सध्या सर्वाना पुढे जायची घाई आहे. परंतु काहि महाभागांना मात्र जरा जास्तच घाई दिसते. ही सतत व्यस्त, त्रस्त आणि काहिशी अत्यव्यस्त असणारी मंडळी भेटणार्यांची अनेक ठिकाणे आहेत. प्रामुख्याने ATM, पेट्रोल पंप, ट्राफिक सिग्नल्स, टिकिट खिडकी इत्यादी ठिकाणी ही मंडळी हटकुन भेटतात. गर्दीच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने वाहने पळवनारे कुशल वाहन चालक याच जात कुळीतले. बहुतेक सर्वाना रेल्वे स्टेशन वर जायचे आहे व पोहचले नाहीतर यांची गाड़ी सुटनार, अर्थातच गाडी सुटली तर यांचे आयुष्यभराचे नुकसान होणार, असेच आपल्याला वाटावे एवढ्या सुसाट वेगात ही मंडळी जात असतात. कधी कधी तर यांचा जवाळचा नातलग ईस्पितळ मधे आहे आणि त्याला हवे असलेले रक्त यांच्याच जवळ आहे असे ही वाटते. ही मंडळी एवढ्या वेगात जाते की आपल्या छातीत धडकी भरते. मधे एकदा असाच वेगात निघलेला तरुण माझ्या छातीत धडकी भरून माझ्या जवळून गेला. पहाटेचि वेळ होती, मला वाटले याचा नक्की पेपर असणार. बिचारा रात्रभर जागला असणार सकाळी सकाळी डोळा लागला असणार. आता निघायला उशीर झाला त्याला तो तरी काय करणार ?
आई वडिलांची स्वप्न पुरी करण्यासाठी ही कोवळी मूल किती कष्ट उपसतात. माझे स्वप्नरंजन थोड्याच वेळात , धावत्या गाडीला ब्रेक लावावा तसे खचकन थांबले. कारण थोड्याच वेळा पूर्वी माझ्या समोरून झपाट्याने गेलेला तरुण रस्त्या शेजारील एका पानठेल्यावर गप्पा मारत उभा होता. एवढ्या वेगात निघालेले हे प्रवासी शेवटी पोहचतात कुठे हा मला नेहमी पडनारा प्रश्न. ऐक मात्र खरे गुळगुळीत रस्त्यावर दिसनारी स्पीडब्रेकर (शासकीय मराठीत गतिरोधक) यांच्या मुळेच करावी लागतात. परंतु हे स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेक करायला आहेत की हाडं याचा उळगळा मात्र होत नाही. एकदा एका हाडाच्या दवाखान्या समोर भलामोठा स्पीड ब्रेकर मी बघितला होता, तो या डॉक्टर च्या सोईसाठीच केला की काय असा कुत्सित विचार माझ्या मनात यायचा. एकदा तर एका अडलेल्या बाईला वाहनातच मूल या स्पीड ब्रेकर मुळे झाले म्हणे. (लोक पण काहिही अफवा करतात )
आपण घाईतल्या लोकांविषयी बोलत होतो. वर जी यांची आवडती स्थानं सांगितली त्यातलच एक म्हणजे ATM. खरतर ATM मुळे वेळेची प्रचंड बचत होते असा माझा अनेक दिवस गैर समज होता, आणि हो तो गैर समज या उद्योगी लोकंनीच दुर केला. तुम्ही ATM च्या आतमधे आहात आणि तुमचा पिन नंबर चुकला, तुम्ही परत प्रयत्न करणार नेमका त्यावेळेस वर उल्लेखीत उद्योगी स्वभावाचा व्यक्ति नेमका तुमच्या मागे असला तर तो खचकन दरवाजा लोटनार व तुम्हाला विचारणार "क्या बात है ! पैसा नहीं क्या?" तुम्हाला मानसीक ताण येणार त्या ताणात तुम्ही परत पिन नंबर विसरणार तो परत आत येणार आता त्याचा प्रश्न " क्या बात है ? जम नही रहा क्या ?" या पूर्वी तुम्ही अनेक वेळा पैसे काळले असले तरी तो तुमच्या कड़े "नया है यह" च्या अविर्भाव आणत पाहनार. शेवटी तो तिथून हटनार नाही. "तुम्ही म्हणणार अच्छा पहले आप निकाल लो" शेवटी तो प्रचंड उद्योगी असल्यामुळे तुम्हचे ऐकणार. माझ्या सारख्या रिकामटेकळ्या माणसाला अशी बिजी लोक नेहमीच भेटतात. अशीच काही घाईतली लोकं भेटन्याची जागा ट्राफिक सिग्नल्स. खरतर ट्राफिक सीगनल्स वर कोणी निवारा करण्यासाठी आलेला नसतो. सध्या लाल सिग्नल सुरु आहे, हिरवा सिग्नल सुरु व्हायला काही सेकन्दाचा अवकाश लगेच मागून हॉर्न वाजने सुरु झाले की समजावे मागे कोणी उद्योगी व्यक्ती आहे. आपल्या सारखा रिकामा व्यक्ति नेमका त्याच्या समोर यावे हे त्याचेच दूर्देव
पेट्रोल पंपवर तर ही मंडळी एवढ्या शिताफीने गाडी लावतात की तुम्ही ही विचार कराल की माझी लाइन बरोबर की याची. टिकिट साठी खिडकित उभे राहणाऱ्या माझ्या सारखी वेंदळी, ही मानसं नसतात. रांगेत आपल्या समोर उभ्या असणाऱ्या युवकाला चुपचाप पैसे देवून ही आपल्या आधीच टिकिट काढून घेणार. काही काही तर इथे चक्क लाइन नाही असे समजून थेट टिकिट खिडकी जवळ जातात. मागून ओरड होते "दिखता नही क्या लाइन हैं! "
या प्रकारच्या लोकांना कायम घाई असते घरी दारी कुठेही यांचा जन्मच घाईत झाला का असा संशय मला वारंवार येत असतो. ही माणसं तुमच्या माझ्या सारख्या धीमी गतीसे चलने वाल्यांना कधी आडवी येतील सांगणे कठिन.
सुधीर विनायकराव देशमुख
अमरावती
15/05/16
http://sudhirvdeshmukh27.blogspot.in/
प्रतिक्रिया
9 Aug 2017 - 5:03 pm | रेवती
घाईने गाडी हाणून, अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवून पुढे ही मंडळी काय तीर मारणार हा प्रश्न मलाही पडतो. समोर लाल सिग्नल असताना तुफानी वेगात जाऊन काय करणार बाबा? सगळ्यांनाच तिथे थांबायचे आहे. आमच्या आजूबाजूचे लोक्स तर आपण भारतीय असल्याचे सर्व जगाला समजलेच पाहिजे अशा थाटात गाड्या हाणत असतात. इथल्याइथे गल्ली बोळातल्या भारतीय लोकांनी २० मैलाची स्पीडलिमिट असताना अॅक्सिडेंटस करून घेतलेत. २० मैलाची मर्यादा ओलांडून किती ओलांडणार? ३० नाही तर ५० मैल? अपघातांचे परिणाम असे आहेत की गाडीचा चुराडा, दुसर्याची पाठ मोडणे, एकाचे डोके फुटणे. यासाठी जितका स्पिड लागतो तितका! आमची पोरे बाहेर सुसाट खेळत असतात. लहान पिल्ले चालायला शिकत असतात. इतक्या जोरात गाडी चालवून काय करणार तर बाहेरून मेथीची जुडी आणणार नाहीतर घरी जाऊन टीव्हीवर काहीतरी बघत बसणार. खूप राग येतो मला.
एटीएमवर तर लेखकाला आलेला अनुभवच मला आला. एकतर एका एटीएममध्ये दोन किंवा तीन यंत्रे असताना वागण्याची पद्धत असते. माझी खटपट पाहून शेजारील मनुष्य "काय ओ तै, पैशे नैत का मशिनीत?". म्हटलं "मला माहीत नाही, माझ्याकडूनही चूक झाली असेल". असे म्हटल्यावर शेजारीच येऊन उभा राहिला. "हां, दाबा तुमचा नंबर, बघुया पैशे संपलेत काय?" मग मीही जरा वैतागाने त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या मशीनवर जावा त्याशिवाय मी पिन दाबणार नाही. तर हा दिव्य मनुष्य त्याच्या यंत्रावर गेला व माझ्या एटीमच्या स्क्रीनवर वाकून पाहू लागला. मग मी चिडले. मला योग्य पिन दाबल्यावर पैसे मिळाले तरी या माणासाची भीती वाटत राहिली.
पेट्रोल पंपावर रात्री उशिरा तेरा चौदापेक्षा जास्त वय नसलेली मुले पेट्रोल भरायला आली होती हे दोनदा पाहिले. ती कशीही दुचाकी चालवत होती व पाय टेकत नव्हते इतकीच उंची होती.
9 Aug 2017 - 10:51 pm | साहना
आमच्या भारतीयांच्या विचारपद्धतीत एक फार मोठी खोट आहे आणि ती म्हणजे दुसऱ्याचं काही चांगलं होत आहे म्हणजे आपले नुकसान असे समाजणे. बहुतेक मानवी कार्ये पॉसिटीव्ह सम गेम असतात. म्हणजे सर्वच लोकांनी शिस्त पळून गाडी चालवली तर सर्वच जण वेळेवर पोचतील पण नाही....
ह्याचे मूळ कारण शेवटी अत्यंत गरिबी हे असते. अत्यंत गरिबीतून वर येणाऱ्या लोकांना प्रत्येक ट्रांसकशन हे झिरो सम गेमच वाताचे.
10 Aug 2017 - 4:46 pm | स्मिता.
जास्त रहदारीच्या वेळी, बँकेत गर्दीच्या वेळी उगाच 'बॉटलनेक' करून आपण सर्वांकरताच उशीर करत असतो हे कोणालाच समजत नाही. त्यापेक्षा शिस्तीत एकामागे एक गेल्यास सुरळीतपणे पुढे सरकता येते हे आपल्याला कधी वळेल देव जाणे.
10 Aug 2017 - 8:52 am | औरंगजेब
रेल्वेपास काढतानापण हा अनुभव येतो. प्रथम वर्गाचा पास लाईनशिवाय मिळतो. पण सकाळी काढायला गेलं की सगळे काहितरी प्रचंड गुन्हा आपण करतो आहोत असा चेहरा करुन आपल्याकडे बघतात.
10 Aug 2017 - 8:53 am | औरंगजेब
रेल्वेपास काढतानापण हा अनुभव येतो. प्रथम वर्गाचा पास लाईनशिवाय मिळतो. पण सकाळी काढायला गेलं की सगळे काहितरी प्रचंड गुन्हा आपण करतो आहोत असा चेहरा करुन आपल्याकडे बघतात.
10 Aug 2017 - 12:19 pm | अत्रन्गि पाउस
माणूस जितका क्षुल्लक तितकी त्याला घाई जास्त असं एक निरीक्षण आहे ...
10 Aug 2017 - 1:28 pm | सामान्यनागरिक
आपण चारचाकी गाडीत सिग्नलवर उभे असतो. पुढील वाहन आणि आपल्या वाहनांच्या मध्ये दोन फुटांचे सुरक्षित अंतर ठेवलेले असते. हे महाभाग (आणि महाभागिणी सुद्धा) आपली दुचाकी घेऊन दोन वाहनांच्या मधील अंतरातून आपली दुचाकी वाकडी तीकडी करून काढून नेतात. आणि ज्याला उजवीकडे वळायचं असतं तो एकदम डावीकडे दुचाकी नेऊन उभी करयो. सिग्नल हिरवा झाल्यावर मग तो मागे उभ्या असलेल्या सगळ्यांना दाबून आपली दुचाकी उजवीकडे दामटतो.
एवढं करून तो परत पुढच्या सिग्नल वर उभा असलेला दिसतोच !
काय मिळतं एवढा जीव काढून ? मागे असलेल्या शेकडो लोकांच्या शिव्या खाऊन ? कुठेतरी या तळतळाटामुळे नुकसान होत असणारच !
10 Aug 2017 - 1:29 pm | सामान्यनागरिक
आपण चारचाकी गाडीत सिग्नलवर उभे असतो. पुढील वाहन आणि आपल्या वाहनांच्या मध्ये दोन फुटांचे सुरक्षित अंतर ठेवलेले असते. हे महाभाग (आणि महाभागिणी सुद्धा) आपली दुचाकी घेऊन दोन वाहनांच्या मधील अंतरातून आपली दुचाकी वाकडी तीकडी करून काढून नेतात. आणि ज्याला उजवीकडे वळायचं असतं तो एकदम डावीकडे दुचाकी नेऊन उभी करयो. सिग्नल हिरवा झाल्यावर मग तो मागे उभ्या असलेल्या सगळ्यांना दाबून आपली दुचाकी उजवीकडे दामटतो.
एवढं करून तो परत पुढच्या सिग्नल वर उभा असलेला दिसतोच !
काय मिळतं एवढा जीव काढून ? मागे असलेल्या शेकडो लोकांच्या शिव्या खाऊन ? कुठेतरी या तळतळाटामुळे नुकसान होत असणारच !
10 Aug 2017 - 9:25 pm | अमरेंद्र बाहुबली
जोरात गाडी चालवणे वाईटच. त्याच्याशी सहमत.
पण एटीएम बद्दल घाई करनार्यांची काहीच चुकी नसते. एकतर रांगेत ऊभ राहण्याची कोणालाही हौस नसते. आणि त्यातच बँलेंस चेक करायला येणारे डोक उठवतात.
काही महाभाग तर 15मिनिट रांगेत उभे असताना मोबाईल मध्ये घुसतील व मध्ये शिरल्यावर पासवर्ड आठवतील 4 वेळा चुकीचा टाकतील. त्यात त्यांचाही खोळंबा नी मागे ऊभे असलेल्यांचाही खोळंबा.जगात बाकी लोकही असतात हे ते सोयीस्करपणे विसरतात. मग अश्यांना अक्कल शिकवली तर चुकते कुठे??
( स्वानूभवावरून).
11 Aug 2017 - 11:17 am | अत्रन्गि पाउस
रांगेत शांत पाने उभे राहणे आणि आपली टर्न येई पर्यंत संयम बाळगणे हे सभ्य संकृतीतले बिग्रीतले धडे आहेत जे आपल्याला पाळायचे कधी शिकवलेले नसते
तुमचा काय संबंध ?? ए टी एम कुणी कशासाठी कितीवेळ वापरावे ह्याचा काही कायदा नाहीये , एखादा वृद्ध किंवा नवशिका वापरत असेल तर वेळ लागतोच, कधी कधी मशीन स्लो असते किंवा एकावेळी अनेक गोष्टी करायच्या असतात ...
ए टी म वर कार्यरत असणार्या ग्राहकाच्या जवळ जाण्याचा, त्याला अनाहूत सल्ले देण्याचा प्रयत्न करणे हे शुद्ध आगाऊ पण आहे इतकी घाई असेल तर दुसरे मशीन शोधावे ..
अगदी फारच वाटले ए टी एम जवळ जो वॉचमन असतो त्याच्या कडे तक्रार करावी ...
12 Aug 2017 - 1:11 pm | अमरेंद्र बाहुबली
एटीएम मशीन ची निर्मिती ही वेळ वाचावा म्हणून झालीय. बँकेला एक मीसकाँल दिल्यावर लगेच बँलेंस कळतो. ते काही खेळणे नाही. आणी नवशिक्या बद्दल समजू शकतो. पण सफाईदारपणे एटीएम मशीन हाताळणारे मिसकांल वर बँलेंस चेक करू शकत नाहीत का??
14 Aug 2017 - 12:36 pm | मराठी_माणूस
हा फार महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्याकडे पुर्णपणे दुर्लक्षीत आहे.
आपलेच काम महत्वाचे आहे आणि दुसर्याचे हे फुटकळ आहे ह्या समजातुन हे सर्व घडत असते.
10 Aug 2017 - 9:57 pm | दशानन
Inside each of us is a monster; inside each of us is a saint. The real question is which one we nurture the most, which one will smite the other. -
Jodi Picoult
10 Aug 2017 - 10:17 pm | पैसा
माझ्या वर्गातली एक मुलगी वर्गात एक धडा शिकवणे सुरू असताना पुढचा न शिकवलेला धडा वाचत होती. फडके सरांच्या लक्षात येताच तिला खास आहेर मिळाला,"---, गाडीतल्या गाडीत धावून कोणी पुढे पोचत नाही!"
घाईत आसलेल्याना असे ब्रह्मवाक्य शिकवणारे कोणी भेटले नसावे.
एटीएम वर शाळा घ्यायला बरेचदा security वाले येतात. त्यांना किंवा एसी आहे म्हणून आत बसून राहणाऱ्यांना "आधी बाहेर व्हा नाहीतर मी complaint करीन" असे सांगून हाकलून लावते
10 Aug 2017 - 10:23 pm | दशानन
मी ऑफिशली अशी तक्रार केली आहे, व या प्रकारला हलके घेऊ नका, काल-परवाच बातमी पाहिल्यानुसार किमान दोन ठग पकडले गेले आहेत पुण्यात, जे एटीम मध्ये फक्त अल्प शिक्षित / वृद्ध लोकांना फसावायला उभे असत. त्यानी लुटलेली रक्कम लाखात आहे ते ही काही दिवसात. तेव्हा सतर्क रहाणे उत्तम.
10 Aug 2017 - 11:47 pm | सौन्दर्य
गुजरातमध्ये रेल्वे फाटकासमोर दोन्ही दिशेने वाहनं लावून लोकं उभी राहतात. फाटक उघडल्याबरोबर दोन्ही बाजूची विरुध्द दिशेने जाणारी वाहने एकमेकात अशी घुसतात की जणू पानिपतचे युद्धच. टू व्हीलर, थ्री व्हीलर, टेम्पो, कार्स, tractor-trailers, सायकली सगळ्यांची एकच झुंबड उडते व मग जो तो होर्न वाजवत एकमेकांचा उद्धार करीत आपापले वाहन त्या गर्दीतुन बाहेर काढतो. मला खात्री आहे की जर प्रत्येकाने आपापले वाहन बरोबर दिशेने फाटकावर उभे केले तर वेळ आणि श्रम नक्कीच वाचतील.
11 Aug 2017 - 1:38 am | राघवेंद्र
सोलापुरात पण असे दिसायचे. ( मीटर गे
पहिल्यांदा सायकलींचे आक्रमण,
नंतर मोपेड , स्कुटर, रिक्षा असा क्रम.
11 Aug 2017 - 1:38 am | राघवेंद्र
सोलापुरात पण असे दिसायचे. ( मीटर गेज रेल्वे गेली आणि हे युद्ध पण संपले )
पहिल्यांदा सायकलींचे आक्रमण,
नंतर मोपेड , स्कुटर, रिक्षा असा क्रम.
11 Aug 2017 - 1:38 pm | वकील साहेब
असे अनुभव नेहमीच येतात. पण यात एक प्रश्न आहे की हे लोक असे का वागतात? काय कारण असते गरीबी की अशिक्षित पणा ?
साठ सेकंदाचा सिग्नल असताना या लोकांना 50 सेकंद थांबायला वेळ असतो. मात्र शेवटचे 10 सेकंद त्यांना दम धरवत नाही. यात गरीब ही असतात अन श्रीमंता घरचे ही असतात. हा विचार अन संस्कारांचा अभाव असतो म्हणून असे घडते.
पण कधी कधी असा प्रश्न पडतो की आपण शिक्षण घेऊन आणि एवढे सौजन्य पाळून काय उपयोग होतो आपण तर अजून रांगेतच उभे आहोत आणि तो तर अडाणी पणाचा आणि बावळट पणाचा बुरखा पांघरून त्याचे काम साध्य करून निघूनही गेला. या सौजण्याचा काही फायदा होण्या ऐवजी नुकसानच जास्त होते. यावर उपाय म्हणून हे असे उद्योगी जेथे कुठे भेटतील तेथे त्यांना फैलावर घ्यायचे, सरळ करायचे. पण कुणा कुणाला सरळ करणार ? head less chicken चा भरणा आहे सर्वत्र
12 Aug 2017 - 6:51 am | sudhirvdeshmukh
अभिप्रायासाठी सर्वांचे आभार !
14 Aug 2017 - 5:58 pm | Pradeep Phule
लेख सुरु झाला तेव्हा वाटलं कि तुम्ही पुण्यात राहता का.. ?
14 Aug 2017 - 6:39 pm | sudhirvdeshmukh
आणि नंतर काय वाटले?