थोड्या वैयक्तिक कामांमुळे व तांत्रिक अडचणींमुळे ते आज झाले नाही.
त्याचीही घोषणा लवकरच.

वाचक's picture

17 Mar 2010 - 1:14 am | वाचक

आधीच अस्तित्वात होते ना हे संकेतस्थळ ? मध्यंतरी बंद पडले होते असे वाटते.
परत सुरु होत असेल तर मनःपूर्वक शुभेच्छा - मलाही सहभागी करा...

नीलकांत's picture

17 Mar 2010 - 8:57 am | नीलकांत

हे संकेतस्थळ आधी सुरू होते मात्र काही अडचणींमुळे ते बंद पडले होते. अशी सुंदर संकल्पना असलेले संकेतस्थळ बंद पडू नये म्हणून लोकायत ग्रुपने ते पुन्हा नव्याने तयार केले आहे.

शेवटी उल्लेख केलेला 'आधीच्या अनुभवांवरून आलेलं जे शहाणपण" ते हेच :)

मदनबाण's picture

17 Mar 2010 - 10:25 am | मदनबाण

प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा !!! :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 10:35 am | शानबा५१२

मला सहभागी व्हायला आवडेल तेव्हा द्या आमंणत्र आणि हो जेवण मांसाहारी पण ठेवा.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

II विकास II's picture

17 Mar 2010 - 11:22 am | II विकास II

>>मला सहभागी व्हायला आवडेल तेव्हा द्या आमंणत्र आणि हो जेवण मांसाहारी पण ठेवा.
काय मुर्खपणा आहे !!!!
एकतर लोक स्वतःच्या खिश्याला खार लावुन चांगले समाज उपयोगी संकेतस्थळ काढत आहेत. आणि तुम्ही टर उडवत आहात.

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 11:30 am | डावखुरा

मलाही आमंणत्र हवे आहे..... "राजे!"

अरुंधती's picture

17 Mar 2010 - 2:56 pm | अरुंधती

आपल्या प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/