....विश्वाची उलगड होते.....

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
16 May 2016 - 12:07 pm

....विश्वाची उलगड होते.....

केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते..
केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते..

पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते.
मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते.

तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते!
मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते.

मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही
तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.**

असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते...
नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते

धग ती नव्हतीच वणव्याची,होळीची ऊब असावी.
निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नांतहि धुळवड होते...

सर्वस्व अर्पूनि मजला,तू मज ईश्वरसम करते
मी तुझा पुजारी बनतो...पूजाही काकड होते

- कानडाऊ योगेशु

** : प.पू घासुगुर्जींना समर्पित. ;)

कविताप्रेमकाव्यगझल

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 May 2016 - 12:09 pm | प्रचेतस

मस्तच.

चांदणे संदीप's picture

16 May 2016 - 12:14 pm | चांदणे संदीप

कविता म्हटले की तुमचा पैला परतिसाद...कूच तो गडबड हय दया! ;)

प्रचेतस's picture

16 May 2016 - 12:40 pm | प्रचेतस

चांगलं ते चांगलंच :)

सतिश गावडे's picture

17 May 2016 - 11:27 am | सतिश गावडे

कविता म्हटलं की माझ्या
हृदयाच्या तारा झंकारतात
स्तब्ध होतात क्षणभर अन
श्वास माझे जणू हूंकारतात

चांदणे संदीप's picture

16 May 2016 - 12:18 pm | चांदणे संदीप

खर...निवांत अड्डा जमवून मैफिलीत दोस्तमंडळीबरोबर हातात जाम घेवून माहोल करावा असेच निवांत वाचून पुन्हा प्रतिसाद देईन!

Sandy

कानडाऊ योगेशु's picture

16 May 2016 - 3:02 pm | कानडाऊ योगेशु

धन्यवाद वल्लीसेठ आणि संदीप्भौ!

एस's picture

16 May 2016 - 3:57 pm | एस

छान कविता!

पथिक's picture

17 May 2016 - 10:34 am | पथिक

मस्तच ! खुप आवडली !

स्पा's picture

17 May 2016 - 11:13 am | स्पा

झकास

सतिश गावडे's picture

17 May 2016 - 11:24 am | सतिश गावडे

वाह... मस्त. कविता आवडली.

रातराणी's picture

17 May 2016 - 11:47 am | रातराणी

सुरेख!

कानडाऊ योगेशु's picture

17 May 2016 - 3:44 pm | कानडाऊ योगेशु

धन्यवाद एस (हे नाव एखाद्या बॉलिवुडी विलन सारखे वाटते आह०,),स्पांडु,पथिक,गावडे साहेब आणि रातराणी!