हो मी अर्जुन आहे..
तोच तो अचूक लक्ष्यवेध करणारा
गुणवत्तेने भरलेला
नव्या चक्रव्यूहात अडकलेला
न लढताच पराभूत झालेला
हो मी अर्जुन आहे..
या महाभारतात कृष्ण शोधतो आहे
जगण्याचे सर्व संदर्भ बदललेल्या
या महाभारतात कृष्ण कोठे शोधायचा
जरी सापडला तरी
माझ्या वाटणीला किती यायचा
ईथे अवती भवती सारेच अर्जुन
दिशा हरवलेले...
तो कृष्ण..
सखा गुरू ज्ञाता
परिस्थितीची जाणीव करून देणारा
ध्येयाची जाणीव करून देणारा
मला कृष्ण हवाय
मार्ग दाखवणारा
माझ्या रथाचं सारथ्य करणारा
माझं मनोधैर्य ऊंचावणारा
नारायणा.... माझे दु:ख
तुझ्या शिवाय कुणालाच न सांगण्यासारखे
तुझ्या शिवाय कुणालाच न समजण्यासारखे
कृष्णा धाव रे
तुझ्या शिवाय न कोण वाली रे
युगंधरा, त्रिविक्रमा...
माझी लढाई मीच लढेन
तू फक्त पाठीशी रहा
तुझा आशिर्वाद हवा
प्रतिक्रिया
25 Apr 2018 - 1:31 pm | पद्मावति
मुक्तक आवडले.
26 Apr 2018 - 3:24 am | निओ
धन्यवाद पद्मावति.
26 Apr 2018 - 4:47 am | चित्रगुप्त
माझी लढाई मीच लढेन
तू फक्त पाठीशी रहा